सावण्याची पुळण! बाबाच्या गावाला आणि आजोळाला जोडणारा एक वाळूचा पसरट पट्टा आणि त्याला चिकटून अस्ताव्यस्त पसरलेला अरबी समुद्र..
काय आहे असं त्या जागेत की जागेपणीही मला तिथला केवडा धुंद करतो, त्यात मिसळलेला समुद्राचा खारट गंध जाणवतो, रेतीचे बारीक कण नाकात टोचायला लागतात, नजरेतल्या निळाईत हळूहळू लाल काळा रंग उतरायला लागतो, समुद्र पक्ष्यांचा थवा फडफडत उडून जातो. कानातल्या गाजेचं वादळात रूपांतर होतं आणि टपटप थेंबानी पायाखालच्या वाळूत खड्डे पडू लागतात तेव्हा जाणवतो आजूबाजूला पसरलेला अथांग एकटेपणा आणि मी! वादळ रोरावत मोठं होतं.. पायाखालची वाळू सरकत पाय खोल जाऊ लागतात, लाटा खवळून मला आणखी आत खेचू लागतात आणि...
"समीपा!! ए, अगं काय मूर्खपणा आहे हा?"
"काय झालं?" मी भानावर येत म्हणते..
"अरे यार, आम्ही सगळे प्रेझेंटेशन बनवतोय आणि तू मात्र आरामात खिडकीबाहेर बघत बसणार का? वॉट द हेल! उठ आणि कामाला लाग.. काय?" तन्वी आज एकदम 'घेतलं शिंगावर' मोड मध्ये आहे तर..
"अं.. हो हो येते.." कसंबसं म्हणून वॉशरूम कडे पळाले. चमचम करणारे क्रोम, मिरर फिनिशच्या पांढऱ्याशुभ्र टाईल्स आणि सेंट गोबेनचे भिंतभर आरसे बघूनच फ्रेश वाटलं. तसंही आमच्या इंटिरिअर डिझाईन कंपनीच्या ऑफिसचं इंटिरिअर भारी असलंच पाहिजे!
तितक्यात.. धबाक्कन फ्लशचा आवाज आला आणि टक टक पेन्सिल हील्स वाजवत एक उंच, बारीक मुलगी बाहेर आली. तिचे कूरळे जेल लावलेले केस हवेने वळवळ केल्यासारखे हलत होते. हात धुवून वाळवताना सुद्धा ती आपल्याच धुंदीत काहीतरी रॅप सारखं गुणगुणत होती.
लक्ष देऊन ऐकल्या वर..
"..सांग..लांब..लगेच जा.. तो आला.. तर.. मर."
असं काहिसं ऐकू आलं. शेवटच्या शब्दालाच तीने आरश्यातून माझ्याकडे नजर वळवली आणि ब्लड रेड लिपस्टिक लावलेल्या ओठांच्या कोपऱ्यातून हसत बाहेर निघून गेली..
सुन्नपणे फेसवॉश लावून तोंडावर पाण्याचे हबके मारले.. काय होतंय मला.. काहीच समजत नाहीये.. ती मुलगी खरंच होती इथे की नाही..
"समे, आज खूप काम झालं ना गं, तू तर शेवटी शेवटी झोपेत वाटत होतीस" नलिन बाइक चालवता चालवता विचारत होता.. नलिन पद्मनाभन, माझा शाळेेपासूनचा मित्र.. रादर, एलकेजीत असताना आमच्या आयांनी घडवून आलेली मैत्री कारण आमची घरं एकाच कॉलनीत होती आणि त्यांना आमची वाहतूक करणं सोपं जायचं..
"नाही रे, ती तन्वी बघ किती कष्ट घेतेय प्रोजेक्टसाठी. पण आपणच तेवढे कॉंपिटंट नाही बहुतेक.. मला फार काही सुचत नाहीये अजून. "
"चिल बेब! नो बिग डील , तन्वी करतेय ना मन लावून मग करू दे ना.. आपण फ़क्त मम म्हणायचं" हेहेहे..
"नलिन, तू शाळेपास्न असाच आहेस. मुलींना फक्त यूज़ कर तू.."
"ए, काहीपण काय बोलतेस गं, उलट तुला रोज घरी सोडतो मी.. हा, तन्वीचा घेतो कधी तरी फायदा.. कारण मी तरी इतकं काम आणि विचार एकाच वेळी नाही करू शकत.."
"ओहोहो, सो स्वीट ऑफ़ यू! असं का ही ही मी म्हणणार नाहिये. दात दाखवू नको इतके!! चल आलं घर.. सी या.."
स्कार्फ काढत एका हाताने नलिनला बाय करून वळते तोच जोरात वारा आला आणि वाळकी पानं फरशीवर खरखरत उडाली. एक थंड शिरशिरी येऊन अंगावर काटा आला, पळतच गेट उघडून आत गेले आणि बेल वाजवली. तरीही पाने सैरावैरा उडत होती. वाऱ्याबरोबर जोराने श्वास घेतल्यासारखा हुं हुं आवाज यायला लागला. गेटजवळचा एरवी मला आवडणारा गुलमोहोर गदागदा हलून सळसळत होता. अचानक मजबूत चामड्याच्या चपला घालून दणादण चालण्याचा आवाज झाला म्हणून वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं. रस्ताही सुनसान होता. मधेच काहीतरी कुजबुज करत बारीक हसण्याचा आवाज आला, या वेळेला कोण जागे असेल? पण आवाज तर जवळून आल्यासारखा वाटत होता. मी घाईने परत बेल वाजवली.
आता तो श्वासाचा आवाज अगदी जवळ येऊ लागला, घामासारखा लोखंडी वास आला, माझ्या मानेला काहीतरी गरम जाणवले आणि काहीतरी खरखरीत टोचल्यासारखे वाटले. मी झटक्यात मानेवर चाचपडून पाहिले तर तिथे बारीक खरचटून रक्तही आले होते. मागे वळले तर शुकशुकाट होता. रस्त्यावर आता एक कुत्रं येऊन विव्हळल्या सारख्या आवाजात रडत होतं. दोन तीन वेळा बेल वाजवूनही दार उघडलं नाही म्हणून डावीकडे किचनच्या खिडकीपाशी जाऊन जोरजोरात दोन तीन हाका मारल्यावर लॅचचा आवाज आला.
क्रमशः
अगदी पहिल्यांदाच काही लिहायला
अगदी पहिल्यांदाच काही लिहायला सुरुवात केली असताना एवढाच तुकडा लिहून ठेवला होता. हा पहिला भाग मायबोलीच्या एका उपक्रमासाठी वापरला होता. काहींना आठवेल
आता याच्या पुढचे भाग लिहीत आहे.
Welcome to the gang ! वातावरण
Welcome to the gang ! वातावरण निर्मिती तर छानच झालीय. पुढचे भाग येवू देत पटापट. नाहीतर लोक विशल्याची क्रमशः वारसदार म्हणतील
पुलेशु !
सहीये ! येऊ दे पुढचे भाग
सहीये ! येऊ दे पुढचे भाग फटाफट
भारी लिहिलंय. पुभाप्र.
भारी लिहिलंय. पुभाप्र.
हो, हे तुम्ही एका STY साठी
हो, हे तुम्ही एका STY साठी लिहिलं होतं ना? मस्तच लिहिलंय ! पुढचा भाग लवकर येऊ द्या.
सही... पुढचे पटापट टाक ग
सही... पुढचे पटापट टाक ग
सुरवात छानच....
सुरवात छानच....
उत्सुकता चाळवलीय...
पुढच्या भागाची वाट पहाणार....
तरीच ओळखीची वाटत होती कथा
तरीच ओळखीची वाटत होती कथा
असले काही च्या काही धागे विणले होते या कथेचे. शेवट तर भयाण 
आता तुझ्या मनात काय होते ते लिहीच.
मस्त सुरुवात.. STY मुद्दाम
मस्त सुरुवात.. पुढचे भाग लवकर येऊ देत.
STY मुद्दाम शोधून वाचले. हहपुवा झाली. जया, सुषमा ,हेमा, निरमा.. कहर आहे
STY म्हणजे????
STY म्हणजे????
STY म्हणजे???? >>>>http://www
STY म्हणजे????
>>>>
http://www.maayboli.com/node/55585
मस्त आहे.....
मस्त आहे.....
छान लिहलयं....पहिल्यांदाच
छान लिहलयं....पहिल्यांदाच लिहताय असं वाटत नाही..पुढचा भाग येऊ द्या लवकर...
वाचतेय गं.. मस्त जमलाय आता
वाचतेय गं.. मस्त जमलाय आता पुढचे भाग पटपट टाक..