गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते
अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.
अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....
साभार--- आमचे परममित्र झपाटलेला फिलॉसोफर
बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड
बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.>>> +१
नाही बनवु शकत.
अवो हॉलिवूड म्हणजे लैच लांबचं
अवो हॉलिवूड म्हणजे लैच लांबचं बोलताय.
असे घडण्याची दोन कारणे आहेत
असे घडण्याची दोन कारणे असावीत
१. पूर्वी साहित्यिक लिखाण करत आणि उत्तम कथांवर सिरियल्स बनवल्या जात. त्या कथेभोवती सुयोग्य टीम तयार केली जात असावी , म्हणजे कथेच्या अनुरूप दिग्दर्शक , अभिनेते , वगैरे निवडले जात असवेत.
आता आधी सिरियल बनवयचा आरखडा ठरत असावा. मग कथा हवी म्हणून लेखक मुक्रर केला जात असावा. आणि या सर्व निवडीचा मापदंड / उद्देश जास्तीत जास्त जाहिराती मिळणे / मिळवणे ! यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षक मिळायला हवा.
२. मुख्य मोठ्ठा प्रेक्षक वर्ग हा गॉसिपिंग ची आवड असणारा सिनियर सिटीझन आणी महिला वर्ग ! त्यामुळे त्याना आवडेल त्या प्रक्रुतीच्या विषयाच्या सिरियल्स बनू लागल्या असाव्यात.
इंग्रजीमधे एक म्हण आहे
People get the government they deserve.
व्ही. शांताराम म्हणत कि प्रेक्षकांची आवड घडवायची असते , निव्वळ त्याना काय आवडतं ते दाखवणं अयोग्य आहे.
हॉलीवूडसारख्या मालिका बनवून
हॉलीवूडसारख्या मालिका बनवून काय एक्स्पोर्ट करायच्या आहेत का तिथे? आपल्या लोकांच्या आवडीचे काय मग? जे आपल्याईथल्या लोकांची आवड जपणे गरजेचे आहे ना.
ऋ +1. आपल्या लोकांना आवडतील
ऋ +1. आपल्या लोकांना आवडतील अशा पण दर्जेदार मालिका बनायला हव्यात. उगाचच हाॅलिवूडशी तुलना कशाला??
हो आपल्या लोकांना निर्बुद्ध
हो आपल्या लोकांना निर्बुद्ध करमणूक आवडते, तीच देत राहा पुढल्या पिढीला
निधी, हॉलिवूड सारखं कन्टेंट
निधी, हॉलिवूड सारखं कन्टेंट द्या असं म्हणत नसून त्यांच्यासारखी दिग्दर्शनाची क्वालिटी द्या असं म्हणत आहेत जे कधीही शक्य वाटत नाही. दोन्ही बाबतीत.
ईथे क्वालिटी सापेक्ष असते हा
ईथे क्वालिटी सापेक्ष असते हा मुद्दा घेतला तर विषयच संपेल, त्यामुळे तुर्तास मान्य करूया की क्वालिटी त्या दर्जाची नाहीये.
पण मग क्वालिटी न येण्यामागे कारण काय असावे?
आपल्या देशातील लोकांमध्ये ती प्रतिभाच नाही हे मला पटत नाही.
तांत्रिकदृष्ट्या सरस नसावे तर त्याबाबत आपण पिछाडीवर आहोत हे कबूल.
सतराशे साठ चॅनेल आणि प्रत्येकावर चोवीस तास कार्यक्रम ठेवायचे झाल्यास डेलीसोपला पर्याय नसतो, मग तिथे तुम्ही प्रेक्षक म्हणूनही आपल्या एक्स्पेक्टेशन उतरवल्या पाहिजेत. तरीही विविध विषयांवरच्या मालिका येतात. त्यात पाणी घालत वाढवण्याआधी चिक्कार मनोरंजन करतात.
मी कधीतरी यूट्यूब जुन्या गाजलेल्या मालिकांचे एपिसोड बघतो, मला त्या बोर वाटतात. त्या जुन्या आहेत, संदर्भ बदललेले असतील म्हणून असे नाही, नाहीतर पिचरही बोर वाटले असते, पण दर्जानुसारही काही खास वाटत नाहीत. त्या देखील आठवड्याला एकच एपिसोड लागत असूनही दर्जा काही खास वाटत नाही. तेव्हाच्या हॉलीवूड मालिकांचा दर्जा काय होता याची कल्पना नाही.
माझ्यामते तरी जसे मराठी चित्रपटांचा दर्जा गेल्या दशकात उंचावलाय तेच मालिकांबाबतही झाले आहे.
आज बहुतांश मराठी माणसांच्या घरात मराठी चॅनेल, मराठी मालिका लागलेल्या दिसतात. अन्यथा एकेकाळी हीच लोकं एकता कपूरच्या हिंदी मालिकांमध्ये गुरफटलेले असायचे. आमच्या ऑफिसमध्येही लंच टेबलवर कधी चर्चा झाली तरी फक्त आणि फक्त मराठी मालिकांचीच होते, हिंदीच्या कोणी बघते की नाही याचीही शंका येते. ईथे मायबोलीवरही प्रत्येक मालिकेवर एक धागा बघायला मिळतो आणि तिच्या दर्जानुसार तो कमीजस्त हिट जातो. व्हॉटसपवर फिरणारे मालिकांवर आधारीत जोक्स हिट जातात, सर्वांना त्यातले संदर्भही माहीत असतात, वगैरे वगैरे हे सारे यश नाही तर आणखी काय आहे? मला तरी वाटते की लोकांना काय आवडते हे या मालिकांनी ओळखले आहे, ते बघण्यात लोकंही खुश आहेत. उगाच दर्जा वाढवायच्या नादात मज्जा निघून जायची
.... आणि तरीही त्याची गरज भासल्यास अधूनमधून एखादी हॉलीवूडची सिरीज बघून घ्यायची, काय काय आणि नाय काय
जुन्या मालिका बोअर वाटतात....
जुन्या मालिका बोअर वाटतात.....
यावर दुमत असू शकते पण त्या आजच्या सारख्या सवंग अन फालतू नक्कीच नव्हत्या.... बोअर असणे हे वाईट दर्जाचे एकमेव लक्षण नाही..... बोअर असणे हे व्यक्ती सापेक्ष आहे.... शास्त्रिय संगीत अनेकांना बोअर वाटते पण त्याच्या दर्ज्याबद्दल दुमत नसते...
शास्त्रीय संगीताचे उदाहरण जरा
शास्त्रीय संगीताचे उदाहरण जरा चुकलेय. मुळातच एखाद्याला मालिकाच आवडत नसतील वा ठराविक जॉनरच्या मालिका आवडत नसतील तर हे उदाहरण लागू. पण शास्त्रीय संगीत आवडणारे तर त्यातले काय चांगले आणि काय बोर हे ठरवू शकतो ना. कि असे तर नाही, शास्त्रीय संगीत म्हटले की मग त्यात होणारी प्रत्येक निर्मिती दर्जेदारच.
असो, मालिकांचा दर्जा तेव्हा काही खास नव्हता. पण तेव्हा अपेक्षा कमी असायच्या मुळातच. काही लागेल ते बघा. आज चॅनेल चॅनेलमध्ये स्पर्धा झाली आहे. मराठीचेच तीन चार चॅनेल आहेत. शहरातील मराठी प्रेक्षक हिंदी मालिकांकडेही सहज वळू शकतो. टीव्हीच्या मनोरंजनाला ईण्टरनेटचा पर्यायही उपलब्ध झालाय. वाढत्या नेटस्पीडने हा पर्याय आणखी सक्षम झालाय. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांची आवड ओळखत चांगले बघायला द्याल तरच टिकाल अशी स्थिती आहे. त्यात मराठी मालिका टिकल्या आहेत हे कौतुकास्पद आहे
धाग्याच्या विषयाशी सहमत, पुढे
धाग्याच्या विषयाशी सहमत, पुढे पशुपत यांनी दिलेल्या विश्लेषणाशी देखिल सहमत.
हल्ली, इट्स अ गेम ऑफ "मेकिंग मनी", तेव्हा क्वालिटी, दर्जा, गुणवत्ता, कथासुत्र, अन मुख्य म्हणजे "संदेश" वगैरे गोष्टींची अपेक्षा करु शकत नाही.
काये ना, पुण्याकडे नीरा मिळते, जर प्युवर नीरा विकली तर गिर्हाईकच मिळणार नाही त्या चविला...
तेव्हा तिच्यात साखरेचे पाणी मिसळले जातेच जाते... प्युवर नीरा इतकी गोड नसते.
तर थंडगार साखरेचे पाणी , थोडीशीच नीरेची "चव" आपण (म्हणजे गिर्हाईकेहो...) उन्हाच्या तडाख्यात मिटक्या मारीत पितो.....
अगदी तस्सेच या मालिकांचेही आहे......
मालिका जशा रतीबाने घातल्या
मालिका जशा रतीबाने घातल्या जातात तसेच इथे प्रतिसादांचेही रतीब घातले जातात. इथे काही चांगले वाचायला मिळण्याआधी बरेच फोलपट ओलांडावे लागते. मालिका पाहणाऱ्यांच्या नशिबी तेवढेही नसावे. नुसते फोलपटच वाट्याला येते त्याला काय करणार.
बाकी मालिका बघणाऱ्यांचा दर्जा खालावलाय असे नसून जे बघायला मिळते ते बघितले जाते शिव्या देत का होईना. कुठल्या मालिकेचा टिआरपी जास्त हे प्रत्यक्ष लोकांना विचारून थोडेच ठरवतात.
सवयीने फेसबुक परत परत रिफ्रेश करणे, व्हॉ ऍ बघणे यासारखेच टीव्ही सुरू करून ठेवणे आणि जे चालू आहे ते डोळ्याखालून घालणे सुरू असते. जमतील तिथे पिंका टाकणे सुरू असते. मीही हेच करते. माबोवर मालिकांवरच्या धाग्यांवरचे प्रतिसाद मूळ मालिकेच्या भागांपेक्षा खूप जास्त पटीत आहेत, धागाकर्ते पुरुषही तितकेच आहेत जितक्या महिला.
दर्जेदार मालिका बनवायची म्हटले की त्याला वेळ द्यावा लागतो. तेवढा वेळ मिळत नाही. जिथे प्रत्येक भागाचा लेखक वेगळा असू शकतो तिथे दर्जा कुठून राखणार?
मी अधून मधून काही मराठी मालिकांचे जेवढे भाग बघितलेत त्यावरून असे वाटते की कलाकारांना सुरवातीला कथानक म्हणून एक ओळ देतात आणि यावर जमेल तसे बोला, 20 मिनिटे भरा असे सांगतात. दिवाळीच्या सुमारास मी बघितलेल्या एका भागात एक ऑफिसचा सिन होता, ऑफिसात बायका आणि पुरुष यांचे प्रमाण 5:1 असे होते आणि पूर्ण 20 मिनिटे उद्या कोणती वस्त्रे नेसावीत यावर चर्चा. प्रत्येकाचा फक्त क्लोजअप. एकही असे दृश्य नाही ज्यात बोलणारे दोघे एका फ्रेममध्ये. त्यामुळं हे लोक एकत्र बसून संवाद बोलताहेत की प्रत्येकाचे वेगवेगळे रेकॉर्ड करून तुकडे जोडून दाखवताहेत हेही कळत नव्हते. इतर वेळीही असेच काहीतरी अर्थहीन, जे 2 वाक्यात आटपू शकते ते 20 मिनिटे दाखवणे सुरू असते.
जुन्या मालिका आजच्या
जुन्या मालिका आजच्या प्रेक्षकांना बोअर वाटणे समजू शकते. मला शास्त्रीय संगीत आवडते पण जुने रेकॉर्डिंग ऐकताना कंटाळा येतो; कानांना स्टेरिओ साउंड आणि अजून कसल्या कसल्या साउंडची सवय झालीय, त्या कानांना जुने मोनो रेकॉर्डिंग रुचत नाही. जो खरा शास्त्रीय संगीत भक्त आहे त्याला खरखर आवाज करणारी एखादी दुर्मिळ रेकॉर्ड मिळाली तरी स्वर्गप्राप्तीचा आनंद लाभेल.
आणि तसेही दर्जा ही कालानुरूप बदलणारी चीज आहे. कालातीत साहित्यकृती निर्माण करणारे कलाकार एकूण जगाचा विचार केला तरी केवळ 100 च्या आसपास आढळतील.
आज बहुतांश मराठी माणसांच्या
आज बहुतांश मराठी माणसांच्या घरात मराठी चॅनेल, मराठी मालिका लागलेल्या दिसतात. अन्यथा एकेकाळी हीच लोकं एकता कपूरच्या हिंदी मालिकांमध्ये गुरफटलेले असायचे.>>>>>> म्हणजे आधी लोक सास बहु मधे रमत होती.आता सावत्र बायका, लग्नाच्या बायको सोडुन बाहेरच्या मैत्रीणीसोबत रहाणे,लग्न जमविण्यासाथी दर आठवड्याला ४ मुल पाहणे,त्यातिथे २ मालिकांमधे बहिणीच्या नवरयासोबत संसाराचे स्वप्न पाहणे, ह्यामधे रमत आहे.खंडोबा सीरीयल तर पाणी घालुन घालुन तलाव करुन ठेवला आहे.काय बिनडोकपणा आहे.
हॉलिवुड च्या मालिका फक्त गुप्तहेर्,हाणामारी,डिशुम डीशुम्,व्हॅपायर एवड्याच मर्यादीत नाहीये.काहीवेळा अश्या सीरीयल अंसंबध वाटल्या तरी त्त्या फुल्ल ऑन टाईमपास असतात.त्यामधे ही ते दर्जा राखतात.कलाकार ही तेवढी मेहनत घेतात हे जाणवत.नातेसंबंधावर ही खुप चां गल्या सीरीयल्स सीरीज आहेत.
आताच्या मराठी मालिका आनि हॉलीवुड सीरीज तुलना च होऊ शकत नाही.
जे 2 वाक्यात आटपू शकते ते 20
जे 2 वाक्यात आटपू शकते ते 20 मिनिटे दाखवणे सुरू असते. अगदी.
मला तर नेहमी प्र्श्न पड्तो की, हे लोक घडा घडा का बोलत नाहीत.?
किती ते एखाद्या प्रसंगावर दळत बसतात.. मालिकामध्ये ज्याने एखादी घटना एकणं किंवा बघणं अपेक्षित असतं ते सोडून नेमके भलतेच लोक (म्हण्जे वॉम्प) बघतात किंवा एकतात. आणि सगळ्या मालिंकामध्ये हेच.. किती तो सारखेपणा.. काहिच नाविन्य नाही..
खंडोबा सीरीयल तर पाणी घालुन
खंडोबा सीरीयल तर पाणी घालुन घालुन तलाव करुन ठेवला आहे.काय बिनडोकपणा आहे.
विनोदि मालिका त्यात्ल्या त्यात बर्या असतात. पण तारक मेहता पण आता ईरिटेटिंग व्ह्यायला लागलंयं.. किती ताणतात प्रत्येक एपिसोड..
चावून चावून चोथा झालेला विषय
चावून चावून चोथा झालेला विषय आणि प्रतिसादही.
या अर्थाचे किती धागे असतील मायबोलीवर?
म्हणजे एकेका मालिकेला वाहिलेला धागा सोडा. त्याशिवात आपल्या मालिका कशा वाईट्ट यावर 'चर्चा' करणारे?
भरत मला वाटलं की प्रत्येक
भरत मला वाटलं की प्रत्येक सिरियलचे सेपरेट कशाला वाभाडे काढा, एकाच ठिकाणी एकाच छताखाली ते निघावेत याची सोय
हल्लीच "खुपते तिथे गुप्ते
हल्लीच "खुपते तिथे गुप्ते season 2" मधला चिन्मय मांडलेकर नि प्रसाद ओक असलेला कार्यक्रम पाहिला. त्यामध्ये चिन्मय मांडलेकरने डेलिसोपच्या लेखकांचे प्राॅब्लेम ठळकपणे सांगितले आहेत. जर या लेखकांवर एवढ्या कमी वेळात भरमसाठ एपिसोड लिहायचा दबाव टाकला जात असेल तर त्यांच्याकडून नाविन्याची अपेक्षा करावी का, हा प्रश्नच पडलाय मला तरी. त्यांना पण विचार करायला वेळ द्यायला हवा.. तोच बहुतेक मिळत नाही. मग सरधोपटपणे जे जसं डोक्यात येईल तस लिहून टाकत असावेत.
भिडे साहेब , लेख / विचार आपले
भिडे साहेब , लेख / विचार आपले आहेत कि आपल्या मित्राचे ?
असो, केवळ भारतीय मालिकांबाबत बोलण्यात अर्थ नाही. मी अधून मधून काही पोर्तुगीज,
चायनीज, नायजेरियन मालिका बघतो.. ( केवळ काहि मिनिटे, त्यापेक्षा जास्त वेळ बघूच शकत नाही. )
तर सगळ्या मालिकेत तेच तेच म्हणजे छळणार्या सास्वा, सोसणार्या सूना, टोमणे मारणार्या नणंदा,
म्हातार्या आज्या आणि देखणे पण बुळचट नायक असतात.. आपल्याला आवडत नसल्या, तरी
जगभरात अनेकांना आवडत असाव्यात !!!
>>>> त्यांना पण विचार करायला
>>>> त्यांना पण विचार करायला वेळ द्यायला हवा.. तोच बहुतेक मिळत नाही. मग सरधोपटपणे जे जसं डोक्यात येईल तस लिहून टाकत असावेत. <<<< अगदी बरोबर.... मी इमॅजिन करु पहातोय, ऑर्डरप्रमाणेचे लेखन...
आपल्याकडे नाही का? गणपतींमध्ये एक तो विषय देऊन, जो तो त्यात आपली भर घालुन कथा तयार करतो, तस्सेच हे, फक्त एकाच लेखकाकडुन.... !
अरे या डेलिसोपवाल्यांनी इकडे मायबोलीवर जरा चक्कर मारली, तर अशाप्रकारे रतिबाचे पण उत्कृष्ट लिहुन देऊ शकतील अशा किमान पाचपंचवीस आयडी तरी मिळतील..... !
१. मुळात उद्या-परवा किंवा
१. मुळात उद्या-परवा किंवा पुढच्या आठवड्यात प्रसारित होणार्या भागाचे लेखन आज करणे हेच चूक आहे. मालिकेचे २५ भागांचे लिखाण पूर्ण झाल्यावरच सिरीयलचे काम पुढच्या पातळीवर घ्यायला हवे .
२. मालिकेचा उद्देश हे निव्वळ लोकांना आवडेल असे काही दाखवणे हा असला तरी त्याच्या दर्जाचे मापदंड हे मूळ कलेच्या त्या त्या विभागाचे कलात्मक पातळी चे मूल्यमापन करण्याशी संदर्भ राखणारे हवेत. म्हणजे कथेला , संवाद - लिखाणाला साहित्यिक दर्जा हवा. त्याला वैचारिक मूल्य हवे. त्यात, "समाजात काय चालले आहे" याचे प्रतीबिंब न दाखवता "समाजात काय असायला हवे " ते दिसायला हवे. भाषा व्याकरण पाळणारी हवी , संस्कुतीचे संकेत जपणारी हवी. त्यामुळे परत तोच मुद्दा येतो कि लिखाण हे साहित्यिकाने केलेले असावे. दिग्दर्षन , अभिनय , नेपथ्य सर्व ठिकाणी असेच मापदन्ड हवेत.
३. मुळात सुद्रुढ विषयच नाही ! काचेच्या खड्याला दिग्दर्षक आणि अभिनेते काय - किती आणि कशाचे कोंदण चढवणार ?
टीवीमालिका या
टीवीमालिका या जाहिरातव्यवसायाचा एक अविभाज्य भाग, जाहिरातींचे पॅकेजिंग आहेत. कार्यक्रम, मालिकांध्ये रॅप करुन खरेतर जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कला म्हणून पाहू नये. दर्जा, वगैरे बद्दल अरण्यरुदन उपयोगाचे नाही. ग्राहकांना खिळवून ठेवू शकेल इतपत काम मालिकेने केले की झाले. त्यापलिकडे तिला महत्त्व नाही. तसेच प्रत्येक कलाकृतीच्या प्रकाराचा ग्राहक वेगवेगळा असतो हेही इथे खंत व्यक्त करणार्यांनी लक्षात घ्यावे. ग्राहक म्हटल्यावर त्याच्या आवडीनिवडीत उच्चनिचता वगैरे नसते तर फक्त भिन्नता असते असे म्हटले जाते. चलाहवायेऊद्या चे विनोद कोणाला आचरट-पांचट-पकावू वाटतील पण टीआरपी खेचणारा कार्यक्रम अस्ल्याने त्या टिकेला शुन्य किंमत.
खरी समस्या ही आहे की घरात ह्या मालिका न आवडणार्यांनाही जबरदस्ती बघाव्या लागतात, किंवा जे हवे ते बघू दिले जात नाही.
हळद रुसली कुंकू हसलं, माहेरची साडी, वगैरे रडूमुळू चित्रपटांवर असे दर्जाचे 'इतके' आरोप होतांना दिसले नाहीत. कारण ते थेटरात जाऊन पाहायची सक्ती नसते. आपल्या आवडीप्रमाणे नाटक-सिनेमा प्रेक्षकाला निवडता येतो. घरात एकच टीवी असतांना हे शक्य होत नाही.
ज्या दिवशी बिगबॉससारखे कार्यक्रमही लोक बघतात आणी टीआरपी देतात हे मला कळले त्यादिवशी जो धक्का बसला एकूण प्रेक्षक मानसिकतेचा की बस... आणि हे भारतसापेक्ष नाही. दिनेशदा म्हणतात तसे सर्वव्यापी आहे. आचरट-पांचट-पकाव कार्यक्रम जगभर चालू असतात.
गंदा है पर धंदा है ये.
मधुगंधा कुलकर्णी यांचे उत्तर
मधुगंधा कुलकर्णी यांचे उत्तर ! तीन मिनिटाचा व्हिडिओ !
https://www.youtube.com/watch?v=s57wTP8xJFw
आणि हे भारतसापेक्ष नाही.
आणि हे भारतसापेक्ष नाही. दिनेशदा म्हणतात तसे सर्वव्यापी आहे. आचरट-पांचट-पकाव कार्यक्रम जगभर चालू असतात.
>>>>>>>
याच्याशी थोडासा असहमत आहे.. त्या साठी काही उ.द. पाहुयात..
काही योगायोग मुळे मला बाहेरील सिरीयल्स काही वेळ पाहाता आल्येला आहेत... त्यामुळे मला जाणवलेला काही फरक इथे मांडतो.
१. तर्कसंगत मांडणी - विषय कोणताही असो पण तर्कसंगत मांडणीचा मोठा आभाव जाणवतो. तर्कसंगत मांडणीसाठी पैश्याची गरज नाही लागत. उ. दा. राणाच बायको पासुन दुर पळण - ज्या प्रेयसी साठी एवढी वर्ष / महीने वाट पाहिली, लग्ना नंतर इतके दिवस तिला हात ही न लावणे व ज्या विचीत्र प्रकारे तिच्या पासुन दुर पळणे. हे कोणत्याच तर्कात बसत नाही. इथे नायक भोळा ऐवजी बावळट किंवा गे वाटतो. अशी खुप उ.द आहेत.
- गोठ्यात जनावरे बांधलेली असताना तिथे शेजारी बसुन जेवणे.
- काहि महिने लहाण असनार्या बाळाला ऑफीस मध्ये घेउन जाणे व दिवसभर न डिस्टर्ब होता काम करणे.
- कार चालवतान बर्याच वेळी पुढे बसलेल्यानी सिट बेल्ट न लावणे.
बेसिक लॉजीक नावाच काही प्रकार असतो हे दिग्दर्शकाला माहीत आहे कि नाही हा प्रश्न पडतो.
२. आती स्टेरिओ टाईप - पोलीस, डॉक्टर, शेतकरी, गुंड, मोलकरीण इ. इ. यांच इतक भयंकर स्टेरिओ टाईप दाखवतात कि अस वाटत यानी हि पात्र खर्या आयुष्यात पाहिली असतील कि नाही ....
३. लुज एन्ड्स - मुख्य कथानकात खुप सारे उपकथानक जोडणे व त्याना वार्यवर सोडणे.
४. पात्राची निवड - हा खुपच कळिचा मुद्दा आहे. व्हिजुअल आर्ट मध्ये ते पात्र खरच आहे तस वाटणे हे किती महत्वाचा आसत, हे याना कस काय जाणवत नाही? ... वेळ मिळाला कि लिहतो पुढच...
morpankhis>>>>
morpankhis>>>>
मी तुमच्याशी सहमत आहे. पण सगळे नीगेटीव गोष्टी सागताय.
morpankhis>>>>
morpankhis>>>>
मी तुमच्याशी सहमत आहे. पण सगळे नीगेटीव गोष्टी सागताय.
morpankhis>>>>
morpankhis>>>>
मी तुमच्याशी सहमत आहे. पण सगळे नीगेटीव गोष्टी सागताय.
दीपक - तुमच्यावर खूपच परिणाम
दीपक - तुमच्यावर खूपच परिणाम झालेला दिसतोय, सिरियल्स चा
आशूचँप
आशूचँप
Pages