१.५२ दरवाजांचे शहर - "औरंगाबाद"
२.देवगिरी (दौलताबाद) किल्ला — औरंगाबाद
३.भूलोकीचा "कैलाश" - वेरूळ लेणी (औरंगाबाद)
========================================================================
========================================================================
खरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि याच मालिकेत देतोय.
आपल्यापैकी बहुतेकांची लोणार सरोवराशी ओळख शालेय शिक्षणात झाली असणार. अशा या लोणार सरोवराला औरंगाबाद भटकंती दरम्यान भेट देता आली. बुलडाणा जिल्ह्यातील हे सरोवर एका खोलगद थाळीत पाणी भराव असं दिसत. काचेसारखं स्वच्छ पाणी पण हिरव्या रंगाचा गडदपणा जाणवतो ते त्या पाण्याखालच्या शेवाळामुळे. या संपूर्ण सरोवराचा परीघ साधारण २ ते २.५ किमी इतका आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या विवराची तुलना अमेरिकेच्या अॅरिझोना विवराबरोबर होते. अफ्रिकेतील घाना येथे असणारे १००००मी. व्यासाचे "बोसुमत्वी" विविअर हे जगातील प्रथम क्रमांकाचे विअर आहे. न्यु क्युबेक हे कॅनडामधील ३५०० मी. व्यासाचे जगातील दोन क्रमांकाचे विवर असुन आपले लोणारचे १८०० मी. व्यासाचे विविअर हे तिस-या क्रमांकावर आहे. पण बेसॉल्टयुक्त खडकांमध्ये तयार झालेले हे जगातील एकच सरोवर आहे. स्कंद पुराणात बालरूपात श्रीविष्णुने लवणासुराचा वध केला त्या लवणासुराच्या वधाचा पदेश म्हणुन "लवणार" आणि पुढे त्याच्या अपभ्रंश होऊन "लोणार" हे नाव पडलं. तसेच इथे असणारी चालुक्य व यादव काळातील मंदिरे याच्या द्रविड वासर शैलीची व ऐतिहासिक महत्वाची साक्ष देतात,
पौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अशा सर्व बाजुंनी या सरोवराला महत्व आहे.
सुमारे ५२००० वर्षापूर्वी एक ६० मी. रूंदीची व २० लाख टनांपेक्षा जास्त वजनाची उल्का येथे पडली तेंव्हा ६ मेगाटन एव्हढी उर्जा उत्पन्न झाली असावी व या नंतर इथे विविर आले व त्यात खा-या पाण्याचा जलाशय तयार झाला. इथल्या पाण्याच्या रंग हिरवट असुन ते पाणी खारट आहे. त्यात सोडियम कार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड अशी संयुगे आहेत.
साधारण १५-२०मि. चा छोटासा ट्रेक करून तुम्ही सरोवरात खाली उतरू शकता. सरोवराच्या तीरावर कमळजा देवीचे मंदिर आहे. कमळजा म्हणजे लक्ष्मी. कमळजा देवी बहुतेकांची कुलदैवता आहे. सरोवराच्या अजवळच घाटातीर्थ मंदिर समूह आहे तेथे एक नैसर्गिक प्रपात गोमुखातुन वाहत असतो. आम्ही गेलो तेंव्हा श्रावणी सोमवार असल्याने गोमुखातुन वाहणा-या पाण्यात अंघोळ करणार्यांची गर्दी होती. माहिती नसल्याने हेमाडपंती "दैत्यसुदन" मंदिर मात्र पाहता आले नाही. सरोवराचा परिसर अभयारण्य घोषित केल्याने परिसरात कमालीची शांतता आहे. नयनरम्य देखावा आणि जलाशयाची गूढता आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
कमळजादेवी मंदिर
प्रचि ०६
प्रचि ०७
कमळजादेवी
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
धारातीर्थ
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
"मातृतीर्थ" सिंदखेडराजा
राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
(No subject)
सर आपण कॅमेरा कुठल्या कंपनीचा
सर आपण कॅमेरा कुठल्या कंपनीचा आणि कुठल्या प्रकारचा वापरता ?
Pages