मी मायबोली वर मल्टीपल इंटेलिजन्स वर मागे लिहले आहे. http://www.maayboli.com/node/39215 मल्टीपल इंटेलिजन्स चा वापर आजवर फक्त लर्निंग स्टाईल च्या शोधासाठी होत होता. याच छोटस उदाहरण द्यायच झाल तर समजा आपल्या मुलाचा निसर्ग विषयक बुध्यांक जास्त आहे. अश्यावेळी तो निसर्गात जास्त रमतो असे समजले. आपल्याला त्याला गणीत शिकवायचे आहे तर ३ फुलपाखरे अधिक २ फुलपाखरे बरोबर पाच फुलपाखरे असे चित्रमय शिक्षण केले तर अश्या मुलाला शिकणे सोपे होते.
आज कृतीतुन शिक्षण देणार्या शाळांची ( Activity based learning ) संख्या नगण्य आहे. मल्टीपल इंटेलिजन्स च्या अभ्यासातुन मला आणखी एक नविन गोष्ट समजली ती अशी की पुर्वीच्या शाळामधुन शिक्षण देण्यासाठी शिक्षक जास्त वापर शब्दांचा करायचे जो ( Audio ) पध्दतीने मुलांना समजुन घ्यावा लागायचा. आज अनेक शाळातुन ( Video ) माध्यम टी व्ही स्क्रीन च्या द्वारे उपलब्ध होता आहे. ज्यात खास त्या विषयासाठी बनविलेल्या फिल्मस दाखवल्या जातात. पण शिक्षणाचे तिसरे माध्यम कृती याचा वापर अद्याप कमीच आहे. काही मुलांना फक्त ( Audio ) माध्यमातुन शिकणे अशक्य असते. म्हणुन या तिनही माध्यमांचा वापर शाळातुन योग्य तसा होत नसेल तर पालकांनी त्याचा कसा वापर करायचा यावर विचार करायला हवा.
एका संशोधन संस्थेच्या माध्यमातुन लहान मुलांची लर्निंग स्टाईल कोणती आहे हे शोधण्यासाठी त्याचा आठ पैकी कोणता इंटेलिजन्स जास्त आहे याची टेस्ट उपलब्ध झाली आहे. ही टेस्ट घेऊन आपण आपल्या पाल्याला त्या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करुन देऊ शकता. यातुन माझ्या मुलाला किंवा मुलीला शाळेत जास्त मार्कस का मिळत नाहीत यावर बराच उपयोग होऊ शकतो.
या लेखाचा महत्वाचा उद्देश करीयर मार्गदर्शनाचा आहे. आज दहावी झाल्यावर मुलाला किंवा मुलीला सायन्स्/कॉमर्स /आर्ट्स किंवा डिप्लोमा /आयटी आय किंवा अन्य काही यानिर्णय कसे घेतले जातात ?
१. दहावीचे मार्क्स जे मुळातच बुध्दीमत्तेचे निदर्शक नसतात.
२. पालकांचा आग्रह
३. पाल्याचे सगळे मित्र सायन्स ला चालले आहेत म्हणुन
४. या शिक्षणाने पुढे नोकरी व्यवसायाच्या उत्तम सधी उपलब्ध असतात म्हणुन
५. हे शिक्षण सहज उपलब्ध आहे म्हणुन
यात पाल्याची बुध्दीमत्ता, कौशल्ये, कल किंवा आवड, क्षमता याची चाचणी न घेता खास करुन इंजिनीयरींग प्रवेशाचा आग्रह लक्षात घेऊन त्याला सायन्सला पाठवले जाते. ११ वी १२ वीचे मार्क्स त्याला सायन्स मधे गती नाही असे दर्शवत असताना क्लासेस चा भडीमार करुन त्याची त्या विषयाची तयारी करुन घेतली जाते. परिणामी इंजिनीयरींगचा अभ्यास झेपत नाही. मुलांची वर्षे वाया जातात. सगळ करुन पास झाला तर तितक्या जागा उपलब्ध नसल्यामुळे उत्तम नोकरी मिळत नाही. आणि पास झाला नाही तर हे घडते
http://www.maayboli.com/node/58439
त्याही पुढे गेलो तर मुलाला इंजिनीयरींगची आवड नसताना इंजिनीयरींग व्यवसायात गती निर्माण होत नाही . ज्याला सॉफ्टवेअर इंजिनीयर बनायचे असते तो सॉफ्ट वेअर टेस्टींगला जातो. ज्याला आपण मेकेनिकल डिझाईन इंजिनीयर व्हावे असे वाटते त्याच्या वाट्याला शॉप फ्लोअरवरचा हडेलहप्पी प्रॉडक्शन इंजिनीयरचा जॉब येतो. आपले मित्र आपल्या पुढे जात आहेत. मी मात्र अजुन नको असलेला जॉब घेऊन रखडतो आहे ज्यात ना पैसा ना व्यावसायीक समाधान अश्या चक्रातुन तरुण मुले जात आहेत.
संशोधन अस सांगतय की ३०,००० व्यावसायीक क्षेत्रे आहेत यातुन योग्य वेळी योग्य निवड करता आली तर खालील समस्या निर्माण होणार नाहीत.
१. शिक्षणात अपयश आले तर वर्ष वाया जाते व अपयशातुन मुल खचतात.
२. यश अपेक्षीत न आल्यास चांगली नोकरी/ व्यावसायीक समाधान मिळत नाही.
३. पालकांनी केलेला खर्च वाया जातो
४. इंजिनीयरींगला चांगले मार्क्स नाहीत म्हणुन पुढे अजुन शिकावे असे ठरवले जाते.
५. यातुन पाल्य वेळेवर सेटल होत नाही म्हणुन अजुन काही समस्या निर्माण होतात.
या समस्यातुन मार्ग काढण्यासाठी सायकोमेट्रीक व अन्य पध्दतींचे एकत्रीकरण करुन निरीक्षण पध्दती बनवली गेली आहे किंवा, १० वी किंवा अगदी ११ वी १२ ला पाल्य असताना पाल्याबाबत कोणती शिक्षणाची दिशा योग्य असु शकेल याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला एका शास्त्रीय पध्दतीने असल्याने तो मार्ग बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. किंबहुना वर सांगीतलेल्या पध्दतीने करीयर पर्याय निवडण्याच्या पध्दतीपेक्षा हा पर्याय व्यवसाय मार्गदशनासाठी चांगला ठरु शकतो.
याबाबत अजुन माहिती साठी संपर्क करायला हरकत नाही. आपण gmconsultancy18@gmail.com या इमेलवर संपर्क साधल्यास याबाबतची माहिती पाठवली जाईल.
वाचून वाईट वाटले. आमच्याकडे
वाचून वाईट वाटले.
आमच्याकडे मुले १० वीतच स्वतःला काय करायचे ते आपणहून ठरवतात. बारावी पर्यंत थोडे जास्त शहाणपण आले की मत बदलते कदाचित. माझ्या मोठ्या भावाने स्वतःच्या मुलाला इंजिनियर हो, इंजिनियर हो असे सतत सांगितल्याने त्या मुलाने कॉलेजच्या पहिल्या वर्षी तसे कोर्सेस घेतले. मार्क उत्तम मिळाले, पण तो म्हणाला मला हे नको, नि त्याने सगळे कोर्सेस बदलून मेडिकल ला जाण्याचे कोर्सेस घेतले. नंतर कर्ज काढून मेडिकलचा कोर्स पूर्ण केला, कॉलेजमधे असताना नोकरी करून पैसे मिळवत होताच. अश्या रितीने स्वतःच्या हिंमतीवर त्याने डॉक्टरचा कोर्स केला, चार वर्षे जास्त घालवून स्पेशलायझेशन केले नि आता त्याच्याजवळ बापापेक्षा जास्त पैसे आहेत. दुसर्या सर्व पुतण्यांनीहि स्वतःला हवे ते कोर्सेस घेतले, दोघांनी तर डिग्री न घेताच कॉलेज सोडले, त्यांचे उत्तम चालू आहे. माझ्या मुलानी कॉम्प्युटर चे कोर्सेस सोडून गणित नि इंडस्ट्रियल इंजिनियरिंग कोर्सेस केले तोहि माझ्या पेक्षा जास्त श्रीमंत आहे.
मुळात मला इथल्या नि भारतातल्या परिस्थितीत बरेच बदल आढळले -
१.
१८ वर्षाचे कधी होतो नि स्वतंत्र निर्णय घेतो, नि स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या हिंमतीने काहीतरी करतो असे इथल्या बहुतेक सर्वच मुला मुलींना वाटत असते. याचा अर्थ त्यांचे नि पालकांचे भांडण असते किंवा पालक मदत करत नाहीत असे नाही, पण जर पालक म्हणाले मी सांगतो ते कर नाहीतर पैसे देणार नाही, तर मुलगा म्हणतो मला तुमची मदत नको!
कितीहि श्रीमंत नि इज्जतवाला बाप असेल तरी मुलाने नोकरी करणे यात त्याला किंवा समाजाला अजिबात वावगे वाटत नाही.
२.
नोकरी मिळायला डिग्रीच पाहिजे अशी अट नाही. माझी डिग्री सर्टिफिकिटे, मार्कलिस्टा कुणिहि विचारल्या नाहीत. पहिल्या एक दोन महिन्यातच बाळाला कितपत अक्कल आहे हे त्याच्या सहकार्यांच्या नि बॉसच्या लक्षात येते. नंतर नोकरी टिकते किंवा जाते. उगाच मास्टर्स डिग्री आहे, किंवा अमुक बापाचा मुलगा आहे असे सांगून नोकरी मिळवली तरी काम बॉसच्या नि इतर सहकार्यांच्या मनासारखे नसेल तर नोकरी टिकत नाही.
३.
एकूणच कागदोपत्री सर्टिफिकेटांपेक्षा प्रत्यक्ष कामाला जास्त महत्व आहे.
भारतात असे व्हायला दोन अडचणी - एक परंपरागत, मुलाची जबाबदारी कायम पालकांची समजतात, अगदी त्याने नोकरी कुठली घ्यावी, लग्न इथपर्यंत.
नोकरीत सुद्धा सर्टिफिकेट दाखव, मार्कलिस्ट दाखव याला महत्व. मुलाखतीत इकडे जे प्रश्न विचारतात नि भारतात आम्हाला जे विचारले ते किती वेगळे,
.
हे तर लवकरच बदलेलच पण अफाट लोकसंख्येमुळे वैध मार्गानी पुरेसे पैसे मिळवणे नि रहाणे कठीण.
आहे.
अर्थात जे मुख्य बदलायला पाहिजे ते बदलले तर खात्री आहे की नवीन पिढीतली मुले जग जसे असेल त्यातून यशस्वी होण्याचे मार्ग काढतीलच - सगळेच तसे पिढ्यान पिढ्या करतात.
>>नोकरी मिळायला डिग्रीच
>>नोकरी मिळायला डिग्रीच पाहिजे अशी अट नाही.>> लागते की बॅचलर्स डिग्री. काही जॉब्जमध्ये हायस्कूल ग्रॅज्युएट चालेल म्हणतात.
ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्था
ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्था अतिशय कमी पैशात मानसशास्त्रीय निकषांवर आधारित कलचाचणी परीक्षा घेतातच की... त्यापेक्षा ही वरची पद्धत नक्की कशी वेगळी आहे आणि का जास्त चांगली आहे हे सांगणार का?
वरदाजी, २००६ साली माझ्या
वरदाजी,
२००६ साली माझ्या मुलीची मी कल चाचणी केली होती. ज्यात इंजिनीयरींग /मेडीकल असे ढोबळ पर्याय होते. त्याही वेळेला ती महागच होती. डॉ श्रीराम गीत यांचा वैयक्तिक अभ्यास उपयोगी होता. नविन टेस्ट microbiology, किंवा electrical engineering या निष्कर्ष काढते. आज ३०० व्यावसायिक क्षेत्रे यात आहेत. ही संख्या पुढेही वाढणार आहे. अनेक देशी विदेशी तज्ञ सल्लागार यावर काम करतात.