खास तळपत्या उन्हाळ्यात! काला खट्टा सरबत!

Submitted by कृष्णा on 10 April, 2017 - 03:49

काला खट्टा सरबत.

उन्हाच्या झळाळत्या झळ्यात थंडगार सरबत घश्यालाच पोटालाच नाही तर मनालाही गारवा आणते....
बर्फगोळा खाण्याची आवड असणार्‍यांना तर कालाखट्टा चा बर्फ गोळा मिटक्या मारत खाण्यातील गोडी सांगायलाच नको.. त्या गोळ्याची आंबट गोड घरच्या घरी अनुभवण्यासाठी बर्फ नाही पण सरबताचा हा खटाटोप काल केला आणि यशस्वी देखिल झाला मग सर्वांसोबत तो का न शेअर करावा म्हणून हा अजून एक खटाटोप... गोड... आंबटगोड... चिभेला मिटक्या मारायला लावणारा काळ्या लवणाचा खरटपणा!

साहित्य ३ ग्लास सरबतासाठी मी जे वापरले ते!

१. छान पिकलेली टप्पोरी जांभळं १५-२०
२. साखर- ८-१० चमचे.. (चहाला साखर घलताना वापरतो ते)
३. काळे मीठ दळून-- ३/४ टेबल स्पून
४. साधे मीठ चवी नुसार
५. २ लिंब मध्यम आकाराची.
६. जीरपूड १/२ टेबल स्पून
७. पाणी आणि बर्फाचे तुकडे

कृती:

१. सर्वप्रथम जांभळातील बिया काढून हलकेसे मिक्सर मध्ये दळून घ्या..
२. दळलेल्या जांभळात लिंबाचा रस , साखर, मीठ, काळे मीठ घालुन थोडावेळ मुरु द्या..
३. नंतर पुन्हा मिक्सर मध्ये थोडे फिरवून नंतर गाळुन घ्या.
४. हे मिश्रण थंड करुन त्यात नंतर जीरपूड आवश्यक तेवढे पाणी घाला. वर थंड करायल ठेवा.
५. ग्लास मध्ये सरबत घेऊन वर हवे असल्यास बर्फाचे खडे टाकून गट्टम करा!
६. बर्फ गोळ्यासारखे खायचे असल्याच हीच बर्फाचा चुरा करून त्यावर पाणी न घालता वरील कॉन्सन्ट्रेट वापरून गट्टम करा! Happy

KK.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सर्वांना! Happy

रंग काय सुरेख आला आहे!>>
ती जांभळं बिया काढण्यासाठी सुरी ने कापली तर एवढी जांभळी नव्हती पण १० मिन साखरेत मुरल्यावर रंग चढला छान!

बघुनच गार वाटलं.>> प्यायलावर अजुन गारगार वाटते! Happy

कलिंगड आणि मिल्क एकत्र पहिल्यांदाच पाहिलं? असं चालतं का?

पुर्वी कलिंगड ज्युसने एका फॅमिलीला प्रचंड फुड पॉयझनिंग झालेलं पाहिल्यापासुन कलिंगडाचा कायमसाठी धसका घेतला आहे.

बाय द वे, दिसतं आहे एकदम मस्त . फार छान रं ग आला आहे.

कलिंगड मिल्क्शेक Uhoh
कधीच पिउ शकणार नाही. काही फळं आणि दुध एकत्र मी विचारही करु शकत नाही. त्यातलं हे एक.

मिल्कशेक मुळात आवडत नाही.त्यामुळे नो नो.
आजच आणलेले कलिंगड गुलाबी असल्यामुळे फक्त सरबत करुन घेईन म्हणतेय.

कलिंगड आणि मिल्क एकत्र पहिल्यांदाच पाहिलं? असं चालतं का? >>>

मी खूप वेळा केलयं आणि मस्त लागते! छान फ्रीज मध्ये ठेऊन थंड केले की! Happy

हे ह्या सिझनचे!

दुसर्‍या चित्रातील दुसर्‍या पेल्यातील सेटल झाल्यावर वरचे फक्त क्लियर सरबत घेतले.

१.

A.jpg

२.

b.jpg

Pages