Submitted by अनुया on 22 April, 2017 - 09:04
दारी सडे फुलांचे मी शिंपिलेच होते
पायात कंटकांचे सल साहिलेच होते
जाई-जुई फुलांचा सुकुमार गंध ओला
निवडुंग अग्निफुलवे मी पाहिलेच होते
अस्मानी अस्मितेच्या विलसे टपोर तारा
पूर्णातही अपूर्णा मी राहिलेच होते
लाटेस सागराच्या जरि थोपवी किनारा
राजापुरात गंगाजल वाहिलेच होते
शापीत अप्सरेचे अव्यक्त आर्त जगणे
उ:शाप वेदनांना कधि लाभलेच नव्हते
आयुष्य वेचताना कधि हासले खळाळा
आक्रंद अंतरीचे मी साहिलेच होते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान !
छान !
शापीत अप्सरेचे अव्यक्त आर्त
शापीत अप्सरेचे अव्यक्त आर्त जगणे
उ:शाप वेदनांना कधि लाभलेच नव्हते.......अप्रतिम लेखन....
काही र्हस्व दीर्घ बघावेत.
काही र्हस्व दीर्घ बघावेत. आनंदकंदमध्ये यती महत्वाचा असतो. अनेक ओळी आवडल्या. शुभेच्छा!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
बेफिकीरजी, सूचनांबद्दल मन:पूर्वक आभार! मी लगेच संपादित करायचा प्रयत्न करते.
सुंदर..
सुंदर..
छान लिहिता
छान लिहिता