‘अनिर्बंध’ (निवृत्त) न्यायाधीश

Submitted by टोच्या on 4 October, 2016 - 12:51

‘अनिर्बंध’ (निवृत्त) न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी, ‘बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना खांबाला विवस्त्र बाधून शंभर फटके दिले पाहिजेत’, असं वादग्रस्त ट्विट केलं आहे. मार्कंडेय काटजूंच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मीडियाला दिवसभर चघळायला एक विषय मिळाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी अशा प्रकारची हिंसक भाषा वापरणे कितपत योग्य आहे. यापूर्वीही अण्‍णा हजारे यांच्या आंदोलनाच्या वेळी नगरचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांचीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये प्रसिध्द झाली होती. एका चॅनलवरील चर्चेत त्यांनी समोरच्याला थेट ‘जीभ छाटून टाकू’ अशी भाषा वापरल्याचे मला आठवते. परवा नाशिकमध्ये एका न्यायाधीशाला दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी पकडले आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाईही केली. न्यायाधीश पद भूषविणाऱ्या व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनावर, समाजातील वागण्या-बोलण्यावर बरीच बंधने असतात, असे ऐकले होते. वरीलप्रमाणे जर न्यायाधीश पदावरील व्यक्तीचा स्वभाव, मानसिकता असेल तर त्याचा एखाद्या केसच्या निकालावर निश्चितच प्रभाव पडत असेल. माझ्या माहितीतील एक न्यायाधीश इतके देवभोळे आहेत की ते कायम भजन, कीर्तनात दंग असतात. वास्तविक, घटनेप्रमाणे न्यायाधीशांनी विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगावा, असे मला तरी वाटते. तर चर्चेचा मुद्दा असा की, न्यायाधीशांच्या व्यक्तिगत जीवनावर, त्यांच्या वागण्याबोलण्यावर काही बंधने असतात का? माबोतील जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकावा…

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निवडण्यापूर्वी सिनेटचे लोक त्यांची कस्सून उलटतपासणी करतात, त्यात ते खात्री करून घेतात की या न्यायाधीशांच्या निर्णयात त्यांच्या धर्माचा किंवा गैर वर्तन करण्याचा संबंध येणार नाही. राज्यांमधील न्यायाधीशांनाहि हाच नियम आहे.

भारता काय नियम आहेत?

अहो नंद्याभाऊ, भारतातली न्यायसेवा व न्यायाधीश हे निवडून नाही यावे लागत. ते डावे उजवे विचारसरणीशी बांधील नसतात. तुमच्या अमेरिकेत एव्हढ सिनेट वगैरे तपासणी करते तर न्यायाधीश निवडणुकेचा मुद्दा का बनतो. अमूक न्यायाधीश उजवा तर अमूक डावा हे एव्हडे उघड का असते हो? हिलरी आल्यावर सुप्रीम कोर्ट लिबरल होईल असा दंगा का होतो? आमच्या भारतात सरकार कुठलेही आले तरी न्यायाधीशांना फरक पडत नाही व ते अल्ला येशूचा कॅल ना ऐकता घटनेनुसार व बुद्धेनुसार निर्णय घेता येतात.
अजून भारताचा ख्रिश्चन सौदी अरेबिया नाही झालेला अमेरिके सारखा

टण्या +१
न्यायाधीशाच्या निवडीवरून, त्याच्या पोलिटिकल बांधिलकी वरून इतका गोंधळ अमेरिकेतबघून अचंबित व्हायला झालेलं. गर्भपातासारख्या मुद्यांवर अजून आणि यापुढे कित्येक वर्षे अमेरिका भांडत राहील. तीच गत बंदुका वापरण्याची.
बाकी न्यायाधीश समाजातूनच येतात त्यामुळे फार वेगळे व्यक्तिमत्व असावे ही अपेक्षाच गैर आहे.

तसेच कौंटी लेवालच्या न्यायाधीशांची अमेरिकेत निवड होते की नेमणूक?

नंद्याभाऊ, खरे तर काटजू तुमच्या पठडीतले आहेत. प्रकांड पंडित, बंधू-वडील-काका लोक सगळे उच्चाविद्याविभूषित कायदेतज्ज्ञ वगैरे. तसेच काटजू जे बोलतात ते बरेचदा उपरोधिक असते. तुम्हाला एकदम समजायला हवे त्यांचे बोलणे

टण्या, अमित, निवडणुकीचा मुद्दा यावेळेस बनला आहे. मागे २-३ वेळा ऐकला नव्हता. कारण यावेळेस एक जागा रिकामी आहे. कॉन्झर्वेटिव्ह्ज आणि लिबरल असे ४-४ जण आहेत. त्यामुळे हा/ही जो कोणी असेल त्यावरून निर्णय लिबरल साईडने लागतील की कॉन्झर्वेटिव्ह हे यापुढे ठरेल. त्यात यांनी आपला जज आणला, नंतर त्यांनी आपला असे होउ शकत नाही. एकदा जज अपॉइण्ट झाला की झाला.

त्यामुळे या मुद्द्यावर रान उठवणे रास्त आहे इथे.

मूळ लेखाबद्दल - न्यायाधीशांना निवृत्त झाल्यावर काही बंधने राहात नसावीत बहुधा भारतात. ते कोळसे पाटील दादोजी कोंडदेव पुतळा हलवण्याबद्दल जे चालले होते त्या वादात सहभागी होते असे लक्षात आहे.
http://www.dnaindia.com/mumbai/report-chargesheet-filed-against-ex-judge...

आणि न्यायाधीशाने वैयक्तिक जीवनात धार्मिक असायला काय हरकत आहे. ज्याची त्याची श्रद्धा. विज्ञानाशी संबंधित गोष्टी व स्वतःच्या धार्मिक श्रद्धा बहुतांश लोक स्वतंत्र ठेवतात. त्यामुळे इस्रो चा अध्यक्ष देवळात गेला तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही.

भारतात सिटिंग जजेसने (कोर्टाने!) कसे वागावे याचे संकेत आहेत. हे न्यायाधीश लोक तुम्हाला जिथे पोस्टिंग आहे तिथल्या स्थानिक बारच्या पार्ट्यांना (इथे बार म्हणजे बार असोसिएशन, बीअर बार नव्हे!) वगैरे जात नाहीत. तसेच स्थानिक वकिलांशी, इतर धनाढ्य/बलाढ्य लोकांशी सलगीचे संबंध, घरोबे करू नयेत असेही संकेत आहेत. त्यामुळे यांची उठबस सहसा जिल्ह्यातील/तालुक्यातील इतर क्लास१/२ कर्मचार्‍यांचे जे क्लब असतात तिथेच असते.
तसेच न्यायाधीशांची एका ठिकाणी २-३ वर्षांपेक्षा जास्त पोस्टिंग होत नाही.

निवृत्त न्यायाधीशांच्या वागण्या-बोलण्यावर मात्र काही निर्बंध असतात असे ऐकिवात नाही. त्यात जे न्यायाधीश चौकशी कमिशन वगैरेंवर असतात त्यांना हेच संकेत लागू असावेत.

मार्कंडेय काट्जू प्रेस काउन्सिलचे चेअरमन झाले होते निवृत्तीनंतर.

धन्यवाद नंद्या, टण्या, अमितव, फारएण्ड.
न्यायाधीशांच्या व्यक्तिगत श्रध्दा, राजकीय मते, विशिष्ट बाजूने असलेला कल याचा न्यायप्रक्रियेवर कितपत परिणाम होत असेल? दुसरा मुद्दा न्यायधीशांनी भले ते निवृत्त का असेना, बेताल वक्तव्ये करणे कितपत योग्य आहे?

दुसरा मुद्दा न्यायधीशांनी भले ते निवृत्त का असेना, बेताल वक्तव्ये करणे कितपत योग्य आहे? >>> एकदा निवृत्त झाले की त्याना सामान्य माणसाचा कायदा लागेल. सामान्य माणसाला बेताल वक्तव्ये करायला (धार्मिक बेताल वक्तव्ये सोडुन) बंदी नाही

सामान्य माणसाला बेताल वक्तव्ये करायला (धार्मिक बेताल वक्तव्ये सोडुन) बंदी नाही >>>> Lol

"एकदा निवृत्त झाले की त्याना सामान्य माणसाचा कायदा लागेल. सामान्य माणसाला बेताल वक्तव्ये करायला (धार्मिक बेताल वक्तव्ये सोडुन) बंदी नाही" - हे मान्य आहे. मिडीया ने सुद्धा अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देताना 'माजी सरन्यायाधीश' वगैरे बिरुदं न लावता दिली तर त्या पदांची प्रतिष्ठा जपली जाईल.

शंभर फटके , गोळी घालीन इ इ ही अलंकारीक भाषा आहे ... उपमा / अतिशयोक्ती वगैरे वगैरे ..... प्रत्यक्षात असे कुणी करत नाही... आपली भावना व्यक्त करायला वापरलेला तो एक भाषिक प्रकार आहे.

मिडीया ने सुद्धा अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देताना 'माजी सरन्यायाधीश' वगैरे बिरुदं न लावता दिली तर त्या पदांची प्रतिष्ठा जपली जाईल. >> सहमत.

साहिल शहा,
एकदा निवृत्त झाले की त्याना सामान्य माणसाचा कायदा लागेल. सामान्य माणसाला बेताल वक्तव्ये करायला (धार्मिक बेताल वक्तव्ये सोडुन) बंदी नाही>> त्यामुळेच आपल्याकडे बेतालांचा सुकाळ आहे..

फेरफटका,
मिडीया ने सुद्धा अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देताना 'माजी सरन्यायाधीश' वगैरे बिरुदं न लावता दिली तर त्या पदांची प्रतिष्ठा जपली जाईल.>> खरं आहे. पण मीडिया अशा बातम्यांनाच जास्त महत्व देतं, हे दुर्दैव…

अनिलचेंबूर,
शंभर फटके , गोळी घालीन इ इ ही अलंकारीक भाषा आहे ... उपमा / अतिशयोक्ती वगैरे वगैरे ..... प्रत्यक्षात असे कुणी करत नाही... आपली भावना व्यक्त करायला वापरलेला तो एक भाषिक प्रकार आहे.>> अलंकारिक भाषा आहे हे खरं आहे. पण त्या विशिष्ट पद भूषविलेल्या व्यक्तीच्या तोंडी ती सार्वजनिक पातळीवर शोभत नाही. अशा बेताल बोलण्यामुळे नकळत त्या पदाचीही प्रतिष्ठा कुठेतरी डळमळीत होते.