Submitted by Vaishali Agre on 27 December, 2016 - 06:48
आयुष्य हे सतत बदलत असते .
घडाळ्याच्या काट्याला सरकत असते .
मिनिटाला असतात जवळ , तर सेकंदात असतात दूर .
आयुष्य हे सतत बदलत असते .
पावसाच्या सरीत मन कोरे असते ,
आणि आठवणींच्या उन्हात भिजत असते .
आयुष्य हे सतत बदलत असते .
भविष्यच्या पुस्तकात , भूतकाळाचे पान असते .
चुकांमध्ये बरोबर वजा केले जाते .
आयुष्य हे सतत बदलत असते .
शब्दांना हि कोडं पडावं अशी हि माणसे भेटतात .
काही माणसे अशी भेटतात सोबत राहूनही एकाकी करतात .
आणि काही माणसे क्षणाचे सोबती असतात ,
नंतर दूर जाऊनही हृदयांत घर करतात .
आयुष्य हे सतत बदलत असते .
मन कधी कागदासारखे हलके होते ,
तर कधी मनावर अनुभवाचे दगड ठेवावे लागते .
आयुष्य हे सतत बदलत असते .
बदलत असतात रंग ....
कधी असते डोकयावर निळ्या रंगांचे छप्पर ,
तर डोळ्यात असते बेरंग पाणी ....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
छान! ! !
छान! ! !