घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरतं
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करतं ?
प्रतिकुल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनुदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?
हात नाहीत सुगरणीला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेऊन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धावून येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
असं विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमावून धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपासारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकावून सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सूर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकू आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ !
ज्याने रचना केली त्याला सलाम !
Submitted by वृन्दा१ on 18 January, 2017 - 09:23
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे कविता!!
छान आहे कविता!!
कविता छानच आहे
कविता छानच आहे
यावरुन स्फूर्ती घेताय देताय ते पण छानच
आजची अेका मराठी मुलीच्या
आजची अेका मराठी मुलीच्या मुलाखतीची लिंक देतोय.
या विचारांशी साजेशी वाटतेय.
https://youtu.be/zXscYihhpuk
घाबरू नको कर्जाला
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकावून सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सूर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकू आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ !>>>>>खूप छान ! ! !
नेहमीप्रमाणे आवडली कविता.............
कविता तुमची आहे का?
कविता तुमची आहे का?
की शिर्षक , कवितेसाठी आहे ?