खरी श्रीमंती.
ती- आई हि बघ.... नोट मिळालीय आज.
आई- दाखव... काय ग? चोरी केलीस? एवढी मोठी नोट ग कशी दिली कोणी?
ती- चोरी का ग करू? तू तरी नको ना बोलू असं ... त्या गाडीवाल्यानं दिली ना .. सिग्नल लागलान तेव्हापासून मागत होते त्याच्याकडं.. काचेवर मारलं म्हणून रागाने बघितलं... पण दिली जाताना हि नोट.. मग आले धावत तुझ्याकडं.
आई- खरं का...?
ती- अगं खरंच.
आई- बरं, बरं... जा तू.. आज रात्री थोडं बरं खाऊ. काय त्ये... तुझं त्ये चायनीज खाऊ.. आज नाही झोपवायची तुला नुसता पाव वडा खायला घालून ... जा पळ आता .
(झाली रात्र एकदाची.)
गेली एका चायनीज विकणाऱ्या गाडीवर... त्यांचा अवतार बघून झाली काही लोकं बाजूला.
चायनीज वाला- ए ... हो बाजूला...
आई- बाजूला कशाला ? पैसे हायेत ...
चायनीज वाला- पैसे नको ... रुपये दे...
आई- हो .. हो... हे बघ... मोठी नोट हाय... दे आता चायनीज.
चायनीज वाला- मोठी? बघू... अरे हि तर छोटी झाली आज ... म्हणून तर अली तुझ्याकडं... नाय चालत आता हि... बंद झालीय... ब्यांकेत जा, अकाउंट हाय ना? ( असं म्हणून जोरात हसायला लागला तो...)
तिला काहीच कळंना... पैसे हायेत पण चालत न्हाईत.? आजूबाजूची सगळी हसतायेत ... येड लागायची वेळ आलीय.. पोरगी इथे मागे लागलीय.... प्रश्न प्रश्न प्रश्न....................
तितक्यात...
तो- काय झालं ग ?
आई- पैसे हायेत पण चालत न्हाईत... ब्यांक पण नाही... पोरीला खाऊ घालणार व्हते.. चायनीज....
तो- आण ते...
आई- काय पैसे?
तो- हो... दे .. दे... परत देतो... ह्या बदल्यात हे घे.. माझं आहे ब्यांक अकाउंट ... मी घेईन बदलून. (जीवाचा आटापिटा करून त्याने दिवसभरात 500 चे सुट्टे मिळवले होते... पण आता या क्षणाला त्याच्यापेक्षा तिच्या ते जास्त गरजेचे होते... दिले त्याने ते तिला.)
आई- (अजूनही प्रश्न डोक्यात ठेऊन... पण निमूटपणे घेतले ते पैसे... पोरीच्या दीनवाण्या चेहऱ्यासमोर काही विचारावं असं सुचलंच नाही तिला ) उपकार तुझे दादा... सुखी राहा...
तो गेला तिथून... त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुखावला तो ... शांत झोपही लागली.
गाडीवाल्याने खरंच "भीक" दिली होती आणि त्याने "माया" दाखवली होती. पुण्याईचा तराजू त्याच्या दिशेने झुकला होता. तितकंच त्या सुशिक्षित जीवाला पुरेसं होतं….. खरी श्रीमंती सत्कार्यात असते ती त्याने मिळवली होती.
………............ मयुरी चवाथे- शिंदे.
( 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद... जोक्स खूप पाठवले पुढे... पण खरंच जमलं, तर... आता मदतीसाठी हात पुढे करा. कोणी असा लाचार, अशिक्षित दिसला तर त्याला मदत करा. खरे श्रीमंत बना. )
500 आणि 1000 च्या नोटा
500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद... जोक्स खूप पाठवले पुढे... पण खरंच जमलं, तर... आता मदतीसाठी हात पुढे करा. कोणी असा लाचार, अशिक्षित दिसला तर त्याला मदत करा. खरे श्रीमंत बना>>>>+११११
मला वाटलचं नोटेवर असणार
मला वाटलचं नोटेवर असणार म्हणुन
पण खरंच जमलं, तर... आता मदतीसाठी हात पुढे करा. कोणी असा लाचार, अशिक्षित दिसला तर त्याला मदत करा. खरे श्रीमंत बना +१
mayuri tai chan lihles g....
mayuri tai chan lihles g....
छान लिहिलयं. खरच याची गरज
छान लिहिलयं. खरच याची गरज आहे आत्ता.
ईथे नातेवाईक सुट्टे देत नाही
ईथे नातेवाईक सुट्टे देत नाही आहेत. काढता पाय घेत आहेत. मुंबईत तरी "तो" भेटणे अशक्य. भेटलेच तर चायनीज वाले भेटतील....??
लेख उत्तम..@!
मयुरी छान लिहिले आहे. आणि छान
मयुरी छान लिहिले आहे. आणि छान विचार आहे.
माझ्या दहा वर्षाच्या भाचीने मोठ्या दिलदार मनाने तिची पिगीबँक आई बाबांना दिली दोन दिवसासाठी.
पण पूर्वी जमा झालेले आणि सोयीसाठी हजाराच्या नोटेत ठेवलेले काही पैसे आहेत. मधेच घरी बातम्यांच्या अनुषंगाने चर्चा होत असली तर बिचारी विचारते "ते पैसे कधी नवे होणार"...
समाजातल्या कष्टकरी बायका पुरुषांकडे असेच पैसे असतील तर ते किती घाबरून जातील. अशा वेळेस त्यांना सल्ला देणारे प्रत्येक वेळेस चांगले असतीलच असे नाही. पैसे वैध करून घ्यायचे वैध मार्ग सांगण्याऐवजी फसवणूक होऊ शकते...
सगळे ह्यातून सुखरूप निभाऊन जाओत!
खुप छान. खरंच चांगला विचार
खुप छान. खरंच चांगला विचार आहे.आशा करु की गोरगरिब अशिक्षीतांना मदत मिळो.
मोदी सरकार च्या या तडकाफडकी
मोदी सरकार च्या या तडकाफडकी निर्णयामुळे सगळ्यात जास्त सर्व सामान्य लोकाचे खुप हाल होत आहेत. त्यान्च्या या निर्णयावर मी ठाम व जाहीर निषेध करतो...!!!
धन्यवाद. @vt220 :- कित्ती गोड
धन्यवाद.
@vt220 :- कित्ती गोड भाची .
@तृष्णा :- " तो " शोधायचा नाहीये.. आपल्याला संधी मिळाली तर " तो " बनायचं आहे., अशा संदर्भाने लिहिलंय.
@Abdul Hamid :- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, अशा अर्थाची एक म्हण आहे. थोडा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही. हे माझं मत. थोडा वेळ जाऊ दिला तर होईल सगळं नीट.
" तो " शोधायचा नाहीये..
" तो " शोधायचा नाहीये.. आपल्याला संधी मिळाली तर " तो " बनायचं आहे., अशा संदर्भाने लिहिलंय.>>>> charity begins at home.......