मायबोलीवर सध्या ऋन्मेषच्या धाग्यावर लग्नाचा उद्देश काय ह्यावर चर्चा चालू आहे.तिथे अस्थानी वाटतेय म्हणून इथे वेगळा धागा काढतो आहे.
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.देवसेना धाग्यावर चाललेला प्रकार कशाचं द्योतक आहे?
४.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
लग्नाचा उद्देश काय!!!!! सेक्सची सोय? साहचर्य ?की आणखी काही?????????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 15 May, 2017 - 05:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंजी, तुम्हाला एकच आणि
सिंजी, तुम्हाला एकच आणि शेवटचा प्रतिसाद / सल्ला देते -
तुम्हाला एकंदर सेक्स या विषयावर अनेक प्रश्न पडलेत... तुम्हाला याची खरीच उअत्तरं हवी असतील तर एखाद्या तज्ञाला भेटा अणि सगळ्याचा खुलासा करून घ्या
रिया,धागा वाच ,सेक्सविषयी
रिया,धागा वाच ,सेक्सविषयी प्रश्न नाही पडलाय.विवाहाचा उद्देश काय याविषयी प्रश्न पडलाय.
३.देवसेना धाग्यावर चाललेला
३.देवसेना धाग्यावर चाललेला प्रकार कशाचं द्योतक आहे? >> काही ही हं...
अजुन एक प्रश्ण अॅड करा...
५.प्रभास धाग्यावर चाललेला प्रकार कशाचं द्योतक आहे?
(एकच आणि शेवटचा प्रतिसाद / सल्ला )
प्रभास आणि देवसेनेच्या
प्रभास आणि देवसेनेच्या धाग्याचा काय संबंध?
काहीही
देवसेना धाग्यावर चाललेला
देवसेना धाग्यावर चाललेला प्रकार कशाचं द्योतक आहे?
कुणाची म्हस कुणाला उठबस
सिंजी हे इथे बसेल ना चपखल....
लोकहो, त्याच्या सिंथेटिक
लोकहो, त्याच्या सिंथेटिक प्रश्नाला देवसेना धाग्यावर इग्नोर केलं त्याची ही भडास आहे.
कुठला सिंथेटिक प्रश्न श्री?
कुठला सिंथेटिक प्रश्न श्री? वाचुन येते
ओह ओके. ती गब्रु जवान, मुलाचे
ओह ओके. ती गब्रु जवान, मुलाचे काका, बोलणी करावाली पोस्ट ना?

श्री, देवसेनेच्या धाग्याच्या हेडरमधे सगळे फोटो टाकल्यामुळे कित्ती स्क्रोल करावं लागतंय. हुश्श!
(No subject)
व्यवस्थित निचरा होत नसला अथवा
व्यवस्थित निचरा होत नसला अथवा, निचरा होण्यास साधन मिळत नसल्यास असे धागे काढण्यास प्रेरणा मिळते. यात वेळेचा अपव्यय वैगरे होत नाही तर रिकाम टेकड्या वेळेतील काही वेळ विरंगुळा मिळतो.
webmaster,वैयक्तीक टिका होतेय
webmaster,वैयक्तीक टिका होतेय कृपया लक्ष द्या.
(No subject)
वेमा, माझ्याकडे दुर्लक्ष करा
वेमा, माझ्याकडे दुर्लक्ष करा कृपया. मी उधृत केलेले वाक्य सिंजिं यांचेच आहे. ते त्यांना साभार परत केलेय इतकेच.
सिंजी... खूप एकतर्फ धागा..
सिंजी... खूप एकतर्फ धागा..
स्त्रियांना पण सेक्स ची जास्त इच्चा असते... लग्न हे फक्त पुरुषांना नाही तर पुरुष आणि स्त्री दोघांना सेक्स ची सोय, आणि कंपनियन ची , मुख्यता संतती साठी सेक्स हे प्रमुख कारण IMO... सेक्स केला की इमोशन इन व्हॉल्व्हमेंट येतेच.
विवाहित पुरुष इतर स्त्रियांकडे बघतात कारण ते नैसर्गिक आकर्षण आहे.. विवाहित स्त्रिया पण एखादा मस्त फिट पुरुष असेल तर बघतातच की...
Crime पेट्रोल सिरीयल पहिली तर कळते की किती विवाहित स्त्रिया अफेअर्स करतात.. लाईफ एकदाच मिळते.. जर नावऱ्यापासून सतिसफाकशन मिळत नसेल तर स्त्रिया बाहेर शोधतात...
सो सेक्स प्रमुख कारण...
वेमा - जास्त रोखठोक असेल प्रतिसाद तर उदवावा..
रोखठोकपेक्षा चक्क शुद्ध
रोखठोकपेक्षा चक्क शुद्ध लिहिलाय म्हणुन उडवा वेमा
Crime पेट्रोल सिरीयल पहिली तर
Crime पेट्रोल सिरीयल पहिली तर कळते की किती विवाहित स्त्रिया अफेअर्स करतात..
>>> च्राप्स, त्या क्रैम पेट्रोल वाल्यांच्या पोटापाण्याचा विषय आहे तो.. विवाहित स्त्रीचे विवाहबाह्य संबंध हा हमखास टीआर्पी खेचणारा विषय आहे. बहुसंख्य पुरुषांना ही फॅण्टसी असते, तेच दाखवणार ते... त्याला तुम्ही प्रमाण मानणार काय? म्हणजे फॅण्टसी असणार्या पुरुषांपेक्षा अफेअर करणार्या अनसॅटिसफाइड स्त्रीयांची संख्या याचे कसे गुणोत्तर आहे?
( हल्लीचे सीपी एपिसोड विवाहबाह्य संबंधांवर जास्त असतात काय? आम्च्याकडे टीवी नाही, कुठेतरी युट्युबवर विडियो पाहिला होता, आजकाल फार रंगवून रंगवून सॉफ्ट पोर्न दाखवतात काय सीपी मध्ये?)
अवांतरः काडी टाकाय्चे प्रयन्त चालु आहेत्का?
सतिसफाकशन
सतिसफाकशन
(No subject)
कुणाची म्हस कुणाला उठबस
कुणाची म्हस कुणाला उठबस
सिंजी हे इथे बसेल ना चपखल.+11111111111111
विषयाला धरुन चर्चा करा
विषयाला धरुन चर्चा करा.
मायबोलीचा मिपा करु नका
५.प्रभास धाग्यावर चाललेला
५.प्रभास धाग्यावर चाललेला प्रकार कशाचं द्योतक आहे?
>>>>>
प्रभासचा धागा मी काढलाय
आणि मी मेलो तरी बहात्तर पण मी प्रभासशी लग्न करणार नाही.
मी मेलो तरी बहात्तर >>>>
मी मेलो तरी बहात्तर >>>> बेहत्तर रे!
बेहत्तर हा मला उर्दू शब्द
बेहत्तर हा मला उर्दू शब्द बाटतो. म्हणून मी त्याचे मराठीकरण केले.
असो, धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास मला माझ्या पोटी एका सुंदर मुलीने जन्म घ्यावा अशी माझी ईच्छा आहे म्हणून मला लग्न करायचे आहे. कारण लग्नाशिवाय होणारया अपत्याला आपल्या समाजात मान मिळत नाही किंबहुना एखादी शिवी म्हणून संबोधले जाते. तर जोपर्यण्त आपला समाज प्रगल्भ होत नाही तोपर्यण्त लग्नाला पर्याय नाही.
अरे समाज बदल की! आणखी भारंभार
अरे समाज बदल की! आणखी भारंभार धागे काढ त्यातून प्रबोधन होईल मग क्रांती होऊन समाज बदलेल. बिगर पिक्चर बघ.
सुंदर मुलगी म्हणजे कशी... गोरी का? मग नॉन सुंदर म्हणजे कशी. आपल्या समाजाच्या सुंदरतेच्या कल्पना काय आहेत? कुठे चाललो आहोत आपण... घे.. काढ पुढचा धागा आणि कर प्रबोधन.
सुंदर मुलगी म्हणजे जिला बघून
सुंदर मुलगी म्हणजे जिला बघून चेहरयावर एक गोडसे हास्य उमटेल. एखादे तान्हे बाळ सुण्दर शिवाय आणखी वेगळे असूच कसे शकते.
येस!!!! मी ऋन्मेऽऽष सरांशी
येस!!!! मी ऋन्मेऽऽष सरांशी इतकं अगत्याने बोललो की शेवटी त्यांनी सरळ उत्तर दिले! हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यात येत आहे.
सिंजी, तुम्हाला सेक्स या
सिंजी, तुम्हाला सेक्स या विषयी खूप प्रश्न पडलेले दिसतंय आणि त्याची त्याची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही हे धागे काढता आहात. सेक्स विषय प्रश्न पडणे किंवा त्याविषयी कुतूहल वाटणे यात काही गैर नाही परंतु असे धागे काढून काही उत्तर मिळतील असे वाटत नाही त्यापेक्षा तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला भेटा ...
आणि हो लग्नाचा खरा उद्देश जाणून घ्यायचा असेल तर ४-५ आजी आजोबा ना भेटा जे आता आयुष्याच्या सांजेकडे वाटचाल करताय तुम्हाला उत्तर मिळेल ... आणि मग तुम्हाला कुठल्याच धाग्याची गरज भासणार नाही
एकदम सिधि बात नो बकवास ...