एकतर्फी

Submitted by Poetic_ashish on 25 September, 2016 - 10:44

प्रेमाची साकेंतीक भाषा, कधी कळलीच नाही,
ह्र्द्यात आग लागूनही,ती कधी जळलीच नाही,
मला तिची जाणीव, कधी उमगलीच नाही,
अंत:करणात प्रेमाची आशा,कधी फळलीच नाही,

तिच्या डोळ्यातली निळाई,मला कधी भावलीच नाही,
प्रेमात चपळ असूनही, ती भावनांच्या मागे धावलीच नाही,
तिच्या खाणाखुणा मला कधी समजल्याच नाहीत,
तिचे बोलके डोळे, कधी काही बोललेच नाहीत,

ती एकतर्फी असूनही निराश कधी झालीच नाही,
काळाच्या पडद्याआड ती कधी गेली नाही,
तिने प्रेमाचा बाउ कधी केलाच नाही,
प्रितीची मर्यादा कधी पार केली नाही,

इश्काच्या अपयशाने दु:खी ती कधी झाली नाही,
सुंदर रुपाची मोहीनी तीने कधी घातली नाही,
इश्काच्या रोगापायी जीवनसूख तिने कधी घेतलेच नाही,
मृत्यूच्या पंखाखाली, ती कधी सामावली नाही,

प्रेमात त्याच्या ती, अशी काही रंगून गेली,
की तिच्या मर्यादेचीही मर्यादा आता पार झाली,
शेवटी तिची मला उत्कट प्रेम भावना उमगली,
अन् तिने दाखवून दिले, ती कधी हरलीच नाही,

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users