मायबोलीची २० वर्षं...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१६ सप्टेंबर, म्हणजे तारखेप्रमाणे आज मायबोलीने २० वर्षं पूर्ण केली. काही मायबोलीकरांनी, जे या प्रवासात almost सुरूवातीपासून आहेत, आपणा सर्वांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुम्हालाही जर शुभेच्छा पाठवायच्या असतील तर संपर्कातून / विचारपुशीतून कळवा.

बिपिन चौधरी (असामी):

विनय देसाई (गोष्टी गावचे):

रूपा (rmd):

वैशाली पांडे (maitreyee):

संपदा आणि सत्यजीत माळवदे (daffodils / satyajit_m):

अनु आणि आशीष महाबळः

आरती रानडे (rar):
मायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जगभरात पसरलेल्या असंख्य वाचकांच्या फेवरेट्स लिस्ट मधली 'बुकमार्क्ड' साईट म्हणून 'मायबोली'चं स्थान कायम राहो.
मायबोलीला वाढदिवसाची छोटीसी गिफ्ट म्हणून हा डूडल-बुकमार्क :) bookmark.JPG

विषय: 
प्रकार: 

अरे वा ! असे जुन्या लोकांकडून मायबोली बद्दल ऐकायला मस्त वाटलं अगदी Happy

आम्ही इथेच शुभेच्छा देऊ Wink

'मायबोलीचं आयुष्यातलं स्थान' वगैरे क्लिशे आणि कृत्रिम वाटणारी वाक्यं लिहायलाही बोअर वाटतात. पण कुठल्याही आनंदाच्या, हळव्या, तणावाच्या क्षणी मायबोलीची आणि मायबोलीवरच्या सुहृदांची हटकून आठवण होते. लोक मायबोलीचं 'व्यसन' वगैरे म्हणतात. ते खरंही आहे. व्यसन लागण्याइतपत मायबोलीची सवय होते. लोक त्याचे परीणामही नंतर भोगतात ;). पण परत परत मायबोलीवर येणं सुटत नाही. ९७ सालापासून इथल्या लहान गावातल्या हिवाळातल्या थंडीतल्या एकटेपणात, आयुष्याच्या वेगवेगळ्या माईल्सस्टोन्समधे, सणासुदीच्या दिवसात, आनंदाच्या क्षणी, अत्यंत तणावाच्या काळात मायबोली कायम बरोबर असायची आणि यापुढेही असू दे ही इच्छा. मात्र अस्सल पुणेकराप्रमाणे अस्सल मायबोलीकर असल्यानं पूर्वीची ती मायबोली राहीली नाही हा सुस्काराही जाता जाता ..... Happy

शुभेच्छांची आयड्या एकदम मस्त!

मी जु आणि जा नाही, पण जेव्हा बर्फाळ वातावरणात, दुपारी ४ ला सूर्यास्त होऊन गुडुप अंधार पडल्यावर बेचैन होऊन नवर्‍याची वाट बघत दूर देशी दिवसच्या दिवस एकटी असायचे तेव्हा मायबोलीवर येऊनच माणसांत असल्यासारखं वाटायचं. अक्षरशः आधार असायचा मायबोलीचा. आता तर रोजचा दिवस मायबोलीवर आल्याशिवाय सरकत नाही.

मायबोलीला खूप मनापासून शुभेच्छा! Happy

अरे वा, मस्त वाटलं जुन्याजाणत्यांना बोलताना बघून Happy

खर्‍या आयुष्यात इतरांशी बोलताना मायबोलीवरच्या खास शब्दांचे, रेसिपीजचे, चर्चांचे उल्लेख वारंवार येतात ह्यामध्येच मायबोलीचं स्थान काय आहे ते आलं... इट्स अमेझिंग ! मायबोलीची ओळख मला पूनमने करुन दिली त्याबद्दल तिचे मनापासून आभार.

मायबोली ( भाषा आणि संकेतस्थळ दोन्ही ) चिरायू होवो Happy

वीस वर्षांची आहे आपली मायबोली.. भारीच.. आधी माहीत असते तर मायबोलीताईच बोल्लो असतो Wink

विडिओ नंतर पाहतो सावकाश.. पण कल्पना मस्तच.. येऊद्या अजून.. माझ्यातर्फेही मायबोलीला शुभेच्छा.. जेव्हा मायबोली २५ वर्षांची होईल, तेव्हा मी देखील पाठवेन.. तुर्तास ईथूनच देतो Happy

मायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जगभरात पसरलेल्या असंख्य वाचकांच्या फेवरेट्स लिस्ट मधली 'बुकमार्क्ड' साईट म्हणून 'मायबोली'चं स्थान कायम राहो.
मायबोलीला वाढदिवसाची छोटीसी गिफ्ट म्हणून हा डूडल-बुकमार्क Happy bookmark.JPG

माबोला मनापासून शुभेच्छा. या साइटमुळे जगाच्या पाठीवर जाईन तिथे आप्त भेटले व जगभरचे लोक आपले वाटत राहिले

मस्त वाटलं माबोकरांना प्रत्यक्ष बघून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकताना. मायबोलीला शुभेच्छा. Happy

admin आणि वेमा तुम्हीपण तुमचा एक व्हीडीओ टाका ना!

अरे वा मस्त!

इतकी वर्षं मायबोली सोबत आहे. विशेषतः सुरवातीला दूरदेशी एकाकी वाटत असताना मायबोलीचा जो काही आधार वाटला आहे ते सांगणं अशक्य आहे.

फारसं लिहित नसले तरी वाचनमात्र असतेच.

Long Live Maayboli!

मायबोलीला अगदी मनापासून शुभेच्छा.

तुम जियो हजारो साल......

admin आणि वेमा तुम्हीपण तुमचा एक व्हीडीओ टाका ना! >> +१ हो हो पाहिजेच

मस्त आयडिया!

अनू, आषीश आणि रमड ह्यांचे व्हिडिओ आवडले.

मायबोलीची खूप भरभराट होवो! मराठीत म्हणतात तसं, 'लाँग लिव्ह मायबोली'! Happy

सगळ्यात जुने कोण आहे हे प्रथमच समजले. अनेक नांवेही प्रथमच समजली. सदस्यनामेच फक्त माहीत होती.

मायबोली व मायबोलीकर ह्यांना मनापासून शुभेच्छा! ह्या स्थळाने मला काय नाही दिले? आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे मायबोली.

-'बेफिकीर'!

Pages