माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा.
झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच माफी मागितली ,पण त्या गुंडाने मला डोक्यात जबर फाईट मारली,काही दिवस मला त्यामुळे जिभ जड झाल्याचा अनुभव आला होता .माझं बोलणं sluggish झालं होतं.
तर असा हा भित्रा स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय हळवा देखील आहे.कुणी जरा टोचून बोललं की माझ्या मनाला लागतं,बराच काळ मी त्या विचारात राहतो,रडायलाही येते.टिका सहन होत नाही.
आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे.
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे?
२. अतिहळवेपणावर कशी मात करावी?
३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे!
कृपया मार्गदर्शन करावे.
एका गुंड स्वभावाच्या
एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता. मी लागलीच माफी मागितली.
>>>>>>
योग्यच तर केलेत.
याला प्रॉब्लेम बोलून जर आपण सुधारवायला गेलो, थोडक्यात आपणही गुंडागर्दी करायला लागलो, तर जगच गुंडमवाल्यांनी भरून जाईल.
आंख के बदले आंख, सारी दुनिया अंधी हो जाएगी !
- महात्मा मोहनदास करमचंद गांधी
मला तर एखाद्या मुलीने डोळा मारला तरी मी पलटून डोळा मारत नाही. मित्र हसतात. पण त्यांना हसू देतो. मी माझी सभ्यता सोडत नाही
ऋन्मेष ,धन्यवाद.
ऋन्मेष ,धन्यवाद.
खरी समस्या असेल तर ठीकच.
खरी समस्या असेल तर ठीकच. सध्या असे जेव्हढे धागे निघताहेत त्या सर्वांसाठी एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे अध्यात्म. असा सल्ला कितपत सिरीयसली घेतला जाईल याबद्दल शंका आहे. पण त्याचे फायदे होतात हे मात्र खरे आहे. मनोनिग्रह वाढवणे, संयम, नकारात्मकता घालवणे असे अनेक लाभ होतात. पटत असेल तर चांगला गुरू शोधा.
पण उगीचच टाईमपास असेल तर खरोखर कुणाला असा त्रास असेल तर त्याला सल्ले मिळणार नाहीत.
सपनाजी,मी माझ्या व्यक्तिगत
सपनाजी,मी माझ्या व्यक्तिगत समस्या मायबोलीवर मांडत आहे.या बाबतीत मी पुर्ण गंभीर आहे .टाईमपास नाही करत आहे मी.खात्री बाळगा.
भित्रे लोक पार्किंग मधे
भित्रे लोक पार्किंग मधे गुंडाशी पंगा घेत नाहीत.
अटेन्शन सीकिंगच्या आजारातून बरे होण्यासाठी गुड लक!
एकूणात हा आणि तुमचे इतरही एक दोन धागे मुळीच जेन्युइन वाटत नाहीत. त्या कुऋ कडून शिका जरा टिपी धागे कसे विणायचे ते
मैत्रयी, धन्यवाद खरे तर
मैत्रयी, धन्यवाद
खरे तर मायबोलीवर ईतके विविध कलागुण भरलेले सभासद आहेत की प्रत्येकाकडून बरेच काही किंवा काही ना काही शिकण्यासारखे आहे.
फक्त कोणाकडून काय शिकावे हे समजले पाहिजे
अवांतर - हा देखील एक मस्त धाग्याचा विषय होऊ शकतो - मायबोलीवर कोणाकडून काय शिकावे
लोणचं घाला.
लोणचं घाला.
मनोनिग्रह वाढवणे, संयम,
मनोनिग्रह वाढवणे, संयम, नकारात्मकता घालवणे असे अनेक लाभ होतात. पटत असेल तर चांगला गुरू शोधा.
गुरू मिळाला नाही पण वाचन करून संयम मनोनिग्रह वाढवणे व नकारत्मका घालवणे हे फायदे झाले आहेत.
अतिहळवेपणा - मी या अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे, मला मनापासून कुणाहि बद्दल जराहि दया येणे, वाईट वाटणे असे होत नाही.
या उलट माझा एक मित्र अतिभयंकर हळवा आहे - कधी कधी तो स्वतःचे हसे करून घेतो. एकदा तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. तरी जबरदस्ती दुसर्याला मदत करायला जाणे थांबत नाही. मी त्याचा जवळचा मित्र आहे पण हे असे जबरदस्ती मदत करणे मला बरेचदा जड व महागाईचे व असोयिस्कर होते. पण मी कितीहि निर्दय असलो तरी त्याचा चांगला गुण पहाता त्याला काही उलटून बोलणे जमत नाही.
सिंजी, एक अनाहूत सल्ला देतो. मला असा अनुभव आला आहे की दुसर्या कुणाला विचारत बसण्यापेक्षा स्वतःच स्व्तःला सुधारावे - कारण या जगात कुणि कुणाचा नाही हो - जसे जमेल तसे ज्याने त्याने स्वतःला सुधारावे.
जड व महागाईचे व असोयिस्कर >>
जड व महागाईचे व असोयिस्कर >> कठीण आणि गैरसोयीचे म्हणा की. महागाई आणि असोयिस्कर काय!
तुमचा मानसोपचार तज्ज्ञ बदला..
तुमचा मानसोपचार तज्ज्ञ बदला..
जहांगीर खान
जहांगीर खान
माझ्या अतिशय भित्रट आणि
माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे?????
<<
एक काम करा. पुढले सहा महिने मायबोली, मिसळपाव व ऐसीअक्षरे या सगळया साईट वर तुमच्या जितक्या आयडी/डुआयडी असतील त्यांनी येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक गोष्टीत गुंतायचा
प्रत्येक गोष्टीत गुंतायचा प्रयोग करा. आणि आपल्या ताकदी निशी त्यातील संघर्षाचा सामना करा. म्हणजे आपली योग्य ( वैचारिक,वास्तविक पण भावनिक नाही )) प्रतिक्रिया न घाबरता द्या आणि परिणामांची पर्वा करु नका. कदाचित आपल्याला दुसर्याच्या प्रभावाखाली कामे करणे सोपे वाटत असावे. ही वृत्ती नाहीशी
होण्यास मदत होईल. आपण बहुतेक आपल्या एखाद्या वडिलधार्या माणसाचे अनुकरण करीत असण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतःकडे घ्या. म्हणजे भिति कमी होण्यास मदत होईल. सुटकेसाठी दुसर्याचा उपयोग कमी करा. ज्याला आपण भित्रटप्णा म्हणता ती प्रसंगापासू न पळून जाण्याची वृत्ती म्हणावं लागेल. हा वागणुकीतला प्रॉब्लेम वाटतो. तो वागणूक सुधारल्यावरच जाईल. इतर कोणत्याही उपायाने जाणार नाही. मी म्हणतो ते कदाचीत पटायला कठीण जाईल. पण कृती केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी. नाहीतर परिस्थिति तुम्हाला जशी बदलली आहे तशी स्वीकारावी लागेल
घरात वीर पुरुषांचे फोटो
घरात वीर पुरुषांचे फोटो लावा.
कोणता हे तुम्ही तुमच्या आवडी आणि आदर्शावरून ठरवा.
कोणाला शिवाजी महाराजांचा फोटो बघून स्फुरण चढत असेल तर कोणाला उघड्या बॉडीचा सलमान खान आदर्श वाटत असेल. शेवटी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळणे महत्वाचे
अर्चना सरकार यांच्याशी सहमत.
अर्चना सरकार यांच्याशी सहमत.
कर्नल जूलियस नागेंद्रनाथ
कर्नल जूलियस नागेंद्रनाथ विल्फ़्रेड सिंह यांची भेट घ्या एकदा!
उघड्या बॉडीचा सलमान खान आदर्श
उघड्या बॉडीचा सलमान खान आदर्श वाटत असेल. शेवटी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळणे महत्वाचे
उघडे वागडे फोटो पाहून काय करायची इन्स्पिरेशन मिळते म्हणे?
उघडे वागडे फोटो पाहून काय
उघडे वागडे फोटो पाहून काय करायची इन्स्पिरेशन मिळते म्हणे? >>> नैसर्गिक अवस्थेत फिरण्यचे..
नैसर्गिक अवस्थेत
नैसर्गिक अवस्थेत फिरण्यचे..

>>>>
यालाही डेअरींग लागते हं, भित्र्या लोकांचे काम नाही
तसेच एकदा हे जमवले की तुम्हाला ईतर कोणाला घाबरायची गरज नाही, क्यों की नंगे से खुदा भी डरता है
मांसाहार करा. मांसाहाराने
मांसाहार करा. मांसाहाराने स्वभाव भित्रट आणी अतिहळवा राहणार नाही.