Submitted by संजयb on 12 December, 2016 - 04:26
शब्द शब्द सांभाळा
पण लिहीते व्हा
कधी दूधावरली साय सांगा
कधी दर्याच्या लाटा बोला
कधी पत्नी प्रियसी वर्णा
कधी फूलांचा रंग सुगंध वाटा
कधी तरी वेचा शंख शिपंले किनारी
कधी कवडसे सोनेरी
कधी ऊसासे
हास्य स्मिते फूलवा कधी
कधी हेरा आश्रूंची टपटप
कधी विरश्रीचे दर्शन घडवा
कधी करूणेची पाखर
कधी वर्णा तांडव भयंकर
अन्यायाची कधी फेडा पैरण
कधी कैतूकाची थाप पाठीवर
कधी हात धरूनी दाखवा वळण
स्वत:ची ठसठस कधी तरी....
कधी दुसऱ्याची ओळख
कधी आईची माया सांगा
कधी जयपराजय आपले वर्णा
शब्द शब्द जपून माळा
पण लिहीते व्हा!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा