Submitted by स्वप्नाली on 19 September, 2016 - 14:24
"रात्रीस खेळ चाले" चा धागा भरून वाहतो आहे...विश्वास्राव च्या आधी आपणच खूनी शोधूया...
चला आपण आपले तर्क-वितर्क मान्डूया खूनी शोधन्यासाठी:
--------------------------------------------------------------------------------------------------------
खूनीचे नावः
खून करण्याचे कारणः
पूरावा:
--------------------------------------------------------------------------------------------------------
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
खूनीचे नाव- पांडू खून
खूनीचे नाव- पांडू
खून करण्याचे कारण- कथा काय होती हेच इसरलंय.
पुरावा- तो स्वत:च लेखक आहे.
-----------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------
खूनीचे नावः माधव नाईक
खून करण्याचे कारणः
)
१) माधव सध्या एक
पुस्तक लिहीतो आहे...मला वाटते की, त्या पुस्तकासठी खाद्य मिळावे म्हणून तो स्वतः च हे सग ळे घडवून आ ण त असावा
२) निलिमा चा कशावर ही विश्वास बसत नाही, तिचा विश्वास बसावा म्हनून ही तो हे करत असावा
३) तो , त्याचे हाव-भाव, उगाच साल-सूद बनने, ह्या सगळ्या मुळे तो च ह्या मागे असावा असे वाटते (टीपीकली, ज्याच्यावर अज्जीबात सन्शय येणार नाही, असाच गुन्हेगार असतो
पूरावा:
१) त्याच्यालपून ठेवलेल्या डायर्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------
ज्जेब्बात..
ज्जेब्बात..
मला वाट्टं या मागे नाना
मला वाट्टं या मागे नाना असावेत ,ते फक्त बेडवर पडुन असल्याचं नाटक करतात व नंतर सुम मधे जाउन खून करुन येतात.
सि. जि. ..++१ न. !! नाना ल
सि. जि. ..++१ न. !!
नाना ल कोनीच चहा-पोहे देत नाही म्हनुन...
खूनीचे नाव- निलिमा खून
खूनीचे नाव- निलिमा
खून करण्याचे कारण- कॅरॅक्टर गंडवल्यामुळे (सिरेलीत) किंवा काय कराव काहिच कळत नसल्याने खून तरी करुयात म्हणुन
पुरावा- आधी भूताखेतांच्या विरोधात असलेली एकदम त्यांच्यावर विश्वास दाखवू लागलिये. सुशल्याची माय फक्त तिच्याच अंगात येते कारण दोघी संपत्तीवर डोळा ठेवुन
अरे, पण कोणाचा खुनी शोधताय?
अरे, पण कोणाचा खुनी शोधताय? नेन्यांचा का अजयचा? अर्थात अजयचा खून झालाय की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे.
कदाचित खुळोच (पांडु) खून
कदाचित खुळोच (पांडु) खून करता..
पांडुचा लगीन होत नाय ना म्हणून करत असेल
अजय पोलीस होता ना..?? अस मला
अजय पोलीस होता ना..??
अस मला वाटतं
अग कळ्ळ की स्वप्ना, अजयचा खून
अग कळ्ळ की स्वप्ना, अजयचा खून झालाय आणि तो कॉन्स्टेबल होता जो विश्वासरावला जीवावर उदार होऊन या केसमधे मदत करत होता
जोपर्यंत मी अजयची डेड बॉडी
जोपर्यंत मी अजयची डेड बॉडी डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही - इति निलिमा
नेनेंचा खूनः कोणीही असू
नेनेंचा खूनः कोणीही असू शकतं
खूनीचे नावः माई
खून करण्याचे कारणः माईंना अण्णांचा गेम करताना नेनेंनी पाहिलं / अण्णा आणि शेवंता ह्यांची गाठ नेन्यांनी घालून दिली होती / माई वेड्या आहेत / नेने त्यांच्या मुलांच्या वाट्याची जमिन घेऊ बघतात
पूरावा: माईंना येणारे वेडाचे झटके / सुशल्या विहिरीत बुडून मेला असं त्यांना वाटणं आणी तेव्हची त्यांची वागणू़क
खूनीचे नावः पांडू
खून करण्याचे कारणः अण्णांचा अनौरस मुलगा. नाईकांना संपवून टाकायचा ध्यास
पूरावा: तो नेनेंना अभिरामच्या लग्नाच्या दिवशी भेटला होता असं त्याने सांगणं
खूनीचे नावः सुशल्या
खून करण्याचे कारणः नदीकाठची शेवंताच्या नावाची जमिन नेन्यांना हवी.
पूरावा: नेन्यांना धमकी दिली होती. आणि अभिरामच्या लग्नाच्या दिवशी ती लग्नात नव्हती.
खूनीचे नावः अण्णाचं भूत
खून करण्याचे कारणः नेन्यांनी अण्णांना जमिनीच्या मोहापायी मारलं
पूरावा: भुताकडून काय पुरावा मागणार आता?
खूनीचे नावः जगनशेठ
खून करण्याचे कारणः त्याला जमिन हवी आहे
पूरावा: त्याची आणि नेन्यांची ओळख होती हे त्याने लपवून ठेवलं होतं. त्याला जमिन काहीही करून हवी आहे.
अजयचा खूनः १. छाया - सात खून
अजयचा खूनः
१. छाया - सात खून माफ पाहून मिळालेली स्फूर्ती.
२. सुशल्या - अजय वर एकतर्फी प्रेम
३. पांडू - नाईकांना अडकवणे
४. अर्थातच जतिनशेठ
मला कधी कधी अभिरामचा संशय
मला कधी कधी अभिरामचा संशय येतो. (रहस्यकथेतला सगळ्यात अनपेक्षित धक्का).
खूनीचे नावः रघूकाका खून
खूनीचे नावः रघूकाका
खून करण्याचे कारणः नाईकांच्या घरात झालेला त्यांचा अपमान.
पूरावा: रघूकाकांच आणि नाईकांच भांडण होतं, जमिनीवरूनच. अजयला पण प्रथम त्यांनीच आणलं होतं सुसल्यासाठी.
हायला, अजय पोलिस होता का ?
हायला, अजय पोलिस होता का ? मला वाटले च होते...तो खरच मेला असेल का ? त्याला विश्वास्राव ने पेरला होता क गुप्त पोलिस म्हनून ? पण तो विश्वास्राव यायच्या आधी पासून छाया ला भेटत होता ना ?
नाथा बद्दल काय मत आहे? त्याला तर आ ण्णा बरोबर बरेच "मुडदे" पाडायची सवय आहे ना
हो, आजच्या एपिसोडमध्ये
हो, आजच्या एपिसोडमध्ये सुषल्या नाथावर आरोप करणार आहे की अजयचा खून तूच केलास म्हणून. रच्याकने, तिने नाथा आणि दत्ता ह्यांनी माझा खून कराय्चा प्रयत्न केला होता असं विश्वासरावला सांगायची संधी का सोडली काय माहित.
खून करून झाडावर लटकावणं हें
खून करून झाडावर लटकावणं हें शारिरीक दृष्ट्या रघूकाका व नाथा या दोन संशयितानाच शक्य असावं.
आता छाया त्या झाडाखाली जाऊन
आता छाया त्या झाडाखाली जाऊन 'सुषल्या' स्टाईल अजयवांगडा बोलणार काय?
(No subject)
नेने काका- खुनी- जगन
नेने काका-
खुनी- जगन शेठ
कारण- जमिनीचे व्यवहार आणि त्यातील भांडणे.
पुरावा- नाईकांना कितिही राग आला तरी इतके वाईट नसतील.
व्यपार्याला व्यापार्याने मारले असेल.
अजय-
याचा खुन झालाच नाहिये. छायाचे वाईट व्हावे असे घरातील कोणालाच वाटणे अवघड आहे.
विश्वासरावाचा बनाव आहे हा.
घरात जे चमत्कारिक घडतय ते मात्र माधव ची करणी आहे. त्याला बेस्ट्सेलर कादंबरी द्यायची आहे ना.
झाडाला लटकणार्या अजयला पाहुन
झाडाला लटकणार्या अजयला पाहुन बरेच लोक तिथे धावत गेले, त्यात छाया, गवरी, स्वानंदी, ललिता, पसरणी ( निशा ), बानु, राधिका या आघाडीवर होत्या.
छाया :- (हंबरडा फोडुन ) अगे माजे बाय गे, का गेलाव माका हयं एकट्या सोडुन. ह्ये बगा, बगाना मियां हिरवी साडी नेसलान, चुड्यो घातल्यान. एवडी सजुन मियां तयार झाले तर तुमी माका सोडुन गेला. गणेशा, आता मी काय करु?
गवरी:- तुझे दु:ख मला समजते छाया, पण रडु नको. माझ्याकडे बघ जरा, माझ्या चेहेर्यावर एक तरी सुरकुती दिसते का? माझ्या सारखे थंड रहायला शिक जरा, आवर स्वतःला.
स्वानंदी:- छाया, छाया रडु नकोस गं. सत्य स्वीकारायला शिक, अखेर तेच उजेडात येते.
ललिता:- छाया, तू हिचे काही ऐकु नको, म्हणे सत्य उजेडात येते, अहाहा. माझे आले का कधी काही बाहेर? माझ्याकडुन शिक जरा.
पसरणी ( निशा) :- छाया, रडु नकोस, अजयने तुला काही भेटी वगैरे दिल्या होत्या की नाही? दिल्या असतील तर त्या जपुन ठेव, त्याच कामाला येतील. नाहीतर मी पण तुला अम्मासारखी कुणीतरी गाठुन देते, चांगली आयुष्यभराची कमाई होईल. भाऊ आणी माई काय जन्माला पुरणार आहेत का?
बानु:- मला ह्येंच्याकडुन काय बाय कळल म्हणून मी तुला भेटायला आले. तू पण माझ्याबरोबर गडावर चल, ततं देव भेटत्याल आणी तुझी मदत करत्याल. नाही म्हणू नगं, मी हाय तुझ्या बरुबर. चल माझ्या घरला.
राधिका:- अगं बया कुठल्या भैताडाने हे काम केलं असेल बाई ? आमच्या नागपूरला असलं काही झालं असत तं, मी त्याला खलात घालुन कुटला असता, हो की नाही हो विश्वास भाऊजी.
विश्वासराव कोमात, साळकाया माळकाया जोमात!
विश्वासराव कोमात, साळकाया
विश्वासराव कोमात, साळकाया माळकाया जोमात! >>>>>>>हा हा हा हा
रश्मी.. मस्त
रश्मी.. मस्त
रश्मी.. भारी. बानू आणि
रश्मी.. भारी.
बानू आणि राधिकाचं बोलणं लयच परफेक्ट. त्यांच्याच आवाजात वाचलं गेलं.
विश्वासराव कोमात, साळकाया
विश्वासराव कोमात, साळकाया माळकाया जोमात! >>
(No subject)
मी ह्या मालिकेचे फारच कमी भाग
मी ह्या मालिकेचे फारच कमी भाग पाहिले. पण मला त्या निलिमावरच संशय आहे!