टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.
थांबा ! थांबा ! मला टक्कल पडत नाहीए.सध्या मी सहा इंच लांब केस बाळगले आहेत,केस भरपुर आहेत ,पण प्रॉब्लेम असा आहे की केस खुप पातळ आहेत व लांब ठेवल्याने गळत आहेत.कंगव्यात,उशीवर,टॉवेलवर जिथेतिथे हे पातळ केस दिसू लागल्याने मी सध्या चिंताग्रस्त आहे.लांब केस बाळगणे मला अडचणीचे ठरु लागले आहेत.तसा मला लांब केसांचा लुक आवडतो,अगदी lion's mane टाईप.पण उपरोक्त कारणामुळे ते आता अडचणीचे ठरु लागलेत.मला मेडीयम लेंथ हेअरकट आवडत नाहीत,एकतर लांब ठेवायचे नाहीतर सरळ चकोटी.मला आता क्लीन शेवन हेड लुक हवाहवासा वाटू लागला आहे.मस्त तुळतुळीत डोके व त्यावर फ्रेंच कट दाढी ठेऊन जरा मॅच्युर व कॉन्फीडंट लुक ठेवायचा विचार करतोय.माझे काही प्रश्न.
१.तुमचे केस तुम्ही कीती लांब ठेवता?
२.लांब केस पातळ असतील तर गळतात,यावर तुम्ही काय उपाय करता?
३.तुळतुळीत टक्कल ठेवायचे असेल तर दर दोन दिवसांनी भादरत बसायला लागते,यावर खरचं काही इलाज आहे का ? इलेक्ट्रीक रेझर वगैरे?
४. बायकांना प्रश्न----- तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी?
लांब केस ठेवावेत की सरळ टक्कल करावे????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 25 January, 2017 - 09:59
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरळ टक्कल करुन टाक , ना रहेगा
सरळ टक्कल करुन टाक , ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी.
ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी
ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी >> केशारोपण करून घ्या. अमिताभ ला बघा बरं. कसले मस्त भरघोस केस दिसतात त्याचे. तसे भारी केस होतील.
खरेच. केव्हढा महत्वाचा
खरेच. केव्हढा महत्वाचा प्रश्न.
ते अर्थव्ययस्था, देश संरक्षण वगैरे सोडून भारत सरकारने ताबडतोब इकडे लक्ष द्यावे. एक कमिटी स्थापन करून सहा महिने त्यांना जगभराचा दौरा करून यायला लावून त्यांच्या कडून दोन वर्षात कमीत कमी पाचशे पानी रिपोर्ट लिहून घ्यावा. त्याचे खालीलप्रमाणे भाग असावेत (उदाहरणादाखल - ) भारतातील अशिक्षित बायका, सुधिक्षित बायका, खेड्यात रहाणार्या, शहरात रहाणार्या, निरनिराळ्या देशातील बायका इ.
म्हणजे काय, प्रश्न महत्वाचा आहे - शेताट काय पिकवावे, पिकते की नाही यापेक्षा डोक्यावर काय आहे हे महत्वाचे. डोक्यात काही नसले तरी चालेल!
I like long hair look. Like
I like long hair look. Like yanni. Bald head wl.make you look even older. Grandfather type. Unless you are really fit and confident . Eat your carrots Nd spinach fruits and milk. Good hair depends on eating healthy. Plus oil massage twice a week.
समन्वय साधा. वर टक्कल आणि
समन्वय साधा. वर टक्कल आणि पाठिमागे लांब मानेवर रुळणारे केस ठेवा. मोहन वाघांसारखे...
समन्वय साधा. वर टक्कल आणि
समन्वय साधा. वर टक्कल आणि पाठिमागे लांब मानेवर रुळणारे केस ठेवा. मोहन वाघांसारखे...
ह्या ह्या ह्या
सिन्थेतिक गेनिउस भौ ... केस गलत असतिल तर महब्रिन्ग्रज तेल वपरा... नक्कि केस गलयचे थम्ब्तिल... अनि वध्तिल पन..
तक्कल करु नका... वय जस्त दिसेल उगच...
डॉक्टरांच्या सल्ल्याने
डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटिन सप्लिमेंट घेअुन बघा.
टक्कल बेष्ट. टकलाला मेंटेनन्स
टक्कल बेष्ट. टकलाला मेंटेनन्स नसतो. ना शांपू, ना कंगवा, ना तेल, ना कुठलं सिरम, प्रोटीन... काही झिगझिग नाही
त्यपक्ष, तम तल लव त बर पडल ;
त्यपक्ष, तम तल लव त बर पडल
गोगाचा प्रतिसादात असं काय
गोगांच्या प्रतिसादात असं काय होतं की सेन्सॉरने रेघेच्या वर कात्री लावून मात्रा वेलांट्या उडवल्या?
गोगा आणी च्रप्स च्या
गोगा आणी च्रप्स च्या प्रतीसादाने हसून वाट लागली.
तुम्हाला तुळतुळीत टक्कल
तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी?>>>>>अजिबात नाही.....बी..........................ग नो सिंजी.
मी तुमच्या एका लेखात वाचले होते कि,तुम्ही शेती करता त्यामुळे लांब केस अजिबात सूट होणार नाही लोक तुम्हाला गुंड,आवरा टाइप समजतील,आणि टक्कल ठेवायचा का हे तुमची चॉईस असेल.
आणि सामान्यत: पुरुषांचे केस हे वयानुसार गळायला लागतात,त्यामुळे लांब केस शक्यतो ठेऊ नका.आणि केस गळत असतील तर त्वरित डॉ.चा सल्ला घ्या...
महिलांना हलकीशी दाढी मिशी
महिलांना हलकीशी दाढी मिशी शोभेल का?
याचे ऊत्तर फार सोपे आहे. नक्कीच नाही शोभणार.
तसेच पुरुषांनीही लांब केस ठेवायचा अट्टाहास करू नये हे माझे मत.
लांब नखे आणि लांब केस हे बायकांनाच शोभतात.
अर्थात याला अपवाद म्हणजे तुम्ही कमालीचे मॅचो असणे गरजेचे. उदाहरणार्थ महेंद्रसिंग धोनी किंवा जॉन अब्राहम. नाहीतर आठवा लांब केसांचा सैफ अली खान किंवा बॉबी देओल.
जर तुम्ही आपला फुलसाईज फोटो ईथे टाकलात तर मी तुम्हाला सूट होणारी एक्झॅक्ट केसांची लांबी सांगू शकतो. विश्वास ठेवा, माझी गर्लफ्रेंड सुद्धा स्वत:च्या हेअरकटींग आधी माझ्याकडून सल्ला घेते. मला फक्त माझ्याच केसांचे काय करायचे हे समजत नाही पण ते सोडून जगातल्या सर्वांना मी त्यांनी त्यांच्या केसाचे काय करायचे याचा अचूक सल्ला देऊ शकतो.
काय जीवनमरणाचा प्रश्न आणि
काय जीवनमरणाचा प्रश्न आणि प्रतिसाद पण नेहमीप्रमाणेच भारी.
>>>महिलांना हलकीशी दाढी मिशी शोभेल का?
याचे ऊत्तर फार सोपे आहे. नक्कीच नाही शोभणार.
तसेच पुरुषांनीही लांब केस ठेवायचा अट्टाहास>>>>>>>>>>>>
ऋ, आजकाल मेन बन बांधणारी मुलं पाहिली नाहीस काय? मस्त वाटतात की. मेन बन प्लस दाढी पण वाढवलेली असते. ते ही चांगले वाटते.
अमा, टक्कल केल्याने वयस्कर दिसाल ह्याला अपवाद माझ्या ऑफिस बिल्डिंगमधे एक हॅह आहे. लिफ्ट मधे दिसतो येता जाता. पुर्ण टकलु. पण कसला हॅन्ड्सम आहे म्हणुन सांगु.
राज ची आयडीया मस्तय.
कंफ्युज करुन सोडावे सकल जन.
सिंजि, तुम्ही नेहमी बायांना काय आवडेल ह्याचा विचार करुन उत्तरं मागता. त्यापेक्षा कुठल्यातरी मुली/बाईलाच विचारायचं ना.
आणि महत्वाचं म्हणजे....च्रपस, तुमचं लिखाण सुधारण्यापेक्षा अजुनच वाईट होत चालंलय. फोनेटिकल मराठी टाइप करणं इतकही कठीण नाही इथे. एव्हाना तुम्हालाही नीट लिहिणं जमायला हवं होतं. असो. मुद्दाम तसं लिहित असाल तर.... शुभेच्छा.
>>>> सिंजि, तुम्ही नेहमी
>>>> सिंजि, तुम्ही नेहमी बायांना काय आवडेल ह्याचा विचार करुन उत्तरं मागता. त्यापेक्षा कुठल्यातरी मुली/बाईलाच विचारायचं ना. <<<<
अहो तेव्हडे डेअरिंग असते, तर मग इथे कशाला विचारायला आले असते?
अन विचारायला तरी कशाला हव? आपण सरळ करुन बघावं, अन कळतच मग किती कोणाच्या "नजरा" तुमच्याकडे पुन्हा पुन्हा वळताहेत.... हां, तेव्हडे अजुन एक ओळखता यायला हवे की त्या नजरा, भारावलेल्या आहेत, कौतुकाच्या आहेत, ज्येलस आहेत की कुत्सित आहेत, जोकर वाटला म्हणुनच्या आहेत, का अगदीच (वाया गेलाय म्हणूनच्या) "सहानुभुतिच्या" आहेत....
सिंजी, चमनगोटाही काहि वाईट नाही, फक्त बोटभर तरी "शेन्डी" ठेवायला विसरू नका...... शेंडी ठेवली नाही तर लोक तुम्हाला "हिंदू" समजणार नाहीत.
शेंडी ठेवली नाही तर लोक
शेंडी ठेवली नाही तर लोक तुम्हाला "हिंदू" समजणार नाहीत. >>>
अनुपमखेर ची हिंदू धर्मातून हकलपट्टी केली लिंब्याने
>>> अनुपमखेर ची हिंदू
>>> अनुपमखेर ची हिंदू धर्मातून हकलपट्टी केली लिंब्याने <<<
मी तेच्च करतो 
छे छे, गैरसमज नको.
शेंडीच्या जागीच जर टक्कल पडले, तर राखेचा/भस्माचा ओला ठिपका शेंडीच्या जागी लावायची "मुभा" हिंदू धर्मात आहे.
अन शेंडीच्या जागी टक्कल असुनही लोक मला केवळ हिंदूच नव्हे, तर ब्राह्मण पुजारीही समजतात/स्विकारतात.
>>> अनुपमखेर ची हिंदू
डब्बल पोस्ट....
टक्क्ल केल्याने अक्क्ल नक्कीच
टक्क्ल केल्याने अक्क्ल नक्कीच वाढत नाही, त्यामुळे तसला काही विचार करणे तुमच्या फायद्याचे ठरणार नाही, उरला तुमच्या लांब केसाचा प्रश्न त्यांना रिबिन लावुन घट्ट वेणी घाला.
>>> टक्क्ल केल्याने अक्क्ल
>>> टक्क्ल केल्याने अक्क्ल नक्कीच वाढत नाही, <<<<
नक्कीच मान्य, ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने टक्कलाचा संबंध भलतीकडेच आहे/असतो. 
पण टक्कलवाला माणूस अक्कलवानच असतो/असेल अशी "अंधश्रद्धा" सर्वसामान्यांमध्ये आढळते, तिचे काय?
प्रकाशराव घाटपांडेंना या अंधश्रद्धेविरुद्ध आंदोलन/चळवळ/धागे उघडणे असे करायला सांगावे काय?
लांब केस पातळ असतील तर गळतात
लांब केस पातळ असतील तर गळतात,यावर तुम्ही काय उपाय करता? - डाएट तपासा, ऑइल मसाज, सप्लिमेंटरीज - अॅलो वेरा, एग योक, राइस वॉटर असे पॅक्स लावणे, डॉक्टरच्या सल्ल्याने keraglo Forte घेवु शकता, खुप फायदेशीर आहेत केस गळणे थांबवण्यासाठी आणि रिग्रोथसाठी सुद्धा. मला 'Keraglo eva'चा खुप फायदा झाला आहे. एकदम मिरॅक्युलसली केस गळणं थांबलं. पण या कायम घ्यायच्या नाहीत. (साइड इफेक्ट्स असतात असं माझ्या डॉक्टरने सांगितल आहे. मला २ महिने सांगितल्या होत्या)
४. बायकांना प्रश्न----- तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी? - >>>> आवडता पुरुष केस कि टक्कल हे मॅटर करत नाही. आणि मस्त पर्सनॅलिटी असेल तर टक्कल पण सुट होतं. आणि मग तेव्हा टक्क्लसाठी एज नो बार.
तसा तर भरघोस केसांचा घाणेरडा, ढोलु, पेटु असेल तर त्यापेक्षा हॅ.ह. टकलु केव्हाही इम्प्रेशन मारुन जाइल.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार,सल्ले लक्षात घेईन.धन्यवाद.
मला समजलं नाही. जिनियस यांना
मला समजलं नाही. जिनियस यांना नक्की काय अभिप्रेत आहे? केस गळल्याने टक्कल पडलेली व्यक्ती (अनैच्छिक)? कि मुद्दाम वस्तर्याने पूर्ण डोकं भादरलेली व्यक्ती (ऐच्छिक)?
मस्त तुळतुळीत डोके व त्यावर
मस्त तुळतुळीत डोके व त्यावर फ्रेंच कट दाढी >>> हे कसे काय जमवणार? डोक्यावर दाढी!
विठ्ठल ...
विठ्ठल ...