Submitted by सुप्रिया जाधव. on 13 October, 2016 - 01:53
या गैरसमजांनीच सगळा घोळ होतो
नाते उसवते आणि बट्टयाबोळ होतो
फुटणार असते तांबडे मिनिटात काही
दाटून येते मळभ अन झाकोळ होतो
उपकार मानूया मनोमन घसरणीचे ?
एकेक थेंबाचा नवा ओहोळ होतो
आल्हाददायी भासते सर विस्मृतीची
वादळ स्मृतींचे घेरते, कल्लोळ होतो !
उद्ध्वस्त होण्याची मिळे घाऊक शिक्षा
प्रेमात पडण्याचा गुन्हा किरकोळ होतो
जुंपून टाका बैल घाण्याला मनाचा
मोकाट सुटल्यावर अनावर पोळ होतो
गल्लीत शिरताना तुझ्या हा प्रश्न पडला
की राजरस्त्याचा कशाने बोळ होतो ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त! खूप आवडली ही गझल.
जबरदस्त! खूप आवडली ही गझल. माझ्या तरी आवडत्या दहात.
काही क्षणातच तांबड़े फुटणार
काही क्षणातच तांबड़े फुटणार असते
दाटून येते मळभ अन झाकोळ होतो
वरवर मनाचे रान हिरवेगार दिसते
वणवा स्मृतींचा पेटतो, कल्लोळ होतो<<<< सुरेख शेर
मनःपूर्वक धन्यवाद ! दक्षिणा
मनःपूर्वक धन्यवाद !
दक्षिणा विशेष !!
अप्रतीमच !!!
अप्रतीमच !!!
फारच छान गझल. आवडली .
फारच छान गझल. आवडली .
खुप सुन्दर गजल आहे....
खुप सुन्दर गजल आहे....
मनापासून आभार !
मनापासून आभार !
झाकोळ,ओहोळ,पोळ...चांगले
झाकोळ,ओहोळ,पोळ...चांगले शेर!गझल छानंच!