Submitted by मीनल कुलकर्णी on 1 March, 2017 - 08:10
गुंतलो तुझ्यात इतका स्वतःसही मी स्मरत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही..
आरशासमोर उभा मी प्रतिबिंबात हसतेस तू
होता नजरानजर स्वःताशीच लाजतेस तू
तुझ्याकडे पाहताना पापणीही मिटत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही
चांदण्या रात्रीतला मंद तेवता प्रकाश तू
माझ्या अंतःमनाला होणारा एक भास तू
तुझ्या मोहापायी ही रात्रही निजत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही
माझ्या वेड्या शब्दामधली अथांग कविता तू
अबोल तरीही उत्कट भावनांची प्रतिभा तू
वगळता तुला माझ्यातुनी मी मलाच रुचत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही
भाबड्या कल्पनांचा निशब्द हुंकार तू
छेडता तार मनीची उमटणारा झण्कार तू
गीत तुझे गुणगुणताना मी माझा उरत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही
- मीनल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्कृष्ट !!
उत्कृष्ट !!
सर्वांगसुंदर आशय आणि अप्रतिम कविता !!
आरशासमोर उभा मी प्रतिबिंबात
आरशासमोर उभा मी प्रतिबिंबात हसतेस तू
होता नजरानजर स्वःताशीच लाजतेस तू
तुझ्याकडे पाहताना पापणीही मिटत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही>>>किती छान लिहिलिये कविता.... मस्त...
धन्यवाद
धन्यवाद