बेफिक्रे

Submitted by श्री on 9 December, 2016 - 09:54

आता काय परिक्षण लिहू , आयुष्यातला पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहीलेला पिक्चर . काय नाही ह्या सिनेमात ..... किस आहे आणि किस आहे आणि प्यारीस आहे आणि किस आहे . स्टोरी तीच जुनी आहे , किस व्यतिरिक्त फारसं नावीन्य नाही , रणवीर आणि वाणी सुसह्य आहेत . रणवीर , वाणीचा डान्स आवडला .
किती किस आहे कोणी मोजुन सांगेल का ? Lol
ज्या कोणी मायबोलीकरणी रणवीरच्या प्रेमात पडल्या असतील त्यांच्यासाठी एक- दोन खास सीन आहेत Wink Lol
एकदा बघण्यासारखा आहे , पैसे अगदीच वाया जाणार नाहीत .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो बॉलीवुडचा ॠ आहे का?
>>>
बिपिनचंद्र उलट मला स्वत:ला त्याचा पांचटपणा जराही आवडत नाही. एक तर तो अति करतो. आणि त्यात शाहरूखसारखा क्लासही नाही.
त्यादिवशी मी त्याचा लेडीज गर्ल रिकी मार्टीन की काहीश्या नावाचा पिक्चर पाहिला. त्यात त्याच्या तोंडी एक डायलॉग होता. "मै अपने आप को बडा शाहरूख खान समझता था. पर मै जीत के भी हार गया."

शाहरूखने जे काही केलेय त्याच्यातच मी पुढे जाऊन काहीतरी करेन आणि सुपर्रस्टार होईल हे डोक्यातून त्याने काढावे आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करावे. जे त्याला जमतेही. आजच्या पिढीत जे अभिनयशून्य कलाकार निपजताहेत अश्यांत तो बराच उजवा आहे.

बाकी @, लैंगिक असमाधान,
तर हे असे पिक्चरही त्याला कारणीभूत ठरतात. हे लोकं बेफिक्रेच्या नावावर काहीही पांचटपणा पडद्यावर करणार. आणि आमच्या गर्लफ्रेंडस आमच्याकडून सो कॉलड बेफिक्रे एक्स्पेक्ट करणार.
हे म्हणजे विवाहीत जोडप्यांनी पॉर्न बघत अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करायला जाण्यासारखे आहे. अश्या चित्रपटांवरही बंदी आणायला हवी.

काय आहे हे? हल्ली शिलाजीत गोळ्यांची कसलीसी जाहीरात लागते. त्यातला प्रकार आहे का? पण मला हे रात्री घेऊन काय फायदा? त्यापेक्षा आपले आहे तेच ईसाबगोल बरे.

वाणी कपूर जेव्हा ही चित्रपटात केस उडवत चालते तेव्हा मला "गुप्त" चित्रपटातील बॉबी देओलची गाण्यातली "एंट्री"ची आठवण येते. तो ही असाच केस उडवत चालत होता. Wink

Pages