****यातील एखादे दोन प्रसंग तिखट मिरची लावून सांगितले असतील पण घटना एकदम खर्रीखुर्री आहे *******
कधी कधी एखाद्यावर अशी वेळ येते की तो कशाच्याही नादी लागतो, अगदी कशाच्याही...कशावरही विश्वास ठेवतो... आम्ही गेलोय यातून..
काही वर्षांपुर्वी.. कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्टच लिहिते..
साधरण ७ वर्षांपुर्वीची गोष्ट.. गरिबी म्हणजे काय ते आम्ही ठळकपणे पहात होतो, अनुभवत होतो.. आता मागे वळून पहाताना वाटतं त्या काळापेक्षाही कठीण काळ आम्ही मागिल २ वर्षांमधे पाहिलाय पण तेंव्हा जे घडलं ते आत्ता घडलं तर आम्ही तेंव्हा जो मुर्खपणा करणार होतो तो करायचा विचारही आता करणार नाही.. ती वेळच तशी होती.
बाबांचा सुरळीत चाललेला बिजनेस बुडाला आणि आम्ही सुखवस्तू कुटुंबीय रस्त्यावर आलो. जेवणात गोडाशिवाय अन्न न गिळणारे आम्ही २ वेळंचं जेवण मिळण्यासाठी मारामार करायला लागलो. फार अवघड काळ होता तो.
माझं शिक्षण सुरू होतं, बाबांनी कॅब चालवायला सुरुवात केली.. आयटी कंपन्यांमधे रात्रपाळीला असणार्या लोकांचा पिक अप ड्रॉप बाबा करायचे. दिवसापेक्षा जास्त पैसे रात्री मिळतात त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला..
मला आठवतं बाबा रात्री कॅब चालवायला निघायचे आणि आम्ही घरात जीव मुठीत घेऊन बसलेलो असायचो.. त्याला कारणही तसंच होतं..
त्यासुमारास एक पिंगळा (भविष्य सांगतो तो ) आमच्या घरी आला आणि म्हणाला लवकरच घरातल्या कर्त्या माणसाला भुत झपाटणार आहे..
त्या दिवसांमधे आम्हाला कोणी सांगितलं असतं की परिस खरच अस्तित्वात आहे तरी आम्ही विश्वास ठेवला असता, इतके सेन्सेटिव्ह झालो होतोत आम्ही.. या भुतापासून वाचण्यासाठी त्याने काही उपाय सांगितले ज्याला १२ हजार खर्च होणार होता..
पटो वा ना पटो पण तेंव्हा आमचा मंथली इन्कम सुद्धा १२ हजार नव्हता.. खायला ल्यायला पैसे नाहीत तेंव्हा यावर खर्च करायला कुठुन असणार?
तरी बाबा म्हणाले आम्ही पैसे जमवतो, लवकरच उपाय करूयात..
आम्ही खुप प्रयत्न करुनही पैसे साठवू शकलो नव्हतो, कर्जाचा डोंगर होता डोक्यावर... एके दिवशी पिंगळा पुन्हा घरी आला... पुढच्या महिनाभरात उपाय केले नाही तर हा माणुस हातचा गेलाच म्हणून समजा असं सांगून गेला..
मी आणि आई रडण्याखेरिज काही करू शकत नव्हतो. बहिण लहान होती बरीच.. तरीही तिलाही सगळ्याची जाणीव झालेली.. ती आम्हाला बिलगुन बसलेली असायची..
तशातच बाबांना रात्री १२ वाजता होळकर ब्रिज वरून पिक अप मिळाला.. आम्ही नुसत्या बातमीनेच अर्ध मेले झालो.
कारण डिटेलात घुसुन सांगत नाही.. एक तर होळकर ब्रिज बर्यापैकी प्रसिद्ध आहे, नसेल तर गूगलून बघा... आणि दुसरं म्हणजे आता त्या अनुभवानंतर मला स्वतःला होळकर पूलाबद्दल फारसं बोलायला आवडत नाही..
बाबांनी सगळ्यांना धीर दिला.. घाबरू नका म्हणाले. गाडीमधे गजानन महाराजांची स्तोत्रं लावून ते गाडी चालवू लागले.. सकाळी बाबांना घरी सुखरूप आलेलं बघुन मी आणि आई देवाला साखर ठेवायचो..
अशातच तो दिवस आला...
मस्त उत्कंठावर्धक पहिला भाग..
मस्त उत्कंठावर्धक पहिला भाग.. पुभाप्र !
री, किती मस्का लागणार आहे?
री, किती वेळ लागणार आहे?
रिया आता तुझा राग येतोय! अरे
रिया आता तुझा राग येतोय! अरे काय यार..आता पुढचा भाग येईपर्यंत आम्ही काय सतत पेज रिफ्रेश करायचं का! लवकर लिहिणे प्लीजच.
बदलुन दिसले मला वाटले ह्यात
बदलुन दिसले मला वाटले ह्यात समाविष्ट केले की काय! पाहतो तर तसेच!
बदलुन दिसले मला वाटले ह्यात
बदलुन दिसले मला वाटले ह्यात समाविष्ट केले की काय! पाहतो तर तसेच!>>>>>>>>>>>>>> +१
सुरुवात बदललीय.
धन्यवाद लोकहो!
धन्यवाद लोकहो!
पुढे - http://www.maayboli.com/node/62663
पुढला भाग प्रकाशित करायला
पुढला भाग प्रकाशित करायला होळकरांची परवानगी मिळायची बाकी आहे का ?
Pages