मायबोलीवरचे लेखक/लेखिका यांच्यासाठी एक छोटी सुविधा

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आजपासून मायबोलीवरचे लेखक/लेखिका यांच्यासाठी एक छोटी सुविधा देतो आहोत. या सुविधेमुळे त्यांचे वैयक्तिक नाव होण्यासाठी (Personal Branding) थोडी मदत होईल अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक लेखनाच्या खाली लेखकाचे व्यक्तिचित्र (जर प्रोफाईलमधे चिकटवले असेल तर) आणि बाजूला ३-४ ओळीचा बायोडाटा दिसेल अशी सोय आहे. बायोडाटातला मजकूर तुम्ही स्वतः तुमच्या व्यक्तिरेखेत (प्रोफाईल) जाऊन "माझ्याबद्दल" या रकान्यात भरून, बदलू शकता.

हि सुविधा कशी वापरता येईल याचे हे चांगले उदाहरण आहे.
author_bio_example.jpg

विषय: 
प्रकार: 

सही आहे Happy

प्रत्येक प्रतिसादासोबत ऑर्कुट फेसबूक सारखे फोटो फॅसिलिटी यावी असे मला उर्ध्वश्रेणीकरण चालू असल्या काळात वाटत होते. ते झाले नाही. पण हे बाकी आवडले..

चांगली सुविधा. प्रकाशचित्र सोप्प्या पध्दतीने दाखवता येतील या करता काही करता येईल का. सध्याची पध्द्त फारच क्लिष्ट आहे.

मस्तच.
आपोआप प्रतिसाद येतील असे पण पहा प्लीज.

आवडली ही सुविधा . काहीतरी लिहायला पाहिजे किंवा जुन्या लिखाणावर कुणाचा तरी प्रतिसाद आला पाहिजे तर दिसेल माझा प्रोफाईल फोटो ! ( स्मित )