मैत्री

Submitted by Suyog patil on 2 January, 2017 - 11:41

(ते पाच सहा जण होते. बहुतेक जन्माचे उपाशी. आयुष्यात कधी एखाद्या स्त्रीला पहिलेच नव्हते बहुधा. अशा त्या क्रूर नजरा. ती रात्र त्यांचीच होती. बाहेर गावचे होते. गरीब असतील... माहिती नाही पण एकूण चित्र पाहता हेच जाणवत होते. मात्र खरच ते गरीब होते... कि त्यांना पाहिजे असलेली उब आधीच मिळाली होती पण तरी देखील त्यांची भूक.... हो ते भूकेलेच होते. आता त्या लांडग्यांची पुढची शिकार मी होणार..... नाही मी.... या कल्पनेनेच मी घाबरून गेले आणि गाडी थांबत्या क्षणी गाडीतून उतरले. तडक स्टेशन मधून बाहेर येऊन आता या वेळी मिळेल ती गाडी पकडून पळेन. मी धावत धावत चुकून गाडी समोर आली आता याच क्षणी ही गाडी मला चिरडून जाणार इतक्यात गाडी थांबली. ड्रायव्हर काहीतरी बोलत होता. पण त्या क्षणी माझ्या मनाची अवस्था मलाच ठावूक. मी गाडीत बसले. घाईगडबडीत तिकीट काढल. मुठीत जीव कवटाळून डोळे घट्ट बंद करून बसून होते. काही क्षणानंतर गाडी परत थांबली माझी हिमंतच नाही झाली, पण आता भीतीने माझा जीव घेण्याचे ठरवले होते. ते लांडगे गाडीत आले होते. अगदी माझ्या मागच्या सीट्स वर बसले होते. भर पावसात भिजावं इतकी मी भिजली होते. भीतीने शरीर थरथरत होते. शेवटची गाडी असल्याने फक्त पुरुषच होते गाडीत. एक चिमुली होती पण गाढ झोपली होती. कंडक्टर काकांच्या शेजारीच बसली होती. निरागस. गाडी खूप वेळाने कुठेतरी थांबली तेव्हा मी डोळे उघडून बघितल शेजारीच एक शाळा होती मला वाटल माझा जीव वाचेल कारण अशा शाळांच्या मागे शिक्षकांचे निवासस्थान असते. म्हणून मी सुद्धा लगेच गाडीतून उतरले आणि शाळेच्या दिशेने धाव घेतली. मी एका अंधार्या रस्त्याने जात होती. इतक्यात गाडी परत थांबल्याचा आवाज आला, मला अंदाज आला ते माझ्या मागावरच आहेत. मी पळत सुटले. अचानक पायाखाली दगड आला आणि पडले. डोक्याला जबर मार बसला होता. मी रक्तात न्हावून निघाले. ते मागून आले मला पाहता क्षणी त्यांच्यातील एक जन बोलला “वो देख वहा हे.” मी तिथून पळ काढला. धावता धावता अचानक अंगातले त्राण संपले, मी कोसळले, शेवटचा श्वास घेतला आणि हे जग सोडल. पण त्या शेवटच्या क्षणी देखील त्यांचाच आवाज कानावर पडला “वो देख मिल गई. चल.......” देवाने मला का नाही बोलावले, नाही समजले पण त्याने मला त्या वेदनांन पासून दूर केले. मी शेवटचा श्वास घेत्या क्षणी माझ्या आत्म्याने देह त्याग गेला पण, तो माझ्या देहा जवळच होता.
माझा दुसरा जन्म. सुरवातीला काही कळेच ना, मी जंगलात होते का? आजूबाजूला झाड तर होती मात्र लांबून कुठूनतरी गाड्यांचे आवाज माझ्या कानावर पडत होते. म्हणजे इथे जवळच लोक वस्ती आहे. मग हा वास ह्या माश्या नक्की कश्यावर घोंगावत आहे. अचानक वारे वाहू लागले. विजांचा कडकडाट सुरु झाला. पाऊस का नाही पडत? मला प्रश्न पडला. एकच लख्ख प्रकाश पडला. मृत्यूचा सुद्धा थरकाप उडेल असा विजेचा आवाज झाला. दुसर्या क्षणी माझ्या शेजारच्या झाडावर वीज कोसळली. आगीने तांडव सुरु केल. आणि त्या आगीच्या प्रकाशात मला ते विदारक सत्य दिसल ज्याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. मी मेले अस समजून ते लांडगे तिथून निघून गेले असणार असा माझा समज झाला. मात्र ती गिधाडाची जात होती. त्या मेलेच्या देहाचे सुद्धा त्यांनी लचके तोडले होते. मी हादरले. आक्रोश केला. रडू लागले. आणि अचानक पाऊस सुरु झाला. ते आभाळ सुद्धा माझ्या दुःखात सहभागी झाल. दुसर्या क्षणी मला कसली तरी जाणीव झाली आणि मी देवाचे मनापासून आभार मानले. कारण देवानेच मला वाचवले होते. त्यानेच मला सोडवले होते. माझा देह तर ते मिळवू शकले मात्र माझ्या आत्म्याला स्पर्श नाही करू शकले.)
माझ नाव मार्तंड मी एक घरीब घरात राहणारा असल्यामुळे. कदाचित ह्याच मुळे माझी स्वप्न पूर्ण होऊ शकली नाही. असे माझ्या एका मनाला वाटते. मात्र दुसरे मन सांगते. कि, एकतर मी कार्य नाही केले किंवा धाडस करून माझ्या घरातल्यान समोर हे कधी बोलूच नाही शकलो मी. मला खर्या आयुष्यात काय बनायचे आहे. आणि म्हणूनच माझ स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. असो ते स्वप्न मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही कोणत्याही क्षणी पूर्ण करून दाखवेन कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी ची वाट पाहण्या पेक्षा मी स्वतःच ती संधी निर्माण करेन. तसे मी सध्याच्या आयुष्यात खूप प्रयत्न देखील करत आहे मात्र मनापासून करावे असे काम मिळत नसल्याने आताच याच काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात आलेल्या एका सुंदर स्वप्नाला मी होकार नाही देऊ शकलो मात्र नकार सुद्धा दिलेला नाही. ते स्वप्न खर व्हावं अशी मनापासून इच्छा आहे आणि म्हणूनच करावे लागतील ते सर्व प्रयत्न कार्य मी करत आहे. पण मार्ग हा योग्यच असला पाहिजे असा माझा अट्टाहास आहे आणि तिला देखील तो आवडेल हे मला माहिती आहे म्हणूनच मी फक्त आणि फक्त तिच्यासाठी स्वतःला संपूर्ण पणे झोकून दिलंय. स्वतःला तिच्या योग्यतेच होण्यासाठी. मी तिला प्रथम पहिले होते त्याक्षणी मी बहुधा तिच्या त्या निर्मळ मनाचा ठाव घेतला होता. ते मन जरी एखाद्या अथांग महासागरा सारख असल तरी, मला नक्कीच त्याच्या निरागसतेचा अंदाज आला आहे. आता या क्षणी मी तिच्याच विचारात मग्न होऊन काहीतरी लिहित बसलोय. इतक्यात कानावर एक ओळखीचा आवाज आला, मी माझ्या खोलीत बसून आहे ना तरी तो आवाज कोणाचा हे ओळखण्याचा प्रयत्न केला, आणि ते बोलतात ना, की, प्रयत्ने काहीतरी रगडीता काहीतरी गळे, हा तेच ते, ते तुम्ही बघून घ्या. मामा आला, हो नक्की मामा आला, मात्र अजून एक वेगळा आवाज ऐकू येत होता. कोण असेल बर. काहीच कळेना. मी हळूच डोकावून बघितल पण फक्त मामाच दिसत होता. मात्र दुसरी व्यक्ती दिसेचना. बोल्लो जावूदेत असेल कोणीतरी मामाचा मित्र. आपल्याला काय? मी मात्र माझ्या लिखाणात मग्न होतो. इतक्यात माझा विषय निघाला. झाल लिखाण राहील बाजूला. माझे कान टवकारले थेट त्या चर्चेच्या दिशेने. आणि मला ज्याची भीती होती तेच घडल. माझ्या नोकरीचा विषय निघाला. मी डिग्रीच शिक्षण अर्ध्यावर सोडल. कारण शेवटच्या परीक्षेत एक विषय राहिला. आणि मला सुद्धा तो विषय सोडविण्याची इच्छा राहिली नाही. मात्र माझ्या घरातल्यांचा समज असा होता कि जर मी विषय सोडवला तर मला आकाशातून वीज पडावी अशी नोकरी सुद्धा लगेच मिळेल. आणि नेमका तोच विषय चालू होता. आणि तितक्यात आई ने हाक मारली. बाहेर गेलो. चर्चा झाली पण मी माझ्या मनाशी पक्क केल पुन्हा परीक्षा नाही द्यायची. इतर सर्व जरी माझ्या विषयी चिंतातूर असले तरी, मामाच्या मित्राच्या मनात मात्र काहीतरी वेगळच चालू होते. आणि ते मी हेरलं होत. मी पुन्हा परीक्षा देणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे हे समजल्यावर सर्वजण शांत झाले. आणि हीच होती ती शांतता जी माझ्या आयुष्यात वादळ घेऊन आली.
मामाचे मित्र बोल्ले मी याला नोकरीला लावू शकतो. मात्र याला हरकत नसावी. हे शब्द ऐकून मी हादरलो. सरकारी नोकरी ती सुद्धा बारावी पास ला. कस शक्य आहे. विचार केला आणि. होकार दिला. पण मामाला प्रश्न पडला, कारण अशा कोणत्याच नोकरीचा उल्लेख त्यांनी मामा कडे कधी केलाच नव्हता. मामा चा मित्र त्या क्षणी माझ्या घरातल्यान समोर फक्त इतकच बोल्ले. तुला टायपिंग येत ना? मी हो बोलण्या आधीच माझ्या घरातल्यांनी माझ्या बद्दल गोडवे गायले. मामा त्याच्या मित्राला काही विचारणार इतक्यात ते उठले आणि बोल्ले चल तुला नक्की काय काम करायचे आहे ते दाखवतो. घरातले तर मागेच लागले जा जा म्हणून. मी लगेच तयार होऊन आलो आणि आम्ही त्यांच्या गाडीत बसून निघालो. मार्ग तसा ओळखीचा होता. पण शंका नव्हती कारण मामा सोबत होता. गाडी एका ओळखीच्या बंगल्या पाशी येऊन थांबली. हा तोच बंगला आहे ज्याच्या मी प्रेमात पडलोय. ही लहान कहाणी आहे सांगतो. चला या. अरे flashback मधे या हो. मी एका सर्वेक्षण करण्याच्या कार्यालयात कामाला असताना तीन चार वेळा या रस्त्याने येण जाण केल होत तेव्हा बघत्या क्षणी हा बंगला मला आवडला होता. आणि मनाशी नक्की केल कि स्वतःच अस घर घेणार तर तो हा बंगला. हो कारण मी अजून पर्यंत जितक्या वेळा या बंगल्याला बघितल होत तेव्हा तेव्हा ह्या बंगल्यात कोणीच राहत नाही हेच दिसून आल. मला तर शंका पण आली होती कि हा भूत बंगला तर नाही ना? मामाचा मित्र (अरे flashback संपला चला या बाहेर) गाडीतून उतरला मामा ही खाली उतरला. मला मात्र शंका आली होती कारण या बंगल्याच्या मागे म्हणजे अगोदर सुद्धा एक सरकारी कार्यालय आहे आणि आम्ही तिथेच जाणार आहोत. त्यांनी मला बाहेर बोलावल आणि बोल्ले ये तुला तुझ काम दाखवतो. ते बंगल्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते जणू काही बंगल्याच्या आतून कोणीतरी त्यांनासुद्धा पहात आहे. त्यांनी गेट उघडला. रोज या जागी साफसफाई होत असावी कारण परिसर स्वच्छ होता. बंगल्याच्या जवळ गेल्यानंतर मला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. तुम्ही कधी अस ऐकल आहे कि एक बंगला बोलतोय मला उघड. मी ते ऐकल नाही प्रत्यक्षात पाहिलं. त्या बंगल्याच्या दरवाज्याला जे भलमोठ कुलूप लावल होत ते आम्ही तिथे येत्या क्षणी लिफ्ट झाल होत. हा प्रकार भयानक होता. आणि आपण लॉक करताना दरवाज्याची कडी प्रेस करून ठेवतो याउलट ह्या दरवाज्याची कडी उघडली जाण्यासाठी आतुर झाली होती. कोणताही आवाज नाही पण दोन्ही गोष्टी फ्लोट करत होत्या. त्यांनी खिशातून चाव्या काढल्या आणि लॉक उघडला. मात्र कडी स्वतःहून उघडली गेली. सगळीच काम जर आपोआप झाली तर आम्ही काय करायचं फक्त मजा बघायची. दरवाजा आत लोटला आणि, घरातून एका स्त्री चा आवाज आला. हा आवाज वरच्या खोलीतून येत होता. शांत पण घाबरवणारा. मी मामा कडे बघितल. तो बोल्ला नको घाबरूस मी आहे ना. ठीक आहे. मी गेलो आतमध्ये त्यांच्या सोबत. मामा च्या मित्राने मला सांगितल. या बंगल्यात संपूर्ण दिवस राहायचं सकाळी ९ ते संध्याकाळी ६ हेच तुझ काम. करणार? मी त्यांच्या कडे एक टक बघितल आणि विचार केला. हे मला काम देतायत कि माझ डेथ सर्टिफिकेट साईन करतायत. इतक्यात माझ्या मनाला एक आवाज ऐकू आला, न घाबरता रहा इथे. आणि मी बोलून गेलो हो. मी हो बोल्लो कारण, माझ्या मनाला जो आवाज ऐकू आला तो तिचाच होता. तीच बोल्ली होती नको घाबरूस राहा इथे. आणि त्याच विश्वासावर विश्वास ठेवून मी तिथे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र माझा होकार मलाच महागात पडणार किंबहुना माझ्या जीवावर बेतणार अशी भीती वाटून मामा ने माझ्या कडे पाहत, नाही असे उत्तर दे म्हणून खुणावले. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी त्याला इतकच बोल्लो. घाबरू नकोस मला काहीनाही होणार. मात्र त्याला चिंता होतीच. म्हणून त्याने मला एक vokitoki दिला आणि सांगितल गरज पडलीच तर वापर कर. घाबरू नकोस मी आहे ना. घराच्या मालकांना बहुधा त्या घराचा वीट आला होता आणि म्हणूनच त्यांना ते घर विकायचे होते मात्र असले घर कोण विकत घेणार? पण हे भूत इथे कसे आले? म्हणजे एकूण कहाणी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. मालकांना या गोष्टीचा अंदाज आला होता. हे हेरूनच त्यांनी मला त्यांना माहिती असलेला किंवा त्यांना कोणीतरी रंगवून सांगितलेला भूतकाळ सांगितला. हा भूतकाळ खरा नव्हता मात्र त्या क्षणी तो खरा आणि खूपच क्रूर वाटला. कारण दरवेळचीच कहाणी. कि त्या जागी तो बंगला बांधण्या पूर्वी काही वाईट इसमांनी एका निर्मळ मनावर अत्याचार करून जीव घेतला. आणि त्याचाच बदला म्हणून तिची आत्मा आता लोकांना त्रास देते कितीही होम हवन, वास्तू शांती केल्या तरी ती जात नाही. अनेक बुवा, भोंदू बाबा येवून गेले. ह्यात जीव अडकलाय त्यात जीव अडकलाय अस सांगून अक्षरशः लाखो रुपये खर्चून देखील फायदा काहीच नाही. अखेर घर बंद ठेवावे लागले. तेव्हा पण एक हिमालातील बाबा आला. त्याने म्हणे मंत्र जप करून त्या आत्म्याला या घरात कोंडून ठेवले आहे. घरात प्रवेश करताना ते जे भले मोठे कुलूप दिसले होते ती घंटा त्याच मुर्खाने या भोक्याच्या गळ्यात बांधली होती किंमत रुपये ५० हजार. हा संपूर्ण इतिहास सांगून झाल्यावर घरमालकांनी घराच्या चाव्या माझ्या हातात दिल्या आणि घरात राहण्याचे काही नियम सांगितले. हे नियम खरतर त्या घराचे नव्हते हे होते त्या मुर्खाने सांगितलेले. तोच तो हिमालयातला. त्या नियमांचा जन्म होण्यास देखील तोच जबादार होता. कारण त्याने घरमालकांना बुद्धू बनवले होते. जे भले मोठे कुलूप त्याने तिथे लावले होते त्याची एक चावी त्याने स्वतः जवळ ठेवून घेतली होती अस सांगून कि वर्ष भरानंतर तो हिमालातून तपश्चर्या करून परत येऊन ते घर त्या भुताच्या तावडीतून सोडवणार. तो परत आला देखील मात्र मालक मुंबई ला निघून गेले त्याच रात्री. त्याने घरात प्रवेश केला मात्र त्या घरात घरमालकान व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नव्हता म्हणजे घर मालकान सोबत प्रवेश केलात तर ठीक आहे मात्र एकटेच गेलात तर नाही चालणार. तिने त्या भोंदू ला तिथून हाकलून लावल मात्र त्याचा असा गैरसमज झाला कि त्याने घराच दार बंद करून घेतल्यामुळे अस घडल असावं कारण, घराच दार बंद होई पर्यंत ती शांत होती मात्र दरवाजा बंद होत्या क्षणी तिने रौद्रावतार धारण केला. कारण तिला पण असेच वाटले होते कि तो भोंदू आता रोज रात्री तिथे जाणार आणि रात्रीच्या अंधारातील त्याचे घाणेरडे धंदे तिथे सुरु करणार. ही घटना घडून गेल्याच्या आठवड्या भारतच इकडे मालकांना सुद्धा तो बंगला विकण्याचे वेध लागले म्हणून मालकांनी त्या भोंदू ला संपर्क करून त्या बंगल्याचा निकाल लावण्यासाठी लवकरच बोलावून घेतले. ते यड होत जवळच्याच झोपडीत आल लगेच निघून. बंगल्यात आल्यावर म्हणे मनाच्या शक्ती ने प्रवास केला म्हणून लवकर आलो असा बरळू लागला. कारण मालकांना पण प्रश्न पडला कि हिमालयात गेलेला माणूस एका दिवसात परत कसा आला. एक नवीन कुटुंब तेथे राहू इच्छित होत मात्र होम झाल्या नंतर पण तो भोंदू तो भोंदुच बरळला कि, या घरात राहावयाचे असेल तर काही नियमांचे पालन करावे लागेल म्हणे. नियम क्रमांक एक या घराचा दरवाजा कधीच म्हणजे कधीच बंद करायचा नाही. इथूनच कहर करायला सुरुवात केली होती त्या भोंदू ने. नियम दुसरा या घरात राहावयाचे असेल तर कधीच झोपू नका. हे यड त्या रात्री जेव्हा आल होत तेव्हाच रात्रीच्या बारा वाजता दरवाजा उघडा ठेऊन काही क्षणासाठी का होईना झोपलं आणि नेमक तेव्हाच दरवाज्यावर बसलेल्या रात किड्याला पण चाळे सुचले काढला त्याने घुगारांचा आवाज. मग काय होणार झाली या भोंदू ची ओली. गेला आणि केला दार बंद. दार बंद करायची खोटी देवीनी दिला तीर्थ प्रसाद. आधीच ओली झाली होती त्यात आता पिवळी पण झाली. मग काय. झाले याच मुळे दोन नियमांना भोंदू ने जन्म दिला त्याच क्षणी. इतक ऐकूनच त्या परिवाराने घरमालकान कडून तब्बल १ लाख मागितले घराच्या आधीच हातात पडलेल्या चाव्या परत केल्या आणि धरला स्वतःच्या घरचा रस्ता. ती रक्कम भोंदू ने होमा साठी त्या परिवाराकडून घेतली होती. कारण मालकान कडून मागितली आणि तरी पण घर विकल गेल नाही तर मालक त्यालाच त्या घरात राहायला लावतील या भीतीने. या घरात राहण्याचा तिसरा नियम हा घर मालकांची स्वतः जन्माला घातला होता. त्याच झाल काहीस अस कि घर मालकांनी स्वतःच त्या घरात राहायचं ठरवल एकट ते ही परिवारा शिवाय पण फक्त एकच दिवस. मात्र त्या दिवशी मालकांनी केला विचार कि चला आपल्या स्वतःसाठी एक मास्टर बेड आपण तयार केली आहे तर तिथे जावून झोपावे पण, मालक अजाणतेपणी बाई साहेबांना डिस्टर्ब करत आहे हे त्यांना माहिती नव्हते. मग काय व्हायचे तेच झाले. बाई ला आला राग दिली धमकी खबरदार जर वर आलास तर संपूर्ण घर पेटवून देईन. घर मालकांना पण शंकाच आली ही खरच भूत आहे. कि स्वतःची पोळी भाजून घेते भूताच नाटक करून. एकूणच काय तर मालक जेव्हा परिवारासह राहायला आले तेव्हा बाईंच्या नुसत्या आवाजानेच ते घाबरून पाळले होते. म्हणून आता शंका येण साहजिकच होत. तरी पण मालकांनी हिम्मत करून वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि बाईंनी दिलेली धमकी खरी करून दाखवली संपूर्ण घराने वणवा भडकावा इतका प्रचंड पेट घेतला. घरमालकांच झाल पाणी पाणी. ते तत्काळ खाली उतरले आणि पाहतात तर काय घराला लागलेली आग विझली. घराच्या बाहेर येऊन आगीचे अवशेष पाहण्याचा प्रयत्न केला पण आग लागलीच नव्हती असे चित्र दिसले. आता मालकांना विश्वास बसला आणि त्यांनी घर कायमचे बंद केले. आणि यातूनच घरात राहण्याच्या तिसर्या आणि शेवटच्या नियमाचा जन्म झाला कि कधीच वरच्या खोलीत जायचे नाही. हे सर्व नियम सांगितल्या नंतर घराच्या किल्ल्या माझ्या हातात दिल्या. तस पाहता मला सकाळी अकराच्या सुमारास घरात घेऊन आले होते. त्यामुळे ना माझ्याकडे जेवणाचा डबा ना पाण्याची बाटली. तरी जेवणाची वेळ व्हायला अजून दोन तास होते तरी मला वाटल कि दोन तास लगेच निघून जातील. म्हणून घेतल्या चाव्या आणि बसलो सोफ्यावर. मामा आणि त्याचा मित्र निघाले. जाताजाता ते बोलून गेले जेवायला जाताना मात्र दार बंद करून जा. मी होकारार्थी मान डोलवली आणि ते गेले तिथून. मी तत्काळ घरी फोन करून सांगितल नोकरी मिळाली. आता थेट दुपारी जेवायला येईन. समोरून हा ठीक आहे. इतकेच उत्तर आले.
माझा त्या घरातील प्रवास झाला सुरु, मी प्रवास बोलण्या मागचा उद्देश इतकाच की खर समजे पर्यंत प्रत्येक क्षण भीतीच्या ताब्यात होता. जगायला मिळाला तर आपला. नाहीतर मृत्यूचा. मला एक घाणेरडी सवय आहे. कुठेही दीर्घ काळ वास्तव्य करायचे असेल तर त्या जागेची माहिती काढून घ्यायची. म्हणजेच युध्द भूमीचा अंदाज घ्यायचा. म्हणून मी संपूर्ण घरात फिरायचं ठरवल. सुरुवात बाहेरच्या परीसरा पासून केली. त्याचे फोटो काढले. निरखून पाहत होतो. घराच्या आतील जागेचे परीक्षण करताना देखील फोटो काढून घेतले. नशिबाने बाथरूम खाली सुद्धा होते. हसू नका. खालच्या संपूर्ण घराची पाहणी तर झाली पण आता मी जिन्याच्या समोर आलो होतो आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात थांबलो, नियम आठवला तसाच पाय मागे घेतला आणि परत येऊन सोफ्यावर बसलो. त्या घराची चांगली गोष्ट त्या घरात मला गरजेची असलेली एक गोष्ट सोडली तर बाकीच्या सर्व गोष्टी होत्या. त्या पण चालू स्थितीत खरच खूप चांगली गोष्ट होती. हा मला वायफाय पाहिजे होते. तेच फक्त तिथे नव्हत. माझे कोणी मित्र मैत्रिणी नाहीत ना. म्हणून मी शक्यतो स्वतःसोबतच बोलत असतो म्हणजे मनात किंवा हळू आवाजात. असच बोलता बोलता बोलून गेलो कि अरे देवा मला इथे फुल स्पीड वायफाय मिळाल तर किती मज्जा येईल. संपूर्ण दिवस कसा निघून जाईल समजणार सुद्धा नाही. पण तस होऊ तर नाही शकत. तरी पण एक खोटी आशा म्हणून वायफाय चालू केल आणि फोन बाजूला ठेवून घरातला टीव्ही चालू केला. डीश असल्याने टीव्ही सुरु होण्यास वेळ लागणार हे नक्की पण माझ्या मोबाईल चा वायफाय सुरु झाल हे कस शक्य आहे. शेजारी एक सरकारी कार्यालय तर आहे पण त्याला पासवर्ड टाकून तो लॉक केला असणार. मग हे वायफाय कोणाच म्हणून मी नाव बघितल. फोन माझ्या हातातून खाली पडला नशिबाने तो सोफ्यावर पडला पण, त्यात नाव होत तुझी मैत्रीण. ह्या डिस्कव्हरी वाल्यांना पण काही काम नसतात ही गोष्ट मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवली कारण खरच एका क्षणाला माझी पण ओली होणार असेच वाटू लागले. एकीकडे फोन खाली पडला आणि त्याच क्षणाला दुसरीकडे टीव्ही चालू झाला, चालू होऊन पण त्याने माझ्यावर उपकारच केले होते कारण, डिस्कव्हरी चायनेल च्या कोणत्यातरी सिंहांच्या कार्यक्रमाची जाहिरात चालू होती. ज्यात नेमक सिंहांच्या दहाडण्याचा आवाज होता. टीव्हीचा आवाज इतका जास्त होता कि पहिले मी आणि माझ्या जोडीला ती दोघंही घाबरलो. त्या क्षणाला एकच गोष्ट केली घरातून बाहेर. दोनतीन मिनिट त्या धक्यातून सावरण्यातच गेली. परत आतमधे जाण्याची हिम्मत नव्हती होत. तो आवाज झाल्या च्या काही क्षणानंतर नेहमीच्या जाहिराती चालू झाल्या आणि अंदाज आला कि नक्की काय घडल. म्हणून परत घाबरत घाबरत आत जाण्याची हिम्मत करणार इतक्यात वरच्या खोलीतून जो आवाज आला तो ऐकल्या नंतर दरवाज्यातच थांबून राहिलो. ती मला चक्क ओरडली पण भीतीने. अरे ए सरळसरळ सांग ना कि हे घर सोडून जा म्हणून इतक घाबरवण्याची काय गरज आहे. जीव गेला असता ना माझा. हे ऐकून हसावं कि रडावं हेच समजेना तिच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुद्यवाने त्या सीरिअल चा रिपीट चालू होता. मी घरात जावून नेमका तो चायनेल चालू केला आणि परत तोच सिंहाच्या दहाडण्याचा आवाज आता माहिती होत म्हणून जाम भारी वाटत होत. पण तिकडे तिची हालत खराब झाली होती. ती अक्षरशः मला शिव्याशाप देऊ लागली. आणि इकडे माझा हसून हसून जीव चाल्लेला. हा संपूर्ण आनंद फक्त सात मिनिटांचा. आठव्या मिनिटाला बया माझ्या समोर येऊन गेली आणि मला समजले पण नाही. तिने लाईट बंद केला आणि टीव्ही बंद पडला. त्या सोबतच माझ हासण पण थांबल पुढचा मिनिटभर शांतता. त्याच क्षणी मनात काहीतरी आले आणि मी बोल्लो फ्रेंड्स, माझा हात पुढे केला आणि तिची वाट पाहू लागलो. एक वार्याची झुळूक हाताला स्पर्श करून गेली. आणि कानावर शब्द येऊन आदळले हो. आमची मैत्री होण्यासाठी फक्त दहा मिनिट लागली पण जणू काही असे वाटले कि संपूर्ण पर्व सरून गेले. पण या मैत्री सोबतच मनात काही प्रश्नांनी जन्म घेतला. आणि या प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त तीच देऊ शकत होती. माझ्या मनात नक्की काय चालू आहे. हे तिला समजले असेल का? एकीकडे हा विचार तर दुसरीकडे पोटात कावळे ओरडायला लागले. घड्याळ बघतो तर काय. बोल्लो होतोच दोन तास कधी निघून जातील समजणार सुद्धा नाही. घरी गेल्यावर माझ्या नवीन नोकरी संधर्भात जास्त चर्चा नाही झाली. पण, नेहमी प्रमाणे पाण्याची बॉटल bag मधे होती. आणि माझी खास bag घेऊन मी निघालो होतो. घरी आलो. हा म्हणजे आता जे माझ दुसर घर होत तिथे आलो. जणूकाही ती माझ्या येण्याची वाटच पहात होती असे जाणवले. दरवाजा उघडून आत गेलो. तास होत आला मी सोफ्यावर बसून फोनवर गेम खेळत होतो. मात्र तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. गेली कि काय सोडून खरच. मला शंका आली म्हणून हिम्मत केली आणि वरच्या खोली पर्यंत गेलो खरा. पण दरवाजा उघडण्याची हिम्मत होत नव्हती. इतक्यात माझा फोन वाजला. संपल आता सगळ आता ही बया काय मला जित्ता नाही सोडत. घर पण पेटवणार आणि मला पण जिवंत जाळणार. आग लागो काय दुर्बुद्धी सुचली आणि वर आलो अस झाल होत. मी लगेच माघारी फिरणार इतक्यात आतून आवाज आला. अरे तू आलास पण, कधी आलास. डोळा लागला होता रे समजलच नाही. हाक सुद्धा नाही मारलीस. आणि बाहेर का थांबलास? आत येना. मी जरा थांबलो विचार केला नक्की कोणा सोबत बोलते. परत आतून आवाज आला. अरे तुझ्याशीच बोलते ये आत ये. आणि दरवाजा उघडला. आत डोकावून पाहिलं तर कोणीच दिसेना. आत मधे गेलो संपूर्ण खोली तपासून पहिली कोणीच नाही दिसत. मी त्या सावलीकडे दुर्लक्ष केल होत. म्हणून मला ती दिसत नव्हती. पण खर पाहता ती तिथेच होती. आता तिने परत हाक मारली कायरे कोणाला शोधतो आहेस. मी इथे बेड वर आहे. मी त्या दिशेने नजर टाकली असता मला बेड वर ती बसल्याचे प्रिंट्स दिसत होत्या. त्या प्रिंट्स वरून मी अंदाज बांधायला सुरुवात केली. पण काहीच जाणवत नव्हते. तिने विचारल काय पाहतो आहेस. मी मनाशी ठरवल त्या प्रिंट ला मेजर करून हवेत बोलायचं. म्हणजे माझी दृष्टी पारदर्शी न राहता तिच्या पर्यंत पोहोचेल. शेजारीच एक खुर्ची होती तिच्यावर बसलो. आणि फक्त इतकच विचारल कशी आहेस? इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी हा प्रश्न विचारला होता तिला. म्हणून ती भाऊक झाली. आता मला तिच्या डोळ्यातून वाहणारे ते थेंब स्पष्ट दिसत होते. माझा अंदाज कधीच चुकत नाही. आणि तो या वेळी सुद्धा चुकला नव्हता. मी बरोबर तिच्या चेहऱ्याकडे पहात होतो. दोन सामान्य माणस भेटल्यावर जो संवाद सुरु व्हावा त्या प्रमाणे ती माझ्याशी बोलत होती. मला या संवादात खंड पाडायचा नव्हता पण आता तिलाच माझे मन समजले होते.
मी काहीच न विचारता पण जे मनात आले होते त्याचा ठाव घेऊन तिने सर्वकाही सांगायला सुरुवात केली.
मी मुळची रत्नागिरी मधील सावंतवाडी येतील. तिथल्या नारळ सुपारीच्या वाड्या आणि हिरवीगारगर्द झाडी, अक्षरशः जंगलच, अशा त्या निसर्गाच्या सानिध्यात आमचा भलामोठा वाडा. जुनाट बांधकाम, मात्र मजबूत. अगदी भरभक्कम. वाड्याच्या समोर प्रशस्त अंगण, सदैव शेणाने सारवलेलं. आमचा स्वतःचा खूप मोठा गोठा आहे. तुला आश्चर्य वाटेल पण, तब्बल ५० दुध दुभत्या म्हशी, आणि ३० गाई. चार खिल्लारी बैल जोड. तुला जर त्या बैलांच्या मध्ये उभा केला नां तर तुझी ओलीच होईल इतके उंच आणि रांगडे आहेत. म्हशी आणि गाई पण तशाच आहेत. आता गोठ्यात इतकी राजेशाही दौलत असेलं तर ती सांभाळण्यासाठी माणस पण तशीच लागणार. सुंभ आणि कुंभ नावा प्रमाणेच अगदी राक्षसच जणू. ६.६ फुट उंच, पिळदार शरीर, भरलेल्या मिश्या, साधारणपणे डांबर मधे बुडवून काढावं इतके काळे, हाता पायात जाड जाड कड. तिक्ष्ण नजर, लांब केसांची शेंडी बांधलेली असायची, त्यांचा पेहराव अगदी कर्नाटकातील अण्णान सारखाच होता. शर्ट आणि लुंगी. खरंच कुठून शोधून आणल आमच्या बाबांनी त्यांना काय माहिती. पाताळात गेले असतील कदाचित. कारण त्यांना नुस्त बघितलं तरी कोणाचीही अगदी सहज ओली होईल असले राक्षसा सारखे दिसतात. म्हणून तर ती दौलत ते बिन दिक्कत पणे सांभाळतात. कारण असली दौलत संभाळण काही सध्या सुध्या माणसाच काम नाही. त्यांच्या सारखाच अगदी तरबेज माणूस पाहिजे. मात्र आमच्या बाबांना देखील कमी समजू नका. ते बोलतात नां, कि ६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव “येसाजी”, दोन हजार शत्रूंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव “बाजी”, हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव “तान्हाजी”, आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव “संताजी”, दिड तासांत दुश्मनांच्या तंबूचा कळस चोरून आणतो त्याच नाव “धनाजी”, जो वाघाला फाडतो त्याच नाव “संभाजी”, अन ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव “शिवाजी”. अगदी तसच जो एक टन च्या बैलाला फरफट नेतो तो “सुंभ”, ज्याच्या येण्याची चाहूल लागताच अख्खा गोठा जागा होतो तो “कुंभ”, आणि या दोघांना हाताखाली घेऊन शेती आणि वाडी सांभाळतात ते माझे बाबा “ब्रम्हां मार्तंड सावंत”.
माझं दहावी पर्यंतच शिक्षण हे तिथेच झालं. मात्र पुढच्या शिक्षणासाठी मला मुंबईला पाठवण्यात आल. अगदी लाडात वाढलेली असल्याने परत घरी जायला निघाले तेव्हा खूप उत्साह होता. एकदाची परत कधी घरी जाते असं झालं होत. गरातल्या सर्वांचीच आठवण येत होती. ज्यांची मी अत्यंत लाडकी लेक आहे त्या बाबांची. जी माझी पहिली मैत्रीण आहे त्या आईची. आणि ज्याची बहिण असल्यामुळे सावंतवाडी मधे कधी कुणाची माझ्या कडे नजर वर करून बघण्याची हिंमत नाही असा माझा मोठा भाऊ विष्णू. आज्जी आजोबांना देखील अगदी कडकडून भेटावस वाटत होत. सर्व सामानाची बांधाबांध करून स्टेशनवर पोहोचले. छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशन. नावावरूनच समजते कि किती गजबजाट असणार ते. रात्रीचे १० वाजले होते तरीही लोकांची वर्दळ ही होतीच. त्यात नशीब, माझ रिजर्वेशन होत. पण तरीही जे घडायचं ते कदाचित घडणारच होत. प्रवास सुरु झाला तेव्हा हे अस काही होईल ह्याची तीळ मात्र कल्पना नव्हती. प्रवासाच्या सुरुवातीला खरतर तसं काहीच जाणवलं नव्हत म्हणा, तसं जाणवेल तरी कां? पण, प्रवास करतांना अचानक चाहूल लागली. आणि भीतीने मनात जागा घेतली. आता मी संपूर्ण पणे तिच्याच स्वाधीन झाले होती. डोक अगदी बधीर झालेलं. नक्की काय करावं सुचत नव्हत. मनात अचानक विचार आला तडक गाडीतून उतरून पळावे. खरच त्या क्षणी जर डोक ठिकाण्यावर असत तर कदाचित आज मी माझ्या घरी असते. एकच चूक केली गाडीतून उतरले. पण गाडीत थांबून तरी काय झालं असत. कदाचित त्यांचा हेतू हां त्यांनी तिथेच पूर्ण केला असता आणि आज मी इथे तुझ्याशी बोलत नसते. इथे आले म्हणून त्यांना फक्त देहच मिळाला तिथेच थांबले असते तर. नाही. कल्पना देखील करवत नाही. परत ती रात्र आणि ते भयानक चित्र डोळ्यांसमोर उभं राहत. नकोच त्या आठवणी.
पुढचे काही क्षण खोलीत फक्त एक भयाण शांतता होती. कदाचित तिला घरच्यांची आठवण येत असणारं आणि मी तिच्या चेहऱ्यावरील ते निरागस भाव टिपण्याचा प्रयत्न करत होतो. जरी तिचा चेहरा मला अजून पर्यंत तरी प्रत्यक्षात दिसत नसला तरी. वातावरणात बदल घडवा या हेतूने मीच तिला विचारलं. तुझी मज्जा असेलं नां. बिनधास्त कुठेही जा. नां कोणी विचारणार, नां कोणी अडवणार. नाही रे, मी या घरात स्थिरावली आहे. या चार भिंतींच्या बाहेर मला नाही जाता येत. खर सांगायचं झालं तर मलाच नाही जावसं वाटत. खरं सांगायचं झालं तर आता मलाच मनातल्या मनात खूप बर वाटू लागलं होतं. कारण खरंच तिने हे घर आणि माझी मैत्री कधीच सोडून जावू नये असे मलाही वाटत होते. कदाचित हां माझा स्वार्थ असेलं. कारण तसा अबोल असणारा मी, मला एक जवळचा असा मित्र अथवा मैत्रीण हवीच होती.
मात्र तुझ्या बद्दलच्या च्या गैरसमजुती त्याच काय? तिने पुढे सांगायला सुरुवात केली. पाच वर्षा पूर्वी अचानक एक तरुणी माझ्या दिशेने धावत आली आणि मी जिथे पडले होते. तिथे येऊन ती पडली. ते नर भक्षक समोरच होते. मला अचानक ती रात्र आठवली. जे माझ्या सोबत घडले नाही ते तिच्या सोबत घडणार होते. मी तर श्वास सोडला पण ती अजून जिवंत होती. म्हणजे? नाही, मी हे होऊ देणार नाही. ते तिला स्पर्श करतील या आधीच मी, मला काहीतरी झाल. मी एक वेगळेच रूप धारण केले होते. मी ओरडले. पण माझ ते ओरडण इतक भयानक होत कि मला देखील समजले नाही कि हे कसे घडले? ते लांडगे पळून गेले. मी निर्मळ मन मलीन होण्यापासून वाचवू शकले याचा आनंद होता. ती तिथून सुखरूप घरी गेली. पण माझ्या सोबत नक्की काय घडले होते ते माझे मलाच समजले नव्हते. आकाशवाणी झाली. तुला पंच महाभूतांचे वरदान प्राप्त झाले आहे. आताच काही क्षणान पूर्वी तू विष्णूंचा दहावा अवतार म्हणजेच नरसिंह धारण केला होतास. सगळीकडे शांतता झाली. मी मनाशीच बोल्ले जर मी एखादा अवतार धारण करू शकते तर मी माझे मूळ रूप सुद्धा धारण करू शकते. म्हणून इतक्या वर्षान पासून मी स्वतःलाच पाहिलं नव्हत ते सुंदर प्रतिबिंब आज मला पाहता आल. मी त्यात सर्वकाही हरवून गेले. इतक्यात मला आवाज आला ते दुष्ट लोक त्या मुलीच्या शोधात परत आले होते. ती वाचली होती मात्र आता त्यांची नजर माझ्यावर पडली. ते माझ्या जवळ आले. मी पाळण्याचा प्रयत्न करत नाहीय हे पाहून त्यांच्यातला एक जण बोल्ला. “शिकार स्वतःहून आलय, जास्त कष्ट नाही घ्यावे लागणार.” त्या मूर्खाना कुठे माहिती होत. साक्षात त्यांचा मृत्यू त्यांच्या समोर उभा आहे ते. ते दहा जण होते. माझ्यावर हल्ला करणारे पण दहाच होते. त्यांनी माझ्या देहाची विटंबना केली होती. पण मी यांना जिवंतच फाडणार आहे. एकेकाला पकडून पकडून फाडायला सुरुवात केली. जंगली प्राण्यांनी शिकार करावी असे ते दृश्य होते. त्या रात्री मी तिथे ज्या अवस्थेत पडले होते. त्याच अवस्थेत आज ते सर्वजण पडले होते. सकाळी पोलीस आले. एखाद्या जनावराने हा हल्ला केला असावा अस समजून जास्त चौकशी न करताच निघून गेले. तिथे येजा करणाऱ्या लोकांनी एक दंत कथा तयार केली. ज्या मुलीवर अत्याचार झाला होता तिनेच सूड घेतला. कारण या आधी इथूनच माझा देह सुद्धा घेऊन गेले होते. झाल मग काय ही जागा शापित झाली. म्हणजे इथे कोणीच रात्री येऊ नये अमावस्या असेल तर फिरकू पण नये अशा अंधश्रद्धा पसरवण्यात आल्या. यांचा फायदा घेऊन काही तळीराम इथे बसायला यायचे मला ही गोष्ट खटकायची मी सरळ त्यांना पळवून लावायचे. मात्र ते प्यायलेले असायचे म्हणून त्यांच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवायचं कि, मी त्यांना पळवून लावल आहे म्हणून. ज्या व्यक्ती ने इथे घर बांधल तो आणि त्याचा परिवार सभ्य लोक आहेत. म्हणूनच मी त्यांना इथे हे घर बांधू दिले. लोकांनी त्यांना पण भोंदू कथा सांगून पळवण्याचा प्रयत्न केला पण ते सुशिक्षित आहेत. शहाणे आहेत. म्हणून त्यांनी घर बांधल. मात्र जेव्हा मी त्याचं स्वागत करण्यासाठी गेले तेव्हा मात्र ते घाबरले. मला नाही समजल कि, का? माझ्यात अस घाबरण्यासारख काय आहे? मी लोकांचा जीव घेतला पण एका निर्मळ मनाला मलीन होण्यापासून वाचवण्यासाठीच ह्यात मी काय गैर केले. आणि जर केले असेल तर, ते जे वागतात ते योग्य का? ते वाईट कृत्य करतात आणि कायद्याच्या कचाट्यातून सुद्धा सहीसलामत सुटतात. पुन्हा अजून एका निर्मळ मनाला मलीन करण्यासाठी. मी जर त्यांना मृत्यू दंड दिला तर त्यात वाईट ते काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून थकतात आणि बोलतात कि, बाकी सर्व देवाच्या हातात. त्याच प्रमाणे जेव्हा आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटतो तेव्हा पण बोला कि, आता सर्व देवाच्या हातात. ते कार्य आमच्या सारखे समाज सेवक पूर्ण करतील. मृत्यूलाही भय वाटले पाहिजे असे शासन करू. याच दंत कथान मुळे मी मलीन झाली मनाने नाही मानाने.
ते सर्व ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. म्हणजे ही, हे घर बांधायच्या अगोदर पासूनच इथे राहते. वा! छान! म तू हे सर्वांना का नाही सांगितलस? तीच उत्तर हे साहजिकच होत. माझ्या सोबत बोलण्याची हिंमत कोण करणार. नुस्त भूत बोललं तरी लोक घाबरतात. अशा परिस्थितीत इतक मोठ प्रवचन कोण ऐकत बसणार. बरोबर बोलतेस तू. माफ करा. तुम्ही. माझी औपचारिकता पाहून ती हसली. आणि बोल्ली माझ्यामते आपण मित्र आहोत. मग जर एका मित्राने दुसर्या मित्राला एकेरी हाक मारली तर काहीच गैर नाही. मग ही औपचारिकता कशासाठी. आणि मला नाही आवडणार हे अस. तुम्ही वगैरे बोल्लेल. मी विचार न करताच तिला विचारल. मी तुला एक प्रश्न विचारला तर तुला राग नाहीना येणार. तिने मला भयानक अशा चेहऱ्याचे पतीबिंब दाखून ती बोल्ली. तू जर मला प्रश्न विचारलास तर मी तुला खूप रागवेन. नंतर सामान्य होऊन गालातल्या गालात हसली. आणि बोल्ली विचार रे. तुझ्यावर का रागावू? मी खूप हिम्मत करून तिला विचारल. जे तुझ्या सोबत देवाने होऊ नाही दिल. तू त्या मुली सोबत सुद्धा ते होऊ नाही दिलस. मग इतर मुलीन सोबत सुद्धा होऊ नये यासाठी तू काहीच का नाही करत? तिने थोडा विचार केला आणि ती बोल्ली. तू जे बोलतो आहेस ते बरोबर आहे. पण मी या जागी स्थिरावली आहे. मी ही जागा नाही सोडू शकत मग मी त्या सर्व घटना कशा थांबवणार? आणि जेव्हा मी त्या मुलीला वाचवलं. तेव्हा देवांनी मला साथ दिली पण त्या नंतर मी ही अशी एकटीच आहे. तीच हे बोलण मला थोड खटकल. मी न घाबरता बोल्लो. मला नाही वाटत. कारण मी आता पर्यंत जे ऐकल आहे. त्या नुसार तू ते केल आहेस जे एखादा सामान्य माणूस कधीच नाही करू शकत. मग तू इतक्या सहजतेने कस काय बोलू शकतेस कि तू काहीच नाही करू शकत. मला तरी अस वाटतंय कि तुझ्या कडे ते आहे म्हणजे तुझ्या अंतानंतर तुला देवांनी ते दिलंय जे एखाद्या सामान्य माणसाला कधीच प्राप्त होऊशकत नाही. ती माझ्या बोलण्याचा विचार करू लागली. मला एक सांग तू लाईट कशी काय बंद केलीस. तिने विचारल, म्हणजे? अग मगाशी ती सिंहाची डरकाळी ऐकून सरळ सरळ लाईटच बंद केलास नाही. ती भडकली. अरे माकडा मी भूत असले म्हणून काय झाल. मी पण घाबरते. आणि मला नाही समजल त्या क्षणी नक्की काय कराव. म्हणून, ती अचानक विचारत दंग झाली. हां तेच तू तो लाईट कसा बंद केलास. कोणत्याही बटनाला स्पर्श न करताच? अग माकडीणी म्हणजेच तुझ्या कडे काहीतरी आहेच ना. ती ओरडली. ऐ कोणाला माकड बोल्लास तुला पण बंद करेन हां. जास्त बोल्लास तर. मला पण राग आला. ऐ तुझाच शब्द तुलाच परत केला. आणि तू अशील भूत तुझ्यासाठी. माझ्यासमोर नाही नाटक करायची. शांत बस. झाल बाई तापली. मग काय मी गप खोलीतून काढता पाय घेतला. स्पष्ट सांगायचं झालच तर पळत सुटलो. जिन्यातून खाली उतरणार इतक्यात बाईने तिच्या ताकतींचा वापर करायला सुरुवात केली. संपूर्ण जिना गायब. काय करणार माझ पण तोंड सुटल. घातल्या शिव्या. हा पण सर्व शिव्या संस्कारी होत्या. बाईला काय झाल काय माहिती. बाई लागली हसायला. बोल्ली. अरे ऐ तुला साध्या शिव्यापण नाही देता येत. म्हणजे मी पण शिव्या नाही देत पण, खूप लोकांना देताना ऐकल आहे. पण मी माझ्याच तोर्यात, ऐ तू शांत बस ग, भूत कुठची. ती माझ्या कडे आश्चर्याने एकटक बघत बसली. आणि विचारल. म्हणजे? म्हणजे मी तुला शिवी दिली. अरे तू डोक्यावर पडलायस का? आणि मी परत मुख्य मुद्याला हात घातला. त्याच डोक्याचा वापर कर. आणि समाजसेवा सुरुकर. सोशल वर्कर हो आणि सोसल तेव्हढच वर्क कर. आणि आता तिने या विषयाचा गांभीर्याने विचार केला. तू बोलतोयस ते खर आहे. खरच मला एक वेगळीच शक्ती प्राप्त झाली आहे आणि त्याच शक्तींचा वापर करून मी ते सर्व थांबवू शकते. आणि ठरल त्या क्षणापासून आम्ही या दुष्टांना काय शासन करायचे याचा विचार सुरु केला. आणि मला एक कल्पना सुचली. तेच जे त्या रात्री तिने केल होत. फक्त वेगळ्या प्रकारे. आमच ठरल मात्र आता प्रश्न होता. कधी आणि कुठे असे कृत्य घडत असेल. हे कसे समजणार. माझ्या कडे यावर उपाय होता. तिला समजेनाच मला नक्की काय सुचल. आपल्यावर कोणतही संकट आल तरी आपण देवालाच हाक मारतो. आपण त्याच बिगबॉस ची मदत घ्यायची. तिला एकूण अंदाज आला कि काय करायचं आहे ते.
नेमक त्याच दिवशी god फादर आमच्यावर प्रसंन्न झाला. आकाशवाणी झाली तुम्ही जे ठरवले आहे ते खरच योग्य आहे. मात्र तुम्ही जो मार्ग स्वीकारला आहे. तो मार्ग मला योग्य नाही वाटत. तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करा. बघा नक्की तुम्हाला एखादा सुंदर मार्ग मिळेल. मला एकूण अंदाज आलाच होता कि बाप्पाला निक्की काय सांगायचं होत. तिने आरोळीच ठोकली हे बघा आम्ही काहीतरी चांगल करायचं ठरवल आहे तर आम्हाला मदत करायचं सोडून उपदेश कसले करताय. मदत करणार असाल तर करा नाहीतर आम्ही आमच बघून घेऊ. बाई जरा खालच्या मजल्यावर या. मी तिला समजावलं कि देवाचा मास्टर प्लान काय आहे ते.
बाप्पाला इतकच सांगायचं आहे कि, फक्त घरात झाडू मारून केर काढल्याने काहीच फायदा नाही. तो वारंवार काढावाच लागणार. आपण घरातील केर तर काढायचा पण तो परत येऊ नये म्हणून सुद्धा उपाय करणे गरजेचे आहे. म्हणजे असे कि आपण ती कृत्ये करण्यार्यांना तर शासन करायचे मात्र पुन्हा इतर कोणी तसे कृत्य करूच नये म्हणून उपाय करायचे. प्रथम मी तुला सांगतो कि नक्की आपण उपाय काय करणार आहोत.
ज्याप्रमाणे बालवाडी पासून ते चौथी पर्यंत मुल आणि मुली हे एकाच शाळेत, एकाच वर्गात बसून शिकतात त्याच प्रमाणे त्यांना किमान दहावी पर्यंत आणि जर ते उच्च शिक्षण घेऊ इच्छित असतील तर तेव्हाही त्यांना एकाच शिक्षण संस्थेत एकाच वर्गात बसून शिक्षण द्यावे. मात्र हे एका विशिष वर्षा पासून सुरु करावे म्हणजे वर्ष २००० मधे जी नवीन मुल मुली बालवाडीत प्रवेश घेतील त्यांच्या पासून या उपक्रमास सुरुवार करावी. म्हणजे संपूर्ण एका पिढीवर ते चागले संस्कार करणे तर शक्य होईल आणि त्या पिढी पासून नंतर येणाऱ्या सर्व पिढ्यांवर चांगलेच संस्कार करणे जास्त सोप्पे जाणार कारण, जर अचानक जर पाचवी ते दहावी च्या मुला मुलीना एकाच वर्गात बसवून शिकवायला सुरुवात केली तर, जी मोजकीच मुल मुली जी वाईट गोष्टीन पासून दूर असतील ती पण नकळतपणे भरडली जाणार. म्हणजेच विनाकारण सुक्याबरोबर ओले जळणार. आणि बाळकडू हे बालपणीच पाजायचे असते. मोठ झाल्या नंतर नाही. आणि आताची पिढी ही त्या बालपणा पासूनच हायटेक होत आहे. त्या मुळे ही काळाची गरज आहे. या मागचा मूळ उद्देश इतकाच कि, ज्या प्रमाणे मार्शल आर्ट शिकणाऱ्याची सहन शक्ती वाढविण्यासाठी वेळप्रसंगी त्याची वेदना जाणून घेण्याची संवेदन शक्तीच मारून टाकली जाते. अगदी त्याच प्रमाणे पण, आपण कोणतीही गोष्ट मारायची नाही मात्र ती बाळ वयातच जागृत नाही होणार याची काळजी घ्यायची. म्हणजेच त्याचा स्पर्श, नजर, आणि भावना हा त्रिकोण योग्य मार्गावर ठेवून तो मलीन न होता त्यांना एका योग्य वयात येऊ द्यायचं. एकदा ते समजूतदार झाले त्यांना योग्य काय अयोग्य काय याची ओळख झाली कि नंतर त्या गोष्टींचे ज्ञान योग्य मार्गानेच द्यायचे. आणि ते द्यायचेच. कारण आपण त्यांना ते देण आणि त्यांना ते बाहेरून समजणे ह्यात खरच जमीन आसमानाचा फरक असतो आणि म्हणूनच त्यांच्या कडून अशा प्रकारची कृत्य घडतात. हा झाला उपाय. आता त्यांचा प्रश्न जे ही स्टेज ओलांडून समजत वावरत आहेत. त्यांनी असे कृत्य करूनये म्हणून सरळ सरळ ब्रेन व्हॉश करायचा जेणेकरून असे दुष्कृत्य करण्याची इछाच नाही होणार. आणि हे सर्व जर आपण करणार असू तर तो god फादर सुद्धा आपल्याला सहाय्य करेल. आपण फक्त कॉल रिसीव्ह करायचा. त्या निर्मळ मनांचे कॉल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य तो करेल. राहिलाच प्रश्न कसे वाचवायचे तर, त्यासाठी आपल्याला एका संघटनेची गरज भासणार. आता पर्यंत सांगितलेल्या वर तुझा काय विचार आहे. ती फक्त इतकच बोल्ली. फक्त लढ म्हण. आम्ही ठरवले कि किमान काही निर्मलन मनांची गरज भासणार या कार्यासाठी. पहिलाच दिवस. तब्बल ५० कॉल आले. वेगवेगळ्या जागांवरून पण आमची तयारी होती. आमचे कार्य सुरु झाले. फक्त मिनिट लागला. त्या क्रूर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्या क्रूर लोकांना आम्ही आमच्या खास कारागृहात पाठवले. त्या निर्मळ मनाचा बचाव केला. आणि आलेल्या नवीन पिढीवर संस्कार करायला सुरुवात केली. आम्ही एक चांगल्या कामासोबत एक नवीन पिढी घडवायला सुरुवात केली. याचा आम्हाला अभिमान आहे. आणि देवाने देखील आम्हाला यात सहकार्य केले त्याबद्दल देखील त्याचे मनापासून आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users