" जँक जँक "
तीच्या आवाजात काळजी होती अगदी टायटानीक चिञपटातल्या रोस सारखी. तो मधूर आवाज कानी पडताच नकळत त्याचे डोळे पाणावले. बिचारा पापणीची उघडझाप करून समोर पाहण्याचा निष्फळ प्रयन्त करत होता परंतू त्याला काहीच स्पष्ट दिसेना तरीही त्याच्या नजरेतून ती वाचू शकली नाही. तीचा तो नाजूक प्रेमळ स्पर्श त्याला केव्हांच जाणवला होता.
" ज्यूली तू आलीस ना आता जँक कसा लवकर ठणठणीत बरा होतो की नाही ते बघ "
जँक खरंतर ज्युलीमूळेच शूद्धीवर आला होता तीचं कैतुक करावं म्हणून रॉन उगाचच काहीतरी बरडत होता. आणी महत्वाची गोष्ट म्हणजे जँकचा फँक्चर झालेला डावा हात देखील आता हळूहळू सुस्थीतीत येऊ लागला होता.
"नाही नाही तू आता जास्त हालचाल करायची नाहीस. डॉक्टरानी आता तूला फक्त विश्रांती करायचाच सल्ला दिलाय. " जँकला आपल्यासोबत आणलेली फळं व काही बिस्कीटे देत ती जाण्यासाठी ऊभी राहीली.
" बंर चल मला आता नीघायला हवं नाहीतर उगाचच उशीर झाला म्हणून आई आेरडायची. आणी हो गोळ्या वेळेवर घ्यायला विसरू नकोस, चल बाय "
एवढं बोलून ज्युली वेगाने हॉस्पीटल मधील स्पेशल वार्डमधून बाहेर पडली.
तीच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता- पाहता जँक ऊशीचा आधार घेऊन ताठ बसला.
" ए रॉन प्लिझ मला सांगशील का नक्की काय घंडलय ते ? "
" आता काय आणी ? " रॉन
" मी कधीपासून या हॉस्पीटलमध्ये अँडमीट आहे रे ?
तूच ज्युलीला सांगीतलं असणार ना ?
आणी माझा अँक्सीडंट करणारा तो बाईकवाला कोण होता ?
ते तर तू शोधून काढलं असशीलच ना "
" हो हो जरा धीर धर, हळू आपण आता हॉस्पीटलमध्ये आहोत त्या बाईकवाल्याला तर आपण शोधूच पण तू आधी व्यवस्थीत बरा तर हो " रॉन
" नंतर नाही मला आत्ताच सांग, मागील चार-पाच दिवसात माझ्यासोबत नक्की काय घडंलंय ते. मला काहीच नीट आठवत नाही रे " जँक
" तूला आठवंत कसं नाही ? जँक तू हॉस्पीटल मध्ये असताना देखील कोणीतरी तूला मारण्यात प्रयन्त केला होता "
" काय ? कोण होता तो....पण मला कसं माहीत नाही " जँक जवळजवळ मोठ्याने ओरडलाच
" अरे तू दोन दिवसांपासून पूर्णपणे शूद्धीवर तरी होतास का ? तूझ्या हाताच्या आँपरेशनसाठी फार मोठी रिस्क न घेता डॉक्टरानी तूला बेशूद्धीचं इंजेक्शन दिलं होतं आणी त्याच दरम्यान कोणीतरी अनोळखी व्यक्ती तूझ्या बेडपाशी येऊन पोहोचला "
" मग ? "
" मग काय ? सूदौवाने मी माझ्या बाईकची चावी वरतीच हॉस्पीटलमध्ये विसरलो होतो ती घेण्यासाठी म्हणून मी पून्हा वरती आलो तर मला पाहताच तो माणूस वेगाने या स्पेशल वार्ड मधून बाहेर पडला आणी लिफ्टच्या दिशेने पळत सूटला पण मी जेव्हा तीथे पोहोचलो तेव्हा लिफ्ट खाली निघाली होती "
" मग पूढे काय झालं " रॉनचं बोलणं जँक लक्षपूर्वक एकत होता.
" माझ्याकडे त्याला पकडण्याचा कोणताच प्लान नव्हता. म्हनून मी फार वेळ न घालवता लगेचच जिन्यावरून धडपडत खाली हॉस्पीटलच्या ग्राउंड फ्लोरपर्यतं पोहोचलो परंतू मी पोहोचण्याच्या अगोदरच तो तिथून निसटला होता "
" अरे पण त्याला असं अचानक हॉस्पीटलमध्ये कोणी येऊच कसं काय दिलं ? "
" मला ही तेच कळत नाही ना. मग मी थोड्या वेळाने हॉस्पीटलची सी. सी. टीव्ही फूटेज पाहीली पण त्यातही काहीच कळण्यासारखं नव्हतं "
" कळण्यासारखं नव्हतं म्हणजे "
" अरे तो ईसम आला होता खरा पण त्याने मोठ्या हूशारीनेच कँमेऱ्यापासून स्वतःचा चेहरा लपवला होता. कदाचीत कोणता कँमेरा कूठे आहे याची त्याला आधीपासूनच कप्लना असावी. त्याने काळ्या रंगाचं कँपवालं जँकेट घातलं होतं त्यामूळे तो वाचू शकला " रॉन
" ओ शीट " जँकने स्वतःच्याच एका हातावर दूसऱ्या हाताचा ठोसा मारला.
" तो अचानक येतो काय जातो काय.
कोण आहे हा ?
एकदा का तो बाईकवाला आणी हॉस्पीटलमधला ईसम मला सापडला ना का त्याची काही खैर नाही. जर माझा अँक्सीडंटच झाला नसता तर आपण ऐव्हाना नक्कीच रॉकीला शोधून काढंल असतं " जँक पून्हा मोठ्या आवाजातच प्रचंड रागाने ऊतावीळ होऊन बोलला.
" मला तरी वाटंत तो बाईकवाला आणी ती हॉस्पीटलमधली तूझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती एकच असावी "
" कशावरून ? "
" तू निट आठव त्या बाईकवाल्याने जसं जँकेट घातलं होतं हूबेहूब तसंच जँकेट त्या हॉस्पीटलमध्ये आलेल्या ईसमाने देखील घातलं होतं "
" हो तू कदाचीत बरोबर बोलत असशील "
त्या दोघां मधील धीरगंभीर चर्चा संपण्याची लक्षणे काही दिसत नव्हती तेवढ्यात डॉ मँकार्थी वार्डमध्ये आले.
"मिस्टर जँक फ्लेचर तूमंच नशीब म्हणून तूम्ही वाचलात नाहीतर......"
" नाहीतर काय ? "
" काही नाही रे एवढं काय विशेष नाही ते
सो मी तूमची एक्सरे प्रिटं देखील पाहीली आहे. तूम्हाला काही फार मार लागल्याचं त्यात दिसत नाही आणि तूमचे रिपोर्टही नॉर्मल आहेत. त्यामूळे काही फॉरमालीटीज व बेसीक टेस्ट करून तूम्हाला लवकरात लवकर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला जाईल "
आणी खरंच डॉ मँकार्थीच्या म्हणन्याप्रमाने दूसऱ्याचं दिवशी जँकला हॉस्पीटलमधून घरी हलवण्यात आलं होतं. त्यानंतर पूढील चार दिवस तो घरी एकटाच होता त्या चार दिवसांच्या मोकळ्या काळावधीत जँकच्या सूप्त मनात नको नको ते प्रश्न येत होते.
"मला त्या बाईकवाल्याने नक्की का ऊडवलं असेल ?
त्याच्या हातून खरचं चूकून माझा अपघात झाला की त्याने मूद्दामूनच जाणीवपूर्वक माझा अँक्सीडंट केला ?
नाही नाही रॉन तर सांगत होता की मी हॉस्पीटलमध्ये असताना देखील त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता.............म्हणजे याचा अर्थ त्या बाईकवाल्या ईसमा पासून माझ्या जिवाला धोक आहे तर, पण तो असं का करेल ?
अखेर काहीही असलं तरी मला आता त्याच्यापासून सावध राहीलं पाहीजे "
नेहमीच काहीतरी वेगळं, भन्नाट करनं जँकला आवडत असे आणी रॉनही त्याच्यासारखाच वेडा तोही त्याला पूरेपूर साथ देत असे तो तर एक उत्तम ईन्वेस्टीगेटर च होता म्हणा पण यावेळी माञ रॉकीला शोधून काढण्याचा वीडा आता त्या दोघांनीही एकञच उचलला होता.
" मी जास्त विचार करत बसलो तर मला पून्हा ञास होईल " स्वतःशीच पूटपूटत जँक विश्रांती घेण्यासाठी बेडवर उताणा झाला पण तरीही जँकला झोप येईना अचानक सात दिवसांपूर्वीचा तो चित्तथरारक प्रसंग जँकच्या डोळ्यांसमोरून सरकू लागला जँकला सर्वकाही आठवत होतं तो स्वतःच्याच मनाशी बोलू लागला.
राञीचं चायनीज खाऊन झाल्यावर थोडीशी आवराअवर करत आपआपली कामं उरकून मी आणी रॉन रॉकीच्या शोधमोहीमेसाठी घराबाहेर पडलो.
" आपण आता थेट रॉकीच्या घरी जाऊ, बघूया त्याच्या आईकडून काय कळंत ते आणी मग तिथूनच येताना पून्हा पोलीस स्टेशनमध्येही चक्कर मारून येऊ " रॉनने आपला ईन्वेस्टीगेटीगं प्लान माझ्याशी आधीच डिस्कस केला होता.
" मला तर वाटंत रॉन आपण ईतरञही आजूबाजूला रॉकीवीषयी चैकशी करायला हवी कदाचीत त्याला कोणीतरी पाहीलं असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही "
त्या वेळी तर माझं कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नव्हतं फक्त रॉकीचाच विचार माझ्या मनात सारखा घोगांवत होता. मग आम्ही दोघांनीही आमच्या ओळखीच्या माणसांशी रॉकीबद्दल विचारणा केली पंरतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही शेवटी आम्ही रॉगन वे च्या मोठ्या सीग्नल पाशी येऊन पोहोचले .
पॉगं पॉग पॉग पॉग
भररस्त्यात उजव्या बाजूला सिंमेट-कॉक्रिटचे मोठमोठाले पाइप वाहून नेणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. पण तोंपर्यत खूपच उशीर झाला होता. कारण क्षणार्धात मागे वळून पहायच्या अगोदरच त्या बाईकवाल्याने मला जोरदार धडक दीली व तिथून तो सराईतपणे निसटन्यातही यशस्वी झाला होता. सूदौवाने मला फार मार लागला नाही पण बाईकच्या जोरदार धक्याने मी बेशूद्ध होऊन खाली कोसळलो आणी त्यानंतर......त्यानंतर काय घडलं असेल.
कदाचीत रॉनने मला हॉस्पीटलमध्ये नेलं असावं शू.......अरे मला झोप का येत नाही स्वतःशीच पूटपूटत जँक पून्हा बेडवर ऊठून बसला.
त्याचा या आधी असा कोणताच अँक्सीडंट झाला नव्हता. त्याला त्या बाईकवाल्याची खूप चिढ येत होती त्यातच भर म्हणून त्याने रॉकीच्या आईला दिलेलं आश्वासनही त्याला आठवत होतं दरम्यान जँकला पाहण्यासाठी त्या एकदा त्यांच्या घरी देखील येऊन गेल्या होत्या
" जाऊ दे जे झालं ते झालं आता आपल्याला पून्हा रॉकीला शोधण्यावर लक्ष केद्रीत करायला हवं " स्वताःशीच पूटपूटत त्याने रॉनला फोन ट्राय केला पण कदाचीत रेजं नसल्यामूळे त्याचा फोनही लागत नव्हता.
जँक खूपवेळ रॉनची वाट पाहत जागा राहीला आणी नेमकं त्याच राञी रॉनला थोडं ऊशीराने घरी यावं लागलं. मग त्या दोघांनीही एकञच जेवण केलं.
" काय रे आज एवढा ऊशीर "
" अरे तूला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे "
" आता काय आणी "
" जँक तूझा अँक्सीडंट करणाऱ्या त्या बाईकवाल्याचा पत्ता मला लागलाय "
" काय ?"
" कोण आहे तो ? "
" ते काय मला अजून तरी कळलं नाही पण लवकरच कळेल "
" म्हणजे कंसं काय ? "
" अरे तूझा सात दिवसांपूर्वी जेव्हां अँक्सीडट झाला होता तेव्हा त्याने रॉयल वेच्या आरग्वान गँरेजमध्ये त्याची बाईक दूरूस्तीसाठी दिली होती मी त्या गँरेजच्या मालकाची देखील भेट घेतली त्यांच्या म्हणन्यानूसार तो ऊद्या संध्याकाळीच त्याची दूरूस्त झालेली बाईक घेण्यासाठी गँरेजमध्ये येणार आहे "
" ग्रेट यार आता तो काय माझ्या हातून सूटत नाही. मलापण तूला काहीतरी सांगायच आहे "
" काय "
" आता आपल्याला फार ऊशीर करून चालणार नाही आपण ऊद्या सकाळीच रॉकीच्या आईला भेटू व त्यानंतर पोलीसाना मग फार वेळ न घालवता संध्याकाळपर्यतं गँरेजला ही जाऊन येऊ "
" ओके ठीक आहे मग मी ही लवकर ऊठतो "
उद्याचा प्लान ठरवता ठरवता ते दोघंही झोपेच्या आधीन झाले होते.
दूसऱ्या दिवशी उजाडताच सकाळी आपली न्याहारी ऊरकून ते दोघंही थोडीशी आवराआवर करत रॉकीबद्दल काही माहीती मीळण्याच्या आशेने त्याच्या घरी पोहोचले. रॉकीची आई बीचारी दाराला डोळे लावून त्याची वाट पाहत बसली होती. तो आता येईल, मग येईल पण त्याची तर साधी चाहूलही तीच्या नशीबी नव्हती. खंरतर याआधी रॉकी कधीच घरी न सांगता एवढ्या दिवस बाहेर थांबला नव्हता. त्यामुळे तो नक्की कूठे गेला असेल ?
काय करत असेल?
याचा अंदाज बांधणही आता खूपच कठीण होऊन बसलं होतं.
" हाय आंटी "
" अरे या तूम्ही आलात, बरं झालं, तूझा हात कसा आहे जँक आता "
" हो अगदी बरा आहे "
" तूम्ही काय घेणार चहा कॉफी की आणखीन काही "
" काही नको आंटी "
रॉकीच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते त्यातच हे दोघंही पुन्हा रॉकीवीषयी चर्चा करण्यासाठी त्याच्या घरी आले होते म्हणूनच की काय त्यानी रॉकीच्या आईशी रॉकीबद्दल फार चैकशी केली नाही.
" आम्हाला तूमच्याशी थोडं बोलायचं होतं "
" हा बोला ना "
" म्हणजे मला विचारायंच होतं की रॉकी मध्ये व तूमच्यामध्ये काही बिनसलं होतं का ? कींवा त्याची घरी एखाद्या गोष्टी वर भांडण वैगरे ?
" नाही रे तसं काहीच नाही तो कधीच कोणती तक्रार करत नसे शिवाय भांडण झाली म्हणून तो कधीच घर सोडून गेला नव्हता "
" हो आम्हालाही तेच वाटतयं, मूळात त्याचा स्वभावच असा नव्हता "
" तो नक्की केव्हा हरवला आंटी, म्हणजे एक्झ्याक्टली तो हरवल्याची जाणीव तूम्हाला केव्हा झाली "
" अरे तो घरी नसल्याला आतापर्यत जवळ जवळ महीना होत आलाय वीस तारखेला तो सकाळी कॉलेजला गेला तो घरी परतलाच नाही " हे सर्व सागंताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.
" तूम्ही काळजी करू नका आंटी आपण रॉकीला लवकरात लवकर शोधू " रॉनने त्यांना उगाचच दिलासा देण्याचा निष्फळ प्रयन्त केला मग रॉकीवीषयी त्यांनी थोडी आणखीन विचारपूस केली
" बरं आम्ही आता निघतो जर काही गरज पडली तर पून्हा येऊ "
" हो सावकाश जा " ते दोघंही निघेपर्यत ती त्याच्याकडे आशेने पाहत ऊभी होती
रॉकीच्या आईचा निरोप घेतल्यावर ते दोघ आणखीन काही माहीती मीळण्याच्या उद्देशाने तेथील स्थनीक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
चैकीच्या बाहेरच गाड्यांची वर्दळ लागून राहीली होती त्या गजबजलेल्या शहरात गून्हेगारीला काहीच तोटा नव्हता त्यातच अनेकजण आरडाओरडा करत चैकीत घूसण्याचा निष्फळ प्रयन्त करत होते पण त्या दोघांना माञ फार वेळ चैकीबाहेर प्रतीक्षा करावा लागली नाही.
रॉनने जँकसोबत आपला प्रायव्हेट डिटेक्टीव्हचा आयडी दाखवत सराईतपणे आत प्रवेश केला
" हँलो ईनेस्पँक्टर रसेल मी डिटेक्टीव्ह रॉन वॉल्टन आणी हा माझा मीञ "
" जँक फ्लेचर "
" ओ वेलकम रॉन, हाय जँक आज अचानक आमच्या चैकीत " कदाचीत रॉनची व ईनेस्पँक्टर रसेल यांची आधीपासूनच ओळख असावी
" जँक तूमचा झालेला अँक्सीडंट व तूमच्या वर हॉस्पीटलमध्ये झालेला तो जीवघेणा हल्ला यावीषयी आम्हाला सविस्तर कळलंयच पण रॉनसारखा एक हूशार डिटेक्टीव्ह तूमच्यासोबत असताना तूम्हाला कदाचीत आमच्या मदतीची गरज भासणार नाही तरीही आम्ही तूमची काय मदत करू शकतो "
" सर आम्हाला तूमच्याशी रॉकी फर्नाडीसच्या तपासाबाबत थोडी चैकशी करायची होती. "
" या बसा " टेबलापूढे ठेवलेल्या दोन खूर्चाकडे ईशारा करत त्यांनी बसण्याची विनंती केली
" तुम्ही कोण त्याचे " जँककडे पाहत रसेलनी विचारलं
" सर मी रॉकीचा मीञ "
" ओके, कूठे राहता तूम्ही "
" रॉकीच्याच बाजूला एरीझोना सोसायटीत "
" हा रॉकी तोच ना जो मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे."
" हो सर "
"जोसेफ त्या रॉकी फर्नाडीसच्या तपासाची फाईल आणा बरं लवकर "
लगेचच रॉकीची फाईल जोसेफनी ईनेस्पँक्टर रसेल समोर उघडून ठेवली.
थोडीशी चेअर मागे करून फाईलमध्ये पाहत रसेल बोलू लागले
" रॉकीच्या तपासाबाबत अजून तरी काहीच महव्ताचं अंस आमच्या हाती लागलं नाही तरी देखील आमची टीम लवकरात लवकर रॉकीला शोधून काढेलच, तूम्ही निंच्छीत राहा "
" काळजी करू नका."
"आणी हा महत्वाचं सागांयचं तर राहीलंच रॉकीच्या प्राथमीक तपासामध्ये तूमच्या सोसायटीतील एका स्थानीक रहीवाश्याने रॉकीला काही दिवसांआधी कॉलेजमधून घरी येताना पाहील्याचं नमूद केलं आहे. आम्ही त्या दिशेने तपास देखील केला परंतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही "
" असो तूम्हाला आणखीन काही महव्ताचं सांगायचं आहे का ? तूमचा आणखीन कोणावर संशय वैगरे "
" नाही सर आम्ही देखील रॉकीला शोधण्याचा प्रयन्त करत आहोत पण आम्हाला देखील अजून कसलाच सूगावा लागला नाही तरी मला असं वाटंत की रॉकीला नक्कीच कोणीतरी किडनँप केलं असावं किवां त्याच्यासोबत आणखीन काही झालं असण्याचीही दाट शक्यता आहे "
" हो तूम्ही दोघं अगदी बरोबर बोलताय "
" जर काही महव्ताची माहीती आम्हाला समजली तर आम्ही तूम्हाला नक्कीच कळवू जेणेकरून तूम्हाला देखील तूमच्या पूढच्या तपासास मदत होईल "
" Good "
" सर आम्हाला आता नीघायला हवं "
" Yes, you can go now "
थोड्या वेळाने ते दोघंही त्या पोलिस स्टेशन बाहेर होते. तीथेही काही महव्ताचं अंस त्याच्या हाती लागलं नव्हतं. अखेर गप्पा मारत-मारत ते दोघंही त्या बाईकवाल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरग्वान गँरेजवर पोहोचले.
क्रमश:
पुढील भाग लवकरच...........
भाग ३ साठी
http//www.maayboli.com/node/61651
मस्तच....!!! कथा बर्यापैकी
मस्तच....!!! कथा बर्यापैकी पकड घेत आहे....!!!
विस्कळीत वाटली.
विस्कळीत वाटली.
कृपया व्याकरणाकडे लक्ष द्याल का!
धन्यवाद सांगीतल्याबद्दल
धन्यवाद सांगीतल्याबद्दल
कृपया व्याकरणाकडे लक्ष द्याल
कृपया व्याकरणाकडे लक्ष द्याल का!>>>> +१
आणि "लापत्ता" च्या ऐवजी "बेपत्ता" हा शब्द वापरलात तर वाचताना अडथळा निर्माण झाल्यासारखे वाटणार नाही.
बाकी कथा अगदीच उत्तम सुरू आहे.
( आणि हो,... कधी कधी टीका केली असता अथवा बदल सुचवले असता राग मानून घेऊ नये ही विनंती! )