Submitted by मनस्वी८९ on 26 November, 2016 - 06:16
आम्ही अम्बरनाथ वेस्ट खोज खुन्ट्वली भागात घर घेत आहोत. एच डी एफ सी मधुन लोन झालाय. agreement जानकाराना दाखवुन घेतलय ( वकीलाला दाखवली नाहीये) standard format नुसार आहे अस सगळ्यान्च म्हनन आहे. जानेवारी २०१७ नन्तर registration केल्यास काहि फायदा होईल का?( builder registation साठी फोर्स करतो आहे.) Ready Reckoner वर्षातुन केव्हा revised होतो? Development charges agreement value मध्ये अॅड आहेत. Maintainance , legal charge या व्यतीरिक्तही काही असत क?? Agreement करताना कोणत्या बाबीवर भर द्यावा? अजून काही सल्ले असतील तर आभारी आहे.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
>>agreement जानकाराना दाखवुन
>>agreement जानकाराना दाखवुन घेतलय ( वकीलाला दाखवली नाहीये) standard format नुसार आहे अस सगळ्यान्च म्हनन आहे.>>
एवढा खर्च करणारच आहात तर रिअल इस्टेट वाल्या वकिलाला दाखवा. स्टॅडर्ड फॉर्मॅट असला तरी अॅग्रीमेंट शेवटी बिल्डर्/डेवलपरच्या वकीलाने केलेले आहे हे लक्षात घ्या. सासरच्या नात्यातील व्यक्तीने असेच स्टॅडर्ड अॅग्रीमेंट आहे म्हणत सह्या केल्या. नंतर ते किती एकतर्फी आहे ते लक्षात आले. गंमत म्हणजे डेवलपरचा वकीलही माझ्याच माहेरच्या नात्यातला निघाला.
commencement certificate
commencement certificate कोणता मजल्यापर्यन्त आहे ते विचार आणि तुमचा मजला त्यात आहे का ते तपासा . कारण ते नसेल तर कर्जाचे हफ़्ते सुरु होतात पण बान्धकाम रखडत ....वकिलाचा सल्ला आवश्यक ....शक्यतो त्या क्षेत्रातला असावा...
बिल्डरच्या प्रेशरला बळी पडु
बिल्डरच्या प्रेशरला बळी पडु नका , कदाचीत घरांचे रेट्स कमी होतील आणि जर कमी झाले तर तुम्ही बिल्डरसोबत निगोशिएट करु शकता. तेवढेच ५-१० लाख वाचले तर वाचले.
कदाचीत घरांचे रेट्स कमी होतील
कदाचीत घरांचे रेट्स कमी होतील आणि जर कमी झाले तर तुम्ही बिल्डरसोबत निगोशिएट करु शकता.>>>> कस शक्य आहे? ट्रान्सपरन्सी मुळे बिल्डरला जरी जास्त टॅक्स भरावा लागला तरी त्याची वसूली ग्राहका कडून मिळनाय्रा पैश्यातुनच केली जाणार ना.
रेकनरचे रेट्स १ जाने वारीला
रेकनरचे रेट्स १ जाने वारीला रिवाइज होतात. ते शक्यतो वाढतातच. कारण मागच्या वर्षीची सेल स्टॅटिस्टिक्स घेऊन त्या लेव्हलला ती आणली जातात. दरवर्षी सगळीकडेच भाववाढ होत असल्याने ह दर वाढतोच दरवर्षी.
रेडी रेकनर जानेवारीत येतो की
रेडी रेकनर जानेवारीत येतो की एप्रिलला?
आमचेही घराचे एक व प्लॉटचे एक अॅग्रीमेंट पेंडिंग आहे.... आमचा घराचा बिल्डर बोलतोर्य एप्रिलच्या आत करा . मी म्हणतोय जानेवारीत करुया
जमिनीचे घराचे व्यवहार जर १००
जमिनीचे घराचे व्यवहार जर १०० % ऑन चेक व व्हाइटच असतील तर रेट कसे पडतील ?
रेकनर हा कायद्याचा भाग आहे
रेकनर हा कायद्याचा भाग आहे कायद्यानुसार तो १ जानेवारीलाच अपडेट होतो. एप्रिलची भीती बहुधा एखादा टॅक्स वाढण्याबाब्त अथवा लगू होण्याबाबत असावी. कदाचित त्याचे अकाऊंट फायनल करण्याच्या संबंधीही असेल
आता खोपोलि परिसरात निवडणुका
आता खोपोलि परिसरात निवडणुका आहेत. अंबरनाथातही आहेत ना ?
तसे असेल तर निवडणुका व नंतर नवे जळू आल्यावर मगच फायनल झालेले चांगले. उगाच डबल रक्तदान नको.
...
...
सगळ्यान्चे खुप खुप आभार.
सगळ्यान्चे खुप खुप आभार. स्वाती२, छकुली मी- नक्किच हे मी करते. श्री, प्रसिक आमचही असच झालय दोन्ही possibilities वाटतायत. anilchembur निवडणुकामुळे काही फरक पडेल का? तुम्हाला काय सुचवायचे आहे मला कळाले नाहि खरतर. अजय अभय अहमदनगरकर धन्स.
अजुन काही सुचवावेसे वाट्ले तर नक्कि सुचवा
या क्षेत्रातला वकील आहे किवा
या क्षेत्रातला वकील आहे किवा नाही हे कस कळेल? मला bhandup, mulund, thane मधील एखादा वकील सुचवाल का? आनि त्यान्ची फीस साधारण किती असते? ( या बाबतीत कोणतीही जानकारी नाहीये..)
जमिनीचे व्यवहार, दिवाणी दावे
जमिनीचे व्यवहार, दिवाणी दावे वगैरे करणारे वेगळे वकिल असतात. त्याला भारतात बहुतेक सिविल प्रॅक्टिस म्हणतात(आता नीट आठवत नाही.) त्यांना अॅग्रीमेंट दाखवल्यास ते ग्राहकाच्या बाजूने विचार करुन, योग्य आहे ना हे सांगतात, दुरुस्ती सुचवतात. याची फी फार नसते. आणि नंतरचा त्रास टाळायचा तर वर्थ इट! आमच्या घराचे अॅग्रीमेंट करताना बाबांनी दिवाणी दाव्याची प्रॅक्टिस करणार्या वकिलांना दाखवून काही बदल करवून घेतले होते. माझे काका वकिल होते पण ते क्रिमिनल कोर्टात प्रॅक्टिस करायचे म्हणून या दुसर्या वकिलांना पेपर्स दाखवले होते.
स्वाती२ आभारी आहे. माझ्याही
स्वाती२ आभारी आहे. माझ्याही ओळखित क्रिमिनल प्रॅक्टिस करणारे वकिल आहेत. त्यान्च्या ओलखित असतील तर विचारते.
मनस्वी, तुम्हाला अंबरनाथ ईस्ट
मनस्वी, तुम्हाला अंबरनाथ ईस्ट चे चांगले इस्टेट एजन्ट माहीत आहेत का. प्लीज त्यांचे संपर्क देऊ शकाल का?
राजसी.. तुम्हाला email केला
राजसी.. तुम्हाला email केला आहे.
धन्यवाद मनस्वी. मी
धन्यवाद मनस्वी. मी पूर्वाश्रमीची अंबरनाथकर
ohhh aani mi in future hoin.
ohhh aani mi in future hoin.
तुम्ही खोज खुंटावली असं
तुम्ही खोज खुंटावली असं लिहिलंय - त्या खोज ला आम्ही बहुतेक कोहोज म्हणायचो. बदलापूर रोडवर आहे ना?/ का? कदाचित तुमचा भाग दुसराही असेल.☺ वय झालं
बिल्डर तुमच्या एकटयासाठी
बिल्डर तुमच्या एकटयासाठी करारनामा बदलणार नाही.बिल्डरची अगोदर बांधलेल्या इमारती बघा.. तो वेळेत काम करुन देतो का बघा...
मायबोलीकर uju :
मायबोलीकर uju : http://www.maayboli.com/user/5699 यांना संपर्क करून विचारू शकता. त्या अॅडव्होकेट आहेत आणि अंबरनाथ क्षेत्रात प्रॅक्टिस करतात. त्या तुम्हाला गाईड करू शकतील.
हो राजसी त्याच भागात आहे.
हो राजसी त्याच भागात आहे. मामी खुप खुप आभारी आहे.
राजू७६ हो बिल्डरने( Patel
राजू७६ हो बिल्डरने( Patel Residency) तिथे बरेच प्रोजेक्ट पुर्ण केलेत. ज्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही पाहातोय त्याचाही कामाचा वेग चांगला आहे (as per husband, he is civil engg). बिल्डर तुमच्या एकटयासाठी करारनामा बदलणार नाही>>>+1 हे असही माझ्या अहोंच म्हणन आहे.
तरीही, newly married त्यात ही घरासारखी मोठी गुंतवणुक आहे त्यामुळे मला जरा भीती वाट्तेय