मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.
कृपया सल्ला द्या
राज1,
राज1,
मुलाने हि ट्रीटमेंट तरी पूर्ण करावी अशी अपेक्षा व मुलाला पुढील करिअर साठी शुभेच्छा
माझ्या मुलाची IQ टेस्ट झाली,
माझ्या मुलाची IQ टेस्ट झाली, त्यानंतर क्लिनिकल स्टडी व ओपन स्कूल हि चालू होईल. माझा मुलगा ट्रीटमेंट साठी प्रतिसाद देत आहे.
मायबोली वरच्या मित्र, मैत्रिणीच्या मदतीमुळे हे शक्य झालं, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. माहिती हवी आहे मध्ये ऑनलाईन कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट कामाबद्दल माहिती हवी आहे या बद्दल लिहिले आहे , अशी कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्टची कामे करणारे मायबोली वरचे कोणी किंवा त्यांचे मित्र, मत्रीण किंवा ओळखीचे पुण्यातील कोणी असल्यास Please सांगा.
ट्रीटमेंट मध्ये प्रगती होत
ट्रीटमेंट मध्ये प्रगती होत आहे हे ऐकून छान वाटले. सातत्याने पुढे continue करण्यासाठी शुभेच्छा.
मुलासह सर्व कुटुंबियाना
मुलासह सर्व कुटुंबियाना शुभेच्छा. नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.>>>१
आपल्या प्रयत्नांना सुयश येवो.
आपल्या प्रयत्नांना सुयश येवो. कौतुक आहे तुमचे.
<< माझ्या मुलाची IQ टेस्ट
<< माझ्या मुलाची IQ टेस्ट झाली, त्यानंतर क्लिनिकल स्टडी व ओपन स्कूल हि चालू होईल. माझा मुलगा ट्रीटमेंट साठी प्रतिसाद देत आहे. >>
----- प्रगती होत आहे हे वाचल्यावर खूप छान वाटले. प्रयत्न करत रहा... तुम्हाला आणि कुटुंबियांना शुभेच्छा.
राज1, अशीच प्रगती होत राहो
राज1, अशीच प्रगती होत राहो ह्या शुभेच्छा.
प्रगति उत्तरोत्तर होत राहावी
प्रगति उत्तरोत्तर होत राहावी आणि मुलाचे भविष्य सुकर व्हावे ह्यासाठी अनेक शुभेछा!!
टिव्हीला ईंटरनेट असेल तर
टिव्हीला ईंटरनेट असेल तर टिव्हीचे होस्ट्नेम ब्लॉक करा आणि केबल टीव्ही असल्यास कनेक्क्शन काढुन टाका. मोबाईलला Parent मोड active करुन त्याचा कंट्रोल तुमच्या अकाउंटला लिंक करा.
मोबाईलला Parent मोड active
मोबाईलला Parent मोड active करुन त्याचा कंट्रोल तुमच्या अकाउंटला लिंक करा>> येस हे आम्ही केलेले आहे. मुलंच नाही, तर यंदा माझे बाबा आले होते, सतत ३ तास विरोधी पक्ष वगैरे पॉलिटिकल चर्चा ऐकल्या वर त्यांचा फोन नेट बंद करून आमच्याशी गप्पा करायला बसवले नेट चा प्रॉब्लेम झालाय सांगितले ..
मुलाची प्रगती होत आहे हे
मुलाची प्रगती होत आहे हे वाचून छान वाटले.
मी तुम्हाला तुम्ही राहता तेथे कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट ची कामे करणारी शॉप्स किंवा ऑफिसेस असतील तेथे चौकशी करा असे सांगितले होते ते बघितले का.
हे मला बोलण्याचा अधिकार नाही किंवा मी बोलणे बरोबर दिसणार नाही एका मेसेज मध्ये तुम्ही लिहिले आहे मिसेस ची सर्व्हिस(जॉब) चालू आहे म्हणजे घरात आर्थिक आवक चालू आहे. मग तुम्ही जॉब सोडून मुलासाठी वेळ द्या. आणि आता हे तुम्हाला ठरवावेच लागेल कारण ऑलरेडी त्याच्या शैक्षणीक प्रगतीला उशीर झाला आहे.
तुमचा मुलगा पॉसिटीव्ह
तुमचा मुलगा पॉसिटीव्ह प्रतिसाद देत आहे हे वाचून खूप छान वाटलं. त्याला आणि तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता सगळं सुरळीत होईल. स्टे पॉसिटीव्ह
सुरज, कॉम्पुटर टायपिंग किंवा
सुरज, कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट ची कामे करणारी शॉप्स किंवा ऑफिसेस असतात तेथे बसून काम करावे लागणार आहे घरी अशी कामे मिळत नाहीत असे कळले, मला मुलासाठी वेळ द्यायचा तर असे बसून काम करता येणार नाही, पार्ट Time असे काम बघितले व कामाचा वेळ वाढत गेला तर मुलांसाठी वेळ कधी काढणार.
मायबोली वर ऑनलाईन टायपिंग किंवा कॉपी पेस्ट ची कामे करणारे (पुण्यातील) कोणी किंवा त्यांचे मित्र मैत्रिणी किंवा त्यांच्या ओळखीचे असतील तर please, please सांगा. सुरवातीला अश्या कामाचा मोबदला (पैसे) कमी मिळाले किंवा काही दिवस मिळाले नाही तरी चालतील. कामाची माहिती तरी होईल
सुरज, घरातील आर्थिक आवक कमी झाली कि कटकटी, भांडणे व्हायला सुरवात होते.
खूप आठवड्यांनी माबोवर आले तर
खूप आठवड्यांनी माबोवर आले तर इथे अपडेट्स दिसले. वाचून खूप छान वाटलं. तुम्हाला शुभेच्छा. हळूहळू सगळं मार्गी लागेल, काळजी करू नका. इतकी चिकाटी दाखवली आहे तर ती सोडू नका.
इथे आवर्जून अपडेट्स देत राहा.
राज1
राज1
ईतक्या दिवसांच्या मेसेज वरुन जाणवलं की नातेवाईक आणि घरच्यांचीही तुम्हाला साथ किंवा मदत नाही. माझे चुकीचे असेल तर मला माफ करा.
सुरज,
सुरज,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला कोणाचीही साथ नाही किंवा मदत नाही. मायबोलीवरच्या आपल्या मित्र, मैत्रिणीची तेवढी साथ आणि मदत आहे. मुलाचा बालिशपणा कमी होत नाही, आत्ता त्याचं वय १६ वर्ष आहे पण ३-४ वर्ष्याच्या मुलासारखा गेम खेळत बसतो किंवा youtube वर व्हिडिओ बघत बसतो, एकुलता एक म्हणून आम्ही केलेले लाड आम्हाला भोवले आहेत. Future (भविष्याबद्दल) बद्दल काहीही बोलत नाही, काय शिकणार आहे, काय करणार आहे काहीच माहिती नाही. आम्हा दोघांना (मी व त्याची आई) काही झालं तर त्याचं त्याच्याकडे कोण बघणार, हीच काळजी लागून राहिली आहे. म्हणूनच मी नौकरी सोडून ऑनलाईन copypest किंवा ची कामे बघत आहे, म्हणजे पूर्णवेळ मुलाबरोबर राहता येईल व त्याला वेळ देता येईल. क्लिनिकल स्टडी किंवा ओपन स्कूल साठीही त्याचा उपयोग होईल. आत्त्ता तरी ट्रीटमेंट मुळे कधीतरी तो घराबाहेर पडत आहे.
राज मुलाला घेऊन बसमधून सहज
राज मुलाला घेऊन बसमधून सहज जाता येईल अशा छोट्या सहली करा.. राजा दिनकर केळकर; झपूर्झा म्युझियम.. वानवडी मधली शिंदे छत्री ई. रमला यात तर बरे होईल.
राज, मोअर पॉवर टू यु
राज, मोअर पॉवर टू यु.परिस्थिती लवकर सुधारेल, सदिच्छा.
आम्हा दोघांना (मी व त्याची आई
आम्हा दोघांना (मी व त्याची आई) काही झालं तर त्याचं त्याच्याकडे कोण बघणार, हीच काळजी लागून राहिली आहे.>>>>
राज,
परिस्थीती नक्कीच सुधारेल Be Positive
परिस्थीती नक्कीच सुधारेल Be
परिस्थीती नक्कीच सुधारेल Be Positive -- +1234567
तुम्ही खूप प्रयत्न सुद्धा करत आहात.
आणि तो प्रतिसाद देतो आहे हे महत्त्वाचे. थोडा जास्त वेळ लागेल अपेक्षेपेक्षा कदाचित, पण तुम्ही आणि त्याची आई खचून नका जाऊ.
ओपन स्कूल चा विचार करा.
ओपन स्कूल चा विचार करा. त्याचे कोचिंग पण असतात. जसे जसे छोटी छोटी पायरी चढत जातात तस आत्म विश्वास वाढत जातो.
त्याच नेट्/स्क्रीन टाईम कमी केलात का? किती आक्रस्ताळेपणा केला तरी हे मात्र कराच.
गीतांजली,
गीतांजली,
आमचे पेशन्स कमी होत चालले आहे, हतबल व्हायला होत आहे. मुलगा प्रतिसाद देत आहे हे चांगले आहे.
अश्विनी,
त्याचा स्क्रीन Time कमी केला आहे, मुलाची IQ टेस्ट झाली आहे. क्लिनिकल स्टडी चालू होईल आणि त्यानंतर Open School हि चालू होईल. माझ्या किंवा त्याच्या आई शिवाय तो घराबाहेर पडायला तयार नाही, मला त्याच्याबरोबर जायचे असेल तर नेहमी ऑफिस मधून सुट्टी मिळणार नाही म्हणून मी नौकरी सोडून ऑनलाईन टायपिंग किंवा कॉपी पेस्ट ची कामे बघत होतो, पण ते अवघड वाटत आहे.
पेशन्स ठेवा, आणि प्लीज हतबल
पेशन्स ठेवा, आणि प्लीज हतबल होऊ नका. सगळं ठीक होईल.
राज, परिस्थिती लवकर सुधारो ही
राज, परिस्थिती लवकर सुधारो ही सदिच्छा ! मायबोली कुटुंबातील सर्वांच्याच्य सदिच्छा !
अगदीच रहावलं नाही म्हणून लिहितोय, 'पैशाचे सोंग आणत येत नाही' ही म्हण माहित असेलच. तुम्ही दोघानीही नोकरी सोडून घरीच पूर्ण वेळ रहायचे ठरवले तर आर्थिक गणित कसे जमेल याचाही विचार करावा. मुलाच्या भविष्यासाठीही काही आर्थिक तरतूद करणे महत्वाचे आहे. तुम्ही म्हणताय तशी कॉपी पेस्ट ची कामे मिळणे एक तर अवघड आहे , शिवाय पैसेही तितके मिळणार नाहीत व रेग्यूलरली ही नाही .
चुकलो तर माफ करा !
राज जी, भाषांतर किंवा
राज जी, भाषांतर किंवा सबटायटलिंग ला शिफ्ट व्हा.अपवर्क आणि प्रोज वर छोट्यामोठ्या रिकवायरमेन्ट बघायला चालू करा.सुरू8 पर पेज रेट कमी मिळेल पण अनुभवाने जास्त कामं येत जातील.लिंकडीन वर योग्य स्किल्स आणि ट्रान्सलेशन(मराठी-इंग्लिश/इंग्लिश मराठी टाकून ठेवा.लवकर तुमच्या समस्येतून मार्ग मिळो.
राज, तुम्हा सर्वांना शुभेच्छा
राज, तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मुलाच्या बाबतीत थोडा मार्ग दिसू लागला आहे हे चांगलं लक्षण आहे. हताश होवू नका. जिंकणार तुम्ही.
Copy paste ची कामे नाही मिळाली तर घरगुती शिकवण्या करता येतात का बघा. मुलाच्या वेळा सांभाळून इतरही काही करता येत असेल तर बघा.
राज जी,
राज जी,
रोज वाचतोय. आताचे अपडेट्स सकारात्मक आहेत.
छान वाटलं प्रगती पाहून.
तुम्हाला मायबोलीवर येऊन छान वाटत असेल तर येत रहा. पण मागच्या काही पानात तुम्हाला काही लिंकस दिलेल्या आहेत.
अशा आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णाच्या घरच्यांनी एकमेकांच्या संपर्कात असणे केव्हांही चांगले. अशा काही सोसायटीज असतात, ग्रुप्स असतात.
ते एकमेकांना मार्गदर्शन करतात, मदतही करतात. समदु:खींनी एकत्र येणं ही गरज असते.
हतबलता येणं स्वाभाविक आहे,
हतबलता येणं स्वाभाविक आहे, धीर सोडू नका, होईल सर्व चांगलं, शुभेच्छा.
अगदीच रहावलं नाही म्हणून
अगदीच रहावलं नाही म्हणून लिहितोय, 'पैशाचे सोंग आणत येत नाही' ही म्हण माहित असेलच. तुम्ही दोघानीही नोकरी सोडून घरीच पूर्ण वेळ रहायचे ठरवले तर आर्थिक गणित कसे जमेल याचाही विचार करावा. मुलाच्या भविष्यासाठीही काही आर्थिक तरतूद करणे महत्वाचे आहे. तुम्ही म्हणताय तशी कॉपी पेस्ट ची कामे मिळणे एक तर अवघड आहे , शिवाय पैसेही तितके मिळणार नाहीत व रेग्यूलरली ही नाही .
चुकलो तर माफ करा !
नवीन Submitted by vijaykulkarni on 24 July, 2024 - 17:52<<<<<<<<<<
+ 1
लवकरात लवकर तुम्हाला आशेचा
लवकरात लवकर तुम्हाला आशेचा किरण दिसावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
कामासंदर्भात - वकीलांकडे बरंच टायपिंगचं काम असू शकतं असं वाटतं. जर घराजवळ कोणी वकील असतील तर त्यांच्याकडे विचारणा करून शकता.
Pages