आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण कधी एकदाचे मोठे होतो असे सतत वाटत असते.लहानपणाची मजा जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला मोठेपणाच्या एलाईट क्लबात सामिल व्हायचे असते.मी लहान असताना स्वतःला दाढीमिश्या काढून आपण मोठे झालो आहोत अशी स्वतःची समजुत करुन घ्यायचो.वडील म्हणायचे तुलाही येतील दाढी मिश्या,जरा कळ काढ .यथावकाशात मला भरघोस दाढीमिश्या आल्या.मी नवतरुण होतो.दाढी कोरणे ,मिश्या वाढवने असले प्रकार कॉलेजमध्ये करायचो.त्यावेळेस आमच्याकडे यझदी गाडी होती ,ती गावातून सुसाट पळवणे हा माझा छंद होता.
काही दिवसांपुर्वी मी आरश्यात बघत असताना लक्षात आले की आपले केस पांढरे व्हायला लागले आहेत.पुर्वीची दाढीची काळीभोर खुंट आता बरीच पांढरी पडायला लागली आहेत.तरी मी दाढी वाढवली.यथावकाश आजुबाजुचे माझे तरुण मित्र मला " ओ काका " अशी हाक मारुन चिडवायला लागले.ज्या षोडशा मला दादा म्हणायच्या त्या काका म्हंणायला लागल्या तेव्हा माझी झिंग उतरली.विचार करु लागलो ,आता आपण नवतरुण राहीलेलो नाही.आपण ३० नुकतेच पार केले आहे.त्यादिवशी नेहमीप्रमाणे मैदानावर चालायला गेलो.एक रनिंग करणारा मित्र भेटला ,त्याच्या बरोबर थोडे रनिंग करुन बघुयात म्हणून पळायला सुरवात केली.अवघ्या काही सेकंदात धाप लागायला लागली.हातानेच त्याला पुढे जायला सांगितले व तिथेच थांबलो.घरी येताना बाईक चालवत येत होतो,आजुबाजुने नवतरुणांच्या बाइक्स सुसाट जात होत्या ,मी बराच संथ चाल्वत होतो,दहा वर्षापुर्वीचा यझदीवरचा वेग मला आता भीती दाखवत होता.मला आठवायला लागले ते कॉलेजमधले दिवस ,१८,१९ वर्षांचा असताना अंगात असलेली रग,बेदरकारपणा कुठल्याकुठे उडून गेला होता.राहीले होते फक्त ७० किलोचे संथावलेले शरीर.वयाने त्याचे परिणाम दाखवायला सुरवात केली आहे.
अजुन मिडलाईफ यायला खुप वेळ आहे.पण त्याची आतापासुनच भीती वाटायला लागली आहे.साठीतले रोग आजकाल चाळीशीत आले आहेत.न जाणो आपल्यालाही चाळीशीतच डायबेटिस ,हार्ट् ब्लॉकेज असे काही जडले तर?
मग या वाढत्या वयाविषयी इतरांना काय वाटते ते विचारुन बघितले.सगळ्यांनी माझाच विचार परत माझ्यापाशी बोलुन दाखवला.मित्र ही तेच बोलत होते.साला आजकाल पुर्वीसारखा जल्लोष वाटत नाही कशात.
या वाढत्या वयाचा शाररीक ,आर्थिक , लैंगिक ,भावनिक सर्व् पातळ्यांवर परिणाम होतो.हळवेपणा वाढतो,होपलेसनेसही वाढत जातो.एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत ,जेव्हढि कॉलेजमध्ये यायची.शेतीच्या कामात मी नियमीत लक्ष घालत असल्याने तिथे अजुन वयाचा परिणाम तितपत जाणवत नाही.असो ,मी माझेच पुराण सांगत बसत नाही.तुम्हाला ,स्त्री पुरुष दोघांना माझे काही प्रश्न.
१. तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत असलेल्या वयाचा त्रास होतो का?
२.वाढत्या वयाचे काय शाररीक ,मानसिक,आर्थिक परिणाम होत आहेत.? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह.
३. वयाबरोबर सौंदर्य लोप पावत असे म्हणतात ,अदर सेक्सला तुम्ही कमी अपील होत जात आहात का? यावर उपाय काय ?
४.आपल्याला सुयोग्य आहाराने वय लपवता येते,आपण तरुण दिसतो हे कितपत खरे आहे?
५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.
धन्यवाद.
तुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या वयाचा गिल्ट येतो का???
Submitted by सिंथेटिक जिनियस on 14 December, 2016 - 10:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार
ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.
धन्यवाद.
>>>>>
अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान या दोन सुपर्रस्टारना फॉलो करा किंवा आपल्या मातीतील उदाहरण हवे असेल तर मायबोलीवूडचा सुपर्रस्टार स्वप्निल जोशीकडे बघा. हल्ली तो मराठी कोण होणार करोडपतीमध्ये दिसतो. यापलीकडे जायची गरज नाही. ग्रेसफुल एजिंगचा सिलॅबस ईथे कवर होतो
>>५.ग्रेसफुल एजिंग हा काय
>>५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.<<
निसर्गाचं चक्र उलटं फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न न करता, वय वाढल्यावर जगाला आपण कसं दिसु याचा विचार न करता, शरीर/मन या दोन्हिंना आवश्यक आणि पोषक अशी जीवनशैली आत्मसात करुन जगणं याला मी तरी बाबा ग्रेसफुल एजींग म्हणतो. यात तुमचा समाजातला वावर (रियल आणि वर्चुअल दोन्हि) आणि त्यातुन एक्स्पोज होणारी मचुरीटि हि धरली जावी.
ऊदा. द्यायचं झालं तर वहिदा रेहमान, शर्मिला टागोर आणि लताबाई.
ऋ, सगळी उदाहरणं पुरूषांचीच का
ऋ, सगळी उदाहरणं पुरूषांचीच का रे? राजनी बघ कशी दुसर्या बाजूची उदाहरणे दिलीत. हा भारतीयांतल्या सेक्सिझमचा परिणाम असेल का? ह्यावर धागा काढायला हरकत नाही.
भास्कराचार्य, राजनेही सर्व
भास्कराचार्य, राजनेही सर्व उदाहरणे स्त्री जातीचीच दिली तर व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फन असे मी का म्हणू नये?
मला वाटते ज्याला जी उदाहरणे पटकन सुचली त्याने ती दिली.
मलाही सईचे उदाहरण द्यायला आवडले असते पण मूळात तिचे वय तर व्हायला पाहिजे.
गंमत बघा
पण आतापर्यण्त आलेली उदाहरणे चित्रपटसृष्टीतीलच आहेत...
असे का?
30 ch zaley na 50 tar
30 ch zaley na 50 tar nahi.... carry ur age gracefully..... radupana karaicha band Kara.....30 nantarach life chalu hote...
Mhanje 18 te 28 madhe vel asto , stamina asto pan paisa nasto. To kamvnyat apan busy asto....30 madhe financially settle zalele asto.. looks , clothes , traveling var kharch karu shakat asto..... 30 ulatli, pori kaka boltat mhanun ajobansarkhe dhotarahi vaprayla suru karnar ata???? Come on... ugich gale kasle kadhtay mhatare zaloy mhanat
पुरुषांना तरुण फक्त
पुरुषांना तरुण फक्त स्त्रियांना आकर्षित करायलाच दिसायचे असते..... का ?
ग्रेसफुल एजिंगचे नॉनफिल्मी
ग्रेसफुल एजिंगचे नॉनफिल्मी उदाहरण म्हणून आसूमल चालेल का?
Runmesh tu he vakya nemka
Runmesh tu he vakya nemka konas uddeshun boltoys...hmm hmmm
Aasumal no way....tasa tar
Aasumal no way....tasa tar synthetic yanchya line madhe KRK la ubha karava ka??
Aasumal no way....tasa tar
Aasumal no way....tasa tar synthetic yanchya line madhe KRK la ubha karava ka??
ग्रेसफुल एजिंग व्हावं तर
ग्रेसफुल एजिंग व्हावं तर नरेंद्र मोदी यांच्या सारखं
काय जोश, काय तडफ
त्याच्या निम्म्या वयाच्या राहुल गांधी, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या कडे बघून वाटते की या लोकांना आत्ताच म्हातारपण आलंय. कसले केविलवाणे दिसतात.
मोदी आजही 20-22 तास काम करतात दिवसाला, याच्या शतांशने देखील या वयात बाकीचे करू शकणार नाहीत
ग्रेसफुल एजिंग व्हावं तर
ग्रेसफुल एजिंग व्हावं तर नरेंद्र मोदी यांच्या सारखं
काय जोश, काय तडफ
>><<
+786
आणि आपले पवारसाहेब. मी तरी जेव्हा केव्हापासून त्यांना बघतोय एकाच वयाचे, एकाच एनर्जीचे, एकाच ध्यासाने पछाडलेले एकच एक दिसत आलेत. वय थांबलेय त्यांच्यासाठी !
गिल्ट का यावा बरे? अर्थात
गिल्ट का यावा बरे?
अर्थात काळजी वाटते कधीकधी आणि मग त्या काळजी वाटण्यातुन काळजी घेतली पण जाते कधीकधी जसे की मधूनच डाएटचे खूळ घुसते डोक्यात किंवा मग ऐन थंडीचे पहाटे वॉकला जावे वाटते पण मग जरा वजन आवाक्यात आले की ये रे माझ्या मागल्या
बाकी तो स्वप्नील खरच ग्रेसफुल दिसतो त्या करोडपतीमध्ये.... True Gentleman
बाकी मोदींच्या ग्रेसफुल असण्याबद्दल पण sahamat
बाकी तो स्वप्नील खरच ग्रेसफुल
बाकी तो स्वप्नील खरच ग्रेसफुल दिसतो त्या करोडपतीमध्ये.... True Gentleman + ७८६
अगदीच राहवत नाही म्हणून
अगदीच राहवत नाही म्हणून लिहितोय,
ग्रेसफुल ऍजिंग म्हणजे काय बघायचे असेल तर कर्वे नगर च्या चितलेच्या दुकानात जाऊन बसावे,
विविध वयोगटातील बायका तिकडे येतात,
त्यातल्या काही आज्या अगदी लक्षात राहतात,
कॉटन ची मस्त इस्त्री असलेली साडी, मॅचिंग ब्लाऊस, गळ्यात नाजूशी चेन, किंवा छोटेसे पेंडेन्ट, केसांचा (पूर्ण पांढरे आणि विरळ असले तरी)बॉब कट किंवा एक पिन लावून मागे बांधलेले
आणि वागण्यात एक प्रकारची अदब,
एक्दम कोथरुडच्या गायत्री देवी
आणि BTW शाहरुख /सलमान हे
आणि BTW शाहरुख /सलमान हे ग्रेसफुल ऍजिंग चे उदाहरण बिलकुल नाही,
रादर ऍजिंग कसे नसावे याचे उदाहरण आहे,
अमिताभ त्याच वाटेने चाललेला लाल बादशाह वगैरे मध्ये, तो वेळीच सावरला.
चांगला विषय बरेच
चांगला विषय
बरेच लिहिण्यासारखे "अनुभवाचे" बोल आहेत.
अन लेटेस्ट फोटो टाकलाय तो बघा
पण तत्पूर्वी मला फेसबुकवर शोधा.....
ग्रेसफुल एजिंगचे नॉनफिल्मी
ग्रेसफुल एजिंगचे नॉनफिल्मी उदाहरण म्हणून आसूमल चालेल का?>>>>>>> मी आधी आमसुल वाचले.:अओ:
सिम्बा, मी फक्त शाहरूख
सिम्बा, मी फक्त शाहरूख लिहिले. सलमान कश्याला मध्ये आणत आहात. त्याचे नाव कोणी घेतले ईथे.
@ आसूमल का नाही चालणार? कॅरेक्टरने ढिला आहे पण ते वेगळे झाले ना..
@ शाहरूख तुम्ही फक्त त्याचे चित्रपट बघत आहात. त्याची रील लाईफ. पण त्याची रिअल लाईफही बघा. त्याचे ईंटरव्यू फॉलो करा. वयानुसार आलेली आणि अपेक्षित असलेली मॅच्युरटीला धक्का न लावता तो कसा सळसळत्या उत्साहाचे प्रतीक आहे हे बघा
तुम्हाला तुमच्या वाढलेल्या /
तुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या वयाचा गिल्ट येतो का??? >>>> नाही !
प्रश्न असा हवा होता -- तुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या पोटाचा गिल्ट येतो का???
एखाद्या फटाका मुलीने दिलेले
एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत
>>
वेळीच उपाय करा.
वय वाढणं आपल्या हातात नसतं
वय वाढणं आपल्या हातात नसतं त्याचा गिल्ट कसा येइल.
बाकी आज माबोवर टाइमपास आहे एकंदर.
हल्ली लोक + ७८६ का लिहीतात?
हल्ली लोक + ७८६ का लिहीतात?
वाढ्त्या वयाने कदाचित
वाढ्त्या वयाने कदाचित निरुत्साही वाटणं किंवा क्वचित्/नेहमी तब्येतीची काळजी वाटणं समजु शकतं, पण गिल्टी का वाटावं? काहीही हां.
बायका वय लपवतात म्हणे, मला तशी गरज वाटत नाही. माझं वय ऐकल्यावर किंवा बरोबरचा मुलगा माझाच आहे ऐकल्यावर लोकांचे डोळे विस्फारतात आणि 'वॉव' लुक्स येतात ते मला जाम थ्रिलिंग वाटतात. मी लगेच वय राउंड ऑफ करुन एखादं वर्ष अॅडच करते. गिल्टी कशाला मला चांगलं प्राउड वाटतं.
उलट मी नेहमी म्हणते कि बायकांनी लवकर लवकर प्रऊढ ( हा शब्द बरोबर लिहिताच येत नाहीए) दिसावं. कुठेही हिंडाफिरायला किती मोठी मोकळीक असते. तुम्ही कशा दिसता, फिगर कशी आहे, काय घातलं आहे याचा अॅनॅलिसिस कमी होतो. तुम्ही एकट्याच फिरलात तरी नजरा पाठलाग करत नाहीत, कमीत कमी टोचत तरी नाहीत. काकु संबोधनाने जरा जास्तच सेफ आणि कॉन्फिडंट वाटायला लागतं ( मला तरी वाटेल.) ज्यांच्याबद्दल कॉन्शस व्हावं अशा पुरुषांच्या वयाची रेंज कमी होते
( अर्थात तरुण मुलांना पटापटा प्रेमात पडायला काकवा वयाच्या बायका पण चालतात ही गोष्ट वेगळी, पण तरी त्यातल्या त्यात.) थोडीशी फिगर ४-६ पोउण्डाने इथे-तिथे झाली तरी लगेच मेनो, डिलिवरी इ कारणं देवुन समोरच्याची बोलती बंद करणं शक्य असतं.
किती आणि काय काय अॅड्वान्टेजेस आहेत वाढत्या वयाचे........ गिल्टी का वाटावं? मी तर वाट बघते आहे लवकर लवकर अशा वयाच्या स्टेजला पोचण्याची. सिम्बाने लिहिलं तसं 'ग्रेसफुल गायत्रीदेवी' होण्याची घाईच आहे मला. म्हणजे मी (मनाने) मुक्त आणि (कदाचित) जास्त सुरक्षित जगु शकेन.
लोक कुठे? तो ऋन्मेष एकटाच
लोक कुठे? तो ऋन्मेष एकटाच लिहितो....
धाग्याचे शीर्षक गंडलेले आहे
धाग्याचे शीर्षक गंडलेले आहे का? वय वाढणारच की? त्यात कसली अपराधी भावना? 'लाज वाटते का' किंवा 'दु:ख होते का' असे म्हणायचे आहे का?
बेफी शिर्षकाचं काय घेऊन
बेफी शिर्षकाचं काय घेऊन बसलात, त्यांनी ऋन्म्याला गुरू केलाय मग धागे तर विणणारचं की , शिर्षक काही असो.
>>> हल्ली लोक + ७८६ का
>>> हल्ली लोक + ७८६ का लिहीतात? <<<<
म्हणून सातसोछह्यासी लिहितात... 
७+८+६ = २१ हा गणपतीचा आवडता आकडा
वय वाढल्याचा गिल्ट कशाबद्दल?
वय वाढल्याचा गिल्ट कशाबद्दल? थोडी चिंता वाटते हे नक्की. आयुष्यात काहीही टिकून रहात नाही हे खरं, सतत गोष्टी बदलत असतात. आजकाल कुटुंब व्यवस्था बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात बरेच लोक हाताशी असत. आता कुटुंबात फक्त दोन तीन किंवा फारतर चार लोक असतात. एखादा आजारी पडला तर दुसर्याला सोबत राहावं लागतं. त्यातून मनाचं स्थैर्य सांभाळायच. मुलं लहान असतील तर त्यांच, स्वत:चा व्यवसाय/नोकरी... इ.
वाढतं वय काय घेऊन येईल सांगता येत नाही. मूड चेन्जेस, आर्थिक अस्थिरता, भविष्याची चिंता, मुलाच्या भविष्याची चिंता आणि अनेक गोष्टी.
आजार, वाढते वैद्यकीय खर्च. शेवटी पैसा.... तोच बहुधा आजकाल आराम देतो, मानसिक सुख देतो.
खूप पैसे असले की कुटुंबीय पुढे मागे करतात, मुले विचारतात, वैद्यकीय खर्चाची तरतूद असल्याने त्याची चिंता वाटत नाही. श्रीमंत असा वय वाढलेला पुरूष कमी वयाच्या ललनेशी लग्न करू शकतो. हेच सर्व स्त्रियांना ही लागू पडतेच.
त्यामुळे वय वाढलं तरी चिंता नको, पैसे वाढवा. मग वाढलेल्या वयाची चिंता वाटणार नाही, किंवा गिल्ट पण येणार नाही.
मनीमाऊ ची पोस्ट आवडली.
मनीमाऊ ची पोस्ट आवडली.
Pages