शतशब्द कथा... बेडूक अन विहीर

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 7 April, 2017 - 03:24

बेडूक अन विहीर

बेडूक ... तो त्या विहिरीबाहेर कधी पडलाच नाही... त्याचे मित्र उड्या मारायचे.. कुठल्यातरी पारंबीवरून, खळग्यातून वाट काढत वर यायचे.. मग बाहेरच्या जगात रमून कधीतरी त्याला भेटायला यायचे, " तू काय पाहिलास गड्या? हि इतकुशी विहीर त्याच ते ... हिरवं पाणी... छोटाले मासे, हे मच्छर अन तुझं पोट भरणारे लहान किडे...बाहेरच जग बघ... पुन्हा इथं फिरकणार नाहीस...अल्पसंतुष्टी म्हणतात ना...त्यातला आहेस तू..." बऱ्याच वेळा असा एकतर्फी संवाद व्हायचा आणि बेडूक गप गुमान ऐकायचा... तेच तेच तेच... शेवटी एकदा वैतागून बोलला..." अरे आहे मला माझी प्यारी विहीर... काय फरक पडणार आहे बाहेरच जग पाहून? अल्पसंतुष्टी नाही र गड्या मी... फक्त "संतुष्टी" आहे म्हण.... इथंही सुखातच आहे ना ?" बस... या प्रश्नावर मात्र सगळे मित्र निरुत्तर झाले अन... पुढे... एक समाधानी शांतता त्या विहिरीत पसरली...

............. मयुरी चवाथे-शिंदे.

शतशब्द कथा... हा एक (नवीन?) साहित्य प्रकार हल्लीच ऐकला.. ज्यात कथा शंभर शब्दांच्या आसपास संपवली जाते आणि हि सहसा बोधपर कथा असते, बोधही नकळत दिला जातो, कधी कधी तो शोधावा लागतो ... अशा कथेचा हा पहिलाच प्रयत्न.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
छान जमलिये शतशब्द कथा..
>>> +१

पटतो मला हा ही दृष्टीकोण, नव्हे मागे माझ्या मनात या विषयावर धागा काढायचेही आलेले. राहून गेले ते पुन्हा ते आठवले. आता बघूया कधी जमते.