वेळ ही निराळी (भाग-दोन)

Submitted by कविता९८ on 22 September, 2016 - 11:51

वेळ ही निराळी
भाग - 2

केवलला माझ्यापेक्षा पण चांगली कुकींग येते हे माहित नव्हतं मला.
जेवुन झाल्यावर पुन्हा गप्पा मारायला सुरु करणार तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला.
केवलने दरवाजा उघडताच एक क्युट छोटी मुलगी आत आली.
मी आधी पण केवलच्या घरी आलेली आणि या मुलीला बघितलेलं सुध्दा..
पण नाव आठवत नव्हतं.
तस मला नाव आठवायची गरजच पडली नाही कारण केवलने तिला आवाज दिला..
"पियु काय ग आता आली दादा कडे.
शाळेतून कधीच घरी आलेली ना.."

"अरे दादु माझी ना मावशी आलेली.
हे बघ मला कँडी दिली.."
तिने कँडी हा शब्द बोलताच पुढे काय होणार याचा अंदाज आला मला.

"दादु तू खाणार का कँडी"
हातातली एक कँडी केवलला देत पियु बोलली.
केवल : "नको माझं पोट भरलयं ग,कऊ तु खाणार का?"
मी : मला पण नको..

"दादु तुला कँडी आवडत नाही का?"
फक्त दहा अकरा वर्षाच्या पिऊ ने विचारलेला प्रश्न ऐकून हसू की रडू समजत नव्हत.
पण केवल काय उत्तर देतोय याची उत्सुकता होती मला..
आणि केवलने दिलेलं उत्तर ऐकून मी हसत हसत तोंडावर हात ठेवला..

"अग पिऊ मला कँडी खूप आवडते"
केवल बोलत असताना हसत होता हे मी बघितलं.
केवल पिऊ सोबत बिझी झाला आणि तेवढ्यात मला पण कॉल आला अन् मी कॉल वर बिझी.
मी : हा.बोल अजु..

अजय : कऊ यार आहेस कुठे.
सकाळ पासुन ऑफलाईन.
एवढी बिझी??

मी : अरे बाबा सकाळी कॉलेज मध्ये
होती. आणि आता फ्रेंडच्या घरी
आहे.

अजय : 6 चा इवेंट आहे दादरला
तू 5.30 पर्यंत तरी दादरला
ये.

मी : तु मला ऑर्डर नको देऊ
हा..तुझी gf नाही मी..आणि
बँड मेंबर पण नाही

अजय : टाईम वर ये
बाय..आणि नीट ये
आरामात.सुमित, दिप,करण
सर्व येणार आहे.

एवढ बोलून कॉल कट केला त्याने.
मागून केवल आला..
"काय गं..कोणाचा कॉल?"

"अरे आहे एक फ्रेंड....अजय..ओळखतो ना त्याला..ते सोड.चल ना माझ्या सोबत.. प्लिज.."

"कुठे ते सांग.. येतो मी सोबत..
डोन्ट वरी.."

"दादरला..चल ना निघुया आताच..
पिऊ गेली घरी??
मी ठिक दिसतेय ना??
की घरी जाऊन चेंज करून मग जाउ??"

केवल : "अग हळू जरा..पिऊ गेली घरी.. आणि तु मस्त दिसतेयं..
थोड फ्रेश हो मग निघु.."
शिवाजी पार्कला पोहचताच पाच पांडव दिसले.
पाच पांडव म्हणजे अजय,दुष्यंत,सुयोग,विराज आणि स्वप्निल..
केवल पण या सर्वांना आधी पासून ओळखत असल्याने आणि आम्ही सर्व गप्पा मारत उभे होतो.
तेवढ्यात सुमित, दिप , करण आले.
इवेंट सुरू होण्यास वेळ होता.
सुमित, दिप , करण हे तिघं केवलला ओळखत नव्हते मग ओळख परेड सुरू झाली.

"केवल हा दिप ..हा सुमित आणि हा करण..तिघं पण लास्ट year ला आहेत.
अँड तिघं पण कलाकार आहेत..
N gyz हा केवल...."

करण : याला तर सर्व ओळखतात..
याच ते साँग तर रोज ऐकतो
आम्ही..

सुमित : उद्या रविवार आहे सो सर्व जण फ्री असणार..उद्या माझ्या घरी या..जरा मस्ती मजा करू..केवल आणि तुमच्या बँडची जुगलबंदी पण होऊन जाईल.. अँड हा परवापासून गणपतीची सुट्टी..आमच्या घरचे सर्व गावी गेले आहेत.. कोण कोण येणार??

दोन तीन दिवस चील करू असा विचार करून सर्वांनी होकार दिला..
सुयोग दादाची gf सलोनी आणि करणची gf ऐश्वर्या येत असल्याने मी पण तयार झाली.
इवेंट सुध्दा मस्त पार पडलं.
पुढच्या दिवशी सकाळी सुमितच्या घरी भेटायचं , येताना दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेऊन यायच हे सर्व नक्की झाले.
लगेच WhatsApp group पण तयार केला.

पुढच्या दिवशी केवल गाडी घेऊन मला पिकअप करायला आला.
सर्व तयारी करून निघालो..
केवल आणि अजु च्या ग्रुपला मम्मा पप्पा ओळखत असल्याने मला जायची परवानगी मिळाली.
सुमोने पत्ता आधीच ग्रुप मध्ये पाठवला होता..

सुमोचं घर मस्त सजवलेलं होत..
त्याच्या घरी पहिल्यांदाचा गेली होती..
एक एक करत सर्व जण आले..
केवल,दिप,करण-ऐश,सुयोग-सलोनी,विराज,स्वप्निल,दुश्यंत आणि मी..
बँडचे इवेंट असल्याने गावी कोण गेल नव्हत..
तीन दिवसांनंतर इवेंट होता..
सर्व जण गप्पा मारत होतो...
पण अजय अजूनही आला नव्हता..
कॉल उचलत नव्हता..
दहा मिनिटात तो आला..
पण एकटा नाही..
सोबत पुजा होती..
ती येईल अस वाटलं नव्हत आम्हाला..
मी केवलकडे बघितलं..
त्याच्या मनात काय चालू होत हे मला समजल..
पुजाने केवलकडे बघून एक स्माईल दिली..
एरवी हसणारा केवु शांत होता..
आणि त्यामागील कारण फक्त आम्हा तिघांना माहित होतं..
मला,केवलला आणि पुजाला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users