त्याने घरात प्रवेश केला. मात्र त्या घरात घरमालकान व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नव्हता. म्हणजे घर मालकान सोबत प्रवेश केलात तर ठिक आहे. मात्र एकटेच गेलात तर नाही चालणार. तिने त्या भोंदूला तिथून हाकलून लावल. मात्र त्याचा असा गैरसमज झाला कि त्याने घराच दार बंद करून घेतत्यामुळे अस घडल असावं कारण, घराच दार बंद होई पर्यंत ती शांत होती मात्र दरवाजा बंद होत्या क्षणी तिने रौद्र अवतार धारण केला. कारण तिला पण असेच वाटले होते कि तो भोंदू आता रोज रात्री तिथे जाणार आणि रात्री च्या अंधारातील त्याचे घाणेरडे धंदे तिथे सुरू करणार. ही घटना घडून गेल्याच्या आठवड्या भरातच इकडे मालकांना सुद्धा तो बंगला विकण्याचे वेध लागले म्हणून मालकांनी त्या भोंदू ला संपर्क करून त्या बंगल्याचा निकाल लावण्यासाठी लवकरच बोलावून घेतले. ते यड होत जवळच्याच झोपडीत आल लगेच निघून. बंगल्यात आल्यावर म्हणे मनाच्या शक्ती ने प्रवास केला. म्हणून लवकर आलो असा बरळू लागला. कारण मालकांना पण प्रश्न पडला कि हिमालयात गेलेला माणूस एका दिवसात परत कसा आला. एक नवीन कुटुंब तेथे राहू इच्छित होत. मात्र होम झाल्या नंतर पण, तो भोंदू तो भोंदूच बरळला कि, या घरात राहावयाचे असेल तर काही नियमांचे पालन करावे लागेल म्हणे. नियम क्रमांक एक या घराचा दरवाजा कधीच म्हणजे कधीच बंद करायचा नाही. इथूनच कहर करायला सुरूवात केली होती त्या भोंदू ने. नियम दुसरा या घरात राहावयाचे असेल तर कधीच झोपूनका. हे यड त्या रात्री जेव्हा आल होत तेव्हाच रात्री च्या बारा वाजता दरवाजा उघडा ठेऊन काही क्षणासाठी का होईना झोपलं. आणि नेमक तेव्हाच दरवाज्यावर बसलेल्या रात किड्याला पण चाळे सुचले. काढला त्याने घुगारांचा आवाज. मग काय
होणार. झाली या भोंदू ची ओली. गेला आणि केला दार बंद. दार बंद करायची खोटी देवीनी दिला तीर्थ प्रसाद. आधीच ओली झाली होती त्यात आता पिवळी पण झाली. मग काय. झाले याच मुळे दोन नियमांना भोंदूने जन्म दिला त्याच क्षणी. इतक ऐकूनच त्या परिवाराने घरमालकान कडून तब्बल १ लाख मागितले. घराच्या आधीच हातात पडलेल्या चाव्या परत केल्या आणि धरला स्वतःच्या घरचा रस्ता. ती रक्कम भोंदूने होमासाठी त्या परिवारा कडून घेतली होती. कारण मालकान कडून मागितली आणि तरी पण घर विकल गेल नाही तर मालक त्यालाच त्या घरात राहायला लावतील या भीतीने. या घरात राहण्याचा तिसरा नियम हा घर मालकांची स्वतः जन्माला घातला होता. त्याच झाल काहीस अस कि घर मालकांनी स्वतःच त्या घरात राहायचं ठरवल एकट तेही परिवारा शिवाय पण फक्त एकच दिवस. मात्र त्या दिवशी मालकांनी केला विचार कि चला आपल्या स्वतःसाठी एक मास्टर बेड आपण तयार केली आहे तर तिथे जावून झोपावे. पण, मालक अजाणतेपणी बाई साहेबांना डिस्टर्ब करत आहेत हे त्यांना माहिती नव्हते. मग काय व्हायचे तेच झाले. बाई ला आला राग दिली धमकी खबरदार जर वर आलास तर
संपूर्ण घर पेटवून देईन. घर मालकांना पण शंकाच आली ही खरच भूत आहे. कि स्वतःची पोळी भाजून घेते भूताच नाटक करून. एकूणच काय तर मालक जेव्हा परिवारासह राहायला आले तेव्हा बाईच्या नुसत्या आवाजानेच ते घाबरून पाळले होते म्हणून
आता शंका येण साहजिकच होत. तरी पण मालकांनी हिंमत करून वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि बाईंनी दिलेली धमकी खरी करून दाखवली. संपूर्ण घराने वणवा भडकावा इतका प्रचंड पेट घेतला. घरमालकांच झाल पाणी पाणी. ते तत्काळ खाली
उतरले आणि पाहतात तर काय घराला लागलेली आग विझली. घराच्या बाहेर येऊन आगीचे अवशेष पाहण्याचा प्रयत्न केला पण आग लागलीच नव्हती असे चित्र दिसले. आता मालकांना विश्वास बसला आणि त्यांनी घर कायमचे बंद केले आणि यातूनच घरात राहण्याच्या तिसर्या आणि शेवटच्या नियमाचा जन्म झाला कि कधीच वरच्या खोलीत जायचे नाही. हे सर्व नियम सांगितल्या नंतर घराच्या किल्ल्या माझ्या हातात दिल्या. तस पाहता मला सकाळी अकराच्या सुमारास घरात घेऊन आले होते. त्यामुळेना माझ्याकडे जेवणाचा डबा ना पाण्याची बाटली. तरी जेवणाची वेळ व्हायला अजून दोन तास होते. तरी मला वाटल कि दोन तास लगेच निघून जातील. म्हणून घेतल्या चाव्या आणि बसलो सोफ्यावर. मामा आणि त्याचा मित्र निघाले जायला. जाताजाता ते बोलून गेले जेवायला जाताना मात्र दार बंद करून जा. मी होकारार्थी मान डोलवली आणि ते गेले तिथून. मी तत्काळ घरी फोन करून सांगितल नोकरी मिळाली. आता थेट दुपारी जेवायला येईन. समोरून हा ठिक आहे. इतकेच उत्तर आले. माझा त्या घरातील प्रवास झाला सुरू. मी प्रवास बोलण्या मागचा उद्देश इतकाच कि खर समजे पर्यंत प्रत्येक क्षण भीतीच्या ताब्यात होता. जगायला मिळालं तर आपला. नाहीतर मृत्यूचा. मला एक घाणेरडी सवय आहे. कुठेही दिर्घकाळ वास्तव्य करायचे असेल तर त्या जागेची माहिती काढून घ्यायची. म्हणजेच युद्ध भूमीचा अंदाज घ्यायचा. म्हणून मी संपूर्ण घरात फिरायचं ठरवल. सुरूवात बाहेरच्या परीसरा पासून केली. त्याचे फोटो काढले. निरखून पाहत होतो. घराच्या आतील जागेचे परीक्षण करताना देखील फोटो काढून घेतले. नशिबाने बाथरूम खाली सुद्धा होते. हसू नका. खालच्या संपूर्ण घराची पाहणी तर झाली. पण आता मी जिन्याच्या समोर आलो होतो आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात. थांबलो नियम आठवला तसाच पाय मागे घेतला आणि परत येऊन सोफ्यावर बसलो. त्या घराची चांगली गोष्ट त्या घरात मला गरजेची असलेली एक गोष्ट सोडली तर बाकीच्या सर्व गोष्टी होत्या. त्या पण चालू स्थितीत खरच खूप चांगली गोष्ट होती. हा मला वायफाय पाहिजे होते. तेच...
मैत्री (भाग ४)
Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:51
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा