धाबा

Submitted by Abhishek Sawant on 22 April, 2017 - 10:49

धाबा

जॉबवर रुजु झाल्यापासुनची ही तिसरीच वेळ होती घरी जाण्याची. गोव्यात जॉबला असल्यामुळे, गोवा कोल्हापुर अश्या प्रवासात अर्धा कोकण पाहिल्यासारखे वाटे. मला प्रवास खूप आवडतो म्हणजे माझ्या मागे आई बाबा परिवार वैगेरे कोण नसते तर मी हिप्पीच झालो असतो आणि आयुष्यभर फीरत राहिलो असतो. मला कधीकधी ट्रकवाले किंवा टुर्सवाले यांचा तिरस्कार वाटत असे. साला यांना फिरायचे पैसे मिळतात. मग कधीकधी मला पण ट्रक ड्रायवर नाहीतर त्याच्याबरोबर असतो तो हेल्पर किंवा ट्रॅवल्स कंपनीत काम करू वाटे. कधीकधीअर त मेंढपाळ जे शेळ्या घेऊन गावोगावी डोंगरातुन फीरतात त्यांचा सुद्धा हेवा वाटत असे.
असो तर घरी जाताना कोंकणामधला निसर्ग अनुभवायचा असेल तर महामंडळाची गाडीच उत्तम ट्रॅवल्स च्या त्या वातानुकुलीत स्लीपर कोच बसेस मधून निसर्गाशी थेट संवाद साधला जाऊच शकत नाही आणि म्हणूनच मी सकाळची सातची गाडी पकडली, सातला महाराष्ट्र परिवहन मंडाळाची आमाची बस मडगाव स्थानकातून बाहेर पडली, पाऊण तासात पणजी ओलांडले आणि तिथून सुरू झाला निसर्गरम्य प्रवास जरी उन्हाळ्याचे दिवस असले तरी कोकणातली ती हिरवळ डोळ्यांना गारवा देत होती. कोकणातली नागमोडीव वाट आणि गाडीचा लयबद्ध आवाज डोळ्यावर झापड आणत होता. एकंदरीत माझा स्वप्नवत प्रवास चालू होता. सावंतवाडी पर्यंत येऊपर्यंत १० वाजले होते ऊन्हाने जोर वाढवला होता. सावंतवाडी स्टॅन्डवर मस्त थंड पाण्याची बॉटल घेऊन अक्षरशः अर्धी संपवली.
सावंतवाडी नंतर घाट शेक्शन चालू झाला, सुमारे अर्धा एक तास पुढे आल्यानंतर ड्रायवरने गाडी एका धाब्यावर घेतली. त्या हिरवळीने नटलेल्या घाटात एका वळणानंतर रस्त्याच्या कडेला एक प्रशीस्त असा धाबा होता माझ्या वरील काही फॅन्टसी पैकी हि एक माझा एक मस्त धाबा असावा एका घाटातील हायवे ला लागून किंवा किमान मी वेटर म्हणुन पण काम करायला तयार होत्तो इतके शिकलो नसतो किंवा एका चांगल्या घरात जन्म नाही घेतला असता तर मी अश्या धाब्यांवर काम करायला गेलो पण असतो. हे कोकणातले हायवे लगतचे धाबे मला खूप चांगले वाटतात. फक्त धाबे ते हायफाय हॉटेल्स नाही.
या धाब्यांवर एक मस्त सुस्ती असते, शहरापासून दूर लांबच्या प्रवाश्यांसाठी कायम सज्ज असणारे हे धाबे प्रत्येक वेळी मन आकर्षित करतात. तर या धाब्याचे नाव होते किंदा दा धाबा, पंजाबी धाबा असावा बहुतेक. तो धाबा म्हणजे एक शेडच होते, कंबरे एवढ्या उंचीच्या भिंती, त्यातून मस्त शूद्ध हवा खेळत होती. ८ ते ९ बाज बसतील एवढे शेड होते अणि त्याला लागूनच किचन. बाहेर झाडाखाली ५ ते६ बाज मांडले होते. किचन मधून तोंडाला पाणी सुटेल असा सुगंद दरवळत होता. असा सगळा गोतावळा आणि त्यापुढे गाड्या पार्क करण्यासाठी माती सपाट करून केलेली जागा. शहरातल्या गोंगाटापासून प्रदुशनापासून खुप दुर.
आजूबाजूला सगळे जंगल मला ते सगळं पाहून तिथेच रहावे असे वाटू लागले आयुष्यात पहिल्यांदा आपण श्रीमंत असण्याचा तिरस्कार वाटू लागला.
कानातले ईयरफोन्स काढून खिशात ठेवले आणि उतरलो गार वारा वाहत होता त्या उन्हाळ्यातल्या दुपारी तो वारा स्व्रर्गवत वाटत होता. धाब्याच्या डाव्या बाजूला असणार्‍या त्या छोट्याश्या टॉयलेट मध्ये शारीरिक विधी आटोपले आणि त्या शेड मधल्या एका बाजेवर जाऊन बसलो. आमची एकच गाडी तेथे असल्याने फारशी गर्दी न्हवती. शेड दोन्हीबाजूनी खुले असल्यामुळे मस्त वारा वाहत होता. बसल्या बसल्या वेटर जवळ आला मस्तपैकी आलू परोठा आणी काजू मसाला ऑर्डर केला स्पाईसी करना हा पाजी म्हणून त्या दोनवेळा बजावून सांगितले. आणि त्या वातवरणाचा आस्वाद घेत बसलो. असे वाटत होते की ईथेच एक दिवस वस्ती करावी.
वेटर जेवण घेऊन आल्यानंतर यतेच्छ ताव मारला, आणि डोळ्यावर पेंग घेऊन तिथेच बसून राहीलो तेव्हड्यात कंडक्टर च्या शिट्टी चा आवाज ऐकू आला बस निघाली होती नाईलाजाने ऊठलो बील पे केलं आणि निघालो पण मनात एक गाण वाजत होतं,
"मंझिल से बेहतर, लगने लगे है ये रास्ते......"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला कधीकधी ट्रकवाले किंवा टुर्सवाले यांचा तिरस्कार वाटत असे. साला यांना फिरायचे पैसे मिळतात.>>>>

तुम्हाला 'हेवा वाटत असे' असे म्हणायचे आहे का?

अजुन खुलविता आले असते त्या प्रवासाचे वर्णन!

धाग्याचं नाव वाचुन भुताचं काही असेल असं वाटलेलं.

नाव ढाबा हवं ना?
मराठीत धाबं दणाणलं मधलं धाबं किंवा एखादा नियम धाब्यावर बसवला मधला धाबा आणि हा पंजाबी जेवण्याचा ढाबा सेम असतं का?

माफी असावी, मला शुद्धलेखनातले शु पण कळत नाहि, तरी पण वाचुन वाचुन ट्राय करतोय सुधरण्याचा. धन्यवाद प्रतिसादांसाठी

नाव ढाबा हवं ना?
मराठीत धाबं दणाणलं मधलं धाबं किंवा एखादा नियम धाब्यावर बसवला मधला धाबा आणि हा पंजाबी जेवण्याचा ढाबा सेम असतं का?
>>
हेच लिहिणार होतो. आमच्याकडे धाबा म्हणजे टेरेस!

आमच्याहीकडं धाबाच म्हणत्यात..ओ >> कशाला? खानावळीला की गच्चीला ?
मी आत्ताच नेटवर च्या डिक्शन-या बघितल्या तर त्यात धाबा हा शब्दच नाही.