भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.
आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.
एका वेळी एका संचात ५ म्हणी दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या प्रतिसादात त्या म्हणींचे रूपांतर लिहायचे आहे. जमल्यास सर्व पाचही म्हणींचे रुपांतर एका प्रतिसादात सुद्धा तुम्ही लिहू शकता.
तुमचे रुपांतर चटपटीत शब्दांत असायला हवे - अगदी म्हणींसारखे.
उदा. A penny saved is a penny earned
दमडी वाचली कमाई झाली.
२ मार्च संच १ -
१. Variety is the spice of life.
२. You can lead a horse to water, but you can't make it drink.
३. You can't judge a book by its cover.
४. Too many cooks spoil the broth.
५. It's no use crying over spilled milk.
१. Variety is the spice of
१. Variety is the spice of life. वायला वायला, मज्जा आयला
२. You can lead a horse to water, but you can't make it drink. दाखवी वाट, सोडी पाठ
३. You can't judge a book by its cover. दिखाऊ ध्यान की आत्मा महान
४. Too many cooks spoil the broth. ताई, माई, अक्का, स्वयंपाकाचा विचका
५. It's no use crying over spilled milk. झालं ते झालं, काहून मनात ठेवलं
मस्त
मस्त
Too many cooks spoil the
Too many cooks spoil the broth. सोळा सुगरणी भोपळा अळणी.
१. Variety is the spice of
१. Variety is the spice of life. वायला वायला, मज्जा आयला
>> लय भारी
२ मार्च संच १ -
२ मार्च संच १ -
१. Variety is the spice of life.
नित्य नवे, जिवाला भावे
रस नऊ, रंग सात, गाणे गाऊ सात सुरांत
चिवचिव छान, कुहुकुहु मस्तं, किलबिल ऐकताना वेगळंच वाटतं
२. You can lead a horse to water, but you can't make it drink.
रांधा-वाढा, कालवून द्या, तरी नाही जेवला तर जेवेल उद्या
सांगावं, समजवावं, करायचं काय ते, त्यालाच सोपवावं
लगाम धरला, डोणीपुढे नेला, घोट कसा घेईल, जो नसेल तान्हेला
जोडाल हात, धराल पाय, नाहीच ऐकलं तर कराल काय
३. You can't judge a book by its cover.
दिसतंय तरी बरं, तसंच निघेल तेव्हा खरं
सूतपुत्र म्हणवी अखंड, आज दात्यांचा मानदंड
दिसायला भोळा, करून-सवरून नामानिराळा
ओबडधोबड चंदनी खोड, सुगंध लावी जिवाला वेड
४. Too many cooks spoil the broth.
सुगरणी खूप तरी जळून गेले तूप
आचार्यांचा फड नि बासुंदी निगोड
चुलीपाशी गलबला, शिरा बिघडला
एकापेक्षा एक कुशल, साध्या कामाचा बट्ट्याबोळ
५. It's no use crying over spilled milk.
उलंडलं, गंगेला मिळालं
होउन गेली चूक, आता व्यर्थ रूखरूख
नुकसानीचा योग, खंतावून काय उपयोग
कारवी ग्रेट जॉब!!
कारवी ग्रेट जॉब!!
लले.. हीहीही मस्त हां..
छान लिहितायेत सगळे.
छान लिहितायेत सगळे.
कारवी, ललिता-प्रीती मस्तच.
कारवी, ललिता-प्रीती मस्तच.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
मला पण मजा आली लिहिताना, डोके तरतरीत झाले एकदम
संयोजकांचे कौतुक अणि आभार, अशा मस्त खेळाबद्दल
कारवी गुड जॉब१ सगळ्ञाच
कारवी गुड जॉब१ सगळ्ञाच फ्रेजेस मस्त जमल्यात.
>>>>>Too many cooks spoil the
>>>>>Too many cooks spoil the broth. सोळा सुगरणी भोपळा अळणी.
आवडली.
>>>>>>You can't judge a book
>>>>>>You can't judge a book by its cover.
दिसतंय तरी बरं, तसंच निघेल तेव्हा खरं
अरे वा!!
kettle calls the pot black
kettle calls the pot black
दुसर्याच्या डोळ्यात कुसळ दिसतं आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही
A rolling stone gathers no
A rolling stone gathers no moss >>>>
उथळ पाण्याला खळखळाट फार