Submitted by मेधा on 29 November, 2016 - 09:29
मागच्या दोनेक वर्षात अॅमॅझॉन वरचे डील्स आणि सोशल मिडियावरचे पीअर प्रेशर यांच्या कृपेने बर्याच घरात इन्स्टंट पॉट नावाचे आखूड शिंगी, बहुदुधी , जड आणि बर्यापैकी जागा व्यापणारे उपकरण आले आहे.
हौशी, होतकरु , सुगरण आणि बिगरी यत्तेतले अशा सर्वांचे या उपकरणावर फार प्रेम दिसते आहे.
इंस्टंट पॉट मधे तुम्ही केलेल्या ( जमलेल्या किंवा न जमलेल्या ) पाककृतींबद्दल लिहायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ह्या उपकरणाबद्दल आणि
मला ह्या उपकरणाबद्दल आणि त्याच्या महतीबद्दल जस्ट कळलंय. जस्ट म्हणजे ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी. तेव्हा सगळ्यांच्या रेसिप्या बघून खरंज गरज आहे का हा विचार करता येईल.
मेधा, साईझ किती आहे?
माझ्याकडे अरोमा चा १० -११
माझ्याकडे अरोमा चा १० -११ कपचा राइस कूकर आहे. इंस्टंट पॉट साधारण त्याच साइझ आणि शेपचा आहे.
आता पर्यंत त्याच्यात अल्पनाच्या रेसिपीने अमृतसरी छोले, राजमा आणि ब्लॅक बीन सूप हे प्रकार करुन पाहिलेत . तिन्ही मस्त जमले.
हम्म... Instant Pot is the
हम्म...
Instant Pot is the 3rd generation Programmable Pressure Cooker. It speeds up cooking by 2~10 times using up to 70% less energy and produce nutritious ..
त्यातच फोडणी करता येते ना
त्यातच फोडणी करता येते ना मेधा? माझ्याकडे https://www.amazon.com/gp/aw/d/B0074CDG6C/ref=mp_s_a_1_1?ie=UTF8&qid=148...
तसाच दिसणारा हा राईस कुकर आहे. त्यात मसालेभात, खिचडी केलेली आहे. दोन्ही छान होतं पण बाकी काही ट्राय केलेलं नाही.
मीही मागवलाय. पण मला आतून अस
मीही मागवलाय. पण मला आतून अस वाटतय की तो मला खास उप्योगी पडणार नाही. Intuition.
बघू, आल्यावर चिकन करुन बघ्णार आहे. ते नीट झाले तर चान्स आहे ठेवायचा.
विद्या.
Btw, there is a facebook
Btw, there is a facebook group for 'Indian cooking using Instant Pot'. See if that helps. They have lots of recipes and ideas too.
>>आल्यावर चिकन करुन बघ्णार
>>आल्यावर चिकन करुन बघ्णार आहे. ते नीट झाले तर चान्स आहे ठेवायचा>> चिकन करून आवडलं नाही तर परत करणार?
अग हो, मला काय वाटतय की असेही
अग हो, मला काय वाटतय की असेही ते प्रेशर बिल्ड व्हायला वेळ जाणार मग पुढे ४-५ मिनिटे अजून. २० मिनिटात मग आपल्या कुकरमधेच चान्गले होते की डाळ भात. बाकी भाज्याही कुकरमधे केल्यावर पाणचट लागतात असे मला वाटते (वान्गी, दोडका, तोन्ड्ली इ. ) त्यामुळे ते या पॉटमधेही तसेच झाले तर? हॉस्तेलच्या मेसची आठवण येते मग असे खाऊन. एका मैत्रिणीक्डे चिकन खाल्ले होते. एक्दम छान झाले होते. तसे काही झाले तरच ठिक नाहीतर मग आप्ले कुकर आहेत्च की. म्हणून म्हटले तसे.
विद्या.
तसं नव्हे विद्या, वापरलेली
तसं नव्हे विद्या, वापरलेली वस्तू परत करणार का - असं विचारते आहे सायो.
>>तसं नव्हे विद्या, वापरलेली
>>तसं नव्हे विद्या, वापरलेली वस्तू परत करणार का - असं विचारते आहे सायो.>> एक्झॅक्टली.
प्लीज प्लीज जेवण करून वापरलेली वस्तू परत करू नका. त्यापेक्षा तुमच्या मैत्रिणीच्या विचारा तिने केलेलं चिकन कोणत्या भांड्यात केलं होतं आणि तेच ऑर्डर करा.
अछा हा ते ल्क्षात नाही आल.
अछा हा ते ल्क्षात नाही आल. ओके तसे करुन बघते. Thanks. Return policy असल्याने लक्षात नाही आले. पण मैत्रिणिचे वापरुन बघू शकते.
हो, रिटर्न पॉलिसी आहे हे
हो, रिटर्न पॉलिसी आहे हे बरोबर. पण चिकन वगैरे केल्यावर त्याच्या स्ट्राँग मसाल्याचा वास वगैरे लागणारच ना? म्हणून म्हणतेय.
चिकन, राजमा, छोले हे क्रॉक पॉटमध्येही छान होतात असं ऐकून आहे. तेव्हा तुमच्या मैत्रिणीकडे ह्या दोन्हीपैकी काही असल्यास तेच तुम्ही ऑर्डर करू शकाल ना?
सायोचा कुकर बुमबॉक्स सारखा
सायोचा कुकर बुमबॉक्स सारखा दिसतोय! मस्त,स्टायलिश!
प्राजक्ता, मी तो जनरली गटगला
प्राजक्ता, मी तो जनरली गटगला नेते आणि लोकांना मी बूमबॉक्स का घेऊन आलेय असा प्रश्न पडतो. फक्त माझा डिस्प्ले जॅपनीज असल्यामुळे पितळ लगेच उघडं पडत नाही.
सायोचा राइस कूकर ब्रॅन्ड
सायोचा राइस कूकर ब्रॅन्ड एकदम कॅडिलॅक ऑफ राइस कूकर्स आहे
>>सायोचा कुकर बुमबॉक्स सारखा
>>सायोचा कुकर बुमबॉक्स सारखा दिसतोय! मस्त,स्टायलिश!>> +१
मी तो जनरली गटगला नेते आणि
मी तो जनरली गटगला नेते आणि लोकांना मी बूमबॉक्स का घेऊन आलेय असा प्रश्न पडतो>>
ब्लॅक बीन सूप साठी दोन कप
ब्लॅक बीन सूप साठी
दोन कप ब्लॅक बीन ६-८ तास भिजवून
अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून अगदी बारीक चिरलेला लसूण
२ बे लीफ
१ काडी दालचिनी
१ टी स्पून भाजलेल्या जिर्याची पूड
मीठ चवी प्रमाणे
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरुन
कोथिंबीर वगळता सर्व साहित्य एकत्र करुन बीन्स च्या वर अर्धा इंच राहील इतके पाणी घालायचे. इंस्टंट पॉटचे झाकण बंद करुन बीन्स सेटिंग ऑन करायचे.
साधारण तीस मिनिटे लागतात. प्रेशर उतरले की उघडून लाकडी चमच्याने थोडे घोटून घ्यायचे. कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यायचे. सूप तयार. पाहिजे असल्यास बोलमधे सुप घातल्यावर लिंबाचा रस घालावा ( लाइम , नॉट लेमन).
फोडणी करता येते. सॉते मोड वर
फोडणी करता येते. सॉते मोड वर फोडणी करायची आणि मग काही परतायचं असेल तर ते परतायचं. मग मॅन्युअल किंवा प्रिसेट मोड वर उरलेलं शिजवायचं.
नेहेमीच्या कुकर मध्ये प्रेशर च्या शिट्टी मधून अन्न बाहेर येतं, झाकण खराब होतं. यात काय वाट्टेल ते करा झाकण कायम एकदम स्वच्छ राहतं. सुपर इझी टू क्लीन. शिट्टी उडणे, झाकण उडणे असले प्रकार अशक्य असल्याने जास्त सेफ पण आहे.
सेल वर असेल तर वर्थ बाय.
>> शिट्टी उडणे, झाकण उडणे हे
>> शिट्टी उडणे, झाकण उडणे
हे हॉकीन्स मध्ये (आतल्या झाकणाच्या कूकर मध्ये) होत नाही ना सहसा?
लाईम आणि लेमन वेगळं असतं??
लाईम आणि लेमन वेगळं असतं?? अगदीच लेमन फील.
पिवळा-लेमन. बिया मोठ्या आणि
पिवळा-लेमन. बिया मोठ्या आणि साल जाड अस्ते. रस गोड्सर असतो.
हिरवा- लाईम. बिया बारीक, साल जरा पातळ. रस आम्बट अस्तो.
मलाही माहीत नव्हते. गेल्या काही वर्षात कळले.
बेस्ट! हे सूप करून पहाणार
बेस्ट! हे सूप करून पहाणार नक्की.
कालच आला, आता आधी मॅन्युअल वाचून मग वापरायला लागेन.
काल फेसबूकवर एका बाईच्या पोस्टीत काऊंटरवर ४ इन्स्टंट पॉट होते विथ कॅप्शन "I think I have a problem"
मी व्हायटा क्ले स्लो कुकर
मी व्हायटा क्ले स्लो कुकर वापरते. क्ले पॉट आहे. जवळ जवळ रोज वापरते. भाज्या जस्त डम्प केल्या तरी अवसम टेस्ट येते. पाणी ही टाकायची गरज पडत नाही. मुगाची भिजवलेली डाळ बर्याचश्या भाज्या टाकुन शिजवली तर मी त्यात पाणी टाकत नाही. क्ले पॉट, स्लो कुकिंग पाण्याशिवाय - एकदम मस्त चव येते. ह्यात मी पालेभाज्यांपासुन चिकन पर्यंत सगळा केलाय!
एकच प्रॉब्लेम आहे तो पॉट हाताळण्याचा, क्ले चा असल्यामुळे !
https://www.bedbathandbeyond.com/store/product/vitaclay-reg-smart-organi...
सायोचा कुकर पण आहे माझ्या कडे पण क्ले पॉट मु ळे तो मागे पडलाय. राईस प्रकार त्यात करते. पण तसाही राईस कमीच खाल्ला जातो.
काल फेसबूकवर एका बाईच्या
काल फेसबूकवर एका बाईच्या पोस्टीत काऊंटरवर ४ इन्स्टंट पॉट होते विथ कॅप्शन "I think I have a problem" <<< मी फेसबूक मधे फोटो टाकला नाहीये पण राईस कुकर आणि ब्लेन्डर मिक्सर बाबतीत ती बाई मी असु शकते :प
>>>सायोचा कुकर पण आहे माझ्या
>>>सायोचा कुकर पण आहे माझ्या कडे पण क्ले पॉट मु ळे तो मागे पडलाय.
सायो, मग तू काय वापरतेस सध्या?
सध्या ती वापरत नसलेल्याने मला
सध्या ती वापरत नसलेल्याने मला वापरायला तेवढाच चान्स
अदिति, जस्ट वरच्या तू
अदिति, जस्ट वरच्या तू दिलेल्या लिंकवर बघत होते. एक क्ले पॉट कुकरमध्ये आणि एक वेगळा असे दोन येतात का? आणि भाज्या करताना ह्यातच फोडणी करतेस की वेगळी करून मग ह्यात शिजवत ठेवतेस?
http://myheartbeets.com/insta
http://myheartbeets.com/instant-pot-dal-makhani/
Regular desi pressure cooker recipe sarkhach distay. So instant pot cha advantage kai if you already have various pressure cookers, crock pot and rice cookers?
Gyaycha faarch Moh hotoy mhanun ha prashna
English sathi sorry.
सायो, एकच येत. मी फोडणी करत
सायो, एकच येत. मी फोडणी करत नाही. कान्दा/लसुन, तेम, मसाल्या पासुन सगळं एकत्र करते (पाणी अज्जिबात टाकत नाही)आणि सेटींग स्लो कुकिंग वर ठेवते. ५/१० मिनटांनी सगळ एकदा चांगलं हलवुन घेते.१/२ तासात भाजी तयार होते.
वांगी वैगरे फळ भाज्यांमधे थोड पाणी राहात.
बिन्स, गवार वैगरे थोड पाणी सोडतात. पण झाल्यावर थोडा दाणाकुट टाकला मस्त कोरड्या होतात.
पालेभाजी मी एक दोनदा केली आहे पण बाहेर चांगली होते.
सुरवातीला ट्रायल अॅड एरर ने वेळेचे गणित केले आता सवय झाली आहे.
फक्त भांड रिप्लेसमेन्ट $२५ ला मिळत.
Pages