क्विल्ट अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

Submitted by मनीमोहोर on 23 April, 2017 - 14:12

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते. मला वाटतं ह्या कलेचा शोध गरजेतुन लागला असेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा तयार कापडाची एवढी मुबलकता नव्ह्ती तेव्हा कापडाचा एखादा लहानसा तुकडा ही फेकुन देववत नसेल . कापडाची चिंधी न चिंधी वाचवण्याच्या उद्देशानेच ह्या कलेचा जन्म झाला असेल.

पाश्चिमात्य देशात जिथे खूप थंडी असते तिथे पांघरुणं अधिक उबदार करण्या साठी सुद्धा ही कला विकसित झाली असेल कारण वर एक कापड मध्ये एक आणि आतल्या बाजुला एक अशी तीन पदरी जाड पांघरुणं ह्याने तयार करता येतात. काळाच्या ओघात आता खूप बदल झाले आहेत, कपड काटकसरीने वापरण्याची गरज आता उरली नाहिये . अखंड कापडाचे तुकडे कापून ही क्विल्टिन्गची हौस करता येते. आपल्याकडे सामन्यतः लहान मुलांची दुपटी क्विल्टिन्ग ने अशी केली जातात पण परदेशात मोठ्या मोठ्या आकारात ही केली जातात. असं ही वाचलय की तिकडे मुलगा /मुलगी जेव्हा शिक्ष्णासाठी घरा बाहेर पड्ते तेव्हा आई / आजी स्वतः शिवलेली अशी एक क्विल्ट मुलाला प्रेमाची भेट देते.

क्विल्टिंग नी निरनिराळे देखावे, माणसांचे चेहरे वगैरे ही तयार करतात पण ती एक खूप कौशल्याची गरज असलेली वेगळीच शाखा आहे. पहिल्या भारतीय डॉ आनंदीबाई जोशी याना ही ह्याची आवड होती . त्यांनी केलेली अशी तुकड्यांची गोधडी पुण्याच्या राजा केळकर वस्तु संग्रहालयात पहायला मिळते. तुकडे जोडण्याची कला आणि आनंदी बाई ह्या दोन्हीतही तेवढाच रस असल्याने मी पुण्याला गेले की ही गोधडी बघुन येतेच .

मी केलेली ही बेबी क्विल्ट
IMG_20170423_234516.jpg

पॅटर्न मी नेटवरुन घेतला आहे . आयरिश चेन असं नाव आहे ह्या पॅटर्नच. नेट वर क्विल्ट सुबक होण्या साठी काय कराव आणि काय करु नये ह्याच्या टिप्स पण आहेत . जे तुकडे घेतेलेत ते सगळे घरातलेच उरलेले वैगेरे होते. ही क्विट लहान आहे म्हणुन कापताना जास्त त्रस नाही झाला पण आता एक मोठी करायचा विचार आहे त्यासाठी परदेशात मिळतात तसे प्री क्ट पीसेस ठाण्यात कुठे मिळतात का , ऑन लाईन कुठे मिळतात का , असतील तर ती लिन्क आणि कोणी वापरले असल्यास त्याची क्वलिटी कशी अस्ते वगेरे महिती मिळाली तर हवी आहे. म्हणुनच हा धागा काढलाय खरं तर /strike>

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच ममो..
सुरुवातीचा पॅराग्राफ खोडलास का?
आणि फोटो दिसेना गं कुठच...

टीना धन्स तुझा पहिला प्रतिसाद !
सुरुवातीचा पॅराग्राफ खोडलास का? >> आता केलं ग बरोबर . नीट दिसतय ना आता आणि फोटो पण दिसतोय ना ?

छान आहे.
तुम्हाला पडलेल्या प्रश्नाबाबत मधुरा भिडे मदत करु शकेल . तिचं Q for Quilt या नावाचं एक पेज आहे फेसबुकवर .

येस्स ममो...
आता व्यवस्थित दिसतय...अक्षर अन फोटो सुद्धा...
छानच गं... बारीक काम आहे फार..
आमच्याकडे गोधडी विणतात..
आज्यांचे नववार लुगडं, जुण झालेलं..स्वच्छ धुवून घ्यायच अन मग एका माणसाला पांघरायला पुरेल एवढ्या मापाच्या घड्या घालायच्या.. दोन तीन लुगडे एकत्र ठेवून मस्त खाली जमिनीवर अंथरायचे आणि मग हार करण्यासाठी वापरतॉ ती मोठी सुई आणि वापरला जातो तो जाडा पांढरा दोरा घेउन मस्त टाके पाडत जायचे... चौकोनात चौकोन.. बघायला मज्जा यायची..
आठवलं म्हणुन लिहिलं..

मस्तच,

आम्ही लहान असतांना आई करायची असं, बघायला छान वाटायचं. जास्त करुन बाळंतविडा कोणाला द्यायचा असेल नातेवाईकांत, शेजारी तर करतांना बघितलं आहे. असं मोठ्या चादरी टाईप करायची आणि दुपटी टाईपसुद्धा.

मागे एकदा बबल क्विल्ट बघीतलं होत..
तूपन बनव एक आपल्या इवा साठी...
हि बघ लिंक .. http://www.crazzycraft.com/2016/12/how-to-make-bubble-for-bubble-quilt.html

आणखी एक..माझ्या एका मैत्रीणीला मुलगी झाली तिचं नाव सुद्धा इवाच आहे.. Happy

लेख आणि बनवलेलं दुपटं --दोन्ही छान. गोधडी अथवा दुपटं बनवणे हा ‘छंद’ ही हल्ली लोकप्रिय होतोय.

छान ममो! ऐंशी वर्षांच्या आजींची मुलाखत लिहिली होती. त्यांच्या ही गोधड्या खूप सुबक होत्या..

मस्त, सुबक जमलंय.. मोठ्या आकारात पण नक्कीच जमेल.
आमच्याकडे अजून आहेत गोधड्या. पुर्वी मुंबईत बायका घरी येऊन
शिवून द्यायच्या. फार भराभर आणि सुबक टाके घालायच्या त्या.
वर घालायला म्हणून चांगली साडी मागून घ्यायच्या.

Plooma , फार सुंदर झालंय . मजा येते ना करायला . हा पॅटर्न करायची एक ट्रिक आहे नेटवर तसंच केलं की सरधोपट तुकडे जोडले ?
पण झालंय मात्र छानच ! नेस्टिंग परफेक्ट झालंय त्यामुळे आकार सुंदर दिसतोय.
Btw मला अजून कुठे ही precut तुकडे किंवा जेली रोल्स नाही मिळालेत इथे .

मस्तच

ही मी अलीकडे केलेली.

हीच वैशिष्ट्य म्हणजे ही मी हाती शिवून केली आहे. ( घ्यायचं आहे पण अजून माझ्याकडे शिवण मशीन नाहीये) आणि पॅटर्न ही मला कुठे नेटवर न मिळाल्याने मीच चुकत माकत तयार केला आहे. खर तर मी फक्त pinwheel चीच करणार होते पण ते फारच एक सुरी दिसत होतं, आणि एवढी pinwheels हातानी करणं कठीण ही गेलं असत म्हणून मग काही तरी रंगीत patch मध्ये लावायचं ठरवलं. हे निळं पिवळं कापड घेताना ही कसं दिसेल ह्याची धाकधूक वाटत होती पण केल्यावर छान दिसतय अस वाटतय.

IMG_20190329_235634.jpg

ममोने रम्य आठवणींच्या शब्दांनी बनवलेल्या गोधड्या जेवढ्या छान वाचनीय होत्या तेवढ्याच याही कलाकुसरीच्या छान आहेत

खूप सफाईदार काम झालं आहे.
मला क्विल्टींग फार आवडतं पण शिवण सफाईदार येत नाही, म्हणून कधीच करून बघितलं नाहीये. आता एकदा हातरूमालाच्या आकाराचं तरी करून बघीन.

देवकी, अनु, प्राचीन, शशांक, चिन्नू, अनया ..प्रतिसादासाठी धन्यवाद.
ममोने रम्य आठवणींच्या शब्दांनी बनवलेल्या गोधड्या जेवढ्या छान वाचनीय होत्या तेवढ्याच याही कलाकुसरीच्या छान आहेत >> प्राचीन ... थँक्यू , मस्तच लिहिलंय

Pages