आई

Submitted by वृन्दा१ on 1 April, 2017 - 15:16

आई म्हणजे कायमचा गुरू
स्वतः सोसून शिकवणे सुरु
आई म्हणजे आत्म्याची हाक
आई म्हणजे मनाचा धाक
आई म्हणजे अनुभवांची गाथा
आई म्हणजे टेकलेला माथा
आई म्हणजे घडवणारा कुंभार
आई म्हणजे कोमल गंधार
आई म्हणजे मनाची श्रीमंती
आई म्हणजे डोळस भ्रमंती
आई म्हणजे मायेचा घास
आई म्हणजे न संपणारी आस
आई म्हणजे डोळ्यांतलं पाणी
आई म्हणजे शांतवणारी गाणी
आई म्हणजे मनाचा साज
आई म्हणजे आतला आवाज
आई म्हणजे सखी अन् मैत्रीण
आई म्हणजे काळजातली घट्ट वीण
आई म्हणजे पहिलंवहिलं नातं
सगळं जग त्यानंतरच येतं ........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast.

छान!

सुंदर

खुपच छान!