पक्ष्यांच्या संगतीत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 June, 2017 - 05:01

(हळू हळू इतर पक्ष्यांचेही फोटो द्यायचेत म्हणून हे शिर्षक निवडले आहे. फोटो क्रोम मधून दिसतील)

आमच्या पाठच्या कुंपणापलीकडे एक मोठे करंजाचे झाड आहे. त्या झाडावर गेले दोन-तीन वर्षे रातबगळे (नाईट हेरॉन) घरट करून स्थिरावले आहेत. ह्याला कारण कदाचीत पावसात शेतात साचून राहणार पाणी व त्यामुळे त्यात मिळणारा मांसाहार असावा. शेतात साधारण नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत काही प्रमाणात पाणी असत.

काही दिवसांपूर्वी स्वयंपाक घराच्या किडकीतून वर पाहीले तर रातबगळ्याची मादी नारळाच्या झावळीवर आरामात उभी होती. तिची हालचाल संथ होती त्यामुळे ती काही लगेच उडणार नाही हे पाहून लगेच कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागले. हे काढताना मला अस वाटल की जणू स्वतःची स्वच्छता आणि व्यायाम चालु आहे ह्या पक्षाचा. निरीक्षण करताना टिपलेले खालील काही फोटो

१) कसा शांत दिसतो आहे बघा. गरीब गाय.

२) आता थोडी चमक आली आहे डोळ्यात.

३) ही इतकी मोठी मान होऊ शकते हे वरच्या फोटोवरून वाटतही नाही ना?

४)

५) स्वच्छतेसोबत योगा.

६) मान खाली

७)

८)

९) जरा जवळून पिसे पहा.

१०) पूर्ववत.

११) एक क्लोजअप

Group content visibility: 
Public - accessible to all site users