आमचे पोस्टरप्रेम खुप जुनेच म्हणावे लागेल. सिनेमाची पोस्टर्स पाहायला खुप आवडायची. आजही आवडतात. पण आज नवीन हिन्दी चित्रपट फारसे पाहात नसल्याने लक्ष हॉलिवुड चित्रपटाच्या पोस्टर्सकडे जास्त असते. पण तरीही स्टेशनवर लावलेल्या पोस्टर्सकडे लक्ष जातेच. पोस्टर्सचे प्रेम मला इतके वाटते की एकदा मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनेने चित्रपटाचे पोस्टर बनवण्यास सांगितले होते. असेच एक खुप आवडलेले पोस्टर म्हणजे अमिताभच्या "डॉन" चित्रपटाचे. चित्रपटही खुप आवडला होता.
काव्यशास्त्र, रससिद्धान्त यांच्या अभ्यासाला खुपच नंतर सुरुवात केली. पण त्याही वेळी या पोस्टरमधली अमिताभची धावण्याची शैली मनावर ठसली होती. विनोद खन्नाचे चालणे आणि अमिताभचे धावणे याला तुलना आहे काय? डॉनचे पोस्टर म्हणजे फक्त गतीचा खेळ आहे. अमिताभचा उचलेला पाय, आवळलेले दात आणि उडणारे जाकीट सारं मिळून साकार होते ती एक जबरदस्त गती. आणि त्यातूनच बघणार्याला लक्षात येते की यात काहीतरी भन्नाट अॅक्शन असणार.
त्यातही अमिताभचे चित्र हे काहीसे तिरके ठेवले आहे म्हणजे ही गती आणखी गडद झाल्यासारखी होते. पुढे एकाच टोनमध्ये चार वर्तुळांमध्ये चार तीच चित्रे आहेत. याने ही अॅक्शन जास्त फोकस्ड झाली आहे. पोस्टरकडे लक्ष जाताच ठसते ते अमिताभचे धावणेच. डॉन लिहिण्यासाठी वापरलेला फॉन्टसुद्धा ओबडधोबड आहे. रफ अॅक्शन सूचित करणारा. पोस्टरमध्ये अमिताभने डावी बाजु बर्याच अंशी भरली आहे त्यामुळे उजवी कडे नावाखाली आणि पोस्टरच्या उजवीकडच्या खालच्या बाजुला प्राण आणि झिनतला दाखवून समतोल साधला आहे. नावे डावीकडे खाली लिहून हा समतोल पूर्ण झाला आहे.
चित्रपट पाहायला गेलो. सुरुवातीलाच बच्चनसाहेब बॉंडलादेखील विचार करावा लागेल अशा जबरदस्त स्टाईलमध्ये कारमधून आले. बच्चनने आख्खा चित्रपट तेथेच खाल्ला आहे असे मला आजही वाटते. आणि मग बॉम्ब ब्लास्ट करून डॉन तेथून पळतो, त्यानंतर लाल हिरव्या रंगात नामावली सुरु होते. त्यात अमिताभ बहुतेकवेळा धावतानाच दाखवला आहे. मागे अगदी त्याला साजेसे कल्याणजी आनंदजीचे पार्श्वसंगीत. या दृश्यामुळे चित्रपटाचा पगडा जो पहिल्या फ्रेमपासून डोक्यावर बसतो तो अगदी थेट शेवटपर्यंत. आणि त्याचीच झलक या सुरेख पोस्टरमध्येही दिसते.
अतुल ठाकुर
मस्त !!
मस्त !!
अभिताभचे अॅक्शनपट नेहमीच आवडलेत.
पोस्टरचे विश्लेषण छान...
पोस्टरचे विश्लेषण छान...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय अभ्यासपूर्वक बनवलेले पोस्टर वाटते हे.. !
अन हे फोटोशॉप नाही, तर मूळचे हाती रंगवलेलेच आहे ना?
काय एकेक कलाकार होते तेव्हा.. चित्रकर्मि
आवडलं. ं बच्चन पंखा
आवडलं. ं बच्चन पंखा असल्यामुळे भावलं. फारेंड यांची पोस्ट आली नाही
छान.
छान.
तुमच्या नजरेतून पोस्टर पाहणे आवडले.
लेकिन्न... असली दान आ गया तो
लेकिन्न... असली दान आ गया तो माईन तो गया ना बारा के भाव मे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलेय! सिनेमाचे पोस्टर
मस्त लिहिलेय! सिनेमाचे पोस्टर हा विषयच खास आहे. विशेषतः ६०-७०च्या दशकातील. त्यांचे रंग, कॅलिग्राफी, काँपोझिशन सगळेच अदभुत!
डॉनच्या पोस्टरमधली ती सर्कल्स विथ क्रॉसहेअर आहेत, त्याचे सतत टार्गेट असणे दर्शवणारी.
तुमच्या नजरेतून पोस्टर पाहणे
तुमच्या नजरेतून पोस्टर पाहणे आवडले.>>>> +१
पोस्टर एवढं वाचता येतं याची कल्पना नव्हती.
तुमच्या नजरेतून पोस्टर पाहणे
तुमच्या नजरेतून पोस्टर पाहणे आवडले.>>>>+१
खुप छान विश्लेषन
छान लिहिले आहे. पोस्टर ही
छान लिहिले आहे. पोस्टर ही मुळातच एक स्वतंत्र कला आहे. त्याबद्दल वेळ मिळाल्यास लेख लिहिन..
ठाकूरसाहेब, तुमच्या हा धाग्यानिमित्त ही एक छान वेबसाईट शेअर करतो. : http://bollywoodmovieposters.com/
मस्त लिहिलेला आहे.
मस्त लिहिलेला आहे.
असे ७० - ८० च्या दशकांतील पोस्टर्स खुप आवडतात. डॉन बरोबरच शोलेचे पोस्टर लाडके आहे माझे.
मस्त , पहिल्यांदाच डॉनच्या
मस्त , पहिल्यांदाच डॉनच्या पोस्टरकडे वेगळ्या नजरेने पाहीले.
विश्लेषण आवडले.
विश्लेषण आवडले.
लेखक राजेश पॉल यांचे 'The art of bollywood' एका मित्राकडून वाचायला आणले. त्यात सिनेमा पोस्टरचा इतिहास, चित्रकार व रंगकामाच्या तंत्राबद्दल छान माहीती दिली आहे.
मस्त लिहिलयं!
मस्त लिहिलयं!
छान लिहिलेय
छान लिहिलेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर एकदम. पोस्टरप्रेम जागृत
सुंदर एकदम. पोस्टरप्रेम जागृत झालं बालपणाचं, खूप आवडायचं.
पोस्टरचे छान विश्लेषण .
पोस्टरचे छान विश्लेषण . पोस्टर एक शक्तिशाली माध्यम होते सिनेमा प्रमोचे .
सुंदर ! डॉन चे संगीत आणि
सुंदर ! डॉन चे संगीत आणि पार्श्व्संगीत एक अभ्यासाचा विषय होईल.
सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशा
सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशा काही पोस्टरबद्दल लिहायचे मनात आहे. काही चित्रांचेदेखिल रससिद्धान्ताच्या माध्यमातून आकलन करण्याचा प्रयत्न करायचा आहे.