Submitted by संपदा on 5 July, 2017 - 08:34
आमच्या कंपनीमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. एक थीम निवडून त्याला अनुसरून जगभरातील विविध देशांमधील माहिती सर्वांना दिली जाते. ह्यावर्षीची थीम आहे "holidays and getaways". भारतातील पर्यटन स्थळे, त्यांची पोस्टर्स, विविध राज्यांमधील खाण्याचे पदार्थ, स्टेज परफॉर्मन्सेस असणार आहेतच. त्याशिवाय खेळ ( मसाल्याचे पदार्थ ओळखणे) / प्रश्नमंजुषा / अॅक्टिव्हिटीज ( मेंदी काढून देणे, साड्यांचे छोटेसे प्रदर्शन ) करायचा विचार आहे. १-१ तासाचे ३ स्लॉट्स आहेत. एका स्लॉटमध्ये प्रश्नमंजुषा ( लिखित स्वरूपात) घ्यायचा विचार आहे. एका स्लॉटमध्ये मेंदी ई. असेल. ३र्या स्लॉटसाठी अजून काही कल्पना सुचवल्या तर आवडतील.
मायबोलीकरांचे आगाऊ धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अष्ट विनायक, काशी यात्रा ,
अष्ट विनायक, काशी यात्रा , वैश्नोदेवी, शबरी मलय , स्थानिक देवळातली जत्रा, पंढरीची वारी असे रिलिजस टुरिझम थीम धरुन काही करता येईल का ?
>>एक थीम निवडून त्याला
>>एक थीम निवडून त्याला अनुसरून जगभरातील विविध देशांमधील माहिती सर्वांना दिली जाते. ह्यावर्षीची थीम आहे "holidays and getaways". भारतातील पर्यटन स्थळे, त्यांची~~>>
माहिती व्हिडिओत द्यायची आहे?/प्रत्यक्ष टुअर आहे? प्रेक्षकही भारतीयच/परदेशात आहेत?
माहिती प्रत्यक्ष द्यायची आहे.
रिलीजियस थीम घेणार नाही आहोत

माहिती प्रत्यक्ष द्यायची आहे. प्रेक्षक परदेशी असतील
From beaches to mountains
From beaches to mountains थीम। घ्या,
1 समुद्र किनारा, (गोवा किंवा कोकण)
1 वाळवंट ( राजस्थान किंवा कच्छ चे रण)
1 डोंगराळ हिल स्टेशन (सिमला डेहराडून,अबू)
1 अति वृष्टी ठिकाण (नॉर्थ ईस्ट)
प्रत्येक भौगोलिक परिस्थितीतील एक स्थळ घेऊन भारतातील विविधता हायलाइट करू शकता
किंवा
किंवा
पाणी हे एक थीम घेऊन पाण्याची विवध रूपे
बॅक वॉटर, समुद्र, मोठी नदी, बर्फ, वृष्टी, वाफ (अति उष्णता) दाखवणारी स्थळे दाखवता येतील.
आणि वर " आम्ही भारतीय पाण्यासारखे असतो, ज्या पात्रात (देशात) राहू त्याचा आकार घेतो" अशी मखलाशी करता येईल
फुड - अन्न
फुड - अन्न
परदेशी लोकांना भारतीय अन्न म्हणजे चिकन टिक्का मसाला असेच माहिती असते. त्यामुळे विविध राज्यांमधले वेगवेगळे पदार्थ आणि भारतीय अन्न किती संपन्न आहे ते दाखवता येईल.
तुमची कँपनी काय फील्ड मध्ये
तुमची कँपनी काय फील्ड मध्ये काम करते?
प्रॉडक्ट्स सेवा काय आहे हे सांगू शकाल का?
ज्या फिल्ड मध्ये असेल त्यातले भारतीय ल्युमिनरी ज्या राज्यातून आले त्या राज्यातील कदाचित त्यांच्याशी संबंधित स्थळे,
प्रोडक्ट असेल तर कच्चा माल ज्या राज्यातून येतो त्या विषयी,
सेवा देणारी कँपनी आणि वेग वेगळ्या राज्यात शाखा असतील तर त्या त्या राज्या विषयी.
साड्यांचे स्टॉल लावणार असाल
साड्यांचे स्टॉल लावणार असाल
तर ज्या राज्याच्या साड्या असतील त्या त्या राज्या विषयी.
पोर्तुजीझ, फ्रेंच, इन्ग्लिश
पोर्तुजीझ, फ्रेंच, इन्ग्लिश कॉलनीज आणि आर्किटेक्चर वर त्यांचा इन्फ्लुएन्स अशी थीम ठेवता येईल - गोवा, पॉंडिचेरी, सिमला, कलकत्ता
@ सिम्बा- आमची कंपनी
@ सिम्बा- आमची कंपनी सॉफ्टवेअरवालीच आहे
हा कार्यक्रम एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीचा प्रकार समजा
@धनि- इथल्या लोकांना चिकन टिक्का सोडून बरंच काही माहिती आहे. फूड स्टॉल नेहमीच गर्दी खेचतो, इथे काम करणारे भारतीय खायचे पदार्थ घरून स्वतः बनवून आणतात. त्यात दरवर्षी बरीच व्हरायटी असते
कार्यक्रम भारतात आहे की
कार्यक्रम भारतात आहे की भारताबाहेर?
रिजनल ईंडियन सिनेमा अशी एक थीम करता येवू शकेल... मोठ्या स्टेट्समधून गाजलेले पिरिअड ड्रामाज/गाणी निवडता येतील किंवा भन्साळी सारख्यांच्या कृपेने हिंदी सिनेमेही आहेत गुजरात, महाराष्ट्रा सारख्या स्टेट्सना रिप्रेझेंट करणारे. त्यानुसार गरबा, भांगडा, लावणी, कत्थक अश्या नृत्यप्रकरांचीही ओळख करून देता येईल परदेशी पब्लिकला, साड्या/ कपडेपट, खाणे वगैरेही येईलंच त्या अनुषंगाने.
भारताबाहेर
भारताबाहेर
, नाच, गाणी, खाणे पिणे सगळे ठरले आहे. थीमला अनुसरून काही इतर अॅक्टिविटिज करता येतील का हे बघायचेय.
१) डहाणू -केळवा माहिम (बीच)-
१) डहाणू -केळवा माहिम (बीच)--पुढे जव्हार राजवाडा आदिवाशी राजाचा आणि वारली चित्रकला --पुढे घाटावर त्र्यंबकेश्वर सिहस्थ कुंभमेळा--नाशिक पांडवलेणी आणि वायनरी --पुढे सापुतारा हिलस्टेशन ब्रिटिशांना न वसवलेलं पहिलं. (२५० किमी अंदाजे)
२) अलिबाग, नागाव, काशिद बीच -- जंजिरा किल्ला-रोह्याकडे जाताना वाटेत अभयारण्य - कोलाड रिवर राफ्टिंग -- वर मुळशी लेक --अँबिवॅली -लोणावळि खंडाळा हिल स्टेशन.
(२५० +किमि)
कोणी जाऊन व्हिडिओ फोटो आणल्यास अर्धा तासाची डॅाक होऊ शकते.
ओके???
तिसर्या भागात, नुसती माहिती
तिसर्या भागात, नुसती माहिती द्यायची... ते ऐकणार / बघणार असे असेल तर --
* प्रांतानुसार / जनरल -- दागिन्यांची माहिती ( स्लाईड / व्हिडीओ) किंवा
* प्रांतानुसार विवाह सोहळ्यात होणारे विधी ( स्लाईड / व्हिडीओ) किंवा
* विवाह सोहळ्यातील निवडक मंत्रांचे अर्थ ( त्यांच्या पद्धतीशी सारखेपणा दाखवण्यासारखे) किंवा
* अजूनही हाताने / पारंपारिक पद्धतीने केली जाणारी कलाकुसर / अत्तरे बनविणे / खाद्यपदार्थ याची माहिती ( स्लाईड / व्हिडीओ)
* जुनी साधने जी आपणही वापरत नाही (जाते, बंब, घंगाळ, लामणदिवा, सूप, खलबत्ता, वैलाची चूल इ सारखे) याची माहिती ( स्लाईड / व्हिडीओ)
त्यांचा सहभाग आणि थोडी गंमत अपेक्षित असेल तर --
* भरतकामाचे छोटे नमुने भरून घेणे
* साडी / पारंपारिक पोशाख परिधान करायला शिकवणे
* मंगळागौरीचे सोपे खेळ खेळणे ( जे त्यांना एकदा दाखवल्यावर जमतील असे)
* रांगोळी काढून घेणे
* तयार उकड आणि सारण देऊन -- मोदक करायला देणे
* त्यांनी त्यांच्या भाषेत काही वाक्य / शब्दप्रयोग / म्हणी सांगायचे आणि तुम्ही त्याचे वेगवेगळ्या भारतीय भाषांतील स्वरूप / भाषांतर सांगायचे, सोबत रोमन लिपीत लिहून दाखवायचे, जर त्यांनाही उच्चारून बघायचे असेल तर.
असं काही चालेल का?
भारताबद्दल करायचंय ना? की
भारताबद्दल करायचंय ना? की फक्त कोकण्/महाराष्ट्र? ( ↑ हे वरचे एसारडींचे वाचून प्रश्न आला डोक्यात. बाकी कैनै)
माझ्या इंटरप्रिटेशनप्रमाणे आपण जसा "टुरीझम" करतो, अर्थात, (उदा.)केसरी वाल्यांसोबत जाऊन सकाळ ते रात्र वाघ पाठी लागल्यासारखे धावणे अन जिथे जाऊ तिथे स्वतःचे फोटो काढणे, यापेक्षा, "सुटी, +व 'गेट अवे'" ही थीम वेगळी आहे.
भारतात येऊन ४-८ दिवस मोकळेपणी राहून, तिथली लोकल काही गोष्ट अनुभवता येईल अशा प्रकारच्या स्थळांची/अॅक्टिव्हिटीजची माहिती दिल्यास चांगले होईल.
यात हौशी पद्धतीने नानफानातोटा प्रकारे AirBnB सारखी स्थळे सुचवता येतील, किंवा सरळ स्पॉन्सर पकडून (वीणा) ट्रॅवलवाल्यांना आऊटसोर्स करा. पहिल्या दोन सेशन्सचा खर्चही निघेल, अन प्रोफेशनल क्वालिटी प्रेझेंटेशन्स मिळतील.
याऐवजी,
३र्या स्लॉटमधे काही भारतीय प्रसंग/सणवार इ. interactively enact करून दाखवले, उदा. गरबा. पब्लिक कॅन डान्स, अन स्टेप्स शिकवता येतील.
एकादा सोपा भारतीय पदार्थ शिजवायला शिकवता येईल.
साडी नेसायला शिकवता येईल.
इ.
जाताजाता,
>>रिलीजियस थीम घेणार नाही आहोत Happy<<
↑
खर्च आम्हांला करायचा नाहीये
खर्च आम्हांला करायचा नाहीये

भारताबद्दलच हवंय, नुसता कोकण नकोय
तिसर्या भागात काहीतरी ईंटरअॅक्टिव्ह प्रकार असायला हवाय.
तिसर्या भागात काहीतरी ईंटरअ
तिसर्या भागात काहीतरी ईंटरअॅक्टिव्ह प्रकार असायला हवाय. >>> कल्चर, फूड, डान्स, लँडमार्क्स बेस्ड गेटवे जागां चा ट्रेझरहंट खेळू शकता. कल्चर, फूड, डान्स, असा एकेक क्लू काढत लँडमार्क पर्यंत पोचायचे. माहिती, खेळ + क्रिएटीव, इनोवेटिव आणि ईंटरअॅक्टिव सुद्धा