जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनि जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
प्रचि ०१
नभं उतरू आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात . . .
प्रचि ०२
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
प्रचि ०३
पहाड-राने नदी-सरोवर ऊरा-उरी भेटून सार्यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस
प्रचि ०४
माती लेऊनिया गंध, होत जाते धुंदधुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात . . . .
प्रचि ०५
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
प्रचि ०६
प्रचि ०७
कोसळल्या कशा सरींवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग
आला पाऊस मातीच्या वासात ग . . .
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे लावण्य हे निराळे
प्रचि ११
गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा, मनातही ताजवा नवा नवा . . . .
प्रचि १२
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
प्रचि १३
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
प्रचि १४
बरसे पुहार, बरसे पुहार,
कांच कि बूंदे बरसे जैसे....
प्रचि १५
वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू . . . .
प्रचि १६
मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
प्रचि १७
पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा..
कधी उधाणता अन् केव्हा, थेंबांच्या संथ लयीचा
प्रचि १८
प्रचि १९
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे . . .
वाह! ४, ५, ११, १२ अप्रतिम.
वाह! ४, ५, ११, १२ अप्रतिम.
१२ मध्ये पाण्याचं हार्ट दिसतंय.
धन्यवाद मामी १२ मध्ये
धन्यवाद मामी
१२ मध्ये पाण्याचं हार्ट दिसतंय.>>>>>अगदी. म्हणुनच कॅप्शन "बरसुनी आले रंग प्रीतीचे" असं निवडलं.
मस्त फोटो जिप्सी,
मस्त फोटो जिप्सी, नेहमीप्रमाणेच
नि:शब्द !!!
नि:शब्द !!!
सर्व प्रकाशचित्रे आवडली. छान
सर्व प्रकाशचित्रे आवडली. छान आहेत.
प्रचि ०२
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे >>>> अतिसुंदर!!!!
अप्रतिम! कॅप्शन्सही मस्त आहेत
अप्रतिम! कॅप्शन्सही मस्त आहेत
नि:शब्द.
नि:शब्द.
मस्त प्रचि.. नि कॅप्शन्स का
मस्त प्रचि.. नि कॅप्शन्स का क्या केहना.. आप तो मास्टर हो..
प्रचि १० ११ १२ १४ खासच
मस्त फोटोज
मस्त फोटोज
१ २ ११ १२ आवडले. मस्त आहेत.
१ २ ११ १२ आवडले. मस्त आहेत.
सगळीच प्रचित्रे मस्तच.... पण
सगळीच प्रचित्रे मस्तच.... पण ११व्यातली हिरवी नदी विशेष आवडली
पाऊस तर मला नेहमीच आवडतो.....
पाऊस तर मला नेहमीच आवडतो..... खास करून आमच्या कोकणातला.... पण अशी ही प्रचि पाहिली की असेल तिथून धावत धावत त्या धो धो कोसळणाऱ्या पावसाला अंगावर घ्यावेसे वाटते.....
अप्रतिम जिप्सी ......
सगळेच सुंदर.. प्रचि ११ आनि १४
सगळेच सुंदर.. प्रचि ११ आनि १४ जरा जास्तच आवडले.
मस्तच...
मस्तच...
सुंदरच !
सुंदरच !
सुंदर !
सुंदर !
अहाहा! सुंदर!
अहाहा! सुंदर!
मस्तच !
मस्तच !
काय बोलू...अप्रतिम..
काय बोलू...अप्रतिम..
मस्तच. ४,१०,११ खूप आवडले.
मस्तच. ४,१०,११ खूप आवडले.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अरे व्वा मस्तच... सुन्दर...
अरे व्वा मस्तच... सुन्दर... कोकणात कधी जाणार आहेस ?
अप्रतिम
अप्रतिम
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्त फोटोज, जिप्सी!
मस्त फोटोज, जिप्सी!
वॉव! ५, ११, १४ तर खूपच सुंदर.
वॉव!
५, ११, १४ तर खूपच सुंदर.
काय भारी फोटो आहेत सगळे आणि
काय भारी फोटो आहेत सगळे
आणि काव्यपंक्ती सुध्दा....
खूप सुंदर!
खूप सुंदर!
काय सुंदर फोटो आहेत. अन
काय सुंदर फोटो आहेत. अन मथळे ही चपखल आहेत.
व्वा! खूपच सुंदर! फ़ोटो आणि
व्वा! खूपच सुंदर! फ़ोटो आणि त्याला साजेस्या काव्यपंक्ती!
Pages