माणसाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात की त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य बदलून टाकतात!
मिमोह राजर्षी वाचस्पती!
एम आर व्ही!
आणि मी एम आर व्ही ज्युनिअर...
श्वेताबाईना बघून मला एक गोष्ट तर नक्की कळली होती की यांनी आयुष्यात खूप काही केलंय....
त्यांचा दिवस सकाळी चार वाजता चालू होतो.चार वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत फिरायला जाण त्यांनतर बाकीचे एक तास सर्वकाही आवरण आणि सकाळी ठीक आठ वाजता आपल्या हवेळीच्या पारावर येऊन बसणं.
त्यांनतर त्यांच्याकडे माणसाची जी रीघ चालू होत असे तर त्यांना जेवायलाही वेळ मिळत नसे.
त्यांनी त्यांच्या एका खास माणसाला मला हवेली दाखवायला पाठवलं.
"ह्या हवेलीत एकूण चौपन्न खोल्या आहेत प्रत्येक खोली अशी बांधलिय की तिचा संपर्क मुख्य दरवाजाशी यायला कुठलंही अडचण नको."
पण चालून माझे पाय दुखायला लागलेत...
"हे देवघर इथे बाई दररोज संध्याकाळी एक तास पूजा करतात."
पुन्हा व्यंकतरामन्ना...
बाईंच्या बैठकीच्या खोलीत मात्र अनेक चित्रे लावली होती.
हे सर्वात मोठे महाराज दुर्गेश्वर चेत्तीयार.
हे त्यांचे पुत्र अळगसुंदरम चेत्तीयार.
ह्या त्यांच्या कन्या मीनाक्षी चेत्तीयार.
त्यांचे सुपुत्र श्री उदयवाडा चेत्तीयार.
आणि आता राज्य करणाऱ्या महाश्वेता चेत्तीयार.
म्हणजे राजेशाही इथेही होती, जी मी लॉस अँजेल्सला फक्त ऐकून होतो.
बाई आता कालच्या धक्क्यातून सावरलेल्या दिसत होत्या...
"बस माझ्याजवळ" त्या म्हणाल्या.
मी जरासा भांबावूनच गेलो.
ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी इतक्या लांबून आलो होतो ती माझ्या खूप जवळ होती.
तो व्यंकतरामन्ना खेळत होता माझ्यासोबत....
"खूप वर्षांपूर्वी आम्ही भेटलो होतो.. खूप वर्षे झाली असतील त्या गोष्टीला... मात्र अजूनही मनात सगळं कसं टवटवीत आहे..."
"माझा स्वभावच मुळात बंडखोर. या राजघराण्यात कधी मनच रमल नाही. कायम समोरच्याच दुःख दिसायचं आणि वाईट वाटायचं...."बाईनी क्षणभर विसावा घेतला
आणि त्याच क्षणी मला माझ्या बापाची डायरी आठवली...
'....सोनाली माझं नाही मन रमत या खेळात. खूप दुःख आहे इथे...मला सगळं चांगलं करायचंय...सगळ्या जगासाठी चांगलं...'
का अफाट पैसा कमावला मग त्यांनी?
सगळा भार माझ्या आईच्या शिरावर देऊन बाहेर पडण्यासाठी?
की माझ्या आईला एकटं सोडण्यासाठी?
माझ्या आईच्या नजरेत माझ्याविषयी नेहमी तिरस्कार असतो. आमचं नातं इतकं शुष्क असण्याचं एकच कारण....
....कारण ती माझ्या बापाचा तिरस्कार करते!!
बाईंनी शब्दांची जुळवाजुळव केली आणि त्या बोलू लागल्या...
"मिमोह.... अजूनही नाव ऐकलं तरी पहिली भेट आठवते.... अशी विचित्र पहिली भेट कुठेही कुणाची झाली नसेल"
"कुठे भेट झाली होती तुमची?" मी मुर्खपणे विचारलं...
बाई मंदपणे हसल्या.
खरंच ही बाई खूपच सुंदर आहे....
"वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये!!!!"
आरंभम- भाग 2
Submitted by अज्ञातवासी on 7 June, 2017 - 13:16
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरंभम भाग १-http://www
आरंभम भाग १-http://www.maayboli.com/node/62739
yaala kay arth ahe??
मस्त..!!