Submitted by संजय मेहेंदळे on 20 January, 2017 - 18:25
आरसा
भिंतीवरच्या आरशात मी मला रोजच बघतो
कटिंग दाढी केल्यावर तेव्हढा जरा बरा दिसतो
काल रात्री जास्त झाल्यावर (झोप हो!)
सकाळी मात्र बघवत नसतो
.
पूर्वीचा त्यात मी दिसत नसतो
विशीतला मी तर कुठेच नसतो
मग मी तिच्या डोळ्यात बघतो
तिनं त्याला आठवणीत जपून ठेवलेला असतो
.
लोकांचा आरसा तर कॅलिडोस्कोप असतो
त्यात मी वेगवेगळाच दिसतो
कधी दिलदार दिसतो, तर कधी खत्रूड असतो
काहींना आपलासा वाटतो, काहींच्या खिजगणतीत नसतो
मग मी मलाच डोळा मारतो
.
अंथरुणावर पडल्यावर मनाच्या आरशात बघतो
तिथे स्वतः "मी" दिसतो, कुठलाही मुखवटा नसतो
आज व रोजच्या वाटचालीचा तो साक्षी असतो
कधी मी नजर चुकवतो, कधी तो हिंमत देतो
उद्या परत भेटूयात म्हणत गुड नाईट म्हणतो
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान ! ! !
छान ! ! !
थँक्स कावेरी जी
थँक्स कावेरी जी
अंथरुणावर पडल्यावर मनाच्या
अंथरुणावर पडल्यावर मनाच्या आरशात बघतो
तिथे स्वतः "मी" दिसतो, कुठलाही मुखवटा नसतो
आज व रोजच्या वाटचालीचा तो साक्षी असतो
कधी मी नजर चुकवतो, कधी तो हिंमत देतो
उद्या परत भेटूयात म्हणत गुड नाईट म्हणतो
अप्रतिम लय भारी...!