मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत(सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.
मुळ :- उत्तरायण शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचासंधी आहे.
प्रादेशिक विविधता :- संक्रात समग्र दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोडा स्थानिक फेरफार सोबत साजरी करतात.
यात्रा :- मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा. हा दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो.
याखेरीजकोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित केली जाते.
या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
माझ्या तर्फे सर्व मायबोलीकरांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…
"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला."
_/||\_
छान माहिती. "तिळगुळ घ्या आणि
छान माहिती.
"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला."
धन्यवाद राया.
धन्यवाद राया.
आपण पुरवलेल्या माहितीसाठी
आपण पुरवलेल्या माहितीसाठी आपले आभार सुयोग! खूप त्वचा माहिती दिलीत तुम्ही. तिळगुळ घ्या गोड बोला!!
धन्यवाद पल्लवी.
धन्यवाद पल्लवी.
चान आहे... निबंद लेखन मदे
चान आहे... निबंद लेखन मदे पैकीचा पैकी तुम्हला..
अवडली माहिटी