मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.
एक रोज मामा सांगत व्हता. त्या गावमां एक सुतार र्हाये. सुतार तसा कामले चांगला व्हता. लोकेस्मा मियि मिसळीसन र्हाये. काम कराले बी वाघ व्हता. सम्दा लोके त्याले 'सुतारदादा' म्हनीसनी हाक मारेत. तसं त्यानं नाव व्हत " रामभाऊ " ! रामभाऊ नी बायको मातर कजाग व्हती. अशी कशी बाई व्हती ! ! जवयं देखो तवयं झगडा करे. तीनं नी रामभाऊ नं कधी पटनंच नई. शेजार-पाजारन्या बाया गंज तीले समजाई सांगत , पन ती काही सुधरनी नई. अशी हाई सुतारनी बायको -नाव व्हतं - दुरपदा ! ! बिचारा रामभाऊ तीले कटायी गयथा, पन कोनले सांगानं ? जसा तसा जगत व्हता. हाही दुरपदा बी सोभावथीन वज्जी बाख्खर व्हती. रामभाऊ तीले जे बी सांगे, ती त्यानं उलटंच कर्हे.
रामभाऊ एक रोज घर ऊना आन तीले बोलना," दुरपदा, माले आज कुर्डाया नईतर कांदानी भजी खावानं वाटंस. काही करशी का? "
दुरपदा :- " मंग , मी जशी काय घरमां बंगयीवरच बशी र्हासंना ? तुमना करता कुर्डाया नईतर भजी कराले ! मी कोंडाया लावेल शेतस, खाऩं व्हयी ते खाई लेजा, नईतर र्हावा तसचं! "
एक रोज असंच रामभाऊ तीले बोलना, " देख दुरपदा, आते पावसाया सुरु व्हयी गया शे ,गावमा कामे बी भलता कमी व्हयी ग्यात. माले बी कट्टाया येल शे. मना मनमा असं यी र्हायनं की मना मायबापले जाईसन भेटी येवा. तु बी चालशी मनाबरोबर ? "
दुर्पदा :- ( दोन्ही हात ववाळत ) " काय बोलना ? तुमना माय बापले कां बरं भेटानं ? ते काई जमावू नयी. चालनं व्हयी तं मना मायबापले भेटाले चला."
रामभाऊ :- " अवं धुरपदा , मना माय-बापनं आते वय व्हयी जायेल शे , त्यास्नी तब्येत नरम-गरम र्हास, तुना माय-बाप तरना ताठा शेतस, त्यास्ले कवय भी भेटनं तं चाली जाशे."
धुरपदा :- मी एक डाव सांगी दिधं ना , मंग काबरं जास्ती बोली र्हायनात ! "
रामभाऊ :- ' बरं, तुना माय-बापले भेटाले जासुत, पन एक गोट शे, तुना माय-बापले भेटाले जानं म्हंजी सक्कायनी सात नी एस्टी धरनी पडंस, तु आत्तेच तयारी करी ठेव."
धुरपदा:- ' आडनं मनं खेटर , मी सकायले तयारी करसू , आन दुसरी गोट काई सात नी एस्टी धरानी गरज नयी, घरनी बैल-गाडी शे ना? तीच जपी ल्या, " बिचारा रामभाऊ , त्यानी कोनतीच गोट , दुरपदा कधी आयकीन असं व्हयनंच नयी.जवयं देखो तवयं, मी सांगसू तसंच व्हयनं जोयजे, अशी व्हती धुरपदा!
सकाय मां रामभाऊनी उठीसनी बैल-गाडी जुपी, आनि धुरपदाले बोलना , " आते चालसं का ? मंग दुपारले ऊन व्हयी जायी, मंग बैल भी चालाले नखरा करतीन ! "
धुरपदा बैल-गाडीमां बठनी आनि गाडी सुरु व्हयनी. आते पावसायाना दिवस व्हता. चार रोज पासीन धो धो पानी पडेल व्हता. दोनेक घंटा व्हयी गयात आनि त्यास्ना रस्तामां एक नदी ऊनी.नदीमां पानी जोरमां वाही र्हायनं व्हतं.रामभाऊ बायकोले बोलना, " माले वाटंस, पानीले धार जास्ती शे. बैल बी थकेल शेतसं, आठे घंटाभर बशी र्हाऊ.पानीनी धार कमी व्हयी जायी, मंग जासू. "
पन दुरपदा मंजे दुरपदाच व्हती, तीले कोठे धीर निंघस आन ती काय तीना नवरानं ऐकनारी व्हती? ती वरडनी," माले मना माय-बापले भेटाले जावानं शे, आत्ते ना आत्ते च चला. काय जास्ती पानी नयी शे, टाका पानीमां गाडी ! ! "
बिचारा रामभाऊ ! त्यानं बायकोना समूर कधी कायी चालेच नयी, तो बी काय करी ? बैल गाडी नदीमां टाकी दिधी. जवयं का पानी वाढाले लागनं तवयं तो बी घाबरना. आते काय करवो ? छातीलोंग पानी ऊनं, तवयं रामभाऊनी दोन्ही जोतं सोडी दिधात आनी एक बैलनी शेप पकडी लिधी, तशी दुरपदानी बी दुसरी बैलनी शेप पकडी लिधी. गाडी सोडी दिधी आनी दोन्ही बैलेस्ना शेपट्या धरिसनी दोन्ही जीव पानीमां झेपी र्हायना व्हता.
तितलामां रामभाऊ दुरपदाले बोलना, " देख, पानीले वढं जास्ती शे, बैलनी शेप जोरमां पकडी ठेव." बस्सं , दुरपदाना नवरा बोलना , इतलामा दुरपदीनी दोन्ही हातमांथीन बैलनी शेप सोडीसन बोलनी, " नयी धरसू जोरमां पकडीसन." आते जे व्हयनं नयी जोयजे, तेच व्हयनं ! ! पानीना धारमां दुरपदा कथी गयी, कोनलेच सापडनी नयी.
मना मामा सांगत व्हता की हायी गोठ खरी शे. आते मना मामा , खोटं सांगाऊ नयी अशी माले खातरी व्हतीच.
भारी !
भारी !
अहिराणी बोलीचा गोडवा पुरेपूर उतरलाय
भौ, वजीन चाग्लं लिखी
भौ, वजीन चाग्लं लिखी र्हायनात, अखो लिखा.
मनी बोली तुमनाजित्ती चांगली नई, पन आठे परयन्त करी र्हायनु.
छान, मज्जा आली . पु ले शु.
वा. छान लिखेल शे जयंत भाऊ.
वा. छान लिखेल शे जयंत भाऊ. तुम्हना मामानी सांगेल गोट आवडनी.
अहिराणी बोलीचा गोडवा पुरेपूर उतरलाय +१