Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅमी.
अॅमी.
लोखंडचीच कढई आहे. ती नेहमी कोरडी करूनच तेलाचा हात फिरवून तापवून ठेवावीच लागते.
पण योकुने कुठल्यातरी धाग्यावर
पण योकुने कुठल्यातरी धाग्यावर पांढरीशुभ्र कढई दाखवलेली लोखंडाची म्हणून. >> लोखंडाची कढई नेहमी वापरात असेल आणि दर वापरा नंतर घासून पुसून कोरडी करुन ठेवली तर पांढरीशुभ्रच रहाते. माझ्याकडची सुध्दा तशीच आहे.
मी तेलाचा हात (थर) लावुन ठेवत नाही.
इथे मुळातच का ळ्या असलेल्या
इथे मुळातच का ळ्या असलेल्या लोखंडी कढया बघा.
स्टेनलेस स्टील, आयर्न - लोखंड , कास्ट आयर्न - बीड असे प्रकार आहेत.
मी तरी पांढरी शुभ्र
मी तरी पांढरी शुभ्र "लोखंडाची" कढई पाहिलेली नाहीये अजून !
ओके झंपी. यापुढे नेहमी वापर
ओके झंपी. यापुढे नेहमी वापर केला की धुवून, कोरडी करून, तेलाचा हात फिरवून ,तापवून ठेवत जाईन. धन्यवाद
> मी तरी पांढरी शुभ्र "लोखंडाची" कढई पाहिलेली नाहीये अजून ! > मीपण. म्हणूनच योकुंची कढई बघून आश्चर्य वाटलेलं.
स्निग्धा तुमच्या कढईचा फोटो टाकू शकाल का?
वर लिंक दिलीय त्यात आहेत
वर लिंक दिलीय त्यात आहेत पांढर्या कढया. स्टेनलेस स्टीलच्या
स्निग्धा तुमच्या कढईचा फोटो
स्निग्धा तुमच्या कढईचा फोटो टाकू शकाल का? >> हो. उद्या पर्यंत टाकते
म्हणूनच योकुंची कढई बघून आश्चर्य वाटलेलं. >> योकुंची कढई पाहिली आहे का तुम्ही?
> योकुंची कढई पाहिली आहे का
> योकुंची कढई पाहिली आहे का तुम्ही? > हो कुठल्यातरी धाग्यात फोटो दिलेला त्यांनी.
सापडली सापडली https://www.maayboli.com/node/66975 काळीच आहे.

मला पांढरी का वाटत होती काय माहीत
चूक झाली. माफ करा सगळ्यांनी
ती लोखंडी कढईच आहे. वरच्या
ती लोखंडी कढईच आहे. वरच्या फोटोत. आधी सांगीतल आहे तसं, सरळ पितांबरी + स्टील वूल नी जरा जोर लावून घासून कोरडी करून मग वापरा. नाही चढत जंग वगैरे. आमची कडई सुद्धा ओलमोस्ट रोजच वापरल्या जाते त तेल वगैरे लवून कधी ठेवत नाही.
कधी नाही वापरल्या गेली आणि जंग चढलाच समजा तर पुन्हा घासून मग वापर्तो.
(No subject)
ही माझी लोखंडी कढई
भारी दिसतेय कढई, स्निग्धा!!
भारी दिसतेय कढई, स्निग्धा!!
योकु, भरत वगैरेंनी सांगितल्याप्रमाणे विम लावून स्टील स्क्रबने जोरात घासून धुतली कढई. बऱ्यापैकी गंज गेला आहे आता.
धन्यवाद सगळ्यांना
ॲमी, कढई लिंबाच्या सालीने
ॲमी, कढई लिंबाच्या सालीने घासलीत तर एकदम चकाचक होईल. मग धुवून पुसून तापवा थोडी.
स्निग्धा, कढई अॅल्युमिनियमची
स्निग्धा, कढई अॅल्युमिनियमची आहे ना?
माझी कढई सुद्धा
माझी कढई सुद्धा स्निग्धांसारखीच आहे . आतून पांढरीशुभ्र आणि कडेला थोडी काळीकुट्ट. पण ती हिंडालीयम ची आहे . लोखंडी कढई इतकी पांढरी नाही होत. असं मला वाटतं.
स्निग्धा, कढई अॅल्युमिनियमची
स्निग्धा, कढई अॅल्युमिनियमची आहे ना? --- नाही. लोखंडाची आहे
गावरान चव चॅनल वर फार छान
गावरान चव चॅनल वर फार छान मातीच्या भांड्याविषयी माहीती दिली आहे. मला आवडली. घरी गेले कि आणाव म्हणती आहे २/३ भांडी. पण world market मध्ये पण दिसली . सेल वर असतील तेव्हा घेईन.
https://www.youtube.com/watch?v=B8gk7gRuTmA
मी पितळेचा पातेलं कल्हई करून
मी पितळेचा पातेलं कल्हई करून आणला आहे, आता ते वापरायला सुरु करायचं आहे. तर कसे तयार करावे? डायरेक्ट साबणाने धूवुन वापरावे कि अजून काही करावे लागेल?
हरपिकने लोखंडी भांडी एका
हरपिकने लोखंडी भांडी एका सेकंदात चकचकीत निघतात.
भांड्यासाठी हारपिक?
भांड्यासाठी हारपिक?
पितळेचे पातेलं घेताना मला
पितळेचे पातेलं घेताना मला सांगितलेलं कि तारेने किंवा कडक घासणीने घासू नका, साबण लावला तरी चालेल.
लोखंडी भांडी मुळातच काळी असतात त्यांना चकचकीत करु नये. हरपिकमधे किती रसायने असतात! एक दिवस ती भांडी जीव टाकतील.
सहमत sonalisl.
सहमत sonalisl.
एकवेळ SS ३०४ ची भांडी हार्पिकने क्वचित कधी घासली तर चालतील हार्ड वॉटरची स्केल जमली असेल तर काढायला, (स्वयंपाकाचे भांडे काही कारणाने हार्ड वॉटर तापवायला वापरले असेल वगैरे तर) पण नंतर जास्त पाण्याने विसळावी लागतील. पण इतर धातूंना हार्पिक बिग नो.
अरे मला सांगा ना कोणीतरी
अरे मला सांगा ना कोणीतरी
हो मन्या. लोखंडी भांडी न
मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होईल लोखंडी भांड्यांना. भांडी न भिजवताना कोरड्या भांड्यावरच डायरेक्ट त्यावर हरपिक ओतायचं. अर्थात नेहमी नाही तरी कधी तरी काहीच हरकत नाही असं करायला. स्टील मात्र बिग नो.
लोखंडी भांड्यात अन्न आपण
लोखंडी भांड्यात अन्न आपण शिजवतो. आणि हारपिकमधे भरमसाठ केमिकल्स असतात. आरोग्याच्यादृष्टीने ते घातक वाटतंय.. त्यापेक्षा लिंबु बेस्ट आहे..
स्टीलच्या भांड्यात लोणचं
स्टीलच्या भांड्यात लोणचं ठेवलं तर भांडे चिरते.
एकदा लसणाची चटणी रात्रभर
एकदा लसणाची चटणी रात्रभर स्टिलच्या वाटीत राहिली तर वाटी चिरली गेली होती.
शितल, माझी आजी कल्हई केलेलं
शितल, माझी आजी कल्हई केलेलं पितळी पातेल राखेनी घासायची. तिला कधी साबण/लिंबु वापरताना बघितलेल नाहीये.. बाकी जाणकार मंडळी सांगतिलच.
पितळेचे पातेले नेहमीच्या
पितळेचे पातेले नेहमीच्या भांड्याच्या साबणाने किंवा पावडरने घासले तरी चालते.
इथे कुणी भारतात डिश वॉशर
इथे कुणी भारतात डिश वॉशर घेतलाय का? कितपत उपयोग होतो?
Quora आणि तत्सम साइट्स वर मिक्सइड रेव्हूवस आहेत.
जागा खूप जास्ती घेतो असं वाचलंय.
तसंच सगळं खरकटं काढून सगळी भांडी लावायची म्हणजे निम्म्याहून अधिक काम केल्यासारखं आहे मग उरतच काय?
पण प्रत्येक सणासुदीला किंवा सतत सुट्ट्या घेणे, वेळेवर न येणे , भांडे कसेतरी घासणे ह्या आणि ह्यासारख्या अनेकानेक प्रॉब्लेम मुळे हे काम मशीन नी झालं तर बर होईल असं वाटतं.
इथे कुणी वापरात असल्यास त्यांचा अनुभव वाचायला आवडेल किंवा कुणाच्या नातलगांपैकी घेतला असेल तर त्यांचा अनुभव कसा आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
आम्ही २.५ महिन्यांपूर्वी
आम्ही २.५ महिन्यांपूर्वी घेतला डिशवॉशर (पुण्यात - अॅमेझॉन वरून घेतला). जागा घेतो २फूट x २ फूट + ३-४ इंच मागे. Bosch 12 Place Settings Dishwasher (SMS66GW01I, White).
अजूनतरी अनुभव चांगला आहे. मी सगळं खरकटं काढून मगच घालते भांडी - पण ते (म्हणजे बॉश) म्हणतात की खूप विसळून घेण्याची गरज नाही. मी परीक्षा घेतली नाही त्याची.
Pages