आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात.
2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे. बुकस्ट्रक तर्फे त्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट फँटसी कादंबरी चा पुरस्कार मिळाला होता.
आज एका वर्तमानपत्रात एक बातमी दिसली आणि मग मी इन्टरनेट वर शोध घेतला. त्यानुसार 22 ऑक्टोबर 2016 च्या एका बातमीनुसार बर्मुडा ट्रँगल मध्ये जहाज आणि विमानं गायब होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग कारणीभूत आहेत जे गरम असून एखाद्या बॉम्ब सारखे स्फोटक असतात असे सांगितले आहे.
माझ्या "जलजीवा" कादंबरीत सुद्धा "बर्मुडा ट्रँगल" वरून प्रेरित होऊन मी "डेव्हिल्स स्क्वेअर" नावाचा एक समुद्रातील चौकोनी भाग दाखवला आहे ज्यात असेच विमानं आणि जहाज गायब होतात आणि त्याचे कारण ढग (जलजीवा रूपातील) आहेत असे मी लिहिले होते.
काय योगायोग आहे बघा, एखादी कल्पना नंतर सत्यात उतरू शकते किंवा एखादे रहस्य ते उलगडण्यापूर्वीच एखाद्याच्या कल्पनेत उलगडू शकते! अर्थात कादंबरीत थोडा ज्यादा फँटसी इलेमेंट आहे. पण मी असं नक्की म्हणू शकतो की माझी कादंबरी सत्याच्या 50 टक्के जवळ जाणारी सिद्ध झाली आणि अर्थातच हे सांगायला मला आनंद वाटतो. नाहीतरी कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती मनात (कल्पनेत) तयार व्हावी लागते. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती आधी त्याच्या मनात तयार होत असते. नाही का?
बातमी - http://bigthink.com/paul-ratner/the-mystery-of-the-bermuda-triangle-may-...
गुगल प्लेस्टोर वरील लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=bookstore.marathi.jaljiva
मायबोली वरील लिंक - http://www.maayboli.com/node/23754 (येथे तुम्हाला वाचकांच्या प्रतिक्रिया वाचता येतील, तसेच ती कादंबरी क्रमशः प्रसिद्ध केलेल्या भागांच्या लिन्क्स आणि त्यावरच्या वाचकांच्या प्रतिक्रियाही वाचायला मिळतील)
तसेच "मिसळपाव" वरच्या "जलजीवा" या कादंबरीच्या आतापर्यंतच्या सगळ्या भागांच्या लिंक्स :
http://www.misalpav.com/node/16118 part 1
http://www.misalpav.com/node/16147 part 2
http://www.misalpav.com/node/16163 part 3
http://www.misalpav.com/node/16189 part 4
http://www.misalpav.com/node/16200 part 5
http://www.misalpav.com/node/16228 part 6
http://www.misalpav.com/node/16265 part 7
http://www.misalpav.com/node/16313 part 8
http://www.misalpav.com/node/16420 part 9, 10, 11
http://www.misalpav.com/node/16566 part 12
http://www.misalpav.com/node/16667 part 13
http://www.misalpav.com/node/16747 part 14
http://www.misalpav.com/node/16751 part 15
http://www.misalpav.com/node/16862 part 16 final
अभिनंदन
अभिनंदन
हार्दीक अभिनंदन !
हार्दीक अभिनंदन !
अभीनदंन नीमीष जी
अभीनदंन नीमीष जी
मला तूमच्या कथेमूळेच स्वतःची कथा लिहीण्याची प्रेरणा मिळाली.
हार्दिक अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन..
छान.
छान.
आरे वाह अभिनंदन..
आरे वाह अभिनंदन..
कधी फुरसत काढून नक्की वाचेन..
अभिनंदन...
अभिनंदन...
जुल व्हर्न यांच्याबाबतीत पण असेच घडले होते... त्यांच्या कल्पना पुढे खऱ्या ठरल्या...
जे न देखे रवी ते देखे कवी ( आणि लेखक ) ।।।
सगळ्यांना धन्यवाद!!
सगळ्यांना धन्यवाद!!
>>> काय योगायोग आहे बघा,
>>> काय योगायोग आहे बघा, एखादी कल्पना नंतर सत्यात उतरू शकते किंवा एखादे रहस्य ते उलगडण्यापूर्वीच एखाद्याच्या कल्पनेत उलगडू शकते! <<<<
<<<< नाहीतरी कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती मनात (कल्पनेत) तयार व्हावी लागते. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती आधी त्याच्या मनात तयार होत असते. नाही का? <<<<
तुम्ही लिहिलय ते सत्य असेल, तर होय, याच प्रकारे लेखनात जसे तुम्हांस "सुचत गेले" तशी "उत्स्फुर्तता" ही स्वप्ने वा तत्सम बाबीतही प्रकटू शकतात, सत्यात उतरण्याचे आधीच. अशा घटना नेहेमी नेहेमी घडत नाहीत, वा सर्वांचेबाबतीत घडतात असेही नाही. त्यामुळे त्या "चमत्कारसदृष" वाटणे साहजिक आहे. पण मग म्हणुनच अशा घटना/प्रसंगाचा "डेटाबेस" उपलब्ध होणे, व त्यावरुन निव्वळ स्टॅटिस्टिकच्या सुत्रांनी निष्कर्ष काढणे हे देखिल अर्धवटपणाचे लक्षण समजावे लागेल.
फक्त ते "प्रयोगशाळेत सिद्ध" करता येत नाही म्हणून त्याची "संभावना योगायोगात" करणेही वैज्ञानिक "एकांगी" हेकट अंधश्रद्धेचे उदाहरण ठरते. असो.
उदाहरण भारी आहे.
बातमीची लिंक सापडत नाहीये.