Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला माझ्या आईला एक मिक्सर
मला माझ्या आईला एक मिक्सर गिफ्ट द्यायचा आहे. हल्ली दोन आकाराचे मिक्सर मिळतात.... एक नेहमीसारखा L shape आणि दुसरा म्हणजे L shape मधुन आडवा पोर्शन बाद करून I shape.
यातला कोणता आकार चांगला आणि टिकाऊ आहे?
पायरेक्सच्या बोल्सची
पायरेक्सच्या बोल्सची प्लास्टिकची रेप्लेसमेंट झाकणं कुठे मिळतात माहित आहे का?<<<
आर्च तुमच्या इथे क्रोगर असेल तर तिथे बघ. मला तिथे अशी झाकणं पाहिल्याचं आठवतंय.
अमि७९ - मझ्या घरि दोन्हि
अमि७९ - मझ्या घरि दोन्हि प्रकारचे मिक्सर आहेत. I shape फिलीप्सचा आणि L shape सुमितचा.
आकारच म्हट्लस तर मला I shape बरा वटतो कारण स्टोरेज साठी बरा वाटतो शिवाय दिसतो पण चांगला.
पण दोन्ही सुद्धा तेवढेच चांगले आहेत.
फक्त चांगल्या ब्रांडेड कंपनिचे असण महत्वाच आहे. टिकतात चांगले. पण सुमित बेस्ट आहे. आता मिळतात कि नहि माहित नाहि. पण आमच्याकडे तर गेलि २७ वर्षे तो वापरला जात आहे.
मला मायक्रोवेव्ह ओव्हन
मला मायक्रोवेव्ह ओव्हन घ्यायचे आहे. मी यापूर्वी कधीही पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले नाही. (त्यामुळे वापरता येईल की नाही , उपयोग होईल की नाही , शंकाच आहे.) . फक्त त्यात अन्न गरम कसे करायचे आणि पापड कसे भाजायचे एवढेच मला जमते.
कुठला घ्यावा? उरलेले अन्न गरम करण्या व्यतिरिक्त अजुन काही उपयोग होतो का? जाणकरांनी प्रकाश टाकावा.
आईशप्पाथ!! प्रिन्सेस, हाच
आईशप्पाथ!! प्रिन्सेस, हाच प्रश्न विचारायला मी आले होते. मला दिवाळीसाठी आई मायक्रोवेव्ह देणार आहे त्यामुळे कुठला घ्यायचा हे तिला सांगायचे आहे..
मी ओटीजी वापरयाल पण मायक्रिवेव्ह मधे फके जेवण गरम करणे इतकेच जमते.
कृपया सल्ला द्या!!!
माझ्याकडे LG चा मायक्रोवेव्ह
माझ्याकडे LG चा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. खुप छान चालतो. गेलि पाच वर्षतरी वापरत आहे. आम्हि त्यात केक पासुन चिकन तंदुरी पर्यंत अगदि सगळ्याला वापरतो.
मोदकपात्र कस वापरायच? आणि
मोदकपात्र कस वापरायच? आणि त्यात फक्त मोदकच करता येतात का? ढोकळा वगैरे करता येईल का त्यात?
रचना! भारतात आहेस का? माझ्या
रचना! भारतात आहेस का? माझ्या आईकडे LGचा मायक्रोव्हेव आहे, त्याबरोबर रेसिपि बुक येत त्यानुसार बरेच पदार्थ करता येतात (आणि चांगले होतात)जस ढोकळा, पिझ्झा, केक, उकड वैगरे.
मोगरा केतकी अन प्राजक्ताडी
मोगरा केतकी अन प्राजक्ताडी धन्यवाद
एलजीचा बघुन येते आअजच जाऊन. अजुन कुणी आहे का, एलजी व्यतिरिक्त , दुसरा सांगणारे ?
नंदिनी, तुझा कुठला घ्यायचा ते नक्की झाले की मलाही कळव.
माझ्या आईकडे एल जी चा आहे. ८
माझ्या आईकडे एल जी चा आहे. ८ वर्षं झाली. चांगला आहे. कॉम्बो आहे. पण पटवर्धन शाकाहारी असल्याने कॉम्बोचा फारसा वापर होत नाही.
मी गेल्यावर्षी गोदरेजचा घेतलाय. तोही कॉम्बो. अजूनतरी काहीच प्रॉब्लेम नाही. कॉम्बो मधल्या इतर गोष्टी अजून वापरून बघितल्या नाहीयेत.
माझ्याकडे एलजी चा आहे
माझ्याकडे एलजी चा आहे मायक्रोव्हेव विथ ग्रील अँड कन्चेंशन. अडीच वर्षापासून वापरतेय. अन्न गरम करणे, इडल्या (माझ्याकडे साधं इडलीपात्र नाहिये), ढोकळे, भात, वांगी भाजणे, शेंगदाणे भाजणे, आयाम लहान असताना त्याच्यासाठी खिमट बनवणे, भाज्या शिजवणे (बर्याच भाज्या मी अर्धवट शिजवून घेते अन नंतर बाहेर थोड्या तेलावर फोडणी देवून परतते), ग्रीलवर २-४ वेळा व्हेज आणी चिकन कबाब ग्रील केलेत, केक अन लो कॅल बनाना ब्रेड कनव्हेंशन मोडवर नेहेमी करणे इ. साठी वापर होतो.
२-४ वेळ गॅस संपल्यामुळे अन स्वैपाकघरात सुतारकाम चालल्यामूळे सकाळचा चहा / कॉफी, नाश्ता (ब्रेड्-बटर, पोहे) अन जेवण (भात्-भाजी, पुलाव, मॅगी इ..)करताना सगळ्यात जास्त उपयोग झाला मायक्रोव्हेवचा.
आईकडे केनस्टारचा कॉम्बो विथ ग्रील असा मायक्रोव्हेव आहे ५-६ वर्षांपासून. तिच्याकडे केक वैगरेसाठी दुसरा गोल ओव्हन असल्यामूळे कन्व्हेंशन मोड असलेला घेतला नाही. ती क्वचित भाज्या करणे अन नेहेमी वांगी, शेंगदाणे वैगरे भाजणे यासाठीच उपयोग करते फक्त. तिकडे सकाळच्या स्वैपाकाच्या गडबडीच्या वेळी लाइटच नसते. पण केनस्टार मध्ये २-३ वेळा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला होता. कंपनीने दुरुस्त करून दिला होता.
मी परवा फराळी मिसळ पुर्णपणे मायक्रोव्हेव वापरुन केली. :). बटाट्याचा किस अन साबुदाण्याच्यापापड्या, बटाट्याचे पापड वैगरे न तळता मायक्रोमध्ये भाजून घेतले.
माझ्याकडे LG
माझ्याकडे LG micro+grill+convection oven आहे. भाजी,उपमा करण (कधीतरी नेहमी नाही), सुप साठी भाज्या शिजवुन घेण, पालक शिजवण, केक (साध्या मायक्रो वर/कन्व्हेक्शन वर) करण, शेंगदाणे भाजण, स्विट कॉर्न चटपटे करताना कॉर्न उकडण आणि अजुन बरच काही मी मायक्रोचा वापर करुन करते. (माझी मामी इडली, ढोकळा पण छान करते मायक्रो मधे पण मी एकदाच केलेल त्यात पण बिघडल नी बाहेर कुकर मधल चांगल झाल मग पुन्हा त्यात केलेल नाही)
कविता .. अजुन एक सांग ना ..
कविता .. अजुन एक सांग ना .. मायक्रोवेव्हमधे केक ओवन सारखा होतो का गं ? मी ऐकलंय की, केक मायक्रोव्हेव मधे फार चांगला होत नाही. (कोणाकाणाला सेम पिंच करु ;-), मी पण दिवाळीत मायक्रोव्हेव घ्यायचा विचार करतीये.. योग्य वेळी चर्चा सुरु झालीये. )
अग मैत्रिणींनो, एक सांगा मला,
अग मैत्रिणींनो, एक सांगा मला, माझ्याकडे शारजाहून आलेला एक मायक्रोवेव्ह आहे. त्याच्या माहिती पुस्तकात दुर्देवाने इंग्रजी भाषा नाही.
म्हणून मी आत्तापर्यंत त्यात तांदळाचे पापड भाजणे, अन्न गरम करणे इतकेच केले, तर माझा प्रश्न असा आहे की वीज जास्त वापरली जाते का मा.वे. वापरून?
अनघा वीज बील तर थोड वाढतच (पण
अनघा वीज बील तर थोड वाढतच (पण एकिकडे गॅसची थोडी बचत होते तो ही महागलाच आहे) अट्टाहासाने जे पदार्थ कुकर मधे पटकन होतात ते नाही करायचे मायक्रो मधे पण गॅस, मायक्रो अस दोन्ही नीट वापरल तर काहिच हरकत नाही. (वॉ. मशिन मुळे/फ्रिज मुळे पण बील वाढत. वॉ. मशिन तर उपयोगाच आहे मग आपण वापर काटकसरीने करतो ना तसच करायच) (१/२ किलो शेंगदाणे जास्तीत जास्त ८ मि. होतात. मायक्रो मधे वेळ वाचतो, गॅस वाचतो हे एक उदाहरण)
पल्लवी मायक्रो मधे २ प्रकारे केक होतो
१. मायक्रो मोड वर झटपट ५-६ मिनिटाचा केक (पुर्वी कधी पिल्सबरी रेडीमिक्स वापरुन कुकर मधे केक करुन बघितला आहेस का?असशील तर त्यात जसा होतो तसाच हा केक होतो मायक्रो झटपट केक)
२. कनव्हेक्शन वापरुन नॉर्मल otg मधे बेक करतो तसा केक
दोन्ही मधे केक सॉफ्ट, फ्लफी बिफी का कायतो होतो (केक सॉफ्ट व्हायला मिश्रण्/प्रमाण महत्वाच) फक्त कनव्हेक्शन वर browning effect मिळतो तो मायक्रो मोड वर मिळत नाही पण तरीही छान लागतो.
पल्लवी, तुझा इमेल आयडी दे मी तुला रेसिपी सेटिंग सकट पाठवते
नुकताच कन्व्हेक्शन मोड वर केक केलेला त्याचा फोटु तुझ्या रेफरन्स साठी डकवते मग तुच ठरव केक अॅटलिस्ट केक सारखा दिसतो का ते
कविता त्रिवार थँक्स गं ! मी
कविता त्रिवार थँक्स गं ! मी कुकर मधे केलेला केक तुझ्या फुटुतल्या केक सारखाच ब्राऊन झाला होता. म्हणजे कन्व्हेक्शन मोडवर केक चांगलाच होतो की. याची डोळा याची देही शंकानिरसन झाले
तुला संपर्क मधुन मेल टाकते. मला सेंटिंग सह रेसिपी दे त्याबरोबरच तुझ्या मा.वे. चे पण डिटेल्स दे ना ... म्हणजे दुकानात गेलं की त्याप्रमाणे चौकशी करता येईल (क्यों की.. इस मामले में बडी अनाडी हुं ;-))
अल्पना, कविता, मस्त पोस्ट
अल्पना, कविता, मस्त पोस्ट

वा! केक मस्तच झालाय.. हे ठीकच झालं म्हणजे- केक कन्व्हेक्शन मोड ऑन करून ओटीजीसारखा होत असेल, तर बेस्ट. मी घेणार आता मावे!
तर, एलजीचे बरे दिसत आहेत न? आणि सॅमसंगही आहेत माझ्या ओळखीत दोन जणींकडे. त्याही खुश आहेत.. या दोन कंपन्या पहाव्या.. सध्या बरेच डिस्काऊंट, ऑफरही आहेत..
ओ, मॉडेल नंबर इकडेच द्याकी.. त्यात काय कॉन्फिडेन्शियल?
आम्ही पण अनाडीच आहोत 
सॉरी यार! मला माहित आहे की मी
सॉरी यार! मला माहित आहे की मी अस्थानी आलोय. इथे येऊन मी पचकणे शिष्टसंमत नाही. पण मायक्रोवेव्ह बद्दल कविताने जे मेन्शन केलय त्या बद्दल काही मजकूर हाती लागला. राहावलं नाही म्हणून त्याची लिंक देतोय.
http://www.mercola.com/article/microwave/hazards.htm
http://www.relfe.com/microwave.html
आपण साधं प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये साचवून ठेवलेलं पाणि पितो, ते सुद्धा स्लो पॉईझन सारखं कार्य करतं म्हणे. कारण सगळ्याच बाटल्या चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या नसतात. त्या वाईट प्रतीच्या प्लॅस्टिकचे गुणधर्म प्यायच्या पाण्यात अंशतः उतरतात.
भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी कराव्या लागणा-या रोजच्या 'जगायच्या' धबडग्यात इतक्या बारीकसारीक गोष्टींवर आपलं लक्ष नसतं, आणि आधुनिक काळाच्या गतीने जायचं असेल तर ते परवडणारंही नसतं!
आधुनिक विज्ञानाने सुखसोयींबरोबर त्यांचे दृश्य/अदृश्य, चांगले/वाईट परिणामही आणलेले आहेत. आणि जाणते/अजाणतेपणे आपण ते स्वेच्छेने/जबरदस्तीने भोगतो आहोत. हे खरं की नाही?
मी इथे येऊन डिस्टर्ब केलं असेल तर माफी मागतो.
थॅक्स कवि. माझापण कुकरातला
थॅक्स कवि.
माझापण कुकरातला केक १ नं.सारखा झाला होता. आता मा.वे. प्रयोग करून पाहिन. माझा कणकेचा केक होता. हे वरचे कसले हेत? कवि, मला पण रेसेपी.. माझा इमेल तुझ्याकडे आहे, अनघा प... नावाने. 
बापरे, अभिजीत.. थोड्या
बापरे, अभिजीत.. थोड्या चाळल्या लिंक्स.. वाचते पूर्ण नंतर..
अभिजीत मलाही हे इमेल मधुन
अभिजीत मलाही हे इमेल मधुन आलेल पण नक्की कितपत खर ते कळत नाही. अजुन असच एक आर्टिकल मुंबई मिरर मधे आलेल मी ह्याच धाग्यात कुठेतरी त्याबद्दल लिहील होत पण तरिही नक्की काय ते कळत नाही. ह्या बाबतीत मत मतांतर भरपुर आहेत. माझ्या डॉ. च्या मता नुसार मायक्रोचा वापर करायला हरकत नाही. कोणी जाणकाराने ह्यावर प्रकाश टाकला तर खरच खुप उपयोग होईल
अभिजा लिंकबद्दल धन्यवाद! पण
अभिजा लिंकबद्दल धन्यवाद! पण कोणत्याही वस्तूचा अतिवापर हानीकारकच. आपण भारतीय गॅसचाच वापर जास्त करतो, हे सगळी उपकरणं पूरकच.. त्यामुळे सजग रहावे, घाबरून नव्हे
आता तू जा बरं इथून, आमच्यात लुडबुड करू नकोस

मलापण हेच विचारायचं होतं
मलापण हेच विचारायचं होतं मायक्रोवेव्ह बद्दल.माझा नवरा केमिस्ट्री फिल्डमधला (phd)आहे.आणी मा.वे. वापरु नये ह्याबद्दल तो ठाम आहे.मलापण मा.वे. वापरु देत नाहि.:( काहितरी केमिकल रीअॅक्शन होते असं सांगत असतो.´
खरच असं आहे का?
>>आता तू जा बरं इथून, आमच्यात
>>आता तू जा बरं इथून, आमच्यात लुडबुड करू नकोस >>
रुपा अग मग तुझ्या नवर्यालाच
रुपा अग मग तुझ्या नवर्यालाच लाव कामाला (किचन मधल्या नाही म्हणत आहे मी ; तेही लावायच का ते तुझ तू ठरव :फिदी:) ) नी सोप्या शब्दात सांग म्हणाव आम्हाला काय केमिकल लोचा होतो नी किती वापर करण तितकस हानिकारक नाही वगैरे वगैरे
पुनम अगदी अगदी मलाही वापरा बाबत असच वाटतय (अजुन्तरी).
मी पण दिवाळीत मायक्रोव्हेव
मी पण दिवाळीत मायक्रोव्हेव घ्यायचा विचार करतीये..
मी घेणार आता मावे!
जल्ला कोण म्हणेल इंडियात रीसेशन चालू आहे म्हणून......
मंजुडी रिसेशनच चालु आहे खरतर.
मंजुडी रिसेशनच चालु आहे खरतर. न्यानोचा विचार सोडुन, मोड्युलर किचन विथ चिमणी नी अजुन काय काय त्याचा विचार सोडून सगळ्या फक्त मा.वे. चा विचार करतायत
रुपा अग मग तुझ्या नवर्यालाच
रुपा अग मग तुझ्या नवर्यालाच लाव कामाला (किचन मधल्या नाही ) नी सोप्या शब्दात सांग म्हणाव आम्हाला काय केमिकल लोचा होतो नी किती वापर करण तितकस हानिकारक नाही वगैरे वगैरे>>>>>:)
अगं,तो म्हणतो,जेवण गरम करायला वगैरे ठीक आहे,पण जेवण बनवण्यासाठि नको....
मग नको तर नको
अग नको तर नको अस नाही तू
अग नको तर नको अस नाही तू विचार ना त्याच डोक खाऊन "नीट समजावुन सांग म्हणाव का नको ते"
अगं,मलापण मा.वे.ची एवढी गरज
अगं,मलापण मा.वे.ची एवढी गरज नाहि ना

नाहितर मी घेतला असताच(डोळे मिचकवणारी बाहुली) भारतात परतल्यावर नक्की घेनार.
Pages