- दोन ते अडीच वाट्या जाड पोहे
- वाटीभर ताजे मटार दाणे
- पाऊण वाटी फ्लॉवरचे बारीक तुरे
- एक मध्यम बटाटा काचर्या करून
- एक मध्यम मोठा कांदा पातळ उभा चिरून
- पौष्टिकपणा हवाच असेल तर बोगातु बारीक चिरून
- थोडे शेंगदाणे
- चार, पाच तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- २०/२५ कढिलिंबाची पानं
- मीठ
- साखर
- लाल तिखट
- तेल
- मोहोरी
- जिरं
- कोथिंबीर
- लिंबू
- ओलं खोबरं/ सुकं खोबरं किसून
- भुजिया शेव
- पोहे स्वच्छ निवडून, धूवून मग पाण्यात मिनिटभर भिजत घालावेत. नंतर चाळणीत निथळत ठेवावे.
- सगळ्या भाज्या बारीक चिरून तयार ठेवाव्यात
- जरा जास्त तेलाची फोडणी करावी. तेल चांगलं तापलं की मोहोरी घालावी, ती तडतडली की मग जिरं; त्यावर मिरच्या मग शेंगदाणे घालावेत. दाणे जरा खरपूस झाले की मटारदाणे घालावेत.
- त्यावर कांदा घालून परतावं. कांद्याचा जरा रंग बदलला की बटाट्याच्या काचर्या, फ्लॉवरचे तुरे आणि कढीलिंबाची पानं घालावीत (जरा नंतर कढीपत्ता घातल्यानी त्याचा हिरवा रंग टिकतो). हे सगळं नीट परतायचं आहे. यात आता संपूर्ण पोह्यांना पुरेल एवढं मीठ घालून परतावं आणि झाकण घालून एक दणदणीत वाफ आणावी. बटाटा, मटार, फ्लॉवर शिजला की मग हळद, तिखट घालायचं.
- पुन्हा एकदा २ ते ३ मिनिटं परतायचं म्हणजे तिखटाचा, हळदीचा कचवटपणा जाईल.
- यात आता भिजवलेले पोहे घालायचे, चवीला थोडी साखर घालायची मोठं अर्ध लिंबू पिळायचं. सगळं व्यवस्थित हलवून झाकण घालून पुन्हा एक दणदणीत वाफ येऊ द्यायची.
- भरपूर भाज्या घातलेले एकदम चविष्ट पोहे तयार आहेत.
- मस्तपैकी आपल्याकरता प्लेट भरून घ्यायची. त्यावर भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालायची, ओलं खोबरं किसून घालायचं, बाजूला थोडी भुजिया शेव घ्यायची; लिंबाची एक फोड ठेवायची. आवडतं पुस्तक, नाटक, टिव्ही, गाणी काय हवं ते लावायचं, सोबत घ्यायचं; अंगावर शाल घ्यायची आणि मग हे पोहे गरमागरम चापायचे. अगदी पोटभर.
- सगळे जिन्नस आपआपल्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त करता येतील. एखाद दुसरी वस्तू बदलली/ वगळली तरी चालेल. आपल्याकरताच तर करायचेत!
- हळद घालतांना जरा जपून
- लिंबू, कोथिंबीर, ओलं खोबरं यात कंजूषी नको
- तेलही जरा जास्त लागेलच कारण सगळ्या भाज्या तेलावरच शिजवायच्या आहेत. तसंही तेल फार कमी झालं तर पोहे कोरडे वाटतील. तेल, या वापरलेल्या भाज्या, कोथिंबीर वगैरे जिनसांमुळे मस्त मॉईस्ट, वाफभरले पोहे होतात.
अरूण ते स्वीकार वेगळं. ही
अरूण ते स्वीकार वेगळं. ही टपरी मयूर कॉलनीच्या तोंडाशी आहे
तिथे डोसे फार भारी मिळतात.
पोहे कमलेश्वरी ला चांगले मिळतात. आणि सुवर्णरेखा जवळ परशुराम आहे तिथेही
Pages