फेसबूकवर देखील सामाईक चर्चेसाठी ग्रूप बनवू शकतो मात्र तिथे स्वत:ची पर्सनल वॉल असा प्रकार असतो, तोच जास्त वापरला जातो. बरेच जण फेसबूकवर फिरणारे फॉर्वर्ड शेअर करतात, स्वत:चे फोटो शेअर करतात, तर क्वचित काही जण आपले स्वत:चे विचारही उधळतात. त्याखाली काय कशी प्रतिक्रिया द्यावी याचे बरेच जणांना भान नसते असे मला आढळून आले आहे. तसेच शेअर करणारयांनाही बरेचदा काय शेअर करावे याचे भान नसते. फेसबूकवर आपले शाळा कॉलेज ऑफिसपासून फॅमिली मेंबर्स आणि शेजारीपाजारीही लिस्टमध्ये असतात आणि ते वाचत असतात हे समजायला हवे.
फेसबूक पासून तसे मी दूरच राहतो पण तरी हे काही अनुभवलेले किस्से.
किस्सा 1 -
मराठा मोर्चाच्या निमित्ताने आमच्या बिल्डींगमध्ये राहणारया एका मित्राने "एक मराठा लाख मराठा" आशयाची गुणगान गाणारी स्वरचित पोस्ट टाकली. त्याला घेऊन बिल्डींगमधीलच दुसरया जातीच्या दुसरया एका मित्राने तो मोर्चा कसा फोल आहे यावर टिप्पणी केली. बघता बघता तिथे मित्रयादीतले त्या त्या जातींचे समर्थक आले आणि पोस्टींचा धुरळा उडाला. नेहमीसारखेच जातीयवादी चर्चा ज्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचते तशी ती पोहोचली. बिल्डींगमधील काही मित्रही या चर्चेत(की वादात?) सहभाग घेत होते. ईतर मित्र, त्यांचे कुटुंबीय हे वाचत होते. लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळताना घाणीत गेलेला बॉल एकत्र काढायला जाणारी मुले, कोणाला कोणाची जातही माहीत नव्हती, ती या निमित्ताने समजत होती. दोनचार दिवस ती वॉल भडकून शांत झाली. या सर्वात एकच गोष्ट चांगली झाली की दिवाळीला फटाके उडवताना पुन्हा सारे एकत्र होते. पण ठिणगी कुठेतरी पडली होतीच. त्यातल्याच एका मित्राकडे फराळाला गेलो असताना त्याच्या आईने हे आम्हाला बोलून दाखवले. त्याची आई फेसबूकवर नव्हती पण बहिण होती, अर्थातच हे तिच्यामार्फत समजले असावे. आणि त्यांना समजले म्हणजे बिल्डींगमधील प्रत्येकाच्या घरी हे पसरले असावेच. आता त्या काय बोलल्या हे ईथे नेमके नाही सांगत पण फेसबूक वॉलवर झालेले वाद असे घरांत पोहोचले होते ते यांच्या मुर्खपणामुळे. तेच जर एखाद्या ग्रूप किंवा मायबोलीसारख्या संकेतस्थळावर असते तर असे नसते झाले. आपण कुठे काय बोलतो हे लक्षात ठेवायलाच हवे. स्टेटस टाकणारयानेही आणि त्यावर कॉमेंट करणारयानेही.
किस्सा 2 -
व्हॉटसपवर हिंदू-मुसलमान भडकाऊ पोस्ट फिरत असतात. फक्त हिंदूच ज्या ग्रूपवर असतात अश्या ग्रूपवर जो तो आपल्या आवडीने अश्या पोस्ट टाकत असतो. जिथे मिक्स मित्रांचा ग्रूप असतो तिथे अर्थातच हे टाळले जाते. अशीच एक पोस्ट एका मित्राने आपल्या वॉलवर टाकली. मला बघताक्षणीच आश्चर्य वाटले की याच्या मित्रयादीत कोणी मुसलमान नाही का. बरे पोस्टची प्रायव्हसी सेटींगही पब्लिक होती. म्हणजे मित्राचे मित्रही किंवा आणखी कोणी तिरहाईक येऊनही भांडू शकत होता. खाली पाहिले तर तेच चालू होते. त्याच्याच मित्रयादीतील एका मुस्लिम मित्राने आक्षेप घेत वादाला तोंड फोडले होते. आणि पुढे चांगलेच पेटले होते. पुढे मी काही ते भांडण फॉलो करत बसलो नाही.
किस्सा 3 -
हा एक मजेशीर किस्सा. मित्रांमध्ये टवाळक्या चालतातच. असभ्य अश्लील टिपण्य्या आणि कंबरेखालचे विनोद वगैरे. पण याच पठडीतील कॉमेंट एकाने मित्राच्या फेसबूकवर अपलोड केलेल्या फोटोवर दिली. फोटो गोव्याच्या बीचवरचा होता. कॉमेंट काय होती हे न सांगताही कशी असू शकते हे समजून घ्या. त्या मित्राने ती बघेपर्यंत चार तास उलटून गेले होते. मधल्या काळात त्याच्या ईतर किती मित्रांनी, नातेवाईकांनी पाहिली असेल याची कल्पना नाही. पण त्याने पाहताच डिलीट केली आणि आमच्या व्हॉटसपग्रूपवर येऊन त्या कॉमेंट करणारया मित्राला शिव्या घालू लागल्या. तो कॉमेंट टाकणाराही ईतका बिनडोक की आपल्यात असे चालत नाही का?, या आधी तू मला कधी असे बोल्लास नाही का? वगैरे मुद्दे काढून भांडू लागला. शेवटी ते स्थळ, काळ, वेळ वेगळी होती याची अक्कल आम्हालाच त्याला शिकवावी लागली.
किस्सा 4
म्हटलं तर हाही मजेशीरच किस्सा.
मध्यंतरी ऑलिंपिक दरम्यान एक फोटो वायरल झालेला. ज्यात एकीकडे भारतातर्फे ऑलिंपिकमध्ये चमकलेल्या मुली तर एकीकडे आपल्या सैराटच्या आर्चीचा फोटो. खाली टॅगलाईन होती की मुलींनो, आदर्श यांचा घ्या, हिचा नको.
एका मैत्रीणीने हा तिच्या टाईमलाईनवर शेअर केला. मी दिसेल ते लाईक करा सवयीने पुढे जात होतो. पण त्या फोटोखाली एक दहाबारा लाईक्स मिळालेली पोस्ट दिसली म्हणून वाचली. त्यात ही मूळ पोस्ट कशी फालतू आहे आणि आर्चीनेही आपल्या मेहनती आणि कलागुणांवरच पैसा प्रसिद्धी मिळवलीय अश्या आशयाची पोस्ट, फारच कडक आणि जहाल भाषेत लिहिली होती. अर्थात ते पटण्यासारखेच मत असल्याने एक लाईक तिथेही ठोकला. पण मूळ पोस्ट ज्या मुलीची होती तिला ते इन्सल्ट केल्यासारखे वाटल्याने खाली त्या दोघांचा फार मोठा राडा सुरू झाला होता. काही जण उगाच टाईमपासला त्या वादात शिरले होते तर काही तेल टाकत होते. मी गपचूप दोन्ही पोस्टना दिलेला लाईक मागे घेत तिथून सटकलो.
किस्सा 5 -
हा किस्सा म्हणजे माझे धागा काढायचे तात्कालिक कारण!
ऑफिसमधील एका मैत्रीणीने आपल्या लहान मुलाचा फुलबाजे पेटवतानाचा आणि फटाके फोडतानाचा फोटो मोठ्या हौसेने शेअर केला. त्या खाली तिच्या एका कॉलेजमित्राने फारच उपदेशपर कॉमेंट केली. फटाके फोडणे कसे चूक आहे, त्यामुळे प्रदूषण कसे वाढवते, ती कसे चुकीच्या गोष्टीचे कौतुक करत आहे आणि यामुळे मुलावर कसे चुकीचे संस्कार होत आहेत वगैरे वगैरे ..
एका अर्थी हा उपदेश तसा चुकीचा नसला तरी तो करायची ती जागा आणि वेळ नक्कीच नव्हती. मला तरी तो बिनडोकपणा वाटला. त्याला सात-आठ लाईक्स सुद्धा आल्या होत्या. त्यांचीही गम्मत वाटली. नक्कीच माझ्या मैत्रीणीला हे झोंबले असणार म्हणून मी खाली तिची प्रतिक्रिया शोधली. ती अशी सापडली,
अरे संदिप, तू कॉलेजमध्ये असताना सतत कट्ट्यावरच्या पानाच्या टपरीवर पडून असायचास. किती समजवायचो आम्ही तुला की एवढ्या सिगारेट पिणे चांगले नाही. त्याने स्वत:च्या छातीचाही पिंजरा होतो आणि आजूबाजुच्या लोकांनाही धुराचा त्रास होतो. अजूनही तू तसाच चेनस्मोकर आहेस की धुराचे प्रदूषण होते म्हणून सोडलीस ती सवय
पाहिले तर तासाभरात बत्तीस लाईक आले होते. मी तेहतीसावा लाईक ठोकून पुढे सरकलो.
शेवटचा किस्सा आवडला.
शेवटचा किस्सा आवडला.
@ ऋन्मेष, आमचाही नातेवाईकांचा
@ ऋन्मेष, आमचाही नातेवाईकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. आमची सौ.हि त्यात सभासद होती. एकदा सौ.ने दुसरीकडून आलेला मेसेज ग्रुपवर फॉरवर्ड केला. त्यावर माझ्या दूरच्या बहिणीने फटाके फोडणे कसे चूक आहे, त्यामुळे प्रदूषण कसे वाढते टाईप उपदेश केला. झालं! सौ.चं माथं भडकलं. तिने ग्रुपवर बोलणं टाकलं. तिने बहिणीला काही लिहिलं नाही, पण सर्व राग माझ्यावर निघाला. रोज घरी गेल्यावर त्याच विषयाचं गुऱ्हाळ चालू. अक्षरशः वैतागलो होतो. बरं! इतरांनाहि सौ.चं काहीतरी बिनसल्याची कल्पना आली होती. तिलाहि सगळीकडनं तिच्या मौनव्रताबद्दल विचारणा होत होती. पण सौ. काही ताकास सूर लागू देईना. आणि एकदाचा तो दिवस उजाडला. त्याच बहिणीने कसला तरी फॉर्वर्डेड मेसेज ग्रुपवर टाकला आणि आमची सौ. सुटली ना राव!! तिनेही त्या बहिणीला फटाके फोडणे कसे चूक आहे, त्यामुळे प्रदूषण कसे वाढते टाईप उपदेशाचे डोस पाजूनच दम घेतला आणि मोकळी झाली. इथे मी चाट! म्हणजे सौ. आपलं सावज खिंडीत येण्याची वाट पहात होती तर! अहो पण ह्यात माझा काहीही सहभाग नसताना माझा जीव टांगणीला लावला होता ना!
अच्छा हे दुसरे ऋन्मेष का ?
अच्छा हे दुसरे ऋन्मेष का ?
अच्छा हे दुसरे ऋन्मेष का ?
अच्छा हे दुसरे ऋन्मेष का ? >>>
ऋ: सर्वांना काही ना काही
ऋ:
सर्वांना काही ना काही बोलावेसे वाटेलच असे इंटरेस्टिंग धागे कसे काढायचे याचे क्लासेस चालू करशील का?
किस्सा ५ भारीये!
किस्सा ५ भारीये!
साती विठ्ठल हो, शेवटचा किस्सा
साती विठ्ठल हो, शेवटचा किस्सा 5 भारी आहे म्हणूनच हा धागा सुचला. आधीचे मग त्या अनुषंगाने भूतकाळातील आठवले. जर ते बोअर असतील तर ते उडवून फक्त शेवटचाही ठेवता येईल
सचिन काळे, भारी आहे. म्हणजे आधी फटाक्यांवरून ऊपदेश देणारया काकूंनी नंतर स्वत:च फटाक्यांच्या कोडकौतुकाचा मेसेज पाठवला का
हे असे अनुभव येतात या सोशलसाईटच्या जगात. आणि म्हणूनच हे आभासी आणि फेक वाटते बरेचदा..
मी अनु, तसेच काही नाही. मी मला स्वत:च्या आवडीच्या विषयांचे धागे काढतो. कदाचित माझ्या आवडी चारचौघांसारख्याच सामान्य असतील
शेवटचा किस्सा भारी.
शेवटचा किस्सा भारी.
काही लोकांना फेसबूक वर काय
काही लोकांना फेसबूक वर काय लिहाव कळत नाही तर काही ना किती धागे काढावे ते कळत नाही. त्यात काय!
काही ना किती धागे काढावे ते
काही ना किती धागे काढावे ते कळत नाही
>>>>
हे ही ईंटरेस्टींग वाटतेय. याचे दोनतीन किस्से मला मेल केलेत तर त्यावरही एक धागा काढता येईल
शक्य आहे. कित्येकांना नसावे
शक्य आहे. कित्येकांना नसावे भान.
ऋ, शेवटचा किस्सा भारी. तसही
ऋ, शेवटचा किस्सा भारी.
तसही मी पण फेसबूक पासून फारच दूर राहते.
4-6 महिन्यांनी चेक केलं जातं.
खूप कमो प्रर्तिसाद
खूप कमो प्रर्तिसाद
शेवटचा किस्सा आवडला.बाकी आता
शेवटचा किस्सा आवडला.बाकी आता फेसबुक अस ही बोअर होत राव.