तेच फक्त तिथे नव्हत. माझे कोणी मित्र मैत्रीण नाहीत ना. म्हणून मी शक्यतो स्वतःसोबतच बोलत असतो. म्हणजे मनात किंवा हळू आवाजात. असच बोलता बोलता बोलून गेलो कि, अरे देवा मला इथे फुल स्पीड वायफाय मिळाल तर किती मज्जा येईल. संपूर्ण
दिवस कसा निघून जाईल समजणार सुद्धा नाही. पण तस होऊ तर नाही शकत. तरी पण एक खोटी आशा म्हणून वायफाय चालू केल आणि फोन बाजूला ठेवून घरातला टीव्ही चालू केला. डीश असल्याने टीव्ही सुरू होण्यास वेळ लागणार हे नक्की. पण माझ्या मोबाईल चा वायफाय सुरू झाल हे कस शक्य आहे. शेजारी एक सरकारी कार्यालय तर आहे पण त्याला पासवर्ड टाकून तो लॉक केला असणार. मग हे वायफाय कोणाच म्हणून मी नाव बघितलं. फोन माझ्या हातातून खाली पडला. नशिबाने तो सोफ्यावर पडला पण, यात नाव होत तुझी मैत्रीण. ह्या डिस्कव्हरी वाल्यांना पण काही काम नसतात. ही गोष्ट मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवली. कारण खरच एका क्षणाला माझी पण ओली होणार असेच वाटू लागले. एकीकडे फोन खाली पडला आणि त्याच क्षणाला दुसरी कडे टीव्ही चालू झाला, चालू होऊन पण त्याने माझ्यावर उपकारच केले होते. कारण, डिस्कव्हरी चायनेल च्या कोणत्यातरी सिहांच्या कार्यक्रमाची जाहिरात चालू होती. त्यात नेमक सिहांच्या दहाडण्याचा आवाज होता. टीव्हीचा आवाज इतका जास्त होता. कि पहिले मी आणि माझ्या जोडीला ती दोघंही घाबरलो. त्या क्षणाला एकच गोष्ट केली घरातून बाहेर. दोन-तीन मिनीट त्या धक्यातून सावरण्यातच गेली. परत आतमधे जाण्याची हिंमत नव्हती होत. तो आवाज झाल्या च्या काही क्षणानंतर नेहमीच्या जाहिराती चालू झाल्या आणि नक्की अंदाज आला कि नक्की काय घडल. म्हणून परत घाबरत घाबरत आत जाण्याची हिंमत करणार इतक्यात वरच्या खोलीतून जो आवाज आला. तो ऐकल्या नंतर दरवाज्यातच थांबून राहिलो. ती
मला चक्क ओरडली पण भीतीने. अरे ए सरळ सरळ सांग ना कि हे घर सोडून जा म्हणून इतक घाबरवण्याची काय गरज आहे. जीव गेला असता ना माझा. हे ऐकून हसावं कि रडावं हेच समजेना. तिच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने त्या सीरिअल चा
रिपीट चालू होता. मी घरात जावून नेमका तो चायनेल चालू केला आणि परत तोच सिंहाच्या दहाडण्याचा आवाज. आता माहिती होत म्हणून जाम भारी वाटत होत. पण तिकडे तिची हालत खराब झाली होती. ती अक्षरशः मला शिव्याशाप देऊ लागली. आणि
इकडे माझा हसून हसून जीव चाल्लेला. हा संपूर्ण आनंद फक्त सात मिनीटांचा. आठव्या मिनीटाला बया माझ्या समोर येऊन गेली आणि मला समजलेपण नाही. तिने लाईट बंद केला आणि टीव्ही बंद पडला. त्या सोबतच माझ हासण पण थांबल पुढचा मिनीटभर शांतता. त्याच क्षणात मनात काहीतरी आले आणि मी बोल्लो फ्रेंड्स. माझा हात पुढे केला आणि तिची वाट पाहू लागलो. एक वार्याची झुळूक हाताला स्पर्श करून गेली. आणि कानावर शब्द येऊन आदळले. हो. आमची मैत्री होण्यासाठी फक्त
दहा मिनीट लागली. पण जणूकाही असे वाटले कि संपूर्ण पर्व सरून गेले. पण या मैत्री सोबतच मनात काही प्रश्नांनी जन्म घेतला. आणि या प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त तीच देऊ शकत होती. माझ्या मनात नक्की काय चालू आहे. हे तिला समजले असेल का? एकीकडे हा विचार, तर दुसरीकडे पोटात कावळे ओरडायला लागले. घड्याळ बघतो तर काय. बोल्लो होतोच दोन तास कधी निघून जातील समजणार सुद्धा नाही. घरी गेल्यावर माझ्या नवीन नोकरी संदर्भात जास्त चर्चा नाही झाली. पण, नेहमी
प्रमाणे पाण्याची बॉटल bag मधे होती. आणि माझी खास bag घेऊन मी निघालो होतो. घरी आलो. हा म्हणजे आता जे माझ दुसर घर होत तिथे आलो. जणू काही ती माझ्या येण्याची वाटच पहात होती असे जाणवले. दरवाजा उघडून आत गेलो. तास होत
आला मी सोफ्यावर बसून फोनवर गेम खेळत होतो. मात्र तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. गेली कि काय सोडून खरच. मला शंका आली म्हणून हिंमत केली आणि वरच्या खोली पर्यंत गेलो खरा. पण दरवाजा उघडण्याची हिंमत होत नव्हती. इतक्यात
माझा फोन वाजला. संपल आता सगळ आता ही बया काय मला जित्ता नाही सोडत. घर पण पेटवणार आणि मला पण जिवंत जाळणार. आग लागो काय दुर्बुद्धी सुचली आणि वर आलो अस झाल होत. मी लगेच माघारी फिरणार इतक्यात आतून आवाज
आला. अरे तू आलास पण, कधी आलास. डोळा लागला होता रे समजलच नाही. हाक सुद्धा नाही मारलीस. आणि बाहेर का थांबलास? आत येना. मी जरा थांबलो विचार केला नक्की कोणा सोबत बोलते. परत आतून आवाज आला. अरे तुझ्याशीच बोलते ये, आत ये. आणि दरवाजा उघडला. आत डोकावून पाहिलं तर कोणीच दिसेना. आत मधे गेलो संपूर्ण खोली तपासून पहिली कोणीच नाही दिसत. मी त्या सावलीकडे दुर्लक्ष केल होत. म्हणून मला ती दिसत नव्हती. पण खर पाहता ती तिथेच होती. आता तिने परत हाक मारली काय रे कोणाला शोधतो आहेस. मी इथे बेड वर आहे. मी त्या दिशेने नजर टाकली असता मला बेड वर...
मैत्री (भाग ५)
Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:01
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा