अनाहुत
'अग निशू,अजून किती वेळ बाहेर खेळणार आहेस.चल आत ये पटकन..वाजले बघ किती.'
काव्या अक्षरशः वैतागली होती निशाच्या वागण्याला.
'थांब ना ग मम्मी' बाहेरून निशा ओरडून बोलली .
'बस हा आता निशू.पप्पांना काॅल करू का?चल ये लवकर आत.'
काव्या खरच आकाश ला काॅल करायच्या तयारीत होती तेवढ्यात निशाची स्वारी आली
'काय ग किती वाजले.तुझे पप्पा बघ sunday असून job वर गेले आणि तू अभ्यासाच नाव नाही.करू का पप्पांना call' काव्या जरा रागातच बोलली.
'जा कट्टी मम्मी..मी पण नाव सांगणार डॅडूला आणि दादूला 'बिचारी निशू रडकुंडीला येऊन बोलत होती.
"कोणता दादा ग?"
"मी नाय सांगणार जा,कट्टी"
निशा पाय आपटत तिच्या रूम मध्ये गेली.
काव्या विचारात पडली कोणत्या दादा बद्दल बोलत होती निशू.
तेवढ्यात फोन वाजला.
"हैलो"
पलीकडून काहीच उत्तर नाही..
काव्या पुन्हा बोलली "हैलो"
"हाहाहा...तुझ्या नवर्याला तर मी मारल.आता तुझ्या मुलिची बारी"
पलीकडून घोगरा आवाज आला.काव्या घाबरली.रडकुंडीला येऊन बोलली ..
"कोण..कोण आहात तुम्ही ? काय केलात माझ्या आकाश सोबत?"
तिचा धीर खचला ती रडायला लागली.
तस पलीकडून आवाज आला"ओय काव्या रडण बंद कर वेडू.मी आहे तुझा आकाश वेडाबाई मस्करी करत होतो ग."
"मूर्खा तू ना ये घरी मग बघते तुला हा कोणता नंबर"
"ऑफीसचा आहे ग..अच्छा रोज तर बघतेस ना मला"
"जा ना रे...चल बाय..तू ऑफीसमध्ये काम कर.मी निशू साठी pizza बनवते."
"ऐक ना, निशूला एक गोड गोड पप्पी दे हा"
"हममम,बाय लव यू"
"लव यू टू"
***
प्रसंग दुसरा
निशूच्या रूमचा दरवाजा उघडाच होता.एक पुसटशी आकृती आत येत होती.मम्मी ओरडल्यामुळे निशू रडत रडतच बेड वर झोपलेली.कोणाची तरी चाहूल लागली तिला.कोणतरी होत तिच्या रूम मध्ये."कोण आहे?"निशू घाबरत घाबरत बोलली.
तिच्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला.
थोड्या वेळाने काव्या निशूच्या रूम मध्ये आली तर दरवाजा उघडाच होता.निशा शांत बसली होती.आरशासमोर बसून ती कसला तरी विचार करत होती."काय झाल ग निशू?"काव्याच्या आवाजाने निशाची तंद्री उडाली.निशू मम्मीला(काव्याला) जाऊन बिलगली आणि बोलली "मम्मी साॅरी "
"हे बघ बाळा मी तुझ्या चांगल्यासाठीच ओरडते ना.
चल बस आता रडू नको.हे बघ मी काय बनवल तुझ्यासाठी"
"Wow pizza, मम्मी यू आर द बेस्ट"
"काय ग निशू हे काय?तू sandel घालूनच आत आली."काव्या विचारात पडली हाॅल मध्ये तर ठसे नाहीत मग इथे कसे.
तेवढ्यात तिने जे बघितल , तिच्या अंगावर काटा आलाएक अंधुकशी सावली पडद्याच्या मागे दिसली.काव्या चार पावल मागे झाली.
निशूचा हात पकडून बोलली,चल खाली Hall मध्ये जाऊन बसूया."
"मी नाही येणार..तू जा ना मम्मी अजून एक पिज्जा आण ना त्याला पण पाहीजे ना."खिडकीकडे बोट दाखवून निशू बोलली.
आता मात्र काव्या घामाने ओलीचिंब झाली.निशाचा हात जवळजवळ खेचतच ती खाली आली.अन देव्हार्याच्या समोर येऊन बसली.असाच वेळ जात होता सूर्य मावळतीच्या दिशेने झुकत होता.काव्या खूप घाबरलेली होती.भीतीने तिने घराचा दरवाजा पण उघडाच ठेवला होता.तिचं लक्ष दरवाज्याकडे गेलं.दरवाजावर कोणाची तरी चाहूल लागली.तिने निशूला जवळ घेतलं.तेवढ्यात आकाश आला.काव्याने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली.मागून निशा पण धावत आली.
"काय ग?काय झाल"रडत रडतच तिने सर्व सांगितल.
"अग तुला भास झाला असेल ग..अस काही नाहीय 2 वर्ष झाली आपण इथे राहत आहोत.चल रडन बंद कर बघ निशू पण हसतेय.आणि Horror tv show बघण पण बंद कर तू."ती तिची मिठी अजून घट्ट करते.
"चल खूप झाल हा आता . मी Fresh होऊन येतो.तोपर्यंत मस्त जेवण तयार कर, नाहीतर एक काम करूया आपण आज बाहेरच जाऊया Dinner करायला.चालेल ना?"काव्याच्या माथ्यावर ओठ टेकवून आकाश बोलला.
"हमम.ठिक आहे."
तिघ पण तयार होऊन बाहेर जातात.घरी आल्यावर..
"देवा या light ला काय झाल आता,आकाश मोबाईल चा flashl चालू कर ना"काव्या बोलली.
मी वर जाऊन change करते.
"अग थांब light तर येऊ दे.नाहीतर पुन्हा घाबरणार तू"हसत हसतच आकाश बोलला.
"चल मी डरपोक नाहीय."काव्या थोड्या लटक्या रागातच रूमच्या दिशेने निघाली.
"अग हळू पडशील नाही तर"आकाश खालूनच ओरडला.
काव्याने रूमचा दरवाजा उघडला.रूमच्या खिडक्या बंद असल्यामुळे दमटपणा आला होता.ती बेडवर जाऊन शांत बसली.5 मिनीट तो शांत बसली.मग अचानक उठून ती आरश्यासमोर बसली.कानातले झुमके काढू लागली.तिचं लक्ष दरवाजाकडे गेले.
"आकाश pls मस्ती नको चल आत ये आणि निशू कुठे गेली?"
अचानक एक जोरात किंकाळी ऐकायला आली.
आकाश निशूला उचलून वर आला.काव्या बेशुध्द पडलेली दिसली.
हळूहळू काव्या शुध्दीत येत होती.आकाशला बघून तिला रडू कोसळल.ती रडत रडतच सांगत होती.ती आरशासमोर बसली होती तेव्हा दरवाजा वर कोण तरी आहे अस तिला वाटल तिला वाटल आकाश असेल.ती उठून दरवाज्याच्या दिशेने गेली तर तिला जे दिसलं,ते भयावह होतं. दरवाज्याकडे एक मुलगा उभा होता.लाल भडक असे त्याचे डोळे , त्याचा चेहरा अर्धा जळालेला होते, अगदी मेण कस वितळतं तस त्याच्या चेहर्याची एक बाजू दिसत होती.
"काव्या...अग भास झाला असेल ग सोना तुला..बोललो होतो ना एकटी नको जाऊपण ऐकणार कोण ना..? तुम्ही बायका ना...."काव्याच्या गालावर हलकीशी चापट मारून आकाश बोलला.
"आकाश पण तू कुठे होतास?"
"मी निशूसोबतच होतो खाली..लाईटचा Problem सोल्व्ह होतो का बघत होतो."
तेवढ्यात निशू बोलली"आपण एकसाथ झोपूया ना तिघ please पप्पा"
काव्याने आणि आकाश ने होकार दर्शवला. औषधांमुळे काव्याला त्या रात्री झोप लागली.पण असे भास होणं आता नित्याचं होऊ लागलं. एकदा तर कहरच झाला.निशू त्या मुलासोबत खेळत होती.आता मात्र काव्याचे धाबे दणाणले.पण थोडी हिम्मत करून ती पुढे गेली आणि त्या दोघांचा संवाद ऐकायचा प्रयत्न करू लागली.
"दादा तू का माझ्या मम्मीला घाबरवतोस रे?जा कट्टी"निशा त्या मुलाला सांगत होती.तेवढ्यात त्या जमिनीवर सॅड symbol रेखाटलं गेलं.
"चल दादा मी तुला माफ करते पण पुन्हा अस नको करूस हा"तर जमिनीवर आता smile symbol आलं.
"दादा मी ना आता सर्वांना सांगणार की माझा दादू जादूगर आहे,टाटा दादा मी जाते हा"
तसा तो मुलगा अदृश्य झाला भित्री असली तरी काव्या समंजस होती.ती निशूजवळ आली आणि तिला प्रेमाने विचारलं की कोण होता ग तो?निशू बोलली " मम्मा तो ना माझा दादा आहे.आम्ही ना खूप खेळतो..त्यालाmagic पण येतं मम्मा"
"हो का , पण बाळा तुला त्याची भिती नाही का वाटतं?"तर निशू बोलली ,"मम्मा म्हणून दादा एकटा असतो आणि तू मला एकदा बोलली होती ना आपण कसे दिसतो ते Important नाही"
काव्याने मायेने निशूच्या डोक्यावर हात फिरवला. आता मात्र काव्याच्या मनात काही वेगळंच चालू होतं.असेच दिवस पुढे सरकत होते.निशूला शाळेत सोडून काव्या थेट "वात्सल्य" मध्ये आली.मॅडमचा दरवाजा उघडाच होता.तिने Knock केलं तस आतून आवाज आला "आत या."
"अरे शिंदे मॅम तुम्ही , आज अचानक इथे कशा?काही अडचण?"खुर्चीवर बसलेल्या ' देसाई' मॅडम नाकावर आलेला चश्मा वर करत बोलल्या.
"हो,actually मला निशा बद्दल जाणून घ्यायचं होतं"
"काही problem झाला आहे का?निशा 9 वर्षाची असताना तुम्ही दत्तक घेतलं होतं इथून , याला 2 वर्ष झाली आता" काव्याने देसाई मॅडमना निशाच्या past बद्दल विचारलं.पण अशी कोणाची माहिती देऊ शकत नाही अस सांगून देसाई मॅम विषय टाळत होत्या.काव्याने खूप Request केल्यानंतर त्यांनी सांगायला सुरूवात केली.निशाला आईवडील नव्हते पण तिचा भाऊ खूप प्रेम करायचा तिच्यावर.तिने शिकून मोठं व्हावं यासाठी तो 18 वर्षाचा मुलगा खूप मेहनत करायचा.त्याच्यासेठने एका चाळीतच वरची एक खोली त्याला राहायला दिलेली.पण एके दिवशी अचानक त्या चाळीच्या वरच्या खोल्यांमध्ये आग लागली.निशाला वाचवण्यासाठी तिच्या भावाने तिला तिथून खाली फेकल,निशा वाचली पण तिच्या डोक्याला लागल परिणामी ती सर्व काही विसरली.तिचा भाऊ त्या आगीत वाचू नाही शकला. निशाला इथे तिचे शेजारी घेऊन आले.काव्याचे डोळे पाणावले.ती घरी आली,तिच्या मनात एक भीती होती की जर तो निशूला घेऊन गेला तर...
तेवढ्यात आरशावर काही लिहिलेलं तिने वाचलं."माझ्या बहिणीला सांभाळा.तिला खूप शिकवा.मी एक भाऊ म्हणून तिच्यासोबत नेहमी असेन."
तेवढ्यात निशा शाळेतून आली, ती अक्षरे गायब झाली.
"मम्मा मी बाहेर जाऊ का?"
"हो जा पण आधी fresh हो,दादाला त्रास नको देऊस हा "काव्याच हे बोलणं ऐकून निशा हसायला लागली..आणि काव्याच्या पण चेहर्यावर हसू आलं..
मस्त....छान कथा...
मस्त....छान कथा...
हम्म.. शेवट दु:खी होतो की
हम्म.. शेवट दु:खी होतो की काय अशी भिती वाटली.. पण .. चांगला केलात.. आवडली कथा
धन्यवाद प्रमोदजी
धन्यवाद प्रमोदजी
अनघा...मुळात भयकथा लिहायची
अनघा...मुळात भयकथा लिहायची होती.. पण प्रयत्न फसला..
khup chann shevat kelat,
khup chann shevat kelat, nehami bhute ghabravailath pahijeth ka.
धन्यवाद मानसीजी
धन्यवाद मानसीजी
चांगली लिहिली आहे कथा .
चांगली लिहिली आहे कथा .
धन्यवाद
धन्यवाद
भयकथा नसली तरी "गोड"कथा झाली.
भयकथा नसली तरी "गोड"कथा झाली. आवडली.
धन्यवाद.. मयुरी तू MHE पेजवर
धन्यवाद..
भयकथा नसली तरी "गोड"कथा झाली.
भयकथा नसली तरी "गोड"कथा झाली. आवडली. +१
धन्यवाद आबासाहेब
धन्यवाद आबासाहेब
छान कथा... आवडली
छान कथा... आवडली
धन्यवाद राहुल दादा
धन्यवाद राहुल दादा